अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलू की फैक्ट्री" = श्री नरेंद्र मोदी >> हा हा हा https://scroll.in/video/858051/bulletins/110/art-history-music-beer-and-...

https://www.inuth.com/india/heres-the-truth-behind-rahul-gandhi-aloo-ki-...

पितळ उघडे पाडणे म्हणतात भक्तांचे. म्हणुनच म्हणले - कावीळ झाली तर ठिक आहे. जरा माहिती घ्या. नाहितर अशी उलटी पडते कि .... Lol Lol Lol

एफडिआय मध्ये पण कोणी तरी उलटे पडले म्हणे! , आणी जीसटी, मन रेगा, आधार, बाग्ला निर्वासित, रेल्वे फेअर, एलेस्क्त्रिसिटी , पेट्रोल प्राइझ, वगैरे वगैरे. थोडक्यात काहिजण २०१४ पासुन उलटेच असल्यामुळे काय उलटे पडले ते विचारत बसावे लागते. असु द्यात. होते असे भक्तांचे. ३ वर्शे बघत आहोत . Lol Lol Lol Lol

वाचा जरा ते, नुसते फेक व्हिडिओ पाहु नका. जबरीच आहेत ते.

However, Rahul Gandhi’s words have been taken wildly out of context. In his full 26-minute long speech, Gandhi speaks about the false promises made by Prime Minister Narendra Modi in the state of Gujarat. While talking about the promises Modi had made to potato farmers, Gandhi, quoting the Prime Minister, had made the potato-to-gold turning machine statement.

Around the 17-minute mark, Gandhi says,

He promised the Adivasi community Rs 40,000 crores, but he didn’t give them a single rupee. A few months ago when the floods came, he promised to give Rs 500 crores, but he didn’t give them a single rupee. He told potato farmers that he will install such a machine, that if you feed in potatoes from one side, you’ll get gold from the other side. These are not my words, these are the words of Narendra Modi

Gandhi speaks about the false promises made by Prime Minister Narendra Modi in the state of Gujarat. While talking about the promises Modi had made to potato farmers, Gandhi, quoting the Prime Minister, had made the potato-to-gold turning machine statement.

<<

श्री मोदी यांनी गुजरात मधील शेतकर्‍यांना 'एका बाजूने बटाटा टाका व दूसर्‍या बाजूने सोने मिळवा' असे आश्वासन कोणत्याही जाहिर सभेत, मुलाखतीत दिल्याचे काही पुरावे (जसे राहुल गांधी यांच्या 'आलू कि फॅक्टरी', 'नारियल का ज्युस' याच्या व्हिडीओ क्लिप युट्युबवर उपलब्ध आहेत तसे) आहेत का? कि राहुल गांधी जसे हजारोच्या गर्दी समोर फेकाफेकी करत आहेत तशीच फेकाफेकी तुम्ही इथे करत आहात ?

राहुल
जॉन बर्नाड काय म्हणाले ? लक्षात ठेवा
चिखलात जाऊन डुकरांबरोबर कुस्ती खेळू नये .. त्यांना फरक पडत नाही पण चिखल तुम्हाला लागतो

आरे काय चाललंय के,
भीमा कोरेगाव वरून आलू फॅक्टरी कुठे आणि FDI कुठे...
विषयाला धरून बोला पाहू.

श्री मोदी यांनी गुजरात मधील शेतकर्‍यांना 'एका बाजूने बटाटा टाका व दूसर्‍या बाजूने सोने मिळवा' असे आश्वासन कोणत्याही जाहिर सभेत, मुलाखतीत दिल्याचे काही पुरावे >>>>

पुरावे !!!

चला, काढा पाहु २ जी स्कैम चे पुरावे आता. नंतर बटाटे पाहु

पोलिसांनी अजुनहि भीडे आणी एकबोटे ना अटक केली नाहिये.

सुप्रीम कोर्टाचे जज्जच म्हणत आहेत की लोकशाहि धोक्यात आहे.

16:28 CPI MP D Raja leaves after meeting Justice J Chelamehwar at his residence in Delhi.>> wrong timing???

