अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 03:32

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. images(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दंगल भडकल्यावर शांततेच्या घोषणा करून सत्तेची पोळी भाजण्यापेक्षा तवा तापूच नये, यासाठी प्रयत्न करणारा एकदा नेता या महाराष्ट्रात आहे का??

<<

आहे ना. घड्याळकाका !
त्यांनी ३१ डिसेंबरला सर्वांना, १ जानेवारीला शांतता पाळायचे आवाहन केले होते, त्याप्रमाणे सर्व कसे शांतेत पार पडले. तसेच प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतरही त्यांनी महाराष्ट्र बंद शांतेत करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्र बंद अगदी शांतेत व "यशस्वी"पणे पार पडला. आहे की नाही गंमत !

आहे ना. घड्याळकाका ! >>> भक्तांच्या देवाचे इन्स्पिरेशन असे म्हणा की सरळ - लगेच कळते .

बरे ते ७०००० कोटींच्या घोटाळ्याचे काय झाले पुढे ? काहिजण तुरुंगात जाणार होते म्हणे ४ दिवसात भाजपा सत्तेत आल्यावर!

बरे ते ७०००० कोटींच्या घोटाळ्याचे काय झाले पुढे ? काहिजण तुरुंगात जाणार होते म्हणे ४ दिवसात भाजपा सत्तेत आल्यावर!
नवीन Submitted by राहुलका on 9 January, 2018 - 17:29

<<

कुणाला कश्याचे तर बोडकीला केसाचे ! Lol

शरद पवार एकमेव नेते आहे जे राज्यात शांतता प्रस्थापित करतात पण काही संघटना खुसपट काढत आहे.
अजून कुठलीच कारवाई सरकारतर्फे केली नाही यावरून डिवचणे सुरू आहे हे स्पष्ट होत आहे. दलित लोकं वर दगडफेक करणारे पकडले नाही आणि दुसरीकडे झालेल्या कृत्याचा निषेधार्थ पुकारलेल्या बंदचा ठपका ठेऊन तरुणांना अटक केली जात आहे..
म्हणजे पूर्ण कटकारस्थान रचून घटना घडवली आहे

ह्या युगातील अंधभक्तघोषित'जाणते राजे'ह्यांनी दंगलीनंतर केलेली दोन चार विधाने निव्वळ मनोरंजनमूल्य असलेली नाहीत तर यज्ञ पेटताच राहील आणि त्याचे बिल संबंधीत दोन समाजांऐवजी तिसर्‍याच समाजाच्या नावाने फाडले जाईल ह्याची काळजी घेणारीही आहेत.>> अगदी बरोबर, हाच तर कायम त्यांचा पावर प्लॅन राहीला आहे. अंधभक्तघोषित'जाणते राजे' हे मात्र चपखल...जाणता राजा पण कुणाचा? भक्त सगळीकडेच आहेत.
<<सलोख्याच्या निरपेक्ष प्रयत्नांसाठी कुणी अजून पुढे आला नाही, ही खरी शोकांतिका आहे.>>> याची या घाणेरड्या राजकारणाच्या काळात अपेक्षाच नाही.
बायदवे, कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी १२ जणांना अटक झालीये. आता त्यांना आदेश देणार्यांवरही व्हावी ही आशा. तसेच त्याचे पडसाद म्हणून 'शांततापूर्ण' बंद पाडून तोडफोड करणारे व आमचा 'शांततापूर्ण' बंद यशस्वी झाल्याचे छातीठोकपणे सांगणार्यांवरही कारवाइ करुन नुकसान भरपाई व्हावी ही सुद्धा भाभडी अपेक्षा. हाकानाका.

बंद शांततापूर्ण होता मध्ये काही संघटनेने आपली माणसे घुसवून हिंसाचार केला असावा कारण दुपारपर्यंत शांततेत चालणारा बंद अचानक हिंसक कसा होईल? याचा अर्थ शांत असलेला बंद कुठल्यातरी कंटकांना बघवला नाही त्यांचे स्वतः चे बंद दुकाने फोडून होत असतात.

