सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला.
सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
जागु, गायत्री चा फोटो छानच ग.
जागु, गायत्री चा फोटो छानच ग...
देवकी कीत्ती छान फोटोज.. लिंबु रसाळ दिसतय अगदी..
आता दिसतोय का सांग. गुगलवरून
आता दिसतोय का सांग. गुगलवरून डायरेक्ट टाकला आहे.>>>>>>>>हाच फ़क्त दिसतोय.
हा अडेनियम अॅप्पल रोझ शेड मधला>>>>>हा नाही दिसत.
देवकीचे सगळे फ़ोटो दिसले.
शोभे तू चष्मा लाव फोटो दिसण्याचा >>>>>>>>>>यात, "माझे" हे पण लिही. "शोभे तू चष्मा लाव माझे फोटो दिसण्याचा". जागू तो चष्मा आता तूच पाठव. कसा असतो तुलाच माहित.
क्लेईन्होविया हॉस्पीटा.
क्लेईन्होविया हॉस्पीटा. राणीच्या बागेत ही झाडे खुप फुलली आहेत सध्या.



फोटो सुरेख्,जागू.
फोटो सुरेख्,जागू.
सध्या फक्त वाचत असते...
सध्या फक्त वाचत असते... मधल्या काळात खुप छान फोटो आणि गप्पा झाल्या इथे...
आज लिहिते होण्यासाठी निमित्त झाले नॅशनल जिओग्राफिकवर लागलेल्या फूडटेक कार्यक्रम!
त्यात एखाद्या प्रसिद्ध खाद्यपदार्थातल्या प्रत्येक पदार्थाचे उत्पादन दाखवतात. तर आज भात शेती (अमेरिकेतली) आणि पीच फळ्बाग दाखवली.
कोकणातली थरांची शेती लहानपणीपासुन ऐकलेली, पुस्तकात वाचलेली. आधी भरपुर पाण्यात रोपे वाढवून मग त्या रोपांची परत पेरणी वगैरे केली जाते... तिथे प्रगत शेतकरी पाणी भरलेल्या शेतात कुठे उतरतो!! १९२०-३० च्या दशकापासून तिथे विमानाने भात पेरणी होते. रोपांची फेर पेरणी वगैरे नसावी, कारण नंतरच्या शॉटमधे एकदम यांत्रिक कापणी आणि मळणीच दाखवली.
नंतर पीच फळबाग दाखवली. त्यांचे पिकक्षेत्र तिकडच्या वादळ विभागात येते. वादळाबरोबर गारपीटही होते. मग फळांचे गारांपासून रक्षण कसे करणार? तर त्यासाठी हेल कॅनन (गारा तोफा) वापरल्या जातात. त्यात सतत छोटे स्फोट घडवून त्याच्या दाबलहरी ढगांच्या दिशेने सोडल्या जातात. त्यामुळे म्हणे ढगात गारा बनतच नाहीत.
एकदम आश्चर्य वाटले ते बघुन आणि हल्लि काही वर्षापासुन चालु असलेली आपल्या शेतकर्यांची परवड आठवली. जरा शोधाशोध केल्यावर हे मिळले...
https://en.wikipedia.org/wiki/Hail_cannon
अजुन पुरे वाचले नाही. पण एक ही बातमी देखिल मिळाली... http://www.hindustantimes.com/india-news/himachal-farmers-install-anti-h...
महाराष्ट्रात असा काही प्रयत्न झालेला कुणास माहित आहे का?
.. मधल्या काळात खुप छान फोटो
.. मधल्या काळात खुप छान फोटो आणि गप्पा झाल्या इथे...
खरच खुप चांगले शेयरींग व्हायचे. आताही चालू करुया.
खुप छान माहीती आहे. वादळा पासूनही बचाव करता येतो शेतीचा हे खुप छान आहे.
आपल्याकडे आधुनिक शेती फक्त भात पेरणी न करता डायरेक्ट लागवड करतात एवढेच माहीत आहे मला तरी. अशी आधुनिक भात लागवण कर्जतच्या सगुणाबागेत पाहीली.
.. मधल्या काळात खुप छान फोटो
.. मधल्या काळात खुप छान फोटो आणि गप्पा झाल्या इथे...>>+१
आताही चालू करुया.>>+१
मध्यंतरी एम्प्रेस गार्डनला
मध्यंतरी एम्प्रेस गार्डनला गेले होते. तिथे एका झुडपात हे दिसल. हे काय आहे कुणी सांगाल का?

