अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतत एकाच बाजुचा विखारी द्वेष करणे चांगले जमते की तुम्हाला}}}}}

मला चुकीच्या गोष्टीचा द्वेष करणे जमते... तुमच्यासारखे भाजपाच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला बरोबर ठरवून लाळघोटेपणा करणे जमत नाही

<< अमुक एकजण वाईट वागतो म्हणुन मी पण तसाच वागणार, असल्या प्रवृत्तीने देशाचे अनेक तुकडे झालेले दिसतील. >>

----- वाईट वागणे कशाला म्हणायचे ? प्रत्येकाने समोरच्या/ विरुद्ध विचारान्नाही समजुन घेतले पाहिजे, विचार जुळत नसतील तरी विरुद्ध विचारान्चा सन्मान करायला हवा. हे होत नसेल तर विखारान्ना जन्म मिळतो, पुढे कमी वेळात तो फोफावतो.

<< सतत एकाच बाजुचा विखारी द्वेष करणे चांगले जमते की तुम्हाला >>
------- मला अनेक प्रश्न निर्माण होतात....
विखारी द्वेष कसा तयार होतो ? त्याचा जन्म कुठे होतो... हे कळाले, आणि तो तयार होण्याचे मुळ कारणाचे समुळ उच्चाटन, निर्मूलन केले तर विखारी द्वेष करणारे तो द्वेष करणार नाहीत.

अनेक वर्षान्पुर्वी मायबोलीवर एक आय डी होता... माझ्यामते तो एका विचारान्चा जबरदस्त विखारी द्वेष करायचा. सुरवातीला (अनेक आढवडे) मला त्या आय डीच्या लेखान्चा राग यायचा.... पण मग (काही महिन्यान्नी) एव्हढा विखारी द्वेष करणारा आपलाच माणुस आहे हे लक्षात आले. मग राग न येता तो तशा प्रकारचा विखारी का बनला असावा असा विचार करायला लागलो. कुणी बनवले असेल तसे त्याला ? ते विखारी असण्याचे मुळ कारणच आपण नाहिसे केले, नाहिसे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर तो आज विखारी बनेल का?

का ? मराठा मोर्चा, ब्रिगेड, शिवधर्म, दलित संघटना, अनेक जाती, धर्म, पंथ यांचे दबावगट, इ. इ. हे काय आहे ?? >>>>> मराठा मोर्चा त भाजपाचे काकडे पुढे होते. हिंदु युवा वाहिनी, करणी सेना, राम रहिम बाबा, जाट आंदोलन, हे काय आहे ?

लिहा की...
सनवनीं दिलेल्या धमकीला घाबरलात का?
Submitted by सिम्बा on 25 January, 2018 - 11:2

Woohoo! मी धमकी वगैरे दिलेली नाही. महेश स्वतः त्यांचं मत सांगू शकतीलच. तुम्ही मी त्यांना धमकी दिली असं विकृत खोटं स्टेटमेंट का करताय? तुम्ही त्यांचा रिप्लाय पाहिला आहे का?
तुम्ही इथे खोटे आरोप करणं , वैयक्तिक होणं, समोरचा माणूस जे बोललेला नाही ते खोटंच त्या व्यक्तीच्या नावाने पसरवणं - असं सर्वच करत आहात. दुसर्या पानावरही तुम्हाला सविस्तर उत्तर दिलेलं आहे, तुमच्या या सततच्या कँपेनला आणि वाक्याचा विपर्यास करून खोटं पसरवण्याला कंटाळून इथे लिहीणं कमी करून वाचनमात्र राहात आहे तरी तुमचं चालूच.
(हा धागा भरकटू नये म्हणून इथे आणखी लिहिणार नाही. पण प्रशासनाने या harassment ची नोंद घ्यावी.)