बंद शांततापूर्ण होता मध्ये काही संघटनेने आपली माणसे घुसवून हिंसाचार केला असावा कारण दुपारपर्यंत शांततेत चालणारा बंद अचानक हिंसक कसा होईल? याचा अर्थ शांत असलेला बंद कुठल्यातरी कंटकांना बघवला नाही त्यांचे स्वतः चे बंद दुकाने फोडून होत असतात.

सलोख्याच्या निरपेक्ष प्रयत्नांसाठी कुणी अजून पुढे आला नाही, ही खरी शोकांतिका आहे.

>>> बातम्यांमधे काय येतेय हे माहीत नाही. पण जेथे दंगल झाली त्या कोरेगाव भीमा व सणसवाडी भागात नागरिकांनी ऑलरेडी सलोख्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि पाहिलेल्या क्लिप्स वरून तरी ते तेथे यशस्वी झालेले दिसत आहेत.

दोन जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, कोट्यावधी रूपयांच्या खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान - हे सगळे २०० वर्षांपूर्वी च्या लढाईचा राजकीय/सामाजिक संदर्भ काय होता या वादावरून!

प्रश्न असा आहे, की:

तेव्हा महार असलेले सैनिक इंग्रजांच्या वतीने लढले. ते आज हिंदू धर्म त्यागून अशा धर्मात गेलेले आहेत जेथे सगळे समान आहेत आणि जातीचे नांवही उच्चारण्याचे त्यांना आता कारण नाही. तेव्हा मराठे असलेले तेव्हा छत्रपतीही होते आणि पेशव्यांच्या सैन्यातही होते. ते आजही मराठेच आहेत त्यामुळे भीमा कोरेगावला झालेल्या पराभवाची खपली कोणी काढत असेल तर त्यांना राग येतो. (हा राग आजही दोनशे वर्षांनी येणे हास्यास्पद आहे हे अलाहिदाच). तर हा विजयोत्सव नक्की कोणाचा, कोणाविरुद्ध आहे? तेव्हा महार परंतु आज हिंदूच नसल्यामुळे महारही नसलेल्यांचा व तेव्हा इंग्रजांच्या बाजूने लढणार्‍यांचा, तेव्हाच्या पेशवे सैन्यातील सैनिकांच्या आजच्या वारसांशी का? म्हणजे हा विजयोत्सव इंग्रज जिंकले म्हणून आहे की तेव्हाचे महार - जे आज हिंदू नाहीत - ते तेव्हा सवर्णांविरुद्ध (!) जिंकले म्हणून आहे की हिंदू धर्म त्यागल्यानंतरही जातपात विसरू न शकलेल्या आजच्या पिढ्यांचा हिंदू धर्मात राहिलेल्या सवर्णांविरुद्ध (!) आहे?

200 वर्षांपासून कुणाला ही राग येत नव्हता परंतु मोर्चा, आरक्षण पाटीदार, वगैरे मुळे सत्ताधाऱयांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याने कातडीबाचाव मोहीम सुरू केली आणि "राग" मनात भारवून दुफळी निर्माण केली.

>>> याची या घाणेरड्या राजकारणाच्या काळात अपेक्षाच नाही.<<
>>म्हणूनच आज दहा वर्षे उलटून गेली तरी गुजरातच्या दंगलीचे उत्तर सापडलेले नाही, की त्यातल्या पिडितांना न्याय मिळू शकलेला नाही. तीच अवस्था मुंबईतल्या १९९२-९३ सालाच्या दंगल व बॉम्बस्फ़ोट हिंसाचाराची आहे. त्यावर प्रचंड राजकारण झालेले आहे. पण अजून त्याची योग्य कारणमिमांसा होऊ शकलेली नाही.

म्हणूनच आज दहा वर्षे उलटून गेली तरी गुजरातच्या दंगलीचे उत्तर सापडलेले नाही, की त्यातल्या पिडितांना न्याय मिळू शकलेला नाही. तीच अवस्था मुंबईतल्या १९९२-९३ सालाच्या दंगल व बॉम्बस्फ़ोट हिंसाचाराची आहे. त्यावर प्रचंड राजकारण झालेले आहे. पण अजून त्याची योग्य कारणमिमांसा होऊ शकलेली नाही.>>> कशी होणार?? असले विषय हे राजकारण्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती, एकदाच कापून टाकण्याचा मूर्खपणा नाहीच करणार ते.