कशी?
जर अमित शाह ला सोडणारा न्यायाधीश राज्यपाल होतो , केस लढवणारा वकील लगेच न्यायाधीश होते
ते wrong timing नाही ठरत?

जर अमित शाह ला सोडणारा न्यायाधीश राज्यपाल होतो , केस लढवणारा वकील लगेच न्यायाधीश होते
ते wrong timing नाही ठरत? >>>>>>> +१

पोलिसांनी अजुनहि भीडे आणी एकबोटे ना अटक केली नाहिये. >>> अटक तर मेवानी व इतरांनाही केलेली नाही. कारण आरोप व गुन्हे तर या सर्वांवरच दाखल झालेत. म्हणजेच पोलिस आणखी माहिती मिळवल्याशिवाय काही करणार नाहीत असेच दिसते.

"सर्वांना बरोबर घेउन जाणारे" व उठसूठ थोर लोकांच्या उल्लेखाने भाषणांची सुरूवात करणारे पक्ष हत्याकांडे झाली तरी अ‍ॅट्रोसिटी सुद्धा लागणार नाही याची काळजी घेतात. पण त्यांचे मुख्यमंत्री स्वतः जातीने ब्राह्मण नसतात, म्हणून ते बहुजनवादी असतात असे अफलातून लॉजिक असते.

सध्या जे सरकार सत्तेवर आहे त्यांना जरूर जाब विचारा, एक तारखेला जमणार्‍या जमावाचे रक्षण करणे त्यांची जबाबदारी होती. पण नवी पेशवाई हटवा वगैरे च्या नादी लागून मोठी क्रांती करून कोणी काही बदल करणार आहे हा मोठा भ्रम आहे. सर्वांना गेली ६०-६५ वर्षे भरपूर संधी मिळाली होती. हे खतम करू, त्यांना खाली खेचू च्या बाता न मारता कोणी गावागावातली परिस्थिती बदलणार असेल तर त्या नेतृत्वाचे स्वागतच आहे.

गावातली परीस्थिती बदलणार? शक्यच नाही. कारण काँग्रेस, शिवसेना ( हो गावातच भाजपा जोर धरत नाहीये, हे उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नासिक कडे बघा ) आणी रिपाई व दलित पँथर हे पक्ष ती बदलुच देत नाहीयेत. लहानपणापासुन यांची शाब्दिक हाणामारी बघीतलीय. अगदी कॉलेज मध्ये सुद्धा या वरुन तट पडुन भांडणे झालीत. माझ्या मैत्रीणीच्या कॉलेजचे या वरुन गॅदरींग कित्येक वर्ष झालेच नाही.

या प्रत्येक पक्षाची आणी त्यांच्या कार्यकर्त्यांची अस्मिता देश आणी लोकांपेक्षा प्रचंड मोठी असते. आणी एक वेळ पाकीस्तान सुधारेल पण आपल्या भारतातले कुठलेच राजकीय नेते सुधारणार नाहीत.

अटक तर मेवानी व इतरांनाही केलेली नाही. >>> करा ना मग. ज्यांनी मेवानी वर आरोप केले ते सत्तेत आहेत (स्वतः मुख्यमंय्तांनी आरोप केले) तरी अटक केली नाहि ???
पुर्वी प्रधान सेवकांनी देशा विरुद्ध कट रचला म्हणुन सभेत आरोप केले, त्याची अजुन अट्क झाली नाहि.

काय चालले आहे ! एकतर आरोप चुकीचे आहे म्हणुन सांगा नाहितर अटक करा.

ज्यांनी मेवानी वर आरोप केले ते सत्तेत आहेत (स्वतः मुख्यमंय्तांनी आरोप केले) तरी अटक केली नाहि ???
नवीन Submitted by राहुलका on 13 January, 2018 - 09:23
<<

देंवेद्र फडणवीस यांनी मेवानी व उमर खालीद वर भडकाऊ भाषणाचे आरोप केलेत याला काही पुरावा आहे का तुमच्याकडे ? की वरिल प्रतिसाद हा देखील राहुल गांधींच्या 'एक तरफसे आलू घूसाव, दूसरी तरफसे सोना निकालो' या सारखी निव्वळ फेकाफेक आहे?

