अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशाच्या इतिहासात सर्वात जास्त वायफळ कारणांवरून बंद पुकारणारे भाजपा आणि शिवसेना हे दोनच पक्ष आहे. या दोन पक्षांमुळे देशाचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे मागील केलेल्या भारत बंदचा विषय 49% FDI होता जो भाजप नावाच्या टुकार पक्षाने पुकारलेला होता. त्या भारत बंद मध्ये प्रचंड जाळपोळ, आर्थिक नुकसान , रेल्वे नुकसान , बसेस फोडणे दुकाने लुटणे अश्या घटना महाप्रचंड संख्येने घडल्या होत्या आणि ही सर्व नौटंकी अवघ्या 49%ची FDI होऊ नये म्हणून चालू होते.

आता त्याच टुकार पक्षाची सत्ता आल्यावर FDI 100% केला. याचा अर्थ निव्वळ स्वतःची नौटंकी करण्यासाठी आणि देशाचे आर्थिक नुकसान करण्यासाठी याआधीचा भारत बंद पुकारला होता हे स्पष्ट होते. असाच प्रकार आधी जीएसटी,
आधार वगैरे बर्याच विधेयकांवरून भाजपाने वेळोवेळी करून देशाच्या आर्थिक प्रगतीला खीळ घातली होती. भाजपाचे हे दुतोंडी सापाचे धोरण हे देशाच्या प्रगतीला हानिकारक आहे. देशाच्या प्रगतीही गद्दारी आहे.

भाजप पक्षाची मान्यता रद्द करून देशाचे भविष्यातील आर्थिक सामाजिक आणि राजकीय नुकसान होण्यापासून वाचवावे

देशाच्या इतिहासात सर्वात जास्त वायफळ कारणांवरून बंद पुकारणारे भाजपा आणि शिवसेना हे दोनच पक्ष आहे. या दोन पक्षांमुळे देशाचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे मागील केलेल्या भारत बंदचा विषय 49% FDI होता जो भाजप नावाच्या टुकार पक्षाने पुकारलेला होता.

<<

भाजपा किंव्हा शिवसेनेने कधीही जाती-पातीत फुट पाडण्याकरिता दंगल घडवून व त्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर स्वत:चे राजकीय भविष्य चमकवण्याकरता जातीयवादाचा मुद्दा पुढे रेटत 'महाराष्ट्/भारतर बंद' सारखी नौटंकी करुन करोडो रुपयाच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करुन सर्वसामन्य हिंदूस्थानी जनतेला कधीच वेठीस धरले नाही.

>>महेश ज्या मुसलमानी राजवटीबद्दल हिंदुत्ववादी सतत आगपाखड करत असतात, त्यांचेदेखील नख शिल्लक नाही, तरी ते ज्या कारणास्तव करतात त्याच कारणास्तव पेशवाईविरोधक आगपाखड करतात. समजलं असेल तर ठोका लाइक!
मेघपाल आणि प्रदिपके,
मुसलमानी राजवटीचे नख जरी शिल्लक नसले तरी त्यांची धार्मिक कट्टरता आणि समाज विघातक कारवायांमधे बहुसंख्येने आढळणे (फक्त भारतातच नाही तर जागतिक स्तरावर देखील) हे काय आहे ? आणि हे असे करणारे किती पेशवे, ब्राह्मण, हिंदुत्ववादी आहेत ?
यावर तुम्ही लगेच हिंदू अतिरेकी, काही हत्या, इ. इ. चालू कराल हे पक्के माहिती आहे. पण अशा गोष्टींचा काळ आणि त्याचे लोकसंख्येनुसार धार्मिक गुणोत्तर काय आहे ते पण पहा. तसेच हिंदू आतंकवाद नामक प्रकार आहे असे एकवेळ मानले तरी त्याची सुरूवात का आणि कधी झाली याचाही विचार करावा लागेल. अर्थात वैयक्तिक माझा कोणत्याही अतिरेकाला विरोधच आहे. वर हिंसेसंदर्भात एक उत्तम लेखांश दिला आहेच.
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व !

गुणोत्तर कमी म्हणजे दुर्लक्ष करणे असे म्हणायचे का?

