डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डासांकरता संध्याकाळी ६ वाजता संपूर्ण घरच्या खिडक्या बंद करणे . बेडरूममध्ये जाळ्या आहेतच त्यामुळे सफोकेशन होत नाही झुरळांकरता किचन मध्ये स्प्रे मारत नाही . भांडी असतात म्हणून . त्याऐवजी चॉक लावते. बाकीच्या खोल्यामध्ये झुरळांचा हिट मारते . डासांकरता गुडनाईट मशीन असतंच . त्यातून ही चावले तर ओडोमॉस पण घरात आहे ते लावून झोपायचं . त्रास होत नाहीच मुंग्या नाहीशा करण्यासाठी ओट्यावर पावडर ( नाव आठवत नाहीये ) ची रेघ काढायचो . हल्ली बरीच औषध बाजारात मिळत असतील . पालींकरता मात्र काय करावं ते समजलं नाहीये .

कोळी किडे , जाळी कसे साफ करायचे घरातले? घर खूप घाण दिसते त्या जाळ्यानी. >>> मी काळे हिट मारून काढते केरसुणीने . आता नाही होत जास्त.

डासांसाठी घराच्या खिडक्यांना प्लास्टिकच्या जाळ्या लावुन घेणे उत्तम. शक्य असल्यास मुख्य दरवाजाच्या आधी एक पुश डोर तोसुद्धा तारेची बारीक जाळी असलेला बसवुन घ्यावा. काही कारणास्तव दरवाजा उघडा ठेवावा लागत असेल तर सन्ध्याकाळी कटाक्षाने सहापुर्वी बंद केला जाईल याची काळजी घ्यावी. २ आठवड्यातुन एकदा शक्य असल्यास शेतात फवारणी करतात त्याचे दोनतीन थेंब टाकलेले पाणी(पंप असेल तर उत्तम) जुन्या कोलीनच्या बाटलीतुन घराच्या कुंड्यांवर आणी घराच्या बाहेरुन फवारुन घ्यावे (फक्त आणी फक्त बाहेरुन ते सुद्धा अतिशय काळजीपुर्वक).
सहा-सात नंतर दरवाजा बंद करुन ५/१० मिनीटेच रिपेलंट लावुन एकदा पंखा ५ वर १०/१५ सेकंद चालवावा व नंतर डासांचे हेलिकॉप्टर कोसळायला लागले की बॅटने त्यांना वैकुंठवासी धाडावे हा उपाय करुन तुम्हाला रात्रभर रिपेलंटचा श्वास घ्यावा लागणार नाही.
झुरळांसाठी, वर सुचवल्या प्रमाणे १५० रु. वाले इंजेक्शन व्यवस्थित काम करते. दुसरा उपाय म्हणजे स्वयंपाक घरात जास्तीची स्वच्छता बाळगणे. झोपण्यापुर्वी किचन पाणीमुक्त करावे म्हणजे इकडे तिकडे सांडलेले असेल तर कोरडे करुन घ्यावे. अधुनमधुन होसपाईप मधे फरशी पुसायचे कोणतेही कीटकनाशक टाकुन १५/२० मिनीटे तसेच राहु द्यावे, शक्यतो हा उपाय रात्री करावा म्हणजे जास्त वेळ मिळतो.
आधीच जास्त झुरळे झाली असतील तर कोपर्‍याकोपर्‍यात लाल हिट मारुन ठेवावे.
खिडक्यांवर जर आधीच जाळ्या लावलेल्या असतील तर पाली घरात शिरु शकणार नाहीत, तरीही आल्याच तर येण्याच्या शक्य असलेल्या जागांवर डांबर गोळ्यांचा चुरा टाकुन ठेवावा किंवा आठवड्यात तीन वेळा त्या जागांवर लाल हिट फवारुन ठेवावे.
मुंग्यांसाठी डांबर गोळ्यांचा चुरा किंवा हळदही काम करते.

