अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पडलो ना राव खुर्चिवरुन
*
मकृ, ललिताजी बहुतेक टांग्याच्या घोडयावर बसून आले असावेत. कारण त्यांच्या घरी येतानाच टांगा फूल्टू भरलेला होता.

मालाजी मात्र टांग्याच्या घोडासारख्या बसून होत्या. *

स्वप्ना, खतरनाक लिहिले आहे.

मग आणखी अ‍ॅक्टींग करायला लागेल ह्या भीतीने तो लगेच तिथून निघाला. <<<<< Lol पूर्ण सिनेमा पहा ना प्लीज..

राकुने यथाशक्ती हसायचा प्रयत्न केला. किंवा रडायचा केला असेल. आम्हाला त्यातला फरक ध्यानी येत नाही.>>>> Rofl

स्वप्ना, मॅड मॅड मॅड लिहिलंय्स. Lol
खुप आवडलं.
पुर्ण पिच्चर बघावाच लागेल तुला. आणि इथे वेगळा धागा काढुन लिहि. कारण टवाळा आवडे विनोद या उक्तीप्रमाणे असं काही वाचायला मिळालं की माझा दिवस सुखाचा होतो. Happy

तर राकुच्या चेहेर्‍यावर नेहमीप्रमाणेच कसल्याही भावांचा पूर्ण अभाव. त्यामुळे तो आनंदाची बातमी द्यायला आलाय का दु:खाची हा पत्ता लागेना>>>>
मालाजींनी बायका झुरळ (मध्यम साईजचं, मोठं नव्हे!) बघून जेव्ह्ढ्या दचकतील तेव्हढं दचकायचा अभिनय केला. आणि लगेच रडायला समोरचा खांब गाठला.>>>>
आता आपला मख्ख चेहेरा बघायला कोणी नाही हे बघून राकु बाहेर पडला.>>>
मग आणखी अ‍ॅक्टींग करायला लागेल ह्या भीतीने तो लगेच तिथून निघाला. >>>>>>>
ही आणि अशी बरीच कहर वाक्य आहेत. तुझी पोस्टच कहर आहे खरंतर.

अवांतर, तु बीस साल बाद (जुना-विश्वजितचा) बद्दल लिहिलं होतंस ते कुठल्या धाग्यावर?

. बहुतेक त्याच्यासमोर दोन भावनाप्रधान वाक्यं म्हटली असतील. आणि त्या मुलाने स्वतःच स्वतःची जीभ ओढून घेऊन आत्महत्या केली असेल. असो.>>>>>> जाम हसतेय.

स्वप्ना
भयंकर हसतोय
मस्त जमलाय

>>अवांतर, तु बीस साल बाद (जुना-विश्वजितचा) बद्दल लिहिलं होतंस ते कुठल्या धाग्यावर?

मी लिहिलं होतं का? आता आठवत नाहिये. लिहिलं असेल तर ह्याच धाग्यावर असेल.

परवा सुपरमॅनचा (ख्रिस्तोफर रिव्ह) कुठलातरी पिक्चर पाचएक मिनिटं पाहिला. त्यात तो ती लोईस आणि दुसरी कोणीतरी एक छम्मकछल्लो (कोणा श्रीमंत माणसाची मुलगी....बहुतेक त्या माणसाने डेली प्लॅनेट विकत घेतलेलं असतं) ह्यांच्याबरोबर डबल डेट वर असतो. म्हणजे लोईस बरोबर सुपरमॅन बनून आणि दुसरीबरोबर क्लार्क केन्ट बनून. त्या दोघी एकाच खोलीत असतात आणि हा पठ्ठ्या सुपरमॅन म्हणून खिडकीतून आणि क्लार्क म्हणून दरवाज्यातून इतक्या वेळा ये-जा करताना दाखवलाय की मला शेवटी भीती वाटायला लागली की कंटिन्युइटीचा काहीतरी मेगा झोल होऊन सुपरमॅनचा चष्मेबद्दूर होणार आणि क्लार्कच्या अंगावर ती फेमस लाल चड्डी दिसणार Happy

स्वप्ना, अशक्य कहर लिहिलेयस.. हा वरचा सुपरमॅन सिनेमा कुठला? गोविंदा जेव्हा तुफान फॉर्ममध्ये होता तेव्हा त्याने हा असला सिन केल्याचे आठवतेय. फक्त तो सुपरमॅन नाहीय एवढेच.

