अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुप्तचर विभाग कोठुन आला ??? <<<<

वर्तमानपत्रांनी तुमची परवानगी न घेता असं छापलंय खरं! आता काय करायचं?

भीमा कोरेगावात मिटींगा घेऊन, ठराव करुन सर्व दुकाने बंद ठेवून येणार्‍या दलितबांधवांना पाणीसुद्धा मिळू न देण्यामागे नक्षलवाद्यांचेच कारस्थान आहे, हो की नाही बेफीकीर्र...?

माझ्या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर आहे का? पेड बातम्यांच्या क्लिपिंग नका टाकू इथे. कोण किती पाण्यात आहे, कोणाच्या तालावर कोण नाचतंय सगळं माहितीआहे.

माझ्या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर आहे का? पेड बातम्यांच्या क्लिपिंग नका टाकू इथे. कोण किती पाण्यात आहे, कोणाच्या तालावर कोण नाचतंय सगळं माहितीआहे.<<<

अवांतर - तुमचा टोन ते मध्यंतरी नानाकळा म्हणून होऊन गेले त्यांच्यासारखा वाटतो.

मुद्याबाबत - सगळं माहिती आहे तर तुम्ही सांगून टाका गुप्तचर विभागाला. इथे अरेरावी कशाला?

वर्तमानपत्रांनी तुमची परवानगी न घेता असं छापलंय खरं! आता काय करायचं? >>>>

आमची कसली परवानगी! मुख्यमंत्री स्वतः जे म्हणाले होते ते मी लिहिले. उगाचच काहिहि काय बोलताय!

बाकि ते भगवे झेंडे घेउन कोण होते ते हि सांगा!

आमची कसली परवानगी<<<

लहान मुलाला (तुझ्या दप्तरात हे पाच रुपये कोठून आले) ज्या शैलीत दरडावतात त्या शैलीत (गुप्तचर विभाग कोठुन आला, हे) विचारलेत म्हणून वाटले की पेपरवाल्यांना तुमची परवानगी घ्यावी लागत असेल.

बाकि ते भगवे झेंडे घेउन कोण होते ते हि सांगा!<<< काही वाचनात आले तर सांगेन. अजून मनात जे वाटेल ते ठोकून द्यायची वेळ आलेली नाही.
====

येणार्‍यांना पाणीसुद्धा मिळू न देण्याचे कारस्थान कोणी रचले? नक्षलवाद्यांनी?<<<< तेथे दंगल व्हावी हे कारस्थान नक्षलवादी संघटनांचे होते असे गुप्तचर विभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची बातमी वर पोस्ट केलेली आहे. दंगल व्हावी ह्यासाठी २३ सभा घेतल्या गेल्याचेही त्यात लिहिलेले आहे. तुमच्याकडे काही अधिक व ठाम माहिती असेल तर ती गुप्तचर विभागाला त्वरीत कळवा अशी एक विनंतीही केलेली आहे.

म्हणून वाटले की पेपरवाल्यांना तुमची परवानगी घ्यावी लागत असेल. >>>>> पेपरवाले कोणाची परवानगी घेतात त्यावर लेखच्या लेख आणी पुरावेच पुरावे आहेत. त्यामुळे आमची परवानगी घेत असते तर आम्हि माबोवर टंकत बसलो नसतो - प्रधानसेवक नाहितर भाजपाचे अध्यक्ष झालो असतो

काही वाचनात आले तर सांगेन >>> वाचा जरा मग!

अजून मनात जे वाटेल ते ठोकून द्यायची वेळ आलेली नाही. >>>> चांगले आहे. जेव्हा ती वेळ येइल तेव्हा मोदींच्या जागी तुम्हि असाल. तेव्हा प्रयत्न चालु ठेवा जसा आत्त्ता चालु आहे.

घरांवरून दगड फेक करायचे कारस्थान पण नक्षलीने केले बरोबर का? आणि त्यांचा कट त्या भिडया ला माहिती झाला म्हणून त्यांना रोखण्यासाठी त्याने ही त्या ठिकाणी मिटिंग घेतली.

बरोबरर का ? USK चा रिपोर्ट बरोबर का?

येथे प्रती-गुप्तचर विभाग उघडून मोठमोठे रहस्यभेद करण्यापेक्षा ओरिजिनल गुप्तचर विभागाला हे का कळवत नाही तुम्ही? इथे तुमच्या टोळक्याचे निराधार व बिनबुडाचे दावे वाचून न्यायदानाला काही सहाय्यही मिळत नाही. तिकडे कळवलेत तर आरोपींना पकडतील तरी

शिवाय मी आधी जो प्रश्न विचारलेला होता त्यावर एकही उत्तर नाही. त्याचे उत्तर अडचणीत आणणारे आहे का?