मुंग्या मारण्यासाठी लोकल ब्रँडच्या बऱ्याच पावडरी मिळतात. चिमुटभर पावडर मुंग्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर टाकल्यावर ५ मिनिटात मुंग्या मरतात, परंतू हा कायमस्वरूपी इलाज नाही, बिळातील मुंग्या काही दिवसांनी दुसऱ्या मार्गाने येतात.
झुराळांसाठी जेल मिळते. ५०-६० रू. किंमत असते, किराणा दुकानात, मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळते. सिंक व किचन ओट्याखालील कोपऱ्यात रात्री जेल चे थेंब टाकले की सकाळी मेलेली झुरळे फरशीवर दिसतात. १-२ दिवसात १००% झुरळे मरतात. दर सहा महिन्यांनी एकदाच वापर केल्यास झुरळांपासून सुटका होते.

गूड नाईट लिक्वीडने डास मरत नाही. परंतू हमखास डास मारण्याकरता ड्रॉपरने ह्या गूड नाईट लिक्वीडचे ५-६ थेंब एका चमच्यात घेवून मेणबत्तीच्या ज्योतीवर त्याची वाफ येईपर्यंत गरम करायचे. रुमचे दार व खिडक्या बंद ठेवायचे. चमच्यातील लिक्विड संपूर्ण संपले की पंखा दोन मिनिटे चालू ठेवावा ज्यामुळे ही वाफ खोलीत सर्वत्र पसरेल. ५-१० मिनिटात खोलीत अडगळीत लपलेले डास अर्धवट गुंगीत मोकळ्या हवेशीर जागी येवून पडतात. हे डास गोळा करून मारून टाकायचे. थेट गूड नाईटची कार्बन कांडी पेटवली तरी चालते , परंतू प्लॅस्टिक बाटलीमुळे काळजी घेवून हा प्रयोग करावा.
डेंग्यूचे डास दिवसाच चावत असल्याने संपूर्ण हातपाय झाकणे गरजेचे आहे.

मुंग्या - माझे घर दहाव्या मजल्यावर असल्याने सुदैवाने मला अनेक गोष्टींचा त्रास होत नाही उदा. धूळ, कमी प्रकाश इ. त्याचबरोबर किटकांचाही फार त्रास होत नाही. मुंग्या शक्यतो झाल्याच नाहियेत घरात, आणि अगदीच झाल्या तर मग त्या ज्या पदार्थाला लागतात तो पदार्थ मी टाकून देते मग त्या कंटाळून निघून जातात.

चिलटं - ही मात्रं अत्यंत चिकट जात आहे. सिंक च्या आसपास वगैरे, कांदे बटाटे, केळी यावर हमखास असतातच. बरेच दिवस धूप लावून ठेवले. कुणी सांगितले की पुदिना पाण्यात ठेवून तो ग्लास ओट्यावर ठेवायचा. ते ही करून पाहिलं. तात्पुरता फायदा झाला नंतर माझा उत्साह मावळला. अब मैने चिलटो के साथ जिना सिख लिया है.

पाली - माझ्या बेडरूमलाच बाल्कनी असल्याने या बिचार्‍या बाल्कनीत फिरताना दिसतात पण दरवाजा हा गुळगुळित असल्याने त्यावरून त्यांना सरपटता येत नसावे त्यामुळे आत येत नाहित. पण गेल्या ऑगस्ट मध्ये मला भयंकर अनुभव आला तो म्हणजे बाल्कनीचे दार उघडे होते पण पडदा लावलेला होता आणि त्या पडद्यावर मागून येउन एक पाल विराजमान झाली होती आणि मी पडदा सारल्यावर ती टुणकन उडी मारून आत आलि आणि बेड खाली गेली. सकाळपर्यंत जाईल या विचाराने मी झोपी गेले पण २-३ दिवसांनी कुजका आणि घाण वास यायला लागला. नंतर मी परदेशी गेले, तिथून येईतो वास निघून गेला होता. मग दिवाळी आली, समहाऊ माझ्या डोक्यात हेच होतं की नक्की ती पाल घरात मेली आहे. माझा बेड अतिशय जड. त्यामुळे शेजारणीच्या मदतीने मोकळा करून तो बाजूला करून पाहिले तेव्हा अंथरूणे ठेवण्याच्या बॉक्स च्या चाकाखाली येऊन मॅडमचे देहावसान झाले होते. ते पाहून मला चक्कर यायची बाकी होती, पण माझी शेजारीण फार शूर, तिने त्या पालिच्या देहाची विल्हेवाट लावली. आणि मी हुश्श केले. माझी के प्रकारे थेरपीच केली शेजारणीने.