बाकी राजेंद्र कुमार, शम्मी कपूर , माला सिन्हा वगैरे 'वजनदार' स्टार असलेले सिनेमे बघताना मला नेहमी वाटायचे की बिचाऱ्याची लग्ने वेळच्या वेळी झाली असती तर ते व आम्ही सुटलो असतो. दिसायला थेट चाळीशीत आणि प्यार प्यार करत मरताहेत टीनेजर सारखे. हिरॉईनी तर 4 पोरांच्या आया शोभाव्यात.

नीना कुलकर्णी यांची 'सर्फ एक्सेल' ची जाहिरात पाहिली आहे का? ज्यात नीना कुलकर्णी आपल्या नातवाला घेउन भाजी खरेदी करायला जातात. तिथे त्यांच्या पाकिटातून १० रुपयांची नोट खाली पडते आणि मग तो नातू खाली मातीत सरपटत जाऊन ती नोट काढून आपल्या आजीला देतो. यामुळे त्याचे कपडे खराब होतात तेव्हा त्याची आजी त्याला म्हणते, "काही हरकत नाही. १० रुपयांच्या 'सर्फ एक्सेल'ने हे सगळे डाग निघून जातील.!"

आता खाली पडलेले १० रुपये उचलण्यासाठी आधी कसरत करून कपडे खराब करून घ्या आणि मग तेच १० रुपये सर्फ एक्सेल वर खर्च करा, यात काय 'पॉईंट' आहे? त्यापेक्षा खाली पडलेल्या १० रुपयांच्या नोटेवर पाणी सोडले तर 'खरे पाणी' आणि मेहनत वाचली नसती का??? Proud Proud Proud

तळटीप: या जाहिरातीबाबत आधीच कोणी लिहिले असल्यास क्षमस्व. सर्व प्रतिसाद वाचायचे आहेत.

कुरकुरेची हिंदी जाहीरात ,तेढा है पर मेरा है "अशी होती.एकदा पेपरमध्ये याचं मराठी वर्जन होतं "वाकडा आहे पण माझा आहे". खुर्चीवरुन पडायचाच बाकी होतो.लै हसलो होतो राव तेव्हा

त्यापेक्षा खाली पडलेल्या १० रुपयांच्या नोटेवर पाणी सोडले तर 'खरे पाणी' आणि मेहनत वाचली नसती का??? >>> बातों में दम है।

"वाकडा आहे पण माझा आहे". >>> Rofl

हे जाहिरातींचे भाषांतरकार काहीच्या काही लिहितात. अक्षरशः वाचवत नाही.

Swapna Lol

एकदा रात्री ११ च्या दरम्यान चॅनेल सर्फिंग करतेवेळी डी.डी. ओडियावर 'विक्रम वेताळा' मालिका चालू होती. त्यात तर वेताळबाबा विक्रमजींना ष्टोरी सांगत असतांना चक्क त्या ष्टोरीतला पोट्टा छोटी कार घेऊन खेळतांना दाखवलाय.

धन्य त्यात वेताळमाऊली आणि धन्य चक्र(म)वर्ती विक्रमराजा

नायक-नायिकेचं लग्न लावून देण्याऐवजी त्यांच्या आई आणि वडिलांचं लग्न लावून दिलं तर त्यांचे उरलेले दिवस सुखाचे जातील. असो. >>>
भारी Lol

Pages