फोटो आडवा का येतोय कळत नाही
फोटो आडवा का येतोय कळत नाही
उभा घोस होता
अजुन काही फुला पानांचे फोटो काढलेत, जरा फुरसत मधे टाकते
मोबाईलवरून माझेही फोटो उलटे
मोबाईलवरून माझेही फोटो उलटे येतात.
मस्तच गप्पा चालल्यात इथे!
मस्तच गप्पा चालल्यात इथे!
शोभा, पुण्यात पौड फाट्याजवळ येना बंगल्याच्या गेटजवळचं झाड फुललंय! याला वास नसेल असं वाटलं, पण तरीही मी फुलाचा वास घेऊन बघितला. त्याला मस्त गोडसर वास आहे!
फोटो मोबाईलवर काढलाय, कसा इथे टाकता येईल ते बघते.
बुचाच्या झाडावर Horn Bill!!!
बुचाच्या झाडावर Horn Bill!!!

![]()




१.
३.
४.
५.
६.
जागू, Hospita ची फुले सुरेख!!
जागू,
Hospita ची फुले सुरेख!!
राणीच्या बागेतील कृष्णवड.
राणीच्या बागेतील कृष्णवड.
ह्याची पाने द्रोणासरखी असतात. आणि झाड जमिनीकडे झुकलेले आहे.


धनेश मस्तच..
राखाडी धनेश मस्तच..
कृष्णवडसुद्धा छानच.. पहिल्यांदा बघतेय..
साधना, दिदा आणि तो जिप आहे का?
पुणे युनिव्हर्सिटी रोडवर ब्रेमन सर्कलच्या आधी गुलबहार फुललाय मस्त.. पूर्ण गुलाबी झालय झाडं..
Tabebuia rosea असावा शायद तो..
हि अशी फुले असतात त्याची..
झाड खुप उंच आहे.. बाजुने कंपाऊंड सुद्धा होत तरी मी फोटो काढाय्चा प्रयत्न केला.. माझे फोटो टाकते लवकरच..
वरचा फोटो जालावरुन घेतलाय..
जागू,
जागू,
वर स्निग्धाने टाकलेल्या फळांच्या झाडाचं नाव शांकलीने सांगितलेलं ना..
ते दे ना इथे..
मी नाही वाचल ग टिना. तिला
मी नाही वाचल ग टिना. तिला एकदा विचारून टाक ना इथे.
टिने बरोबर ओळखलेस फोटो.
वर स्निग्धाने टाकलेल्या
वर स्निग्धाने टाकलेल्या फळांच्या झाडाचं नाव शांकलीने सांगितलेलं ना.. ते दे ना इथे.. >> सांगा सांगा लवकर. फळ म्हणाव का? असा प्रश्न पडावा इतके छोटे मणी होते.
पुण्यात युनिव्हर्सिटी रोडवर
पुण्यात युनिव्हर्सिटी रोडवर फुललेलं हेच ते झाड..
मला एकदम चेरी ब्लॉसमचा फिल आलेला.. पाच सहा झाडं सोडून परत एक फुलांनी बहरलय पण याला जितक फुटेज मिळालय तितक त्याला नाही.. ते इतर झाडांच्या गर्दीत लपलय जरा म्हणुन निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर हे जस दिसत तस ते उठून दिसत नाही..
वरच्या फोटोतील फुलं आहेत ना तशीच याचीपन फुलं होती पण गळल्यावर खाली पडलेल्या फुलाच्या दांड्यातील तो पांढरा पिवळट रंग मात्र नाहिसा झालेला दिसला मला.. त्याकरता एका फुलाला उचलुन त्याचापन फोटो काढलेला मी..
झाडाच्या अपोझिट बाजुने फोटो काढल्यामुळे दुरुन दिसणारं ते..
कंपाउंड्च्या या बाजुला असलेल्या निंबाच्या झाडामुळे जरास झाकोळून गेलयं..
.
हा त्या झाडाच्या खालुन काढलेला फोटो..
उंची अन मोबाईल कॅमेराचे लिमिटेशन्स..
.
आणि हा त्या गळलेल्या फुलाचा प्रचि..
स्निग्धा,
स्निग्धा,
अगं ते रेड मोती आहे..
त्यांच शास्त्रीय नाव आहे Rivina humilis.
शांकलीकडे आहे ते झाडं..
जागू, अगं मागे तुझ्यासाठी आणि भरत साठी आणली होती आम्ही नाही का आरण्यक वर.. तुला मिळाले कि नाही रोपं ?
त्यांच शास्त्रीय नाव आहे
त्यांच शास्त्रीय नाव आहे Rivina humilis. >>> धन्यवाद
टीना, टबेबुयाचे फोटोज क्लास
टीना, टबेबुयाचे फोटोज क्लास आलेत...:)
अमृता राखी धनेश मस्त टीपलायस!
कृष्ण वड... आ हा हा!! मारोती चित्तमपल्लींची खुप छान गोष्ट आहे ... "तांबट पक्षी आणि कृष्ण वड"
एकदा बाळ कृष्ण खुप उदास बसलेला असतो, कारण त्याला लोणी कसे लपवावे हा प्रश्न पडलेला असतो.. तेव्हा एक तांबट पक्षी त्याला खुणेनी हा कृष्ण वड दाखवतो. मग त्याला खुप आनंद होतो.. आणि तेव्हा पासुन बाळ कृष्ण , कृष्ण वडाच्या पानात लोणी लपवत असे.... म्हणुनच याला माखन कटोरी पण म्हणतात .खुपच गोड गोष्टी आहेत त्यांच्या.. माझ्या मुलाला रोज झोपण्याच्या आधी वाचुन दाखवाव्या लागतात...
राखाडी धनेश मस्तच..
राखाडी धनेश मस्तच..
कृष्णवडसुद्धा छानच.. पहिल्यांदा बघतेय..>>>> +१.
सायु, प्रतिसाद मस्तच.
सध्या घरी एका कुंडीत, हीने
सध्या घरी एका कुंडीत, हीने वेड लावलय.....

