अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच सैन्य राष्ट्रपती यांचे असते मग मोदि ने थोडी केले प्रणव यांनी सर्जिकल स्राईक केला म्हणा... मोदींचे काहीच नव्हते श्रेय..

मोदींनी सर्जिकल स्ट्रैक केले म्हणतात ते का?
<<

असे कुणी म्हटल्याचे मला तरी माहित नाही "सर्जिकल स्ट्राईक" हे हिंदूस्थानी सैन्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर राजकिय नेतृत्वात केले. असेच आजपर्यंत ऐकून आहे.
--=========

इंदिरेने पाकिस्तान युद्ध जिंकले म्हण्तात ते का?
<<

आता लाळघोटे कॉंग्रेजी भाट, नेते, समर्थक असे म्हणतात त्याला कोण काय करु शकते?

पुणे आणि सभोवतालच्या परिसराचा कारभार चालवणे , राजकीय सामाजिक आणि आर्थिक धोरण ठरवणे आणि महसूल गोळा करणे याचे अधिकार पेशव्यांना दिलेले होते.
इतिहासाची माहिती नसेल तर कृपया नागपुरी इतिहास इथे लिहू नका ..
त्यामुळे त्या परिसरात घडणाऱ्या सगळ्याची जवाबदारी पेशवे यांच्यावर येते. जर असे नसेल म्हणायचे तर मग पेशवेकालिन वगैरे शब्द नियोजन बंद करा.
झालेले युद्ध हे पेशवे आणि रेजिमेंट यांच्यात नसून ते सातारांचे राजे व रेजिमेंट यांच्यात झाले आहे हे दाखवण्याचा कुटील डाव काहींचा आहे . जो गेल्या 2-3 वर्षात पद्धतशीर उभा केला जात आहे. बाकीचे श्रेय घ्यायला पेशवेना पुढे करणारे मात्र या युद्धात त्यांना मागे घेऊ पाहतात.. का? कारण
दोन समाजात तेढ वाढवण्याचे कारस्थान सुरू आहे.

भाजपाचे व नागपुरी भाट यात माहीर आहेत

मुहब्बत की तडप ऐ दिल इधर भी है उधर भी है....
कहे कैसे यही मुशकिल इधर भी है उधर भी है....

तात्पर्य काय की लाळघोटे, भाट, समर्थक स्गळीकडे असतात,

तात्पर्य काय की लाळघोटे, भाट, समर्थक स्गळीकडे असतात.>>+१११

कोरेगाव भीमा स्मारकाबाबत शाळेत असताना ऐकीव माहिती एवढीच होती की हा एक विजयस्तंभ आहे जो इंग्रजांच्या मराठ्यांवरील विजयाचे प्रतिक आहे. पहिला विचार आला, असला स्तंभ तर इंग्लंडमधे पाहिजे, हा इथे काय करतोय? मग कळलं की तो लढा इंग्रजांच्या बाजूने महारांची सेना लढली होती. तरीही परत विचार आला, की परकीयांच्या बाजूने स्वकीयांशी लढा जिंकल्याचे स्मारक कसे काय होवू शकते? जर या घटनेमागील भावना समजून न घेता फक्त एवढीच माहिती विचारात घेतली तर नक्कीच कोणालाही त्या स्तंभाबद्दल राग अथवा द्वेष निर्माण होवू शकतो. परंतू सुदैवाने त्या लढ्यामागील कारणांचा, विचारांचा अभ्यास करता लक्षात आले की महारांची त्या लढ्यात सामील होण्यामागची भावना ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व पेशवेकाळात द्रूढ झालेल्या वर्णवर्चस्वाविरुद्ध होती. त्यांना गोरा साहेब आपला वाटला हे खरंतर भारताचं दुर्दैव आहे व त्यावेळची राज्यव्यवस्था त्याला जबाबदार आहे. जाती-पातींची भोकं असलेल्या समाजव्यवस्थेत कायमचे भगदाड पाडायला काय करायला पाहिजे हे उमजायला त्या गोर्या साहेबाला किती वेळ लागला असेल? काल-परवाच्या घटना पाहून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की फोडा व राज्य करा (यात आहे हे वाचवा किंवा गेलेलं परत मिळवा हेही आले) हा राजकारण्यांचा रामबाण फॉर्म्युला आहे.

पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यात सगळे येतात. मग पेशव्यांच्या सैन्यात फक्त ब्राह्मणच होते हे कोणी सांगितले? की हे असे फक्त नागपुरी शाळेत शिकवले गेले?
भीमा कोरेगाव लढाईत अवघ्या 500 ते 800 महार रेजिमेंट ने पेशव्यांच्या 28k सैन्याचा पराभव केला. या वाक्यात काही संघीष्ट लोकांना फक्त विशिष्ट जात दिसत असेल तर त्यांनी मानसिकता आणि डोळे दोनही तपासून घ्यावी ही नम्र विनंती करतो.
>>>
तुम्ही कोणत्या बाजुने आहात यावर ते अवलंबुन आहे. पण जात मात्र दिसणारच. सगळ्यांनाच. शेवटी प्रत्येकाने कुठला ना कुठला चष्मा घातलेला आहेच.
तुमच्यासारखे बरेच त्यादिवशी भीमा कोरेगावला असणार.
इतकं सगळं होउन सुद्धा पालथ्या घड्यावर पाणी.

२०० वर्षापुर्वी जी घटना होउन गेली त्यावर सगळी अक्कल गहाण ठेवुन दंगल झाली. आणि इथे अशी वादावादी.
इतिहासाची मढी उकरुन काढायची आणि भांडत बसायचं. आजच्या काळात काय चाललय ते द्यायचं सोडुन आणि असं काहीतरी उकरुन काढायचं. जो समाज द्वेषावर पोसला जातो त्याची प्रगती कशी होणार? फक्त जाज्वल्य अभिमान बाळगुन काय साध्य होणार आहे? आमचा इतिहास श्रेष्ठ आहे असं म्हणुन पोट भरतं का? ११०० कोटींचं नुकसान झालं महाराष्ट्राचं, तो सगळा आपला सगळ्यांचा कष्टाचा पैसा. फुकटात गेला. इतिहासाच्या नावानं वर्तमान मात्र खराब होतय. मला हे कळत नाही की ज्या लोकांवर कुटुंबाची जबाबदारी आहे, असे लोक सगळ सोडुन दगडफेक करतात, रस्ते अडवतात, त्यानं नेमकं काय साध्य होणार आहे. ज्या लोकांचं हातावर पोट आहे, त्या सगळ्यांची किती फरफट होत असेल अशा दिवसात.

महाराष्ट्रात मागच्या ३ वर्षात काहीही ठोस प्रगती नाहिये. पुण्याचा आंतरराष्ट्रिय विमानतळ कधी होणार माहीत नाही.
शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, मुंबई विद्यापीठ, आर्थिक तुट, इ इ
पण ते सगळं सोडुन लक्ष भलतीकडेच वळवलं जातय. विरोधी पक्षांनापण बहुतेक हेच हवय.

इतिहासाला इतिहासातच राहु द्यायला पाहिजे तरच वर्तमान सुसह्य राहील.

वर्तमानातही इतिहासाची पुनरावृत्ती होत असेल, तर इतिहासाला इतिहासातच राहू द्यायला पाहिजे या म्हणण्याला अर्थ नाही.
शिवाय हे आत्त्ताच का म्हणावंसं वाटलं (दलितांनी पुकारलेल्या बंदनंतर) असा प्रश्न कोणी विचारला तर त्यात वावगं काही नाही. इतिहासाच्या जाळावर वर्तमानात पोळ्या शेकायचं काम सगळेच करतात. त्यामुळे इतिहासाला इतिहासात राहू देणं सिलेक्टिव्ह असू नये.

इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेउन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा
....विंदा करंदीकर.

इतिहासाला इतिहासातच राहु द्यायला पाहिजे तरच वर्तमान सुसह्य राहील.<<
>>वर्तमानातील अनेक ज्वलंत प्रश्न डोळ्यांआड करण्यासाठी समाजाने असे इतिहासात शिरणे आणि गुरफटणे काहींसाठी सोयीचे असते. हा कावा अनेकदा जनतेच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे आजवर अनेकदा महाराष्ट्रात अशा प्रकारे इतिहासावरून कलह निर्माण झालेले आणि त्यातून सामाजिक संघर्षाला तोंड फुटलेले दिसेल. सध्याच्या या सार्‍या विषयामागे मूलतः राजकारण आहे हे तर निर्विवाद.

