अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग ह्या बातमीतही स्पष्ट विधाने आहेत. वाचा जरा. सोयीस्करपणे प्रश्नचिन्हांवर अडकू नका

नक्षली संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतले आहे. हे 7 जण जण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या या 7 जणांचा कोरेगाव-भीमा हिंसाचार व महाराष्ट्र बंदमध्ये हात असल्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

याला प्रश्नचिन्ह म्हणतात.
जर मराठीचा अभ्यास केला असेल तर संशय व्यक्त करणे हा एकप्रकाराचा प्रश्नचिन्ह आहे ही माहिती असायला हवी. 7 दिवस झाले बातमीला अजून संशयित व्यक्तीं विरुद्ध पुरावे सादर करून केस उभी झाली नाही. म्हणजे अजून पोलीस साशंक आहे. पण बेफि आपण तर इथे ठामपणे छातीठोकून लिहून टाकले याला काय म्हणावे?

बातमीत म्हणले आहे " अटक केलेया संशयित तरुणांचा दंगली नम्तरच्या उद्रेकात सहभाग होता का या बाबतचे धागेदोरे अद्याप हाती आलेले नाहित "

यात बरेच मुद्दे आहेत नीट वाचले तर - नाहितर ..... उलटे पडणे आहे - जसे बेफिकिर पडले आहेत

१. अटक दंगली नंतरच्या उद्रेका ची आहे. भीमा - कोरेगाव मध्ये कोणी वाहने जाळली या बद्दल अजुनहि अटक झाली नाहि. म्हणजे भगवे झेंडे घेउन ज्यांनी सुरुवात केली सगळ्याला त्यांना अजुनहि अटक नाहि.
२. स्पष्ट म्हणले आहे की धागेदोरे हाती आलेले नाहित. इथे कसलेहि प्रश्न चिन्ह नाहिये.
३. म्हणजे दंगली नंतरचा उदेक देखील कोणीहि केलेला असु शकतो .

आणी रामदास आठवले जे म्हणाले त्या बद्दल तर बेफिकिर काहिच बोलायला तयार नाहित.

तुमच्या टोळक्याला कसला तरी काल्पनिक आनंद होत आहे ह्याचे सखेद आश्चर्य वाटले. दंगलीत अतोनात नुकसान झालेले आहे. प्राणही गेले आहेत. तुमचे टोळके हातात सर्वाधिकार असल्याच्या थाटात न्यायदान करत सुटले आहे. पाशवी वृत्तीचा निषेध!

1992 aani 2002 च्या दंगलीचा अभिमान बाळगणाऱयां टोळक्याने मगरींचे अश्रू गाळू नयेत.
पेशावर येथिल हल्ल्यात लहान मुलांचा बाली गेला त्याच्या समर्थानात कविता काही रिकामी डोकी असणाऱ्या हिंदुत्व वादि लिहितात त्याचे कौतुक तुमचेच टोळके करत होते इतकेच काय तर एका धर्माची शाळकरी मुलं पिकनिक ला गेली असताना पाण्यात बुडाली तेव्हा देखील अश्याच प्रकारची वक्तव्य तुमच्या टोळक्याने केलेले होते तेव्हा अश्रू गाळता आले नाही आणि आता रडून दाखवत आहे
30 जाने ला बंदुकीचा फोटो टाकून हत्येचे निर्लज्ज समर्थन करणारे तुमची टोळी आहे विसरतात का?
हास्यास्पद आहेस.
निषेध करत आहे म्हणे ..

