Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रदीपकुमार, भारतभुषण,
प्रदीपकुमार, भारतभुषण, विश्वजीत, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी ई. तमाम मंडळींनी त्यांच्या घरात एक रफी चा मोठ्ठा पुतळा उभारून त्याची रोज पूजा करायला हवी होती असं वाटतं. >>> अगदी अगदी.
लहानपणी खूप enjoy केले ह्यांचे पिक्चर. विश्वजित आवडायचा मात्र खूप, ठोकळा असला तरी. भा भु मात्र बघू पण नाही शकायचे.
कालच एक चित्रपटदृश्य बघितले.
कालच एक चित्रपटदृश्य बघितले. बागांची राखण करण्यासाठी साधारणपणे कुत्रा ठेवला जातो. पण इथे तर थेट एडका ठेवलेला आहे. दोन नारळचोरांना तो एडका ढुशी मारून जेरीस आणतो. तेव्हढ्यात बागेचा मालक तेथे येतो आणि चोरांना रामूची (प्रेमळ एडक्याची) क्षमा मागायला सांगतो. चोर क्षमा मागतात आणि एडकाही क्षमा केल्याच्या आविर्भावात मान डोलावतो.
(ता.क. एडका म्हणजे मेंढा)
(ता.क. एडका म्हणजे मेंढा)....
(ता.क. एडका म्हणजे मेंढा)..........
बालवाडीत असतांना अ- अननस, आ- आई, इ-इमारत यामध्ये 'एडका' हा शब्द वाचला होता. आता इतक्या वर्षानंतर आपल्या स्पष्टीकरणात वाचला!
अवांतराबद्दल क्षमस्व!!
लहानपणी खूप enjoy केले
लहानपणी खूप enjoy केले ह्यांचे पिक्चर. विश्वजित आवडायचा मात्र खूप, ठोकळा असला तरी. >>>
हो तो खूप आवडायचा. कोहरा मधे आणी इश्क पर जोर नही मधे खूपच आवडला होता. नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिका होत्या त्या. त्याने काम चांगलं केलं होतं त्या चित्रपटांमधे.
विश्वजीत चा किसमत मला फार
विश्वजीत चा किसमत मला फार आवडायचा
इश्क पर जोर नही मधे
इश्क पर जोर नही मधे विश्वजितची थोडी grey shades असलेली भूमिका होती. चित्रपटात तो, साधना आणि धर्मेंद्र होते. साधनाचा त्या दोघांबरोबरचा हा पहिला (आणि शेवटचा) चित्रपट. तसंच सचिनदेव बर्मनचं संगीत असलेला साधनाचा हा एकमेव चित्रपट. चित्रपट फार गाजला नाही पण संगीत अप्रतीम होतं. खास करून 'ये दिल दीवाना है', 'ओ मेरे बैरागी भवरा', 'मै तो तेरे रंग राची' ही गाणी अतिशय मधुर आहेत. धर्मेंद्रपेक्षा मला यात विश्वजितच जास्त आवडला होता
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eUoWuPenhK0
Aditi - काय होते हे.. हसून
Aditi - काय होते हे.. हसून हसून पुरेवाट झाली.
कहर आहे हे आता ते गाणे
कहर आहे हे
आता ते गाणे डोक्यातून जातच नाही. लॅपटॉप समोरून उठलो की मी ही असाच स्लोमो डान्स करत जाइन अशी भीती आहे.
अदिति जी---- :ह्ह्पुवा:
अदिति जी---- कसलं भारी आहे हे ....!
अरे कसलं खतरनाक गाणं आहे हे
अरे कसलं खतरनाक गाणं आहे हे
सजेशन्समध्ये मला त्या माणसाचा सुपर वॉरिअर हा सिनेमा दिसतो आहे. आसामी चित्रपटसृष्टीचा अभ्यास त्या सिनेमापासूनच सुरू करावा म्हणतो 
अर्षद वारसीच्या आवाजात
अर्षद वारसीच्या आवाजात म्हणावेसे वाटते..
कौन हैं ये लोग.. कहांसें आते हैं ये लोग?
कोण तो राजकुमार.. त्याचे सुंदर मुलायम केस.. चेहेऱ्यावर असंख्य सुरकुत्या.. मुलीच्या वयाची प्रेयसी..
आणि काय ते गाणं.. 90% वेळा तो "डीवानी तू डीवानी" असं गेंगाण्या आवाजात गातो.. स्लो मो मध्ये डान्स करतो.. प्यार की खुसबु (खुशबु नाही) म्हणताना तगरीचं झाड आणि पांढरी फुले? मध्येच येणारे कोण टिनपाट लोक.. एकत्र नाचत असून उगाच केलेले स्प्लिट स्क्रीनचे ऍनिमेशन..
शेवटी ते दोघे पार बंदूक बिंदूक घेऊन येतात आणि मुलीचं प्रेम नाही ऐकल्यावर गप्प बसतात. अरे टिनपाटान्नो, आधीच विचारायचं ना मुलीला.. प्रेम आहे की नाही ते.. एवढा पाठलाग आणि बंदुकिंचा खर्च वाचला असता.