विखारी द्वेष कसा तयार होतो ? त्याचा जन्म कुठे होतो... हे कळाले, आणि तो तयार होण्याचे मुळ कारणाचे समुळ उच्चाटन, निर्मूलन केले तर विखारी द्वेष करणारे तो द्वेष करणार नाहीत.<<
>>आपला प्रश्न जितका सहज तितकाच गूढ आणि गहन आहे.. द्वेषाची उत्पत्ती आणि त्यावरील उपाय जर माणसाला कळला, तर माणसाचे जीवनच नाही तर आजच्या समाजाचे चित्रही बदलू शकेल.कुणाला कुणाचा द्वेष नसेल तर वाद होण्याची काही गरजच उरणार नाही.. द्वेष नसेल तर दंगली तरी कशा होतील.. द्वेष संपला तर बरेच प्रश्न चुटकीसरशी सुटतील. मात्र द्वेष कोठून उत्पन्न होतो आणि त्याचे उच्चाटन करायचे कसे? याचे उत्तर अद्याप तरी माणसाला सापडल्याचे दिसत नाही.. ज्यांना ते सापडले ते महान बनले,योगी झाले.. अर्थात इतक्या तात्विक पातळीवर याचा शोध घेण्याची किंव्हा विवेचंन मांडण्याची पात्रता नसल्याने आपण आपल्या भाषेत अगदी सरळ धोपट शब्दात याचं विश्लेषण करू शकतो. माझ्या मते द्वेष विचारातून निर्माण होतो. आणि विचार मनातून निर्माण होतात. त्यामुळे तुझ्या मनात द्वेष आहे असं आपण जेव्हा एकाद्याला म्हणतो..तेंव्हा तो द्वेष त्याच्या विचारात असतो,असं समजायला काही हरकत नाही.बऱ्याचदा हा द्वेष अनुभवातूनही निर्माण झालेला आढळतो. आपल्याला आलेल्या अनेक कटू अनुभवांचा परिपाक द्वेषात रूपांतर होत असतो.याचा प्रमानात विचार केला तर अनुभवातुन निर्माण झालेला द्वेष अत्यंत कठोर असतो..त्याचे उच्चाटन सहजपणे करता येईलच असे नाही. कारण काही जखमा अत्यंत खोलवर रुजलेल्या असतात.
द्वेष उत्पत्तीचं दुसरं कारण बघतील तर ते आहे विचार..विचारातून निर्माण झालेला द्वेष विचार परिवर्तनाने दूर केला जाऊ शकतो. गैरसमज,श्रेष्ठ कनिष्ठ भावना ह्या ज्या सर्व काही आहे त्या विचारातून निर्माण झालेल्या असल्याने सकरात्मक विचार त्यात बदल घडवू शकतात."आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के समस्या आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे उत्पन्न होतात. फक्त दहा टक्के समस्या खरोखर समस्या असतात." अस म्हटलं जातं त्यामुळे आपण जसा विचार करतो तसा आपला समज बनत जातो.चांगल्या आणि सकारात्मक विचारांतून द्वेष कमी होतो तर नकारात्मक विचार द्वेषाला खतपाणी घालतात.मला कुठंतरी वाचलेलं एक उदाहरण आठवते. मनाचा खेळ मांडताना एक लेखक असं म्हणतो की, आपण आपल्या घराला किंवा गाडीला लिंबू मिरची बांधतो का तर लोकांची नजर लागू नये म्हणून. खरे तर कोणाचीही नजर कोणाच्या घराला किंवा गाडीला लागत नसते, वास्तविक आपल्याच मनाची नजर लागते कारण आपले मन दुषित आहे जे लोकांविषियी असा विचार करते.
अर्थात, हा माझा वयक्तिक विचार आहे.. तो सर्वाना पटावा, असा आग्रह मुळीच नाही.लेखाचा विषय मांडतानाही याच सकारात्मक विचारानां प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे.. आजच्या द्वेषाच्या वातावरणात द्वेष वाढविण्यासाठी नाही तर कमी करण्यासाठी समोर यावे अशी अपेक्षा उपरोक्त धाग्याची आहे.