बेफी, प्रत्येक पोष्टेला +१.
बाकी ते भक्ताड भक्ताड करत बसलेल्यांचे भारीच चाल्लंय. कुठल्याही विषयाला सरकारला जबाबदार धरण्याची कला कौतुकास्पद आहे. पण डिनेस्टीच्या भक्ताडांना ते काय नवीन नाय. चालू द्या, ५००+ गाठणार म्हंजे हा धागा तर. Wink

तुमच्या टोळक्याला कसला तरी काल्पनिक आनंद होत आहे ह्याचे सखेद आश्चर्य वाटले. >>>>>>>> आम्हाला प्रत्येक दंगलीत झालेल्या नुकसानीचे बद्दल वाइट वाटते आणी आम्हि प्रत्येक दंगलीचा निषेधच करतो पण तुमच्यासारखे सिलेक्टेड निषेध नाहि करत.

बाकि बेफिकिर मुद्द्याचे सोडुन पर्सनल टिका करत बसले आहेत. प्रश्नचिन्ह आहे असे म्हणल्यावर प्रश्न्चिन्ह नसलेले वाक्य दाखवले - तो विषय सोडुन पळाले. मेवानीचा उल्लेख दाखवला - तो विषय सोडुन पळाले. रामदास आठवले - केंदिय मंत्री यांचे मेवानी बद्द्ल म्हणणे दाखवले - तो विषय सोडुन पळाले.

पर्सनल टिका करायला येथे येउन नका. धाग्याच्या विषयाबद्द्ल मुद्दे असतील तर बोला आणी त्यावर उत्तर दिल्यावर पळुन जाउ नका

पुरेसा वेळ मिळत नसल्याने प्रत्येक पोस्टला उत्तर देता येत नाही. ह्या पोस्टमध्ये लिहितो.

१. मी पोस्ट केलेली बातमी ही सरळसोटपणे नक्षलवाद्यांचा हात आहे असे गुप्तचर विभागाला कळल्याचे सांगते. येथील टोळक्याच्या मते मात्र ती पेड बातमी आहे.

२. लोकसत्तातील बातमीच्या हेडिंगला प्रश्नचिन्ह आहे म्हणजे वार्ताहरच गोंधळलेला आहे. पण निदान बातमीत काही विधाने आहेत. त्या विधानांचा अर्थ दंगलीनंतरच्या उद्रेकाशी माओवाद्यांचा संबंध असल्याचे धागेदोरे हाती आलेले नसले तरी वेणूगोपाळशी संबंधीत तरुणांचा संपर्क होता व त्याला अटक केली असा आहे. ही बातमी पूर्णतः निराळी आहे. दंगल का भडकली ह्याचे वृत्त मी दिलेल्या बातमीत आणि दंगलीनंतरच्या उद्रेकात माओवाद्यांचा संबंध आहे की नाही ह्याबद्दलचे वृत्त ह्या लोकसत्ताच्या बातमीत आहे. शिवाय, लोकसत्तातील बातमी पेड नाही ह्याबाब्त टोळके ठाम आहे ते निराळेच.

३. धागा भीमा कोरेगाव दंगल ह्या विषयावरचा आहे. येथे १९९२ ची दंगल, नंतरची दंगल, हे विषय टोळक्याने घुसडलेले आहेत. ते घुसडण्याचे कारण हेच की मनात नुसताच कसलातरी संताप आहे पण भीमा कोरेगाव दंगलीबद्दल काहीच बोलता येत नाहीये.

४. मेवानी आणि खलिदची भाषणे आगीत तेल ओतणारी होती व त्यांच्यावर फिर्याद दाखल करून घेण्यात आलेली आहे. एक कोणी गुजराथचा तरुण उठतो आणि थेट भीमा कोरेगावच्या दिवसाचे निमित्त साधून प्रक्षोभक भाषण करतो ही तर आपली अवस्था आहे. जाणते राजे अशीच गंमतीशीर वक्तव्ये करतात हीसुद्धा एक मोठी दुरावस्था आहे. पण हे दोघे हिरो असल्याच्या थाटात येथे बाता मारल्या जात आहेत.