बंद शांततापूर्ण होता मध्ये काही संघटनेने आपली माणसे घुसवून हिंसाचार केला असावा <<
>>प्रत्येक समूहात असा एक उपद्रवकारी अंश आढळतो, ज्यांना गुन्हेगारी कृत्ये करण्यास मोठे आकर्षण असते. दंगल सुरु होईपर्यंत हे लोक पडद्यामागे राहून, लोकांच्या भावना चेतवून व त्यांच्या मानसिकतेचा विस्फोट करणारी वक्तव्ये करुन वातावरण अधिकाधिक तापवीत राहतात. त्यांच्या कुटिल-कारवाया जनसामान्यांच्या लक्षात येत नाही..हे सुद्धा एक सत्य च आहे

कशी होणार?? <<
>>दंगलीची मानसिकता कशी तयार होते व कशी निर्माण केली जाऊ शकते, त्याचे उत्तर शोधले पाहिजे. सावध आणि डोळस राहणे आज काळाची गरज आहे.. लोक भडकतात म्हणूनच दंगल होते.. नाहीतर हे मूठभर कारस्थानी काय करू शकतील? पण त्यांचा कावा सामान्य सोडा समंजस लोकांच्याही लक्षात येत नाही, हे खरे दुर्दैव.

कुणाला कश्याचे तर बोडकीला केसाचे >>>> हा केस होता होय ? एकावे ते नवीनच. अक्खा महारश्ट्रातील लोक टकले झाल्या प्रमाणे आरोप का बरे होत होते

पण त्यांचा कावा सामान्य सोडा समंजस लोकांच्याही लक्षात येत नाही, हे खरे दुर्दैव. >>>>> ज्यांच्या लक्षात येत नाहि ते समंजस कसे ? असे लोक पाठींबा देतात समाजात फुट पाडणार्यांना. तेहि तितकेच जबाबदार आहेत.

"Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2018"

ह्यावर उत्तर न आल्यामुळे खरे उत्तर काय असेल ते कळले।

ह्यावर उत्तर न आल्यामुळे खरे उत्तर काय असेल ते कळले। >>>> खरे उत्तर मोदिसाहेबांनीच दिले आहे . मोदिसाहेबांचे इस्पिरेशन आहेत. गुरुंना जे जमले नाहि ते शिष्य करत आहेत.

तेव्हा महार असलेले आणि आता हिंदू धर्म त्यागल्यामुळे महार नसलेले आणि त्याला धरून पुढचा पसारा, हा मुद्दा या व्यक्तीकडून यापूर्वीही अनेकवेळा मांडला गेला आहे. जिथे जिथे जातीयता, अस्पृश्यता हे मुद्दे येतात, तिथे तिथे हा मुद्दा मांडून आपण निरुत्तर केल्याच्या समाधानात डोलता येतं.

अस्पृश्यांपैकी ज्यांनी धर्मांतर केलं, तेही साधारण ६० वर्षांपूर्वी. त्यांनी आपण भोगलेला भूतकाळ अगदी सहज विसरून जावा. तेही बाकी समाजाच्या मनात त्यांची ती आधीची जात अगदी ठसठशीत जिवंत असताना, आणि त्या जातिव्यवस्थेची रूपे कायद्याच्या धाकाने क्वचित कुठे दबलेली असली, तरी या ना त्या रूपांत सतत डोळ्यांसमोर असताना, त्यांनी हे सगळं विसरून जावं, आणि कधी कुठे काही झालंच नहतं अशा पद्धतीने जगावं, ही अपेक्षा अगदी क्षुल्लक म्हणायला हवी. नाही का? (कशाला हवी ती स्मृती? आजकाल कोणी कुठे जात मानतं का? जातिभेद पाळतं का? अस्पृश्यता तर त्याहूनही नाही पाळत, हे सगळं त्या प्रतिसादात वाचता येतं. )

१ जानेवारीला भिमा कोरेगावला विजय दिवस साजरा केला जातो का? माझ्या वाचनात शौर्य दिवस असं आलंय.