आणि हो 92 आणि 02 ची दंगल जातीय व धार्मिक होती ज्यात पोळी भाजून या पक्षांनी सत्ता मिळवली
मागील भारत बंद केल्यावर देशाचे काय फायदा झाला हे इथल्या भक्ताड ने स्पष्ट करावे
भाजपा चा नायनाट झालाच पाहिजे देशाला लागलेला कँसर रोग आहे

>>भाजपा चा नायनाट झालाच पाहिजे देशाला लागलेला कँसर रोग आहे
ह्म्म्म, ही जबरदस्त काविळीची लक्षणे आहेत. Sad
अन्य पक्ष म्हणजे कोणते रोग आहेत ते ही सांगा. Happy

100% fdi वर काय मत आहे सांगा जरा.. आणि 100% मान्य असल्यास आधी 49% ला विरोध का केला ते ही सांगा

हो कावीळ तर कावीळ मला देशविघातक भाजप पक्ष असेच दिसतात

>>100% fdi वर काय मत आहे सांगा जरा.. आणि 100% मान्य असल्यास आधी 49% ला विरोध का केला ते ही सांगा
मला विचारत असाल, तर माफ करा, कारण मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. परकीय गुंतवणुकीबद्दल आहे ते कळाले, पण सविस्तर काय आहे ते पहावे लागेल.
असे पहा, भाजपच्या सर्वच्या सर्व गोष्टी मला पटतात असे नाही, पण तरी अन्य पक्षांच्या तुलनेत खुपच चांगला पर्याय आहे.
तुम्ही कॉन्ग्रेस आणि अन्य पक्ष (तुमच्या आवडीचे) यांच्यातल्या चुकांबद्दल, उणिवांबद्दल कधीच काहीच का बोलत नाही (तुमच्या अनेक जन्मांपासुन आयमीन अनेक आयडींपासुन),
विचार करा, कोणी एक व्यक्ती, कोणी एक पक्ष, कोणी एक समुदाय, कोणी एक देश १००% चांगला किंवा वाईट नसतो.

असे पहा, भाजपच्या सर्वच्या सर्व गोष्टी मला पटतात असे नाही, पण तरी अन्य पक्षांच्या तुलनेत खुपच चांगला पर्याय आहे >>>> असे नुसते म्हणुन होत नाहि हो! चांगला पर्याय का ते दाखवुन द्या. जनरल स्टेटमेंट ला काहिहि अर्थ नसतो.

2011 साली 49% fdi ला भाजपाने विरोध केलेला तब्बल 7 वर्ष देशाची प्रगती या फुटकळ आणि टुकार पक्षाने वैयक्तिक स्वार्थ आणि विरोधाला विरोध म्हणून रोखून धरली होती. 7 वर्षात देशाचे करोडोंचे नुकसान केले याची जवाबदारी भाजपाने घ्यावी आणि देशाची माफी मागावी.

http://www.hindustantimes.com/delhi-news/bandh-hits-life-loss-of-rs-12-5...

१२५०० कोटी रुपये फक्त बंद मध्येच गेले होते. ते वसुल करा भाजपा कडुन पहिल्यांदा. मग भीमा- कोरेगाव बंदच्या नुकसानी बद्दल बोला.

2011 साली 49% fdi ला भाजपाने विरोध केलेला तब्बल 7 वर्ष देशाची प्रगती या फुटकळ आणि टुकार पक्षाने वैयक्तिक स्वार्थ आणि विरोधाला विरोध म्हणून रोखून धरली होती.
<<

मोदी सरकारने १००% एफडीआय आणली तेंव्हा देखील विरोधी पक्षांनी विरोध केलाच की, मात्र त्यासर्व विरोधकांच्या नाकावर टिच्चून मोदी सरकारने FDI आणलेच. मग २०११ साली कॉंग्रेस सरकारचे हात कुणी धरुन ठेवले होते एफडीआय आणायला ?