इतिहासाला इतिहासात राहू देणं सिलेक्टिव्ह असू नये.
<<
>>इतिहास लक्षात ठेवून भविष्याचा वेध घेत वर्तमानात वाटचाल करण्याचे भान ठेवावे लागेल!

झालेले युद्ध हे पेशवे आणि रेजिमेंट यांच्यात नसून ते सातारांचे राजे व रेजिमेंट यांच्यात झाले आहे हे दाखवण्याचा कुटील डाव काहींचा आहे . जो गेल्या 2-3 वर्षात पद्धतशीर उभा केला जात आहे. <<
>> इतिहासाची तोडफोड करून आपल्याला हवा तसा इतिहास मांडण्याचा प्रकार सुरवातीपासून सुरू आहे.. यातून छत्रपती ही सुटले नाहीत.. इतिहासाची मोडतोड करून, हव्या तशा प्रतीकांची निर्मिती करायची आणि नंतर त्याचे उदात्तीकरण करत राहायचे हा राजकारणाचा एक भाग आहे

प्रदिपके
"....असे फक्त नागपुरी शाळेत शिकवले गेले? हे वाक्य चुकिचे आहे. नागपुरातच दिक्षाभूमी आहे जेथून शांततेची शिकवण सांगितल्या जाते.

यक्ष
छान प्रयत्न
पण तोडका आहे अजून जरा जास्त करा...

भिमा कोरेगाव येथे दलित जनतेवर झालेला हल्ला हा निषेधार्ह होता.पाशवी शक्ति ह्या समाजात फुट पाडण्यात यशस्वि होत आहेत असेच सध्याचे चित्र आहे.

आले रे आले पगारे आले !
पगारे, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत. (आम्ही = आ.ब.व.)
नव वर्षाच्या पुर्वक्षितिजावर महाराष्ट्राचे सामाजिक पटल खराब करणारी ही जी लांच्छनास्पद घटना घडलेली आहे तिचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

काही भक्ताड म्हणतात की अशी काही घटना झाली तर भाजप शिवसेनेला फायदा होत नाही
http://www.sarkarnama.in/pune-subrao-patil-story-19474
यावर वाचा काय काय आणि कुठे कुठे फायदा झालेला होता

http://www.sarkarnama.in/pune-subrao-patil-story-19474
यावर वाचा काय काय आणि कुठे कुठे फायदा झालेला होता
नवीन Submitted by प्रदीपके on 7 January, 2018 - 18:53
<<
<<

वरिल लेखाला ९३ टक्के वाचकांनी "हास्यास्पद" ही श्रेणी दिली आहे,
त्यावरुनच त्या लेखाची लायकी काय आहे ते कळते. Proud

९३ नाय, ९७ टक्के. किती? पुर्ण ९७%. म्हणजे २८ लोकांनी हॅप्पी ही श्रेणी दिली आहे. तिथे कुठेच नसलेली "हास्यास्पद" श्रेणी दिसलेल्यांना डोळे आणि मेंदू तपासायची गरज आहे.

happy unmoved amused excited angry sad यापैकी नेमकी कोणती श्रेणी दिली म्हणजे तो लेख लायकी नसलेला आहे असे सिद्ध होईल?

सुबराव पाटील यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे लोक फार कमी आहेत याचे वाईट वाटते.
त्यांनी ज्याप्रमाणे सलोखा साधण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न भि.को.येथे का कधी झाला नाही, किंवा का कोणालाच करावासा वाटला नाही.

विदूषक भक्तांना सगळी कडे हसायला येते ..भक्त लेख ना वाचता फक्त भाजपावर आहे ना मग हास्यास्पद ठरवून मोकळे होतात डोकं असते कुठे की लेख वाचून लेखक काय म्हणतोयबते समजायला Wink

लेखाची लायकी काढणारा प्रतिसादच हास्यास्पद ठरला म्हणायचं का?
आयटीसेलला कामाला लावावं लागणार.

त्यांनी ज्याप्रमाणे सलोखा साधण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न भि.को.येथे का कधी झाला नाही, किंवा का कोणालाच करावासा वाटला नाही. >>> अहो राज्यकर्त्यांनी त्यासाठी परवानगी द्यायला लागते. इथे राज्यकर्त्यांनाच दुफळी माजवायची होती.