पाणी मिळू नये ह्यासाठी केलेला कट, दगडफेक करण्याचा कट, भगवे झेंडे ह्या सर्वांबद्दल माझ्या प्रतिसादात एक अवाक्षरही नसताना जणू मी ते बोललोच आहे अशा अर्थाचे आलेले प्रतिसाद हे प्रतिसाददाते कोणत्या थराला गेले आहेत हे दर्शवतात.

येथे प्रती-गुप्तचर विभाग उघडून मोठमोठे रहस्यभेद करण्यापेक्षा ओरिजिनल गुप्तचर विभागाला हे का कळवत नाही तुम्ही? इथे तुमच्या टोळक्याचे निराधार व बिनबुडाचे दावे वाचून न्यायदानाला काही सहाय्यही मिळत नाही. तिकडे कळवलेत तर आरोपींना पकडतील तरी >>>>>>>>>

अहो मोदीनी भरसभेत म्हणले होते माजी पंतप्रधानानी कट केला आहे पाकिस्तान बरोबर म्हणुन , त्याचे पुढे काय झाले ? भारताविरोधात कट करणारे अजुन बाहेरच कसे ? मेवानी विरोधात भाजपा वाल्यांनी आरोप्ल केले होते. ते अजुन बाहेरच आहेत. सिंचन घोटाळा, वाडरा, शिवसेनेचा मुबैतील भ्रष्टाचार हे दावे करनार्यां टोळ्क्यांना शिकवा तुमचा सल्ला आधी.

माझ्या प्रश्नाचे एकहि उत्तर नाहि अजुन. ते द्या आधी! प्रश्नावर प्रश्न कसले विचारता

नवीन Submitted by राहुलका on 18 January, 2018 - 15:19 <<<<

ह्यावर स्वतंत्र धागा निघाला तर लिहीन. ह्या धाग्यावर नाही लिहिणार.

वावराचे नियम - ह्या नियमावलीनुसार इतर विषयांवर इथे लिहिता येणार नाही असे माझे आकलन आहे.

वावराचे नियम - ह्या नियमावलीनुसार इतर विषयांवर इथे लिहिता येणार नाही असे माझे आकलन आहे. >>>
उत्तर अडचणीत आणणारे आहे . हा हा हा.... आणी मेवानीचे काय ?

"अवांतर - तुमचा टोन ते मध्यंतरी नानाकळा म्हणून होऊन गेले त्यांच्यासारखा वाटतो. " हे कोणी लिहिले बरे ?? ह्याचा धाग्याच्या विषयाशी काय सबंध. वावराचे नियम - ह्या नियमावलीनुसार इतर विषयांवर इथे लिहिता येणार नाही असे आकलन आहे म्हणे काहि जणाचे !

अवांतर - तुमचा टोन ते मध्यंतरी नानाकळा म्हणून होऊन गेले त्यांच्यासारखा वाटतो. " हे कोणी लिहिले बरे ?? ह्याचा धाग्याच्या विषयाशी काय सबंध. वावराचे नियम - ह्या नियमावलीनुसार इतर विषयांवर इथे लिहिता येणार नाही असे आकलन आहे म्हणे काहि जणाचे !<<<<

हे विधान दुखावणारे नव्हे. ते केवळ एक निरिक्षण आहे व अवांतर निरिक्षण असल्याने अवांतर असे नमूद करून नोंदवले आहे. नानाकळा हल्ली दिसत नाहीत आणि मेघपाल ह्यांची लेखनाची शैली तशी जाणवली म्हणून निरिक्षण नोंदवले.

आता तुम्ही वरचा संपूर्ण प्रतिसाद अवांतर असल्याचे नमूद करताय का?

आता तुम्ही वरचा संपूर्ण प्रतिसाद अवांतर असल्याचे नमूद करताय का? >>>>> तुमच्या ह्या धाग्यावरील प्रतिसादावर माझा प्रतिसाद असल्याने तुमचा प्रतिसाद अवाम्तर झाल्याशिवाय माझा प्रतिसाद अवाम्तर कसा होइल बरे !

तुमचा हा प्रतिसाद म्हणत आहे मी >>> मी त्यावरहि म्हणत आहे. नीट वाचा. मेवानी पण आहे त्यात. . तुम्हाला हवे तर " अवांतर निरिक्षण " असे लिहितो बाकि ठिकाणी - त्याने प्रतिसाद शुद्धी हवी असेल तर - जसे भाजपात जाउन मुकुल रोय, सुखराम शुद्द होतात भ्रष्टाचारातुन. Lol Lol

उत्तर देता आली नाही की पळून जाणारे बेफिकीर या धाग्यावर अवांतर लिहीत बसू नका.