नाकावर टिच्चून? अरे आधी राज्यसभेत पास तर करून दाखवा मग बोंब मार
आणि हो काँग्रेसने विरोध केला? हे दाखव आधी भक्तांड..
काँग्रेस ने भाजपचे यु टर्न घेतला त्याला विरोध केला आहे का तर 7 वर्ष देशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान भाजप नावाच्या अत्यंत फुटकळ टूक्कार पक्षाने केले होते त्याचा विरोध

नाकावर टिच्चून म्हणे.. सगळीकडे नाक घासून माफी मागावी लागते ते बघा आधी

मग २०११ साली कॉंग्रेस सरकारचे हात कुणी धरुन ठेवले होते एफडीआय आणायला ? >>>>> मोदीने धरले होते तेच तर लिहिले आहे. नीट वाचा की.

तुम्हि काय लिहिता आहात तुम्हालातरी कळते काहो !

मोदीने धरले होते तेच तर लिहिले आहे. नीट वाचा की.

<<

उगा कैच्या कै, बोलू नका.
एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने विरोध केला म्हणून कॉंग्रेसने एफडीआय आणला नाही, ह्यावर रस्त्यावरचे शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का ? स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्‍यावर फोडायची जुनीच सवय कॉंग्रेसला आहे, हे संपूर्ण देशाला माहित आहे.

तेच देशाची जनता आता शिव्याशाप देत आहे भाजपयांना
मध्य प्रदेशात भाजपाचया उमेदवाराचे स्वागत चपलेच्या हाराने केलेले आहे ..

एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने विरोध केला म्हणून कॉंग्रेसने एफडीआय आणला नाही, ह्यावर रस्त्यावरचे शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का ? >>>>> कांगेस ने पास करुनच घेतला हो राज्यसभेत आणी लोकसभेत पण भाजपाच्या राज्यांनी आणला नाहि एफ्डिआय. त्यात मोदी,नी सर्वाधिक विरोध केला होता.

जरा इतिहास वाचा म्हणजे समजेल.

a.November 2011: Miffed over FDI, BJP to stall Parliament proceedings on Monday - https://www.indiatoday.in/india/north/story/bjp-tall-parliament-over-fdi...
b.September 2012: BJP to disrupt parliament on FDI in retail - http://www.livemint.com/Politics/tvluE1LSFJrEXMYoQm0bxK/BJP-denies-alleg...
c.November 2012: ‘BJP will disrupt House till FDI in retail is withdrawn’ - http://www.thehindu.com/news/national/bjp-will-disrupt-house-till-fdi-in...
d.December 4 2012: BJP moves motion against FDI in retail in Lok Sabha - https://www.indiatoday.in/fdi-in-retail/story/fdi-in-retail-upa-governme...

http://profit.ndtv.com/news/politics/article-up-bjp-ruled-states-not-to-...

उगाचच काहिहि लिहु नका माहित नसताना क्रुपा करुन.

कांगेस ने पास करुनच घेतला हो राज्यसभेत आणी लोकसभेत पण भाजपाच्या राज्यांनी आणला नाहि एफ्डिआय. त्यात मोदी,नी सर्वाधिक विरोध केला होता.
<<

वर तुमचे मित्र जे म्हणतायत की
----
2011 साली 49% fdi ला भाजपाने विरोध केलेला तब्बल 7 वर्ष देशाची प्रगती या फुटकळ आणि टुकार पक्षाने वैयक्तिक स्वार्थ आणि विरोधाला विरोध म्हणून रोखून धरली होती. 7 वर्षात देशाचे करोडोंचे नुकसान केले याची जवाबदारी भाजपाने घ्यावी आणि देशाची माफी मागावी.
Submitted by प्रदीपके on 11 January, 2018 - 15:13

---
बर फक्त मोदीनी विरोध केला होता त्यांच्या राज्यात, तर मग त्याने संपूर्ण देशाचे नुकसान कसे काय झाले बर? त्याने देशाची प्रगती कशी काय खुंटली? वैयक्तिक गुजरात राज्याची प्रगती खुंटली असे मानले तरी २०१२ व आता २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गुजराती जनतेने विकासाच्या नावावर मोदी यांना संपूर्ण बहुमत मिळवून दिलेच.