आवरा !!!
डिवानी
डिवानी
ते दोन बंदूकधारी , मध्येच जीप
ते दोन बंदूकधारी , मध्येच बाईक थांबवून झाडीत शिरतात , तेव्हा मला काहीतरी वेगळंचं कारण वाटलं
मलापण स्वस्ति. इंफॅक्ट मला
मलापण स्वस्ति. इंफॅक्ट मला वाटलं की आता नेहमीच्या ट्रिक प्रमाणे ते झाडीत गेल्यावर आपला हिरो राजकुमार आणि त्याची ती हडकुळी प्रेयसी त्यावरून बसून पळून जाणार.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eUoWuPenhK0>>>> ह्या राजकुमाराने 'प्रियतम्मा प्रियतम्मा' गायला हव होत धुमधडाका मधल.
मला त्या मुलीचीच दया आली.
मला त्या मुलीचीच दया आली. मधेच एकदा केसांवर हात फिरवताना कुठले कंडिशनर वापरतो असे विचारलं असेल का??
पण ती डान्स स्टेप लैच अवडलीये
अरे काय भयंकर गाणे आहे !
अरे काय भयंकर गाणे आहे !
माझा पीसी बाय डिफॉल्ट म्यूट वर असतो त्यामुळे सुरुवातीचे काही सेकंद नुसताच व्हिडियो पाहिला.
मुलगी" बाबा! मी दहावीत सर्व विषयात पास झाले !" असे काही म्हणतिये असा भास झाला.
सकाळी सकाळी ते गाणे पाहिल्याने आता ते गाणे दिवसभर डोक्यात बसणार !
"पाकिस्तान च्या ताहेर शाह ला
"पाकिस्तान च्या ताहेर शाह ला भारताचे चोख प्रत्युत्तर.... " !
मानला तुम्हाला.. शेवट पर्यंत
मानला तुम्हाला.. शेवट पर्यंत बघितलं व्हिडियो.. आपण तर पहिल्या 40 सेकंदात बंद केला
काही दिवसांपुर्वी व्हॉट्स अप
काही दिवसांपुर्वी व्हॉट्स अप वर पाहिला होता तेव्हा ... "पाकिस्तान च्या ताहेर शाह ला भारताचे चोख प्रत्युत्तर.... " ! >> हीच प्रतिक्रिया आली होती.
"मैं दिवाना, मधला मँ हा बकर्याला कॉम्प्लेक्स येईल या पद्ध्तीचा आहे. आणि त्याची हेअर स्टाईल पाहून मधेच 'सुरक्षित काले मेरे बाल' ची जाहिरात पण येते की काय वाटून गेलं ! हिरवीण आणि या दोघांचा डॅन्स याबद्दल अजिबातच नो कमेंट्स
सगळंच ... हाईट ऑफ होतकरुपणा !!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eUoWuPenhK0
आयचो घो ..काय पाहतोय मी हे..
पोटात डोकेदुखी व्हायला लागलीय.
मला पण आधी ताहेर शाह वाटला.
मला पण आधी ताहेर शाह वाटला.
<मानला तुम्हाला.. शेवट पर्यंत बघितलं व्हिडियो.. आपण तर पहिल्या 40 सेकंदात बंद केला> ...मी तर दहा सेकंदातच
वरचा विडीओ अजिबात फनी वाटला
वरचा विडीओ अजिबात फनी वाटला नाही. काय ते माकडचाळे. राग आला.
अदिती...भरि व्हिडीओ! मस्त!
अदिती... भारी व्हिडीओ! मस्त! कोण आहे हा हिरो? आणि खरेच...ती त्याच्या मुलीच्या वयाची आहे. पण दोघंही नगाला नग आहेत अगदी!

मला एक कळलं नाही...तो बंदूक धारी तिला पिस्तुल रोखून तिचं प्रेम आहे का ते विचारतो...ते कुणावर? त्याच्या स्वतः वर की ह्याच्यावर?
कैद्यांना शिक्षा म्हणून असे
कैद्यांना शिक्षा म्हणून असे व्हिडिओ दाखवले तर....?
कसे रे तुम्ही इतके एपिक
कसे रे तुम्ही इतके एपिक व्हिडिओ दहा सेकंदात बंद करता?
मी तर पार अगदी शेवटच्या मारामारी पर्यंत अगदि नेटाने पाहिले. इतकेच काय त्या शेजारी असलेले एक लडकी हे गाणे देखील पाहिले, ते देखील इतकेच एपिक आहे याची नोंद घेण्यात यावी.
पोटात डोकेदुखी व्हायला लागलीय
पोटात डोकेदुखी व्हायला लागलीय. त्याच्या स्वतः वर की ह्याच्यावर?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=JgQiV5x2aI8
अदिती, यू मेड माय डे! अशक्य
अदिती, यू मेड माय डे!
अशक्य आहे ते गाणं _/\_
प्यार की खुसबू दोनो को मिला
प्यार की खुसबू बढती रहा
डिवाना मे डिवाना...
अशक्य भारीये!
Pages