>>>>>>>>हा धागा भरकटू नये म्हणून इथे आणखी लिहिणार नाही. पण प्रशासनाने या harassment ची नोंद घ्यावी.)
Submitted by सनव on 27 January, 2018 - 22:2
>>>>>>

सनव या id ला उत्तर देण्याची मला खरंतर गरज वाटत नाही,
मात्र त्यांनी माझ्यावर थेट हरासमेंट चा आरोप केल्यामुळे मला माझी बाजू सांगावी लागतेय.
>>>>>>तुम्ही मी त्यांना धमकी दिली असं विकृत खोटं स्टेटमेंट का करताय? >>>
सनव, नीट आठवून पहा! मी धमकी म्हंटले की गर्भित धमकी म्हंटले?
" तुम्ही लिहू नका,तुमच्या कमेंटचा स्क्रीनशॉट घेऊन तूमच्यावर अट्रोसिटी मध्ये केस ठोकेन" ही धमकी,
" तुम्ही लिहू नका, तुमच्या कमेंटचा विपर्यास करून दुरुपयोग होईल आणि तुम्हाला खूप त्रासाला तोंड द्यावे लागेल" ही गर्भित धमकी.
दोघींचा फायनल आउटपुट सारखाच असला (लिहित्या माणसाला काल्पनिक भीती घालून त्याला मत प्रदर्शन करण्यापासून परावृत्त करणे) तरी दुसरा प्रकार जास्त सभ्य आणि संकेतस्थळाच्या "नियमात" बसणारा आहे,
तुम्ही दुसरा मार्ग वापरत आहात. पहिल्या वेळेस असे लिहिल्या नंतर मी, भरत यांनी तिकडे स्पष्टीकरण दिले, इकडचे वाद संस्थळाबाहेर घेऊन जाण्याचा कोता विचार आम्ही करत नाही असेही सांगितले, तरीही काही दिवसाच्या अंतराने तुम्ही परत तेच लिहिलेत.
याचा संदर्भ देऊन मी या धाग्यावर महेश याना लिहा असे म्हंटले, यात विकृत किंवा खोटा प्रचार नाही.

>>>>महेश स्वतः त्यांचं मत सांगू शकतीलच.>>>
एक्झाकटली, महेश किंवा बेफिकीर सिनिअर मेम्बर आहेत, ओपन फॉरम वर काय लिहावे आणि काय नाही याची त्यांना जाण आहेच, आशा परिस्थितीत ,कायद्याची भीती दाखवून त्यांच्या व्यक्त होण्यावर बंधन आणण्यात काय हशील आहे?

>>>>>तुम्ही इथे खोटे आरोप करणं , वैयक्तिक होणं, समोरचा माणूस जे बोललेला नाही ते खोटंच त्या व्यक्तीच्या नावाने पसरवणं - असं सर्वच करत आहात. दुसर्या पानावरही तुम्हाला सविस्तर उत्तर दिलेलं आहे, >>>>
तुमच्या प्रतिसादात reading between the line करून खरा अर्थ लोकांसमोर ठेवला( उदा पद्मावती धागा) की लगेच वैयक्तिक हल्ला म्हणून ओरड करता तुम्ही
जर आपल्या बोलण्यातील निके सत्य समोर आल्यावर इतकी शरम वाटत असेल तर हे न लिहिनेच श्रेयस्कर, किंवा ते सत्य मखमली आवरणात लपवायचा अजून प्रयत्न करावा.

मी तुमच्यावर वैयक्तिक टीका केल्याचा एक प्रतिसाद सांगा (वैयक्तिक = तुमच्या प्रोफाइल वैयक्तिक मधली माहिती, तुमची श्रद्धा स्थाने, खाण्यापिण्याच्या सवयी, इतर id बरोबर बोलण्यातील काही संदर्भ इत्यादी) मी माफी मागायला तयार आहे.
अशा सदर्भरहित पोस्ट टाकून तुम्ही माझ्या id च्या विश्वासार्हतेवर चिखलफेक करत आहात.

>>>>>तुमच्या या सततच्या कँपेनला आणि वाक्याचा विपर्यास करून खोटं पसरवण्याला कंटाळून इथे लिहीणं कमी करून वाचनमात्र राहात आहे>>>
काहीही वैचारिक बैठक नसलेला एक id उडवण्यासाठी मी कॅम्पेन सुरू करेन असा विचार डोक्यात आणणे म्हणजे तुम्ही स्वतः लाच अवास्तव महत्व देत आहात, तुमचा id उडवण्यात मला अजिबात स्वारस्य नाही, उलट वेळोवेळी तुम्ही ज्या irrashnl गोष्टी पोस्ट करता त्यावरून माझा मुद्दा जास्त स्पष्ट करायची संधी मला मिळते, त्या बद्दल धन्यवाद.

