डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

परवा कॉलनीतुन येतान्ना एका बन्गल्याच्या गेटवर लाल शाईचे पाणी प्लास्टीकच्या पिशवीत बान्धुन टान्गलेले पाहिले.>>>>>
कोकणातही आमच्या गावात काही ठिकाणी मी असेच लाल रंगाचे पाणी प्लास्टिकच्या बाटलीत (बिसलेरी वा तत्सम) भरून कठड्यावर ठेवलेले, झाडाला लटकवलेले पाहिले. कारण विचारले असता माकडांच्या उपद्रवापासून सुटका मिळवण्यासाठी असे केल्याचे सांगितले. (त्यामागचे लॉजिक मात्र नाही कळले!)

माकडांना वाटेल की या घरात माकडं मारुन त्यांचं रक्त प्लास्टिक बॅग मध्ये भरुन अडकवायचा प्रघात आहे आणि ती घाबरुन येणार नाहीत Happy

ते प्लास्टिक पिशव्यांत पाणी भरून वाला प्रकार सनी ढाब्यावर पहिल्यांदा पाहीला. अगदी थोड्या अंतरांवर साधारण १ लीटर पाणी असेल अश्या पिशव्यांची बोचकी ठेवली आहेत.
चिलटं, डास इ तिथे नाहीत हे ही खरं. नक्की काय कारण असेल न कळे...

या पिशव्या डास- चिलटे होऊ नयेत म्हणून लावलेल्या आहेत. कृपया या प्रयोगाच्या यशस्विते बद्दल विचारणा करु नये! ">>>
अशी पाटी पुणे सोडून कुठे बघायला मिळणार? Lol

मला पडलेला एक प्रश्न....डास, झुरळे, पाली, मुंग्या आणि तत्सम प्राणीपक्षी 'माणसांना कसं हाकलायचं किंवा माणसांच काय करायचं' असा विचार करत असतील का??'

मला अगदी नक्की माहिती नाही पण प्लॅस्टिकच्या पिशवीत पाणी भरून त्यात कॉईन टाकल्यास त्याचे रिफ्लेक्षन वाढते आणि त्यामुळे डास चिल्टे येत नाहीत असे कोणितरी बोलल्याचं आठवतेय (रेफ. हापिसच्या बाहेरची टपरी)
कबूतरं बाल्कनीत्/घरात येऊ नयेत म्हणून म्हणे छोट्या काठीला काळं कापड लावून ते बाल्कनीत लावावं किंवा जुन्या सी डीज लटकवायच्या, त्यामुळे ती येत नाहित म्हणे. काळ्या कापडाचा उपयोग तर मी नाही केला पण सीडीज लटकवल्या होत्या. थोड उपाय झाला होता त्याचा, पण कबुतरांना थोड्या दिवसांनी त्याची सवय झाली मग येऊ लागली ती Proud
पुर्वी आमच्या कोल्हापूरच्या घरात मला आठवतंय की माझे बाबा लाईट भोवती येणारे छोटे छोटे किडे अंगावर्/खाण्यात पडू नयेत म्हणून एखादा कागद गोडेतेलात भिजवून तो ट्युब लाईट शेजारी लटकवत. मग सगळे बारिक किडे त्याला चिकटत. थोड्या दिवसांनी तो काढून नविन लावायचे.
त्या ऐवजी काही घरात पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीला आतून तेल लावून ती लटकवली जाई, जेणेकरून सगळे किडे आत पडत.

मेहेंदळे गॅरेजच्या हॉटेल मधेही प्लॅस्टीक च्या पिशव्यां मधे पाणी भरुन त्या टांगलेल्या आहेत. वरुन सूचनाही आहे की ," या पिशव्या डास- चिलटे होऊ नयेत म्हणून लावलेल्या आहेत. कृपया या प्रयोगाच्या यशस्विते बद्दल विचारणा करु नये! "
>>>>
ओह ते असं आहे होय. कालच तिथे बसलो होतो तेव्ह्या त्या पिशव्या दिसल्या. पण मालक मुळातच चक्रम असल्याने डेकोरेशन म्हणून लावल्या असतील असा विचार करून सोडून दिले Happy

कबूतरं बाल्कनीत्/घरात येऊ नयेत म्हणून म्हणे छोट्या काठीला काळं कापड लावून ते बाल्कनीत लावावं किंवा जुन्या सी डीज लटकवायच्या >> सी डीज चा प्रयोग आईच्या घरी केला होता....आमच्या सगळ्या जुन्या सी डी जिकडेतिकडे लटकवल्या...आता कबुतरे त्या सी डीज चा झोका म्हणून वापर करतात Happy
मालक मुळातच चक्रम असल्याने >>+११ पटलं Wink

आमच्या सोसायटीत २ वीजेच्या तारा आहेत
(त्यातला करंट त्या तारांना जोडणारा एक टॉवर पिसा चा मनोरा झाल्यापासून बंद केला आहे.)
२ कावळे रोज सकाळी त्या तारांवर बसून प्रातःविधी आवरतात आणि उडून जातात.वायरी ३० फुटावर आहेत पण खाली आमच्या गाड्या पार्क केलेल्या असतात ('गाड्या दुसरीकडे पार्क करा' म्हणू नका कारण बर्‍याच सोसायटी मिटींग भांडणांनंतर मिळालेले आणि रंगवलेले नवसाचे स्पॉट आहेत.)