बाकी काळं हिट हे माझं हत्यार आहे. आपल्याला सहन होइल इतपत च्या पेरिफेरी मध्ये पाल असेल तर मला खपते पण ती मर्यादा ओलांडून आत वगैरे येऊ पहात असेल तर मी त्या काळ्या हिट ने तिला ऑलमोस्ट बेशुद्ध करून किंवा तो फवारा जोर जोरात मारून तिची दिशा बदलून बाहेर घालवते. ( पण हे क्वचित घडले आहे)

उंदिर - हा महाभयंकर प्राणी एकदा माझ्या कपाटात शिरला होता पण पळून गेला, अजून एकदा एक घुसला होता तो किचन मध्ये गेला, पण सुदैवाने सर्व बंद असल्याने त्याला कुठे शिरून घर करता आले नाही. तो ही कंटाळून रात्रीत निघून गेला बहुधा.

झुरळ - सुदैवाने मोठी झुरळं सुद्धा माझ्या घरात झाली नाहियेत. वर एसआरडी ने उल्लेख केलेल्या सिताफळाच्या बियांसारखि दिसणारी झुरळं मात्रं किचन ट्रॉलिज मध्ये व्हायची/होतात. त्यासाठी मी कोणताही घरगुती उपाय न करता सरळ हाय केअर बरोबर वर्षभराचे कॉन्ट्रॅक्ट करते. त्याने त्यांचाही बंदोबस्त होतो.

ढेकूण - मी नव्या घरात रहायला गेले आणि माझ्या वाढदिवसाला म्हणजे तब्बल ८ महिन्यानी मला उपरती झाली की आपल्या घरात प्रचंड ढेकूण झाले आहेत. फर्निचर मधून आले होते. मी हादरले. मला कळायचे कारण नव्हते कारण मला ढेकूण चावत नाहीत. मैत्रिण बेजार झाली आणि मध्यरात्री उठून आम्ही जो नजारा पाहिला, वाढदिवस बेक्कार गेला. तात्पुरते पेस्ट कंट्रोल केले पण माझे समाधान झाले नाहि, मग मी गायका कडचे इंडस्ट्रियल फ्युमिगेशन करून घेतले, त्याने सर्व ढेकूण गेले आणि परत झाले नाहित. हुश्श Uhoh

हे इतके सोडता इतर कोणते किडे किटक माझ्या अजून तरी वाट्याला गेलेले नाहियेत. Happy

हे हिट चं ५० रु वालं इंजेक्शन आणून बघतेच.
आम्ही आतापर्यंत वर्षातून एक पेस्ट कंट्रोल आणि महिन्यातून एकदा ट्रोली खालून डेटॉल पाणी पुसून हिट मारणे इतक्यावर आहोत.
झुरळं जास्त येत नाहीत.कोळी जास्त येतात.

खालचे घर असल्याने, घरात नेहमी चिचुन्द्री, उन्दिर, गोम, विन्चु, पाल हे ठरलेलेच. आणि आजुबाजुला झाडे बरेच असल्याने डास ही कायम. बॅट, गुड नाईट्,ऑल आउट सगळे उपाय करते. मच्छरदाणी वापरायची सवय केली. झुरळान्चा त्रास इतका नाही. पण एखादे दुसरे दिसले कि फक्त त्याला उलटे पाडायचे. (पुन्हा सरळ व्हायची शक्ती नसते वाटते त्यान्च्यात... Proud ) रात्रभर तसेच राहुन आपोआप मरते. हा माझा अनुभव आहे.