५. माझा धाग्यावरील आधीचा प्रतिसाद, ज्यात मी एक प्रश्न विचारलेला होता, त्यावर एकाही सदस्याने व्यवस्थित उत्तर दिलेले नाही. ते न देण्याचे कारण उघड आहे की ते उत्तर गैरसोयीचे आहे. तो प्रश्न येथे पुन्हा कोट करत आहे. कोणीतरी उत्तर द्यावे.

>>>>प्रश्न असा आहे, की:

तेव्हा महार असलेले सैनिक इंग्रजांच्या वतीने लढले. ते आज हिंदू धर्म त्यागून अशा धर्मात गेलेले आहेत जेथे सगळे समान आहेत आणि जातीचे नांवही उच्चारण्याचे त्यांना आता कारण नाही. तेव्हा मराठे असलेले तेव्हा छत्रपतीही होते आणि पेशव्यांच्या सैन्यातही होते. ते आजही मराठेच आहेत त्यामुळे भीमा कोरेगावला झालेल्या पराभवाची खपली कोणी काढत असेल तर त्यांना राग येतो. (हा राग आजही दोनशे वर्षांनी येणे हास्यास्पद आहे हे अलाहिदाच). तर हा विजयोत्सव नक्की कोणाचा, कोणाविरुद्ध आहे? तेव्हा महार परंतु आज हिंदूच नसल्यामुळे महारही नसलेल्यांचा व तेव्हा इंग्रजांच्या बाजूने लढणार्‍यांचा, तेव्हाच्या पेशवे सैन्यातील सैनिकांच्या आजच्या वारसांशी का? म्हणजे हा विजयोत्सव इंग्रज जिंकले म्हणून आहे की तेव्हाचे महार - जे आज हिंदू नाहीत - ते तेव्हा सवर्णांविरुद्ध (!) जिंकले म्हणून आहे की हिंदू धर्म त्यागल्यानंतरही जातपात विसरू न शकलेल्या आजच्या पिढ्यांचा हिंदू धर्मात राहिलेल्या सवर्णांविरुद्ध (!) आहे? <<<<

ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळेपर्यंत चर्चेत रस नाही. पलायनवादी म्हणण्याचा आनंद मिळवायचा असेल तर जरूर मिळवावा.

सोनागढ च्याआ लढाईत जर 12 शीख 12000 अफगाण सैन्यायाचा पराभव करू शकतात आणि हे मान्य देखील होते तर 500-800 महार सैन्य "28000 पेशवे" सैन्याचा पराभव करू शकतात हे काही तथाकथित लोकांना पचत नाही Wink
मुळात ते सैन्य देखील इंग्रजांचे होते आणि हे सैन्य देखील
फरक इतकाच की वार्षानुवर्षं "पेशवे" यांनी छत्रपतींचे सामाजिक न्यायचे धोरण गुंडाळून बाजूला ठेऊन महारांवर जे अन्यायकारक अति आणि बंधने लादली होती त्याआच्या विरुद्ध महार लढले.
आता काही लोक अशी अफवा पसरवत आहे की सैन्य छत्रपतीं विरुद्ध लढले मुळात पेशव्याने छत्रपतींचे धोरणच राबवले नाही मग जो काही सामाजिक असमानता निर्माण केलेली होती तिला निव्वळ पेशवे जवाबदार आहे आणि जो असंतोष तयार झाला तटाला पण फक्त पेशवे जवाबदार आहे.
म्हणून फक्त त्यांच्याच विरोधात लढले गेले. सातार्याला जाऊन महार लढले नाही हे सोईस्करपाने काही लोक विसरतात. ज्यांनी अत्याचार केला त्यांच्या विरुद्ध लढले आहे त्यामुळे यात सतत कातडी बचाव धोरण जे तथाकथित पेशव्यांच्या अनुयायांनी घेतले आहे ते हास्यास्पद आहे. ते मुद्दामून ही लढाई महार विरुद्ध छत्रपती अशी येनकेनप्रकारेण रंगवायचा प्रयत्न सुरू केला आहे.
कारस्थान करून नामानिराळे राहण्याची सवय अशी ही यांनी पूर्वीपासून आहे म्हणा.
ही लढाई पेशव्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक अव्यवस्थे विरुद्ध होती आहे हे सत्य कुठलाही कळी चा नारद बदलू शकणार नाही

ज्यावर उत्तरे दिली आहेत ते प्रश्न परत विचारु नका. जे प्रश्न विचारले आहेत त्यावर उत्तरे द्या.