जिग्नेश मेवानी व उमरखालीद यांच्या विरोधातील एफ आय आर पुण्याच्या विष्णुबाग पोलीस स्टेशन मध्ये अक्षय बिक्कड व आनंद धोंड यांनी नोंदविली आहे. व त्या एफ आय आर च्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. तेंव्हा ह्या दोन जातीयवादी व दहशतवाद्यांच्या कैवार्‍यांवर मुख्यमंत्र्यानी आरोप केलेत वगैरे थापा मारु नका.

अनिरुध्द ते दोघे दहशतवादी यांचे कैवारी आहे याचा पुरावा द्या अन्यथा जाहीर माफी मागा

अडमीन अनिरुद्ध हे एका जनतेने निवडून दिलेल्या आमदारावर दहशदवादीचे कैवारी म्हणून गंभीर आरोप करत आहे. कृपया लक्ष द्यावे

ते वरिल वाक्य खरे तर असे असायला हवे होते.

---
तेंव्हा जिग्नेश मेवानी या जातीयवादी आमदारावर व उमर खालीद या दहशतवाद्यांच्या कैवारी व देशद्रोह्यावर, मुख्यमंत्र्यानी आरोप केलेत वगैरे थापा मारु नका.
---

जेएनयुत 'भारत तेरे तुकडे होंगे' ह्या देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल, उमर खालीदवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे व सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

जर अमित शाह ला सोडणारा न्यायाधीश राज्यपाल होतो , केस लढवणारा वकील लगेच न्यायाधीश<<
>>याबद्दल काही सांगता येणार नाही. परंतु ज्या न्यायाधीश लोया यांच्याकडे अमित शाह यांचे प्रकरण सुनावणीसाठी होते..त्यांचा नंतर संशयास्पद मृत्यू झाला.. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काल सर्वच्च न्यायालयातील न्यायमूर्तीनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात या प्रकरणाच्या खंडपीठ नियुक्तीतवरून सांकेतिक विरोध दर्शविण्यात आला आहे..

काल सर्वच्च न्यायालयातील न्यायमूर्तीनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात या प्रकरणाच्या खंडपीठ नियुक्तीतवरून सांकेतिक विरोध दर्शविण्यात आला आहे..
नवीन Submitted by अँड. हरिदास on 13 January, 2018 - 14:13

<<

सर्वौच्च न्यायालयातील न्यायमूर्तीनी काल जो 'सांकेतिक' विरोध दर्शविला ते खंडपीठ कधी म्हणजे नक्की कोणत्या साली नियुक्त करण्यात आले होते?

देंवेद्र फडणवीस यांनी मेवानी व उमर खालीद वर भडकाऊ भाषणाचे आरोप केलेत याला काही पुरावा आहे का तुमच्याकडे ? >>>> बाहेरुन आलेल्या लोकांनी हिंसाचार केला असे ते म्हणाले. तेव्हा त्यांना मेवानी म्हणायचे असेल ना ! त्यांना अमित शहा वा आदित्यनाथ तर म्हणायचे नसेल ना!
माझ्याकडे कसले पुरावे मागता ! आधी त्यांनी भडकावु भाषण केले याचे पुरावे द्या.

जे कर्नाटकात आदित्यनाथ लोकांना भडकवत आहे तिथे आता हिंसाचार झाला तर सिद्धारामयाने त्याला सरळ आत घालावा.. जिथे जातात तिथे घाण करतात ही भाजपाची टाळकी

सर्वौच्च न्यायालयातील न्यायमूर्तीनी काल जो 'सांकेतिक' विरोध दर्शविला ते खंडपीठ कधी म्हणजे नक्की कोणत्या साली नियुक्त करण्यात आले होते?<<
>> नक्की तारीख सांगता येणार नाही पण या वर्षभरात हे न्यायपीठ नियुक्त केले असावे

Pages