घराच्या आजुबाजुला उन्दीर/घुशीन्नी बि़ळे हि केली होती. त्यात रॅट पॉईझन टाकुन बघितले, बिळाच्या तोन्डावर काचेचा चुरा टाकतात म्हणे. ते टाकुन बघितले. पण मान्जराच्या वावराने हा प्रॉब्लेम नक्किच सॉल्व्ह झाला.
पावसाळ्यात बाथरुममधे भिन्तीच्या/टाईल्सच्या फटीमधे गान्डुळे आणी ते खाण्यासाठी गोम येतात. एकदा तर भाउ अन्घोळीला बसला आणि समोरुन ३-४ चान्गल्या करन्गळीएवढ्या गोमा (अनेकवचन माहीत नाही :फिदी:) पळत आल्या. मग घाईघाईत स्टुलावर उभे राहुन त्याने कडक पाणी ओतुन त्या घालवल्या. त्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी वॉश बेसीन, सिन्क, टॉयलेट, बाथरुम च्या सगळ्या औटलेटमधे झाकणभर फिनाईल ओतते. उपलब्ध असेल तर रॉकेलही टाकते. त्याचा तवन्ग पाण्यावर पसरुन डास/ मच्छर/ चिलटे होत नाहीत असे वाचले होते.
माठ, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, लसुण, कान्दे, केळी, फळे यान्च्याभोवती दिसणारे चिलट्यान्ना दिवसातुन २-३ दा बॅटनेच मारायचे. गरम पाण्यात कापुर टाकुन ठेवणे/ तव्यावर लवन्ग भाजणे इ. छोटे मोठे उपाय ही करते.

ट्यूबलाईटच्या मागे लपलेल्या पाली असतात. उन्हाळ्यात हा त्रास जास्त वाढतो. पाली खाली जमिनीवर येत नाहीत पण त्यान्ची पिल्ले येतात.. त्यान्ना झाडुने मारते. किचनच्या खिडकीत रिकामे अन्डे ठेवुन, घरात मोरपीसे ठेवुन ही बघितले. काही दिवस असर रहातो. पक्षी पालीला खातात म्हणुन अन्ड्याजवळ पाली येत नाही असे स्पष्टीकरण कोणीतरी दिले होते. Happy

पक्षी पालीला खातात म्हणुन अन्ड्याजवळ पाली येत नाही असे स्पष्टीकरण कोणीतरी दिले होते. Happy >> मला हे समजलं नाही, कुणी समजावून सांगेल काय?

१. पक्षी पाल खातात
२. पालीला अंडी दिसतात
३. पक्षी अंडी देतात हे पालीला माहिती आहे
४. ती दिसल्यावर अंड्यांच्या जवळ पक्षी असेल आणि तो आपल्याला खाईल असं पाल मानते
५. सर सलामत तो कोळी पचास असं मनात म्हणून त्या लोकेशन पासून लांब जाते

असं लॉजिक आहे Happy

हो.बाकी कांची वरद राजा चे लॉजिक विचारु नका. Happy
पालीला काळी अक्षरं भैंस बराबर न वाटता साप बराबर वाटून तो आपल्याला खाईल असं वाटून ती येत नसेल असं काहीतरी असेल.

पक्षी अंडी देतात हे पालीला माहिती आहे>> Uhoh
हे माहीती नव्हते , इतक्या शिकलेल्या पाली कांची नरदराजा वाचून घाबरत नाहीत म्हणजे काय? Wink

पालीला मराठी कळत नसेल>>>
पालींना फक्त पाली भाषेतलं वाचता येतं.
थोड्याफार शिकलेल्या पालींना अर्धमागधीसुद्धा समजतं म्हणतात.

रच्याकने पालीला मारू नये कारण:
भक्तगण जनता: पाल ही घरात येणारी लक्ष्मी असते असे जुने लोक म्हणतात.
प्रॅक्टिकल लोक : पाल दबा धरून बारीकसारीक किडे, माश्या, डास या सगळ्यांना पकडून खाते. शक्यतो ती माणसाला त्रास द्यायला येत नाही. नुसता झाडू आपटला तरी ती पळून जाईल, उगीच गरम पाणी ओतणे, स्प्रे मारणे, फटके मारणे असा क्रूरपणा करू नका.