मुद्दा १. आणी २ तुम्हि पेपर चे काट्रन टाकले की संशयितांना अटक केली. त्यावर कोणीतरी दुसरे काट्रन टाकले पश्न चिन्ह वाले - ज्या बातमीत स्पष्ट पणे म्हणले आहे की पुरावे हाती आलेले नाहित .

http://www.tribuneindia.com/news/nation/arrested-naxals-involved-in-bhim...
Police say the arrested naxalites were active in many slum pockets in and around Mumbai where they were allegedly recruiting disaffected youths to join the Maoists.

हे तेच आहेत मुंबै मधुन अटक केलेले.
या दोन्हि बातमीचा संबध आहेच. पत्रकार गोंधळलेला आहे म्हणुन पळुन जाउ नका.

मुद्दा ३. विषय भीमा कोरेगाव चा असला तरी तुमची विधाने पुरावा न देता बेछुट आरोप करणारी आहेत (उदा. मेवानी विरोधात आरोप). तेव्हा बेछुट आरोप करण्याचा मुद्दा येणारच आणी ही सवयच भक्तांना कशी आहेत याची उदाहरणे येणारच. हे विषयाला धरुनच आहे.

मुद्दा ४. मेवानी- तुम्हि मेवानीने भडकावु भाषण केले असे म्हणले - त्यावर मी उत्तर दिले कि - केंदिय मंत्री स्वतः म्हणत आहेत की मेवानी चा हिंसेत काहि सम्बंध नाहि . आता त्यावर उत्तर देन्याएवजी तुम्हि परत मेवानी ने भड्कावु भाषण केले हे जुनेच लिहिनार असाल तर ते फक्त हास्यास्प्द दिसते

मुद्दा ५ - तुमचा प्रश्न. त्याचेहि उत्तर मी दिले आहे.
हे पहा -
https://timesofindia.indiatimes.com/india/pm-modi-visits-haifa-pays-homa...

PM @narendramodi arrives at Haifa to pay homage to Indian soldiers at Haifa, liberated in WW I https://t.co/a53q27xGav
— PIB India (@PIB_India) 1499329480000

his is the final resting place for 44 of the Indian soldiers who sacrificed their lives during World War I to liberate the city," Modi had said before visiting the site.

तेव्हा तुम्हि प्रधान सेवकांना विचारा की १८१८ मध्ये जे ब्रिटिशांकडुन लढले आणी १९१८ मध्ये जे ब्रिटिशांकडुन लढले - तर हा विजयोत्सव नक्की कोणाचा, कोणाविरुद्ध आहे? प्रधान सेवक ब्रिटिश आणी ओटोमन एम्पायर यातील ब्रिटिशांचा विजय हा भारताचा विजय म्हणत असतील तर ब्रिटिश आणी पेशवे यातील ब्रिटिशांचा विजय हा भारताचा विजय कसा नाहि ?

जर इतिहास विसरायचा तर सगळा विसरा. सिलेक्टेड विसरु नका. कोणतेच सेलेब्रेश्न करु नका.

आता मेवानी ने भड्कावु भाषण केले हे जे तुम्हि म्हणता त्याचे पुरावे द्या.
केस केली आहे सांगु नका. अशा हजारो केसेस सर्वच राजकिय पुढार्यांवर आहेत.