{{{ ते प्लास्टिक पिशव्यांत पाणी भरून वाला प्रकार सनी ढाब्यावर पहिल्यांदा पाहीला. अगदी थोड्या अंतरांवर साधारण १ लीटर पाणी असेल अश्या पिशव्यांची बोचकी ठेवली आहेत.
चिलटं, डास इ तिथे नाहीत हे ही खरं. नक्की काय कारण असेल न कळे...
Submitted by योकु on 8 January, 2018 - 17:32 }}}

या पिशवीभरल्या पाण्यात त्यांना स्वतःचेच भयंकर आकार आणि आकारमानातले प्रतिबिंब दिसून आपलेच मोठ्या आकाराचे भाईबंद असताना त्यांच्याशी पंगा घ्यायला आपण इथे कशाला कडमडा? या विचाराने येत नसतील.

आमच्या घरी (कुडाळला) कामाला ठेवलेल्या बाईने पांढर्‍या प्लॅस्टीकच्या पिशव्या खिडक्याना बांधून ठेवल्यात, कबुतरे येऊ नये म्हणुन.. हल्ली कबुतरे येत नाहीत खिडकीवर हे पण खरे.. (कदाचित पिशवी वार्‍यामुळे फडफडत असेल त्यामुळे).

आंबट गोड,
आता मेहेंदळे गॅरेज मध्ये " प्रयोगाची यशस्वीता सुमारे 70% असे लिहिलेय " Happy
≥>>>>>>>>>
कागद गोडेतेलात भिजवून तो ट्युब लाईट शेजारी लटकवत.>>>>>>
यांच्यावरून आजी कडे किस्सा झालेला. संध्याकाळी घरात खूप चिलटे आली . मामे बहीण आणि भावाने आम्ही आता हमखास उपाय करतो सांगून आजीला स्वयंपाकघरा बाहेर पाठवले, मग 2 ताटांना व्यवस्थित तेल लावले आणि कोणत्याश्या पिक्चर मध्ये संध्या नाचते ,तसे ताटे फिरवत नाचले,
ताटाला भरपूर चिलटे चिकटली, ती आजीला दाखवून शाबासकी मिळवली,
पण आजी स्वयंपाक घरात आल्यावर तिचा पारा चढला.....
कारण ते ताटे फिरवायच्या नादात भिंतींवर तेलाच्या शिंतोडयांचे नक्षीकाम झाले होते.

<<कागद गोडेतेलात भिजवून तो ट्युब लाईट शेजारी लटकवत<< हो अगदी अग्दी! हे ही पाहिलय.
असेच पुर्वी परजिवी वनस्पती अमरवेल ही बल्बच्या जवळ/ घरात सेन्टरला लटकवलेली दिसे. त्याला चिलटे, डास जाउन चिकटलेले पाहिलेत.

कारण ते ताटे फिरवायच्या नादात भिंतींवर तेलाच्या शिंतोडयांचे नक्षीकाम झाले होते. >> चिलटांना तेलाने अन्घोळ घातली की काय? Lol
अजून जरर्र्र्र्रा तेल घातलं असतं तर माणसं पण चिकटली असत्ती Proud

आमच्या सोसायटीत बदामाची पुष्कळ झाडे आहेत. त्यामुळे बदाम खायला त्या झाडांवर पुष्कळ पोपट आणि खारूताई रहातात. सगळ्यांच्या गॅलरीला ग्रील असल्याने खारुताई खालून वर सातव्या मजल्यापर्यंत ग्रीलला पकडून धावत असतात. आपण गॅलरीत उभे राहिले की बऱ्याचदा आपल्या ग्रीलवर खारुताई खेळताना दिसते. ती सहसा घरात शिरत नाही. पण एकदा एक खारुताई आमच्या घरात शिरली होती. कपाटाच्यामागे जाऊन लपली होती. ती आम्हाला आणि आम्ही तिला घाबरून ह्या खोलीतून त्या खोलीत उड्या मारत होतो. मोठ्या मुश्किलीने मी तिला घराबाहेर हुसकावू शकलो. एकदा तर आमच्या घराचा मेनडोअर उघडल्याबरोबर डोअर आणि ग्रीलच्या मधोमध एक खारुताई बसलेली दिसली होती. पट्कन डोअर लावून घेतला. पण आमची पंचाईत झाली ना! घराबाहेर जायचं कसं? दरवाजा उघडल्याबरोबर घरात शिरली तर! चांगलं तासभर घरात अडकलो होतो. आणि खारुताईसुद्धा जाईना. दरवाजात मध्येच खुडखुड आवाज यायचा. मग काय केलं!!? यूपीवाल्या शेजाऱ्याला मोबाईल करून सांगितलं. "हमारे दरवाजेके पासमें जल्दी आव. वो हमारे दरवाजेके ग्रीलमें खारुताई बैठेला है, उसको जरा हाकलताय क्या?" पुढची पंधरा मिनिटे तर खारुताई म्हणजे काय हेच त्याला समजावण्यात गेली. "ओ झाडपे रहताय ना उंदीरके माफिक, ओईच बैठेलाय!" त्याचे थोर उपकार की त्याने येऊन आमची खारुताईच्या तावडीतून सुटका केली.

Pages