बर फक्त मोदीनी विरोध केला होता त्यांच्या राज्यात, >>>

BJP-ruled states today said they will not implement FDI in multi-brand retail which got the support of states like Jammu and Kashmir and Assam where Congress and allies are in power.

As the stand taken by state governments on executing Centre's decision yesterday to allow 51 per cent FDI in retail went along party lines, the BJD government in Odisha said it would examine the matter.

BSP also joined the BJP in opposing the FDI decision while the RJD backed the Centre.

BJP spokesperson Jagat Prakash Nadda said all states in which the party is in power are unanimous in their opposition to FDI

The parties and alliances ruling in 11 major states including Gujarat, Uttar Pradesh and West Bengal have opposed the Centre's decision which has also been opposed by the AIADMK government in Tamil Nadu.

If one went by the 2011 Census data, there are 37 cities with more than one million population in 11 states ruled by the parties opposed to the decision

http://profit.ndtv.com/news/politics/article-up-bjp-ruled-states-not-to-...

काहिजणांना मराठी वाचता येत नसल्याने इंग्रजीत दिले.

महाराष्ट्र बंद करणारेच कसे नालायकच आहेत आणि 'आमचे हिंदुत्ववादी' किती निष्पाप निरागस आहेत ह्याबद्दल चाललेला उरस्फोड कलकलाट मनोरंजक आहे. असो. >>>
हे कशाबद्दल होते कळाले नाही. मी महाराष्ट्र बंद बद्दल काहीच म्हंटलेलो नाही. कोणालाही दोष नक्की व्हायच्या आधीच दोषी म्हणून जाहीर करण्याबद्दल लिहीले आहे.

पण FDI in retail बद्दल मोदींचं मतपरिवर्तन कशामुळे झाले? (जसं आधार, मनरेगा, जीएसटी, बांग्लादेश भूमि हस्तांतरण, इ.इ. अनेक गोष्टींबद्दल बदललं तसंच Wink

https://www.youtube.com/watch?v=dQA4tXRMU3M

सर्वप्रथम भिमाकोरेगाव येथे आलेल्या लोकांवर ज्यांनी दगडफेक केली त्यावर कारवाई वेळीच केली असती तर पुढच्या घटना घडल्या नसत्या त्यामुळे अमुक तमुक नुकसान झाले म्हणून गळे काढणाऱ्यानीं स्वतःच्या पक्षाने विविध वेळेस पुकारलेल्या बंद मुळे देशाचे किती नुकसान केले आहे ते आधी बघावे मग भोकाड पसरावे.
बंद मध्ये झालेल्या नुकसानीची जवाबदारी लोकांवर सर्वप्रथम दगडफेक केलेल्या संघटनेची आहे आणि कायम राहील

सर्वप्रथम भिमाकोरेगाव येथे आलेल्या लोकांवर ज्यांनी दगडफेक केली त्यावर कारवाई वेळीच केली असती तर पुढच्या घटना घडल्या नसत्या
<<

दगडफेक झाली १ जानेवारीला, महाराष्ट्र बंद लगेच ३ तारखेला पुकारला. आता मधल्या एका दिवसात जगातले कोणते पोलीस गुन्हेगारांना (तेही संघटीत दगडफेक करणारे) शोधून काढतात ? तीन तारखे ऐवजी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला "इतक्या-इतक्या दिवसात गुन्हेगार शोधून काढा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करु" असे अल्टिमेटम सरकारला दिले असते तर निदान पोलीसांना गुन्हेगार शोधायला वेळ तरी मिळला असता पण प्रकाश आंबेडकरांनी 'लोहा गरम है, मार दो हाथोडा' या उक्ती प्रमाणे घटनेच्या तिसर्‍याच दिवशी बंद पुकारुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली.

1 जानेवारीला बंदोबस्त पुरेसा का नव्हता ?दगडफेक होत असताना पोलिसांनी किती जणांना अटक केली? की ते "मुहूर्त काढत होते" कधी वेळ होणार आणि अटक करणार? हे काय खून नव्हता की पोलिसांना वेळ हवा शोधायला! समोर दगडफेक चालू होती पकडायचे की त्यांना

कैच्याकाई बोलत जाऊ नकोस शांटाराम

Pages