विजय दिवस आहे असं मानलं तरी, कोणी कोणावर मिळालेला विजय? त्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - अच्या खापरपणजोबांच्या खापरपणजोबांनी बच्या खापरपणजोबांच्या खापरपणजोबांना हरवलं त्याचा विजय दिवस?

की आज जवळपास ९० किंवा त्याहूनही अधिक वर्षं तिथे जमणार्‍यांना वाटतं तसं एका अन्याय्य व्यवस्थेविरुद्धात पहिल्यांदाच आवाज उठवला गेला त्याची आठवण? अशी आठवण काढण्यात वावगं काय आहे?

उलट अशी आठवण ठेवणं आज अधिकच गरजेचं होतं आहे. असं काही आता होत नाहीच, पण तेव्हाही होत नव्हतं. ब्रिटिशांनी, साम्यवादी इतिहासकारांनी , हिंदुधर्मद्वेष्ट्यांनी पसरवलेल्या या सगळ्या भूलथापा आहेत. (बघा साम्राज्यवाद आणि साम्यवाद कसे एकवटलेत आमच्या हिंदू धर्माविरोधात).

आता माझा प्रश्न.
. १ जानेवारीला भिमा कोरेगावहून परतणार्‍यांवर झालेल्या सुनियोजित हल्ल्याबद्दल माध्यमांत आणि काही ठिकाणी समाजमाध्यमांतही मौन का? वातावरण बिघडू नये म्हणून असं साळसूद उत्तर सगळे देताहेत. मग हेच कारण ३ जानेवारीला का बरं लपवून ठेवलं जातं?

भरत,

हा सगळा अनावश्यक फाफटपसारा लिहिण्याऐवजी त्या प्रश्नाचे नेमके उत्तर देता येईल का?

ते उत्तर देता येत नाही की त्या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे आहे की उत्तर देणे हे जपलेल्या प्रतिमेला तडे जातील असे ठरणे आहे की उत्तर देण्याने दिशाभूल करणे बंद करावे लागेल हे माहीत आहे?

आजवर अनेक लढाया एत्तदेशीय लोकांमधे झाल्या आहेत.
या आणि अशा लढायांचे शौर्य/विजय दिवस कधी कोणी साजरे केले नाहीत.
को.भि. येथील लढाईचे एवढे महत्व का, कोणी आणि कधी वाढविले हा संशोधनाचा विषय आहे.
दुसरा बाजीराव फार चांगला प्रशासक नव्हताच, त्याचे पर्यवसान मराठी राज्य लयाला गेले.
पण या आणि नंतरच्या लढायांमधे फक्त पेशवे हरले असे नाही तर राजांनी स्थापन केलेले मराठी राज्य हरले आणि इंग्रज जिंकले.
(हे अनेकांनी अनेक ठिकाणी लिहून झाले आहे.)

मुळात ज्या पेशवाईबद्दल अनेक लोक एवढी आगपाखड करत आहेत, त्याचे नख देखील शिल्लक राहिलेले नाही.
उलट पहिल्या बाजीरावाने (येथे एकेरी उल्लेख चालू शकतो) ज्यांना दिल्लीला जाण्याच्या वाटेवर नेमले, ते नंतर त्या त्या भागातले जणू राजेच बनले. तसेच त्यांची संपत्ती अजुनही बरीच डोळे दिपवणारी आहे. पुण्यात (शनिवारवाड्यात) काय उरले आहे दगड, माती आणि गवत.

आता तुम्हीच (म्हणजे वाचकांना उद्देशून) सांगा, जिथे कशाचा काही मागमूस देखील उरलेला नाही अशा गोष्टींना धरून धोपटत राहणे कितपत योग्य आहे ? त्यातही जर अनेकांना ते अजुनही योग्य वाटत असेल तर वाटो बापडे.

जर हा प्रतिसाद योग्य वाटत नसेल तर अ‍ॅडमिन यांनी उडविला तरी चालेल. धन्यवाद.