देवकी धन्स..
स्निग्धा ,टीन फोटो मस्तच.
स्निग्धा ,टीन फोटो मस्तच.
आयु, हे कुठे मिळाले तुला? कित्ती तो हेवा हेवा.
स्ट्रॉबेरी माझ्या कुंडीत ग.किती मस्त वाटत असेल ना ग?
मस्त गोष्ट सायु..
मस्त गोष्ट सायु..
तूपन सांगत जा अश्या गोष्टी निसर्गावरच्या..
स्ट्रॉबेरी इन कुंडी.. जळजळ होतेय मला
काय मस्त वाटत असेल ना बघुन (डोळ्यात बदाम असणारी बाहूली)
सायु किती सुंदर गोष आहे
सायु किती सुंदर गोष आहे कृष्णवडाची. कोणत पुस्तक.
स्ट्रॉबेरी तुमच्या हवामानात होत? कुठून आणलस रोप?
टिना टॅबेबुया मस्तच.
दोन दिवस पडलेल्या पावसामुळे पुन्हा बेडके बाहेर आली आणि काल गोगलगाईही दिसत होत्या. मृगाचा किडाही दिसला परवा.
स्ट्रॉबेरी तुमच्या हवामानात
स्ट्रॉबेरी तुमच्या हवामानात होत? कुठून आणलस रोप? >> मला किवी उगवायची खुमखुमी येतेय आता ..
मला लहानपणापासून अस वाटत की
मला लहानपणापासून अस वाटत की सफरचंदाच झाड आपल्याकडे असाव. पण इथल्या हवामानात नाही येत ना. तस मला सफरचंद खुप आवडत अस नाही. पण ती लाल लाल फळे लागलेल झाड मला पहायच आहे. आम्ही मे मध्ये काश्मिरला गेलो होतो तेव्हा सफरचंदाच्या झाडाला फुले लागली होती. त्यामुळे अजुन काही फळांनी भरलेल झाड पाहीलच नाही.

सफरचंदाचे फुल
फळे धरली आहेत.

सफरचंदाची बाग.

आहा..
आहा..
काय सुंदर फुल आहे.. फोटो मस्त काढला गं जागू..
Pages