सहमत.
पाल पाल बिळ के पास... तुम रहती हो..
झुरळ मुंगी डास सब गिळती हो...

जब गिधड की मौत आती है......

जेव्हा पालीची मौत येते तेव्हा ती जमिनीवर येते.

जेव्हा डासाची मौत येते तेव्हा तो मनगटावर येतो.

जेव्हा झुरळाची मौत येते तेव्हा ते किचन ओट्यावर येते.

जेव्हा मुंगीची मौत येते तेव्हा ती रांगेच्या बाहेर येते.

आपण पालीला मारायला गेल्यावर तिची अर्धी शेपूट तुटून खाली जमिनीवर पडते, आणि बराच वेळ वळवळत रहाते. किती अजब, विचित्र वाटते न पहायला!!!? यक्क्क!!!

पाल मारायची एक टीप देतो. पाल मारायला झाडू कधीच वापरू नये. झाडू मुळमुळीत असतो, आणि पाल कडक. पाल लवकर मरत तर नाहीच, पळून जाते. पण झाडूचे दीड दोनशे रुपयांचे नुकसान होते. त्याऐवजी पाल मारायला खराटा वापरावा. आता तर प्लास्टिकचे खराटे आलेत. एकदम मजबूत. एका फटक्यात काम तमाम!

छान धागा.
सगळी स्वच्छता असावी पण बाथरूम / बेसिनच्या पाईप्समध्ये फिनेल ओतू नये असे एकदा वाचले होते. तिथे सूक्ष्म जीवाणूंची इको सिस्टीम असते ती केमिकल मुळे नष्ट होते.

पेस्टकंट्रोलऐवजी या ' नैसर्गिक उपायांनी दूर करा घरातील किड्या-मुंग्या झुरळ ,उंदीर ,माशा पाल !

या उपायांमुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोकाच नाही !!

तुमच्या घरात घाण आणि आजार पसरविणाऱ्या जीवांनी थैमान घातले आहेत. या जीवांना पळविण्याची सहज पद्धत सूचत नाही तर आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. सर्वांत चांगली गोष्ट आहे की यामुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही. तसेच लहान मुलांसाठी हे उपाय खूप सुरक्षित आहेत.

१. उंदरांपारून मुक्ती
उंदरांना पेपरमिंटचा वास बिल्कूल पसंद नाही. घरात उंदीर थैमान घालत असतील तर कापसावर थोडे पेपरमिंट (अस्मंतारा) टाका, त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात.

२. झुरळांपासून मुक्ती
काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.

जरूर वाचा हा सोपा उपाय केला, तर घरातून पाल पळून जाते
३. घरमाशांपासून मुक्ती
घरमाशांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो. असे असूनही घरमाशा घरात येतातच. त्यावर उपाय म्हणून कापसाच्या बोळ्याला एका उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाज्याजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. हा उपाय करून पाहा माशा त्वरीत पळून जातील.

४. ढेकूणला मारा
कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात.

येत्या काही दिवसांत दिवाळीच्या फराळासोबतच घराच्या साफसफाईलादेखील सुरवात होईल. अनेकदा स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये किड्या-मुंग्या होऊ नयेत म्हणून काही पेस्टीसाईड्स किंवा केमिकल्सयुक्त औषधांचा फवारा मारला जातो. पण यामुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो. काहींना यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास संभवू शकतो. म्हणूनच यापासून बचावण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचा वापर करा आणि घरासोबतच तुमचे आरोग्यही सांभाळा.

मच्छरपासून बचावासाठी लसूण -
स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा. मच्छर दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे देखील नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.

मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर -
ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.

