माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधिका , आपल्या कुटुम्बासहित अथर्वाच्या मुंजीसाठी नागपूरला पोचली .
सोबत , आनंद , जेनी , रेवती आणि गुप्ते भाउ वगैरे वर्‍हाडी लोक आहेतच. नाना-नानी आणि महाजनी पण येणार .
केडीने काड्या केल्यामुळे शन्या पण येउन राहिली , गुरुला जाब विचारायला .
अथर्वची मुंज आणि रेवती-सुबोधच लग्न बहुतेक एकाच मांडवात करणार , ईतकी चिडवा-चिडवी चालली आहे .
गुप्तेभाउ रेवतीला डायरेक्ट लाईन देउन राहिले .

गुप्तेभाऊंनी लाईन कधीच दिली होती. पण रेवती सारखी लाईनीबाहेर उभी रहातीय.

ही शन्या खरच डोक्यावर पडलेली दिसते किंवा सिरीयलचा डायरेक्टर पण तिच्यासहीत पडला असेल. बिचारीले चांगले कपडेच न्हाय मिळु र्हायले.. नागपूरच्या थंडीत ही भैताड चिंध्यावाली कापडं घालुन मिरवु र्हायली नं बाप्पा!

कसली चिंधी आहे ती शन्या..काल गुरवाने तिला ४००० रु काढून दिले खायला...!!काहीही.....!! तेही नागपूरच्या लफंग्यांनी चोरले!

आणि ऐन मुंजीच्या आधी हा काय बच्चा बच्चा करीत तिच्या सोबत फिरत होता!!! Happy

मला वाट्ते ती ऐन मुंज समारंभात येउन राडा करेल , मग खालील प्रतिक्रिया.

१) वडीलः रागाने लालबुंद मैं तुम्हे जायदादसे बेद खल कर दूंगा.
२) आई: धक्क्याने चक्कर येउन पडेल. अर्ध्यापार्ट्या तिला आव काय झाले हिला डॉक्ट र करत बसतील
३) राधिका: नुसती रागाने सर्व बघत उभीराहील काय करावे ते न कळून मग तोंडाचा पट्टा सुरू करेल.
४) मुंबईचे ऑफिस पब्लिक : आम्हाला माहीतच होते करून गप्प उभे राहतील. आनंद काहे तरी बोलून सावरायला बघेल.
५) महाजनी काका मध्ये पडतेल व घोळ घालतील.
६) नागपुरी नातेवाईक ह्यांना चार पाच एपि सोड नक्की काय प्रकार आहे ते कळणार नाही.
७) अथ्र्व रडू लागेल.
८) केडी पैसे मागेल ह्यातून बाहेर पडायला.
९) गुरू थापा मारेल.

पुढच्या भागात : बाबांनी गुरुच्या कानफटात दिली . राधिकाने पटकन अथर्वचे डोळे झाकून घेतले.

रेवतीची साडी नेहमीप्रमाणे मस्त . तीने ती गुप्ते भाउनी दिलेली दिवाळीची साडी नेसायला हवी होती Happy

येस्स, स्वस्ती...मलाही अगदी हेच वाटले कि तिने गुप्ते भाऊंनी दिलेली ती लाल साडी नेसायला हवी होती.
पण तिचे कानातले अजिबात चांगले न्हवते.....चौकोनी मिनारी सारखे...
नानीच छान दिसत होत्या...राधिकाचा मेकप भडक व हेअर स्टाईल विचित्र. गुरवाने आचमन अगदी सराईता सारखे केलेन! सवय दिसत्ये! Happy

एक गोष्ट डायलॉग मधे नेहमी जाणवते..
काही प्रॉब्लेम आला की रेवती एक्झॅक्ट सोलुशन सांगते,,
मग लगेच राधिका म्हण्ते..
"न्हाई रेवती मी असं नाही करणार.. त्याना मी असं तसं करुन शिक्षा देणार अँड ऑल.."
नेहमी अगदी नेहमी दिसणारा डायलॉग..
एकदा जरी रेवती च ऐकलं तरी बास आहे

आणि अथर्व साठी घटस्फोट देत नाहि म्हणे.. त्याच्या मनावर परिणाम होईल ई. पण रेवती च उदाहरण आहेच ना.. ती एकटी मुलीला नीट वाढवते आहेच ना

नानीच छान दिसत होत्या. >> हां नानी आणि महाजनी काकू दोघीहि एकदम आपली मोठी काकु वगैरे लग्नाला जाताना कशा तयार होतिल , तशा दिसत होत्या .

आणि अथर्व साठी घटस्फोट देत नाहि म्हणे.. त्याच्या मनावर परिणाम होईल ई >>> Lol लय भारी मोठा ज्योक. मुलगा सगळं बघतोय की.

किती सांगु मी सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला,

मुंजीच्या दिवशी गं मंडपाखाली ही भैताड अवतरली
कुणी म्हणा सुंदर कुणी म्हणा मादक, शन्याला नावे किती
ही दिसली दारात, अवचीत आली गं आत
आई बाबांना चमत्कार दिसला
आज आनंदी..... ( एकदाचे कळाले सर्वांना या नादात राधिका)Dancing

हो उरात होते धडधड बच्चा मंडपात घुसली
केडीच्या नादा लागुन मी किती माती खाल्ली
आता अधीर झालोया, मग बधीर झालोय
आणी घामाने मग निथळत सारे कबुल करतोया
अरे उडतोय बुंगाट, पळतोय सुसाट, धापा टाकत जातोया
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट,झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट, ( घाबरलेला गुरु )Confusion