लोकांना पाणी न देणे हॉटेल बंद ठेवणे आणि घरांवरून दगडफेक करणे हे घटना आधी झाले त्याला प्रतिउत्तर म्हणून बंद पाळण्यात आला. जर बंद मध्ये घातपात करण्याचा कट आधी पासून रचत असेल तर अशी दगडफेक करायची फुटेल बंद ठेवायचे वगैरे साठी पण आधीपासून कट रचला आहे असे मानले जावे कारण बंद करायचा हे वरील घटना झाल्यावर ठरवण्यात आले.

त्यामुळे बंद दरम्यान नक्षली लोकांनी जाळपोळ करायचा प्लान आधी पासून केलेला हे मनानेच हास्यास्पद ठरते. कसला मुख्यमंत्री आहे ज्यांना साधे स्टेटमेंट सुद्धा नीट पडताळून देता येत नाही? की भिडे एकबोले याला वाचवण्यासाठी काहीही बोलायचे मोदींसारखे सुरू केले याने पण ?

गुप्तचर विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे. एक दोघांना अटकही झाली आहे.<<
>> गुप्तचर विभागाच्या चौकशीत खरं तर घटना घडण्याआधी काही तरी यायला हवं होतं, असं अपेक्षित आहे.. काल पुण्याला जाणं झालं.. सहजच त्याठिकाणी कोरेगाव चा विषय निघाला. मला जे मित्र भेटले त्या प्रत्येकाचे मत होते की यावेळी असं काही होणार असा आम्हाला दोन दिवसांपासून अंदाज होता.अर्थात एकदा सहज बढाई मारण्यासाठी अंदाज व्यक्त करेल. पण सर्वानाच असा अंदाज का होता? हे कळायला मार्ग नाही. यात मुद्दा असा की, पुणे आणि आसपासच्या नागरिकांना जर अंदाज होता तर गुप्तचर संस्थेला याची काही कुणकुण नव्हती का? एकाद्या घटनेचा "गुप्त"अंदाज घेऊन ती रोखन्याची सूचना तदवतच उपाय करण्यासाठी गुप्तचर संस्था कार्यरत असते. अशा प्रकारची काही सूचना या यंत्रणेने सरकारला दिल्याचे माझ्या तरी माहितीत नाही.आता काही नक्षली पकडल्याची वार्ता आहे.. प्रकरणाचा खुलासा झालाच पाहिजे. पण घटना का रोखता आली नाही यावरही मंथन झाले पाहिजे. जेणेकरून यापुढे सर्व विभाग दक्ष राहतील

पाणी मिळू नये ह्यासाठी केलेला कट, दगडफेक करण्याचा कट, भगवे झेंडे ह्या सर्वांबद्दल माझ्या प्रतिसादात एक अवाक्षरही नसताना जणू मी ते बोललोच आहे अशा अर्थाचे आलेले प्रतिसाद हे प्रतिसाददाते कोणत्या थराला गेले आहेत हे दर्शवतात.
Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2018 - 15:17

<<

अगदी सहमत !
वर जे तीन-चार जणांचे टोळके प्रतिसाद देत आहेत, त्यांच्या प्रतिसादातील इतर सदस्यांना वापरलेली असभ्य भाषा पाहून ह्या साईटवर कोणी संपादक अथवा प्रशासक मंडळ आहे कि नाही हा प्रश्न पडतो.

भाजपाचे लोक राजकारणार असो की माबोवर, खोटे नाटे आरोप करणार आणी पुरावे कधी देणार नाहित.

अहो मोदीनी भरसभेत म्हणले होते माजी पंतप्रधानानी कट केला आहे पाकिस्तान बरोबर म्हणुन , त्याचे पुढे काय झाले ? भारताविरोधात कट करणारे अजुन बाहेरच कसे ? मेवानी विरोधात भाजपा वाल्यांनी आरोप्ल केले होते. ते अजुन बाहेरच आहेत. सिंचन घोटाळा, वाडरा, शिवसेनेचा मुबैतील भ्रष्टाचार यावर कधी पुरावे येतील ?? तसेच वरती असभ्य भाषेचे पुरावे द्या.

http://indianexpress.com/article/india/mevani-not-responsible-for-bhima-...

रामदास आठवले म्हणाले की मेवानी हिंसाचाराला जबाबदार नाहि . रामदास आठवले मिनिस्टर आहेत Social Justice and Empowerment चे केंद्रात. म्हणजे सरकार म्हणतेय की मेवानी हिंसाचाराला जबाबदार नाहि . मग जे भाजपाची लोक मेवानी ला जबाबदर ठरव्त होती ती माफि मागणार का ?

Pages