झुरळ्यांपासून बचाव करण्यासाठी बोरीक पावडर -
घरातून झुरळांना हटकण्यासाठी पेस्टकंट्रोलचा पर्याय निवड्याआधी हा प्रयोग नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपर्‍यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास मदत होते. झुरळांमुळे होते अन्नविषबाधा ! मग त्यापासून बचावण्याचे 8 उपाय नक्की आजमवा.

सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात -
कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपर्‍यांमध्ये जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्र, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालींचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जेथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे,दारं खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात.

कापूरामुळे माश्या दूर राहतील -
कापूरामुळे घरातील माश्यांचा त्रास दूर होतो. घरातील कोपर्‍यांमध्ये काही कापरांचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात माश्या खूपच असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे मश्या दूर होतात.

पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.

पालीला घराबाहेब पळवून लावण्यासाठी काही साधे उपाय आहेत, वाचा

१. कॉफी पावडर आणि तंबाखू
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल.

२. डांबर गोळ्या
डांबर गोळ्या उत्तम किटकनाशक असतात. यांना वॉर्डरोब अथवा वॉशबेसिनमध्ये टाका. पाल येणार नाही.

३. मोरपंख
पालींना मोरपंख पाहून साप असल्याचा भास होतो, असे म्हणतात. साप त्यांना खाऊन टाकेल या भीतीने त्या तेथून पळ काढतात. घराच्या फ्लॉवरपॉटमध्ये मोरपंख ठेवा, पाली पळून जातात.

४. पेपर पेस्टीसाईड्स स्प्रे
पाणी आणि काळी मिरची पावडर एकत्र करा आणि एक पेस्टीसाईड तयार करा. याला किचन, बाथरुम आणि इत्यादी ठिकाणी शिंपडून द्या. या वासाने पाल पळून जाते.

५. बर्फाचे थंड पाणी
बर्फाचे थंड पाणी पालीवर फेका. असे अनेक दिवस करत रहा. थंडावा सहन न झाल्याने पाल घर सोडून देईल.

६. कांदा
कांदा कापा आणि त्याला स्लाईसमध्ये लाईटजवळ टांगून द्या. यामुळे लाईटजवळ ठाण मांडून बसणारी पाल पळून जाईल. कांद्यात असणाऱ्या सल्फरमुळे त्यातून खूप दुर्गंधी येते आणि पाल पळून जाते.

७. अंड्याचे कवच
अंड्याच्या कवचाला अजिबात सुगंध नसतो, पण अंड्याला पाहून पालीला वाटते की हा कोणतातरी जीव आहे, आणि तो तिला हानी पोहचवू शकतो. या भीतीमुळे पाल पळून जाते.

८. लसूण
एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात कांद्याचा रस आणि पाणी भरुन घ्या. या त्या पाण्यात लसुणचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. पालीला हा वास असह्य होतो. पाल पळ काढते

कॉपी पेस्ट झी चोवीस तास

परवा कॉलनीतुन येतान्ना एका बन्गल्याच्या गेटवर लाल शाईचे पाणी प्लास्टीकच्या पिशवीत बान्धुन टान्गलेले पाहिले.
विचारले तर त्याने भटकी कुत्री आवारात येत नाही असे कळले.

घरात चिलटे होउ नये म्हणुन खिडकीत एका प्लास्टीकच्या पिशवीत पाणी आणि त्यात एक रुपयाचा कॉईन टाकणे हे ही प्रकार पाहिले आहेत. दोघान्चेही लॉजिक कळले नाही. Proud

हे अती काहीही आहे Happy
पाण्यात चिलटं अडकत असतील, पण कॉइन का? १ रुपयाचेच का?

मेहेंदळे गॅरेजच्या हॉटेल मधेही प्लॅस्टीक च्या पिशव्यां मधे पाणी भरुन त्या टांगलेल्या आहेत. वरुन सूचनाही आहे की ," या पिशव्या डास- चिलटे होऊ नयेत म्हणून लावलेल्या आहेत. कृपया या प्रयोगाच्या यशस्विते बद्दल विचारणा करु नये! "
Uhoh

Pages