या वादाला माझ्या कडून पूर्णविराम
यापुढे सनव id ने केलेल्या कोणत्याही वैयक्तिक आरोपाला मी उत्तर देणार नाही, तो कितीही हिडीस असला तरी.
मात्र त्यांनी विषयाशी धरून काही कंमेन्ट केली असेल तर त्यावर नक्की चर्चा करेन.
धन्यवाद.

संभाजी भिड्यांबद्दल २०१८ च्या कोरेगाव-भीमा संबंधात कसलेही पुरावे न मिळाल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

याबद्दल चार वर्षांपूर्वी याच धाग्यावर लिहीलेली पोस्ट तशीच्या तशी खाली:

----------------------------

संभाजी भिडे यांना दोषी ठरवून मीडीया ट्रायल करून भरपूर नालस्ती चालू आहे गेला आठवडाभर. अगदी आत्तापर्यंत मी ज्यांना सेन्सिबल समजत होतो अशा साइट्स, लेखक यांनी सुद्धा त्यात बेजबाबदार लेखन केले आहे.

दोन दिवस आधीच्या सभेत जे रस्त्यावरच्या लढाईची मागणी करतात त्यांच्याबद्दल फारसे काही नाही आणि जे लोक तेथे गेले होते याबद्दल काहीच खात्रीलायक माहिती नाही त्यांना दोषी ठरवून अनेकजण मोकळे झालेले आहेत. काही काही लेखांत तर अचाट लॉजिक आहे. निखिल वागळ्यांनी थेट "पुण्यातल्या ब्राह्मणी प्रवृत्तींवर" बोट ठेवले आहे. अक्षरनामा साइट वाले जरी डावीकडे झुकलेले असले तरी कोणाला दोषी ठरवताना हे खालचे अफलातून लॉजिक वापरतील असे वाटले नव्हते:

"....भिडे गुरुजींची मांडणी पाहिली तर काय दिसते? ज्यांना नेहरू हे देशाचा शत्रू होते, असे वाटते, त्यांना आंबेडकरी समाज एकत्र येतो हे कसे आवडणार?..."

अनेक पेपर वाल्यांनी, टीव्ही चॅनेल्स नी यांचा उल्लेख कोरेगाव भीमा घटनेचे सूत्रधार असाच केला. इतरही अनेकांनी स्वतः शहानिशा न करता तेच उचलून धरले. अजूनही सुरू आहे. संभाजी भिडे हिंदुत्त्ववादी आहेत हे उघड आहे. इथे प्रश्न इतकाच आहे की त्यांचा या घटनेशी संबंध आहे का.

या सर्वाचा आधार काय? तर पोलिसांची दाखल करून घेतलेली तक्रार आणि त्यावरून केलेला आरोप. पण असेच आरोप जवळजवळ आणखी ४-५ लोकांवर झाले आहेत. मेवाणी व इतरही. नंतर कोरेगाव भीमा, सणसवाडी वगैरे च्या स्थानिक बातम्या व क्लिप्स वरून जी माहिती बाहेर येत आहे ती पहिल्या एक दोन दिवस झालेल्या आरोपांपेक्षा वेगळीच आहे. तेथील लोक संभाजी भिड्यांचा काहीच संबंध नाही असेच सांगत आहेत.

एकूण अजून काहीच नक्की माहिती उपलब्ध नाही. कदाचित कधीच होणारही नाही. तोपर्यंत मीडिया ट्रायल मात्र भरपूर झाली आहे. एकतर या सर्वांना अशी काहीतरी माहिती उपलब्ध आहे जी सर्वसामान्यांना नाही, किंवा In politics, never let the truth come in the way of a good story हे लॉजिक वापरले गेले आहे.

----------------------------

पवारांची आयोगापुढची साक्ष झाली त्याची बातमी वाचून तर ते सगळं एकदम "हरचंद पालवाच्या कपाटाच्या बिजागिऱ्या गंजून खल्लास" कॅटेगरी वाटलं. Biggrin
एकूणच मविआ सरकार चांगलं आहे. त्यांनी त्या भिडेंची निष्कलंक मुक्तता केली ज्यांना फडणवीस सरकारच्या काळात दोष दिला जात होता.

Pages