हिंसक शौर्य म्हणजे सभ्य हिंसा. हिंसेलाहि शिष्टपणाची, सभ्यपणाची मर्यादा असली, तरच तिची गणना शौर्यात होते. असभ्य हिंसा म्हणजेच क्रौर्य, कसाबकरणी, अमानुषता ! गांधी म्हणतात, आपण कसाबाबरोबर कसाब झालो तर दोन कसाब होतील. मारेकऱ्यांचा संप्रदाय वाढेल. सैतानाबरोबर सैतान झालो, हैवानाबरोबर हैवान झालो, तर हैवानांची संख्या वाढेल. आपल्याला गुंडांचे पारिपत्य करावयाचे आहे. स्वत: गुंड बनावयाचे नाही.

धर्माचे रक्षण गुंडगिरीने होणे शक्य नाही. फार तर क्षत्रियाची मर्यादित व सभ्यपणाने युक्त हिंसा धर्मसंमत ठरू शकेल. क्षत्रियांचे शौर्य धर्माचे रक्षण करील. पण क्षत्रियांच्या क्षात्रतेजाने रक्षित धर्म आणि गावगुंडांच्या भरमसाट अत्याचारांनी रहित धर्म यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. एकाला जर धर्म म्हणावयाचे तर दुसऱ्याला पाप म्हणावे लागेल.

आपल्याला मानवी सभ्यतेचे व स्वधर्माचे रक्षण करावयाचे आहे; ते अहिंसक शौर्यानेच होईल; फार तर, ते हिंसक प्रतिकाराने होईल; पण क्रौर्याने कालत्रयीहि होणार नाही असा गांधींच्या म्हणण्याचा आशय आहे. म्हणून ते म्हणतात गुंडगिरीशी प्रतिगुंडगिरीने लढू नका. गुंडगिरीचा प्रतिकार पराक्रमाने करा. (संदर्भ : "मानवनिष्ठ भारतीयता", लेखक : आचार्य दादा धर्माधिकारी)

१ जानेवारीला भिमा कोरेगावहून परतणार्‍यांवर झालेल्या सुनियोजित हल्ल्याबद्दल माध्यमांत आणि काही ठिकाणी समाजमाध्यमांतही मौन का? >>>

कोठे मौन आहे? उलट संभाजी भिडे यांना दोषी ठरवून मीडीया ट्रायल करून भरपूर नालस्ती चालू आहे गेला आठवडाभर. अगदी आत्तापर्यंत मी ज्यांना सेन्सिबल समजत होतो अशा साइट्स, लेखक यांनी सुद्धा त्यात बेजबाबदार लेखन केले आहे.

दोन दिवस आधीच्या सभेत जे रस्त्यावरच्या लढाईची मागणी करतात त्यांच्याबद्दल फारसे काही नाही आणि जे लोक तेथे गेले होते याबद्दल काहीच खात्रीलायक माहिती नाही त्यांना दोषी ठरवून अनेकजण मोकळे झालेले आहेत. काही काही लेखांत तर अचाट लॉजिक आहे. निखिल वागळ्यांनी थेट "पुण्यातल्या ब्राह्मणी प्रवृत्तींवर" बोट ठेवले आहे. अक्षरनामा साइट वाले जरी डावीकडे झुकलेले असले तरी कोणाला दोषी ठरवताना हे खालचे अफलातून लॉजिक वापरतील असे वाटले नव्हते:

"....भिडे गुरुजींची मांडणी पाहिली तर काय दिसते? ज्यांना नेहरू हे देशाचा शत्रू होते, असे वाटते, त्यांना आंबेडकरी समाज एकत्र येतो हे कसे आवडणार?..."

अनेक पेपर वाल्यांनी, टीव्ही चॅनेल्स नी यांचा उल्लेख कोरेगाव भीमा घटनेचे सूत्रधार असाच केला. इतरही अनेकांनी स्वतः शहानिशा न करता तेच उचलून धरले. अजूनही सुरू आहे. संभाजी भिडे हिंदुत्त्ववादी आहेत हे उघड आहे. इथे प्रश्न इतकाच आहे की त्यांचा या घटनेशी संबंध आहे का.