धन्यवाद निधी, किट्टु, अंजु आणी स्वस्ति. असे काहीतरी धमाल घडतांना दिसले की विडंबन करावे वाटते. बेसिकली मी कवी नाहीये, पण मला विडंबने फार आवडतात. Proud

रश्मे जबरी Rofl
सिरियल इतकी भिकार होत्ये दिवसेन्दिवस कि विचारू नका.
हा गुरू कंपनीचा एम डी पण माणूस म्हणून इतक्या खालच्या थराचा का वागतोय? Uhoh
जमिनिचा सोस धरून बसला आहे त्या भैताड शनाया साठी, आणि ती शनाया पण किती पैसा पैसा करते.
सतत शॉर्ट्स घालून कोचावर तरी बसलेली असते, शॉपिंगला जाते किंवा पार्लर ला
मला पाहूनच इतका उबग आला की आपण च स्टॅग्न्टंट झालोयत की काय असं वाटायला लागलं.
खूप पैसा जवळ असला तरीही मला असलं लिथार्जि़क लाईफ जगायला अज्जिबात नाही आवडणार. Sad

धन्यवाद दक्षिणा. Proud अगं खरे आहे. कुठल्या जगात वावरतात ही दोघे देव जाणे. जे लोक गावात ( ग्रामिण भागात ) अशी सिरीयल पहात असतील त्यांचे वेगळेच गैरसमज होत असतील की कुठल्याही मोठ्या कंपनीत वा ऑफिसमध्ये असेच चालते. म्हणजे नो काम, नुसती लफडी, चहा- कॉफी घेता घेता एकमेकांच्या आयुष्या विषयी चर्चा. आणी सहज सोपे राजकारण, जसे गुरु करत असतो.

आता पहायला मिळेल.नुसती मज्जा. मी वाट बघतच होते की कधी एकदा गुरुच्या आई बाबांना, विशेषतः आईला खरे काय ते कळेल म्हणून.

हो...बाबांना समहाऊ संशय होताच गुरुवर.
मला एक कळले नाही की ही शन्या जेव्हा गुरवाने तिला पैसे दिले तेव्हा शॉर्टस मधे होती ना..... मग पर्स चोरी गेल्यावर ती हॉल वर येते तेव्हा फुल जीन्समधे कशी? तिथूनच ती आली ना डायरेक्ट ? आणि रिक्षावाला कसा नाही आला ओरडत मागे.., .."ओ बाई...पैसे देऊन मला मोकळं करुन टाका की...काय कटकटे राव...!!" ....

एकेकाचे क्लोज अप्स पाहून कंटाळा आला.....आनंद डोळे मिटून काय विचार करत होता कोण जाणे.
गुरुचं पितळ उघडं पडल्यावर सगळेजण आपापला टर्न आला की दचकत होते... किंवा करुण किंवा जे काय भाव दिग्दर्शकाने सांगितले असतील तसतसे आणत होते. तो पर्यंत हे लोक काय करीत असावेत?

नाही अंगो. ती दुसर्‍या दिवशी म्हणजे मुंजीच्या दिवशी गुरुला भेटते तेव्हा फुल कपड्यात असते.( निर्माता मायबोली वाचत असतो का?)

रश्मीने इस्टोरी लिवल्यावर म्या बघितलं ozee वर. त्या अथर्वने मस्त सांगितलं. बरं मला सर्वच सिरीयलमध्ये कळत नाही एक गोष्ट, कित्ती मोठे मोठे अपराध समोरचा करतो पण एक कानफटात दिल्यावर, उपस्थित सर्वांचे चेहेरे आभाळ कोसळल्यासारखे का असतात, उलट बुकल बुकल बुकलावा अशी परिस्थिती असताना फक्त एक ठेऊन देतात.

मारून झाल्यावर राधिकाने अथर्वच्या डोळ्यावर हात का धरला. बघुदे की मारलेलं. गुरु gone case आहे, ती बच्चा धन्य आहे आणि राधिका धन्यवाद आहे, नशीब काल तरी सर्व सांगितलं. कसा काय trp मिळतो ह्या मालिकेला एक नं चा काय माहीती. तिथल्या तिथे गोल गोल फिरवतात दोन महिने एखादा जबरदस्त एपिसोड करून, परत ये रे माझ्या मागल्या.

पण एक मस्त केलं काल राधिकाने, फक्त गुरुवर आरोप केले. पूर्वी माह्या नवराच चांगला, ती बया नादाला लावते असं म्हणायची निदान त्यातून बाहेर आली.

कसा काय trp मिळतो ह्या मालिकेला एक नं चा काय माहीती. >>>>

माबोवर ज्या मालिकेची सर्वात जास्त चर्चा होते, त्यावर टीआरपी काढत असतील! Wink

काल बापाने हाणले आता त्याचे जमिनीचे येणारे कोट्यावधी पण गेले... शन्यामुळे! बसा आता क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड खेळत!

परत राधिकाने भोकाड पसरले. इतके दिवस आईची तब्येत सांभाळण्यासाठी खोटे बोलत होती, आता हा मोठा धक्का बसल्यावर १-२ हार्ट अ‍ॅटॅक येऊन राहिले नाहित तर सगळी मेहनत वाया जाईल.
यांच्याकडे वाढदिवस, Anniversary, मुंज असे काही कार्यक्रम धिंगाणा करायला राखून ठेवले आहेत असे दिसते.
ती शनाया तर फारच भिकारी दाखविली आहे. पैश्यासाठी काहिही करत असते पण स्वतःकडे काहि म्हणजे काहिच पैसे राखून ठेवलेले नसतात. जसे काहि रोजगारावरच जगते आहे.... आज गुरुने पैसे दिले कि आज हिला जेवायला मिळणार.

Pages