साक्षी महाराज सांगीत सोम आदित्यनाथ उमा भारती नरेंद्र मोदी अनिल विज इ नेते तर तोंडातून फुल उधळतात
असे म्हणावे लागेल

काही लोक पेपरात बातमी वर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी

पुणे : कोरेगाव भिमा दंगल हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा सत्यशोधन समितीने केला आहे. यात संभाजी भिडे तसेच मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचंही सत्यशोधन समितीने म्हटलं आहे. कोरगाव भिमामध्ये स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या दलितांवर आधी हल्ला करण्यात आला, यानंतर दंगल उसळल्याचं सत्यशोधन समितीच्या अहवालात म्हटलं आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी जेव्हा कोरगाव भिमात दंगल उसळी, तेव्हा कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, यांनी दंगलीच्या चौकशीसाठी १० दलितांची सत्यशोधन समिती नेमली होती, त्या समितीने हा अहवाल दिला आहे.
http://zeenews.india.com/marathi/maharashtra/koregaon-bhima-roits-sambhj...

आता बोला

आता बोला
नवीन Submitted by प्रदीपके on 20 January, 2018 - 08:44 >>>>> हा हा हा .

‘नक्षलवाद्यांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. समाजातील वंचित घटकांसाठी आपले घर-दार सोडून ते जंगलात राहतात. गरिबांना मदत करतात. परंतु, त्यांचा मार्ग चुकीचा असून आंबेडकरवादी विचारांशी तो कधीही जुळणारा नाही. त्यांनी आपला मार्ग सोडून लोकशाही स्वीकारून मुख्य प्रवाहात सामील व्हावे. तसे झाल्यास त्यांना आमच्या पक्षात घेऊ.’

भीमा कोरेगाव येथील घटनेबाबत ते म्हणाले,‘हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांकडे पुरावे आहेत. त्यामुळे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांना वाचविण्याचे कोणतेही काम केंद्र किंवा राज्य शासनाकडून होणार नाही. या दोघांनाही तातडीने अटक करावी. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबरोबर भिडे गुरूजींची छायाचित्रे आहेत, म्हणून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होत आहेत या आरोपाशी मी सहमत नाही. न्यायालयीन चौकशीत सत्य बाहेर येईल.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

चला केंद्रिय मंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे बरे झाले. इथे आता उगीचच चुकीची माहिती पसरवणार्यांनी आता दिशा भुल करणे बंद करावे.

https://scroll.in/latest/866074/bhima-koregaon-clashes-pune-court-reject...

कोर्टाने बेल अप्लिकेशन फेटालुन लावली एकबोटेंची.

District Judge Prahlad Bhagure observed that the unrest during the 200th anniversary celebrations of the Battle of Bhima Koregaon was a “grave matter”, and that Ekbote faced “very serious charges against him”, reported The Hindu.

A preliminary report prepared by a 10-member fact-finding and co-ordination committee said the violence was planned and members of radical Hindutva groups were involved in it, the Hindustan Times reported

>>तेव्हा कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, यांनी दंगलीच्या चौकशीसाठी १० दलितांची सत्यशोधन समिती नेमली होती, त्या समितीने हा अहवाल दिला आहे.
ह्म्म्म्म, बरोबर आहे, चालू द्या जे काही चालले आहे ते.
खरेतर बरेच काही लिहावेसे वाटत आहे, पण जाऊ दे !!!

लिहा की...
सनवनीं दिलेल्या धमकीला घाबरलात का?

आजकाल एक गमतीदार विनोदी विरोधाभास भारतात पहायला मिळत आहे जो महा भयानक आहे.
जाती, धर्म, पंथ, इ. चे घेट्टो करून वर म्हणायचे की आम्ही समता आणणार आहोत, आम्हाला समता अपेक्षित आहे, इ. इ. Sad

महेश हे सगळे आपल्याच आवडत्या पक्षाने सुरू केले आहे.
उत्तर प्रदेशात समशान कब्रस्तान ,कर्नाटकात मुस्लिम अल्ला आणि राम, गुजरात मध्ये राम रहीम असे नारे देऊन समाजात असंतुलन आणायला तेच जवाबदार आहे. भविष्यात आपलयाला या विखारी वक्तव्याचे फळ भोगावे लागणार आहे.