या सर्वाचा आधार काय? तर पोलिसांची दाखल करून घेतलेली तक्रार आणि त्यावरून केलेला आरोप. पण असेच आरोप जवळजवळ आणखी ४-५ लोकांवर झाले आहेत. मेवाणी व इतरही. नंतर कोरेगाव भीमा, सणसवाडी वगैरे च्या स्थानिक बातम्या व क्लिप्स वरून जी माहिती बाहेर येत आहे ती पहिल्या एक दोन दिवस झालेल्या आरोपांपेक्षा वेगळीच आहे. तेथील लोक संभाजी भिड्यांचा काहीच संबंध नाही असेच सांगत आहेत.

एकूण अजून काहीच नक्की माहिती उपलब्ध नाही. कदाचित कधीच होणारही नाही. तोपर्यंत मीडिया ट्रायल मात्र भरपूर झाली आहे. एकतर या सर्वांना अशी काहीतरी माहिती उपलब्ध आहे जी सर्वसामान्यांना नाही, किंवा In politics, never let the truth come in the way of a good story हे लॉजिक वापरले गेले आहे.

फा, अतिशय उत्तम प्रतिसाद.
<<अनेक पेपर वाल्यांनी, टीव्ही चॅनेल्स नी यांचा उल्लेख कोरेगाव भीमा घटनेचे सूत्रधार असाच केला. >> हा आरोप सगळ्यात प्रथम 'शांततेचे आवाहनकर्ते व प्रशस्तीपत्रकदाते' यांनी केलाय. वर हे पण की त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर समाज अजून 'शांतता' पाळेल. व्वा! (म्हणजे लोकांना परत नवनवीन गाड्या, बसेस मिळतील? Uhoh ) बाकी, को.भी. येथे हल्ला करणार्या १२ जणांना तसेच तेथील युवकाच्या हत्येप्रकरणी ३ युवकांना अटक झाल्याचे समजले. दुसर्या दिवशीच्या शांतीसेनेतल्यांवरील कारवाईबाबत अजून चकार शब्द नाही. असं का ब्वा?
<<निखिल वागळ्यांनी थेट "पुण्यातल्या ब्राह्मणी प्रवृत्तींवर" बोट ठेवले आहे. >> Rofl हा माणूस तर बीग्रेड्यांच्या कळपातलाच वाटायला लागलाय.

को.भी. येथे हल्ला करणार्या १२ जणांना तसेच तेथील युवकाच्या हत्येप्रकरणी ३ युवकांना अटक झाल्याचे समजले}}}}

या बातमीची लिंक मिळेल का?

फा, धन्यवाद ! आजकाल काही मुद्दे लिहावेत की नाही असा प्रश्न पडतो.
समाजाला नक्की काय हवे आहे ??
जातीच्या आधारावर मोर्चे काढून, दिन साजरे करून, राजकारण करून अनेक लोक समता आणण्याच्या गोष्टी कशा करत आहेत तेच कळत नाही.
कालच वागळे यांची एक मुलाखत ऐकली को.भि. संदर्भात. माणुस हुशार आहे, अनुभवी आहे पण त्यांचेही हे असेच एकांगी मते.

महाराष्ट्र बंद करणारेकसे नालायक आहेत आणि 'आमचे हिंदुत्ववादी' किती निष्पाप निरागस आहेत ह्याबद्दल चाललेला उरस्फोड कलकलाट मनोरंजक आहे. असो.

मुळात ज्या पेशवाईबद्दल अनेक लोक एवढी आगपाखड करत आहेत, त्याचे नख देखील शिल्लक राहिलेले नाही.
महेश ज्या मुसलमानी राजवटीबद्दल हिंदुत्ववादी सतत आगपाखड करत असतात, त्यांचेदेखील नख शिल्लक नाही, तरी ते ज्या कारणास्तव करतात त्याच कारणास्तव पेशवाईविरोधक आगपाखड करतात. समजलं असेल तर ठोका लाइक!

Pages