ह्या युगातील अंधभक्तघोषित'जाणते राजे'ह्यांनी दंगलीनंतर केलेली दोन चार विधाने निव्वळ मनोरंजनमूल्य असलेली नाहीत तर यज्ञ पेटताच राहील आणि त्याचे बिल संबंधीत दोन समाजांऐवजी तिसर्‍याच समाजाच्या नावाने फाडले जाईल ह्याची काळजी घेणारीही आहेत.

अनेक दशकांचा अनुभव पाठीशी असल्याने पुलोद, भूखंड, राकॉ अश्या महत्वाच्या स्थानकांनंतर गाडी आता 'मी नाही त्यातली'ह्या वळणावर आलेली आहे.

>>इथे राज्यकर्त्यांनाच दुफळी माजवायची होती.
कैच्याकैच, असे केले तर त्यांना स्वतःलाच खुप ताप होणार डोक्याला आणि सत्तेला सुरूंग लागायची भिती,
ज्यांना सत्ता मिळालेली नाही अशा शक्तींचाच हा उपद्व्याप असणार असे अनेकांना वाटत आहे असे दिसते.

जाणता राजाचे विधान बर्याच जणांना झोंबले दिसते.
असेही त्या झोंबलेल्या लोकांना सत्य पचत नाहीच म्हणा.
नियोजीत समितीचा अवहाल पण जाणत्या राजाच्या विधानाची पुष्टि करतो.
देशात फूट पाडायचे प्रयत्न 90 वर्षांपासून सुरू आहे आता कुठे त्याला यश राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे मिळू लागले.

म्हणजे हिसाचार घडवून आमणे हा सत्तेचा राजमार्ग असं म्हणताय का महेश?
जहॉं जहॉं हिंसा का कीचड होगा, वहॉं वहॉं कमल खिलेगा , असं कोण म्हणालं बरं?
तिकडे मुजफ्फरपूर झालं . आता इकडे कर्नाटकात त्यासाठीच प्रयत्न चालले आहेत का?

महाराष्ट्रात जगण्याच्या, पोटाच्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष भरकटवायला हवंच ना?

कैच्याकैच, असे केले तर त्यांना स्वतःलाच खुप ताप होणार डोक्याला आणि सत्तेला सुरूंग लागायची भिती, >>>> २००२ चे लर्निंग आहे. सत्तेला सुरुंग कोणाच्या लागला ते समजले तेव्हाच

ह्या युगातील अंधभक्तघोषित'जाणते राजे'ह्यांनी दंगलीनंतर केलेली दोन चार विधाने निव्वळ मनोरंजनमूल्य असलेली नाहीत तर यज्ञ पेटताच राहील आणि त्याचे बिल संबंधीत दोन समाजांऐवजी तिसर्‍याच समाजाच्या नावाने फाडले जाईल ह्याची काळजी घेणारीही आहेत. >>> आणी मोदी त्यांच्यापासुन इन्स्पिरेशन घेतात !

बाकि कोणाला प्रयत्न करुन हि प्रधानमंत्री होता आले नाहि आणी कोणाला होता आले यातच दिसते की पेटवण्यात एक्स्पर्ट कोण आहेत!

'कांच' पर 'पारा' चढावो तो आईंना बनता है
किसीं को आईंना दिखा दो तो"पारा" चढ जाता है..!

दुर्दैवाने आपल्याकडे कधीच दंगलीचे विश्लेषण होत नाही. त्याऐवजी त्यावर राजकीय शेरेबाजी चालते. विरोधक सत्ताधाऱयांच्या राजीनाम्याची मागणी करतात तर सत्ताधारी एकादी न्यायालयीन चौकशी माथी मारून वेळ मारून नेतात..त्यामुळे समस्येचा उलगडा होण्याऐवजी ती अधिकच जटील बनत जाते. दंगली मागून दंगली घडत जातात आणि यात अकारण सामान्य माणूस भरडला जातो. कुणी काय म्हटले, कोणत्या राजकीय नेत्याने कोणता आरोप केला. हे आज महतवाचे नाही. सलोख्याच्या निरपेक्ष प्रयत्नांसाठी कुणी अजून पुढे आला नाही, ही खरी शोकांतिका आहे. दंगल भडकल्यावर शांततेच्या घोषणा करून सत्तेची पोळी भाजण्यापेक्षा तवा तापूच नये, यासाठी प्रयत्न करणारा एकदा नेता या महाराष्ट्रात आहे का??

Pages