तेव्हा तुम्हि प्रधान सेवकांना विचारा की १८१८ मध्ये जे ब्रिटिशांकडुन लढले आणी १९१८ मध्ये जे ब्रिटिशांकडुन लढले - तर हा विजयोत्सव नक्की कोणाचा, कोणाविरुद्ध आहे? प्रधान सेवक ब्रिटिश आणी ओटोमन एम्पायर यातील ब्रिटिशांचा विजय हा भारताचा विजय म्हणत असतील तर ब्रिटिश आणी पेशवे यातील ब्रिटिशांचा विजय हा भारताचा विजय कसा नाहि ?>>>>>>

1818 मधे पूर्ण भारत ब्रिटिश अधिपत्याखाली नव्हता, ब्रिटिश भारतात स्वतःची संपूर्ण सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, ज्यांनी विरोध केला त्यांच्याशी युद्ध केले.

1918 मध्ये ब्रिटिश भारतात सत्ताधारी होते.

हा फरक आहे.

पूर्ण एकसंध एक सत्ताधारी असलेला भारत ही कल्पना 1818 मध्ये नसेलही, 1918 मध्ये ब्रिटिश इंडिया हा एक सत्ताधारी असलेला भूभाग होता ज्याचे आता 3 देश झालेले आहेत.

1818 मधे पूर्ण भारत ब्रिटिश अधिपत्याखाली नव्हता, ब्रिटिश भारतात स्वतःची संपूर्ण सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, ज्यांनी विरोध केला त्यांच्याशी युद्ध केले. >>> हो ना ? मग पेशवे म्हणजे पुर्ण भारत कसा काय झाला ?
1918 मध्ये ब्रिटिश भारतात सत्ताधारी होते. >>>> बरोबर आणी आपण त्यांच्यापासुन स्वतंत्र होण्यासाठी लढत होतो. मग त्यांची सेना ही भारताविरोधीच . त्याला कसले वंदन करायचे.

साधनाजी. जराशी मिश्टेक आहे. एकसंध भारत हा १९४७ नंतर व्हायला सुरुवात झाली जेव्हा एक एक संस्थान भारत नावाच्या ऑफिशियल देशात सामिल झाले. एकछत्री अंमल तर सम्राट अशोकापासून सुरु आहे. मग प्रत्येकवेळी जो सर्वोच्च सर्वत्र सत्ताधारी त्यालाच आपल्या निष्ठा वाहायच्या असा संकेत असेल तर मग गुप्तकाळापासून ब्रिटीशांपर्यंत ज्या ज्या सर्वोच्च सत्ताधार्‍यांच्या विरोधात सत्ता हिसकावण्याची युद्ध झाली ती सगळी देशद्रोहीच म्हणावी लागतील. त्यात मुस्लिम शासकही आलेच. त्याविरोधात लढणारे शिवाजी महाराजपण देशद्रोही ठरवावे लागतील, हो की नै?

>>समाजात असंतुलन आणायला तेच जवाबदार आहे.
का ? मराठा मोर्चा, ब्रिगेड, शिवधर्म, दलित संघटना, अनेक जाती, धर्म, पंथ यांचे दबावगट, इ. इ. हे काय आहे ??
सतत एकाच बाजुचा विखारी द्वेष करणे चांगले जमते की तुम्हाला Happy
अमुक एकजण वाईट वागतो म्हणुन मी पण तसाच वागणार, असल्या प्रवृत्तीने देशाचे अनेक तुकडे झालेले दिसतील. Sad
जाउद्या, तसेही या धाग्यावर आणि विषयावर फार काही लिहिण्यासारखे नाहीये. तुमचे चालू द्या सुखेनैव !

Pages