अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या स्लोमो मधेही एकदा तो अडखळुन पडतो की काय अस वाटलेल. नाती बरोबर नाचतोय की काय अस वाटल सुरवातीला. तिची दया आली.

भिकार व्हिडिओ Sad
हे असलं काहितरी करून आपण आपलंच हसं करून घेतोय असं नसेल का वाटत या लोकांना ? Uhoh
तो ताहेर झाला, हा आणि ती पूजा.. नग एकेक नुसते.

सुरवातीला राजकुमार जे काय चालतो/ नाचतो, ते म्हणजे त्या ठिकाणी एकच टॉयलेट आहे. त्यात बराच वेळ कोणीतरी गेले आहे आणि हा ते लवकर बाहेर यायची वाट बघतोय असे वाटते. चेहरापण तसाच आहे.

अजून आलाय राजकुमारांचा व्हीडिओ. त्यात तो एक डायवर असतो आणि ती एक डाकटोर असते. आणि ती सुरुवातीला च त्याला आय लाब यु आय लाब यु आय लाब यु म्हणते
मग गाणं चालू होतं ते इंग्लिस मध्ये
पण त्याचं हायफाय इंग्लिस मला समजले नाही म्हणून 1 मिन च्या वर व्हीडिओ पहिला नाही.
म्युजिक साधारण पहिल्या गण्यासारखं च आणि प्रिन्स चारमिंग चे कपडे ही.
5 की 6 मिन च गाणं आहे

यू आर ए डाक्टाॅर, आय ॲम अ ड्रायवर
वि फेल इन लव, विथ इच udder!!!
udderly butterly hilarious Biggrin Biggrin Biggrin Biggrin >>> आपटले मी खाली हसून हसून.. Rofl

https://youtu.be/in2j_Tn0wfE

हे गाणं आधी कुणी शेअर केलंय का माहीत नाही राजकुमार इतकंच कहर आहे...

नवीन Submitted by फूल on 17 December, 2017 - 13:47

>>> मला तर आवडले हे गाणे. चाल पण चांगली आहे. कहर काय वाटले तुनहाला याच्यात.

https://youtu.be/in2j_Tn0wfE

हे गाणं आधी कुणी शेअर केलंय का माहीत नाही राजकुमार इतकंच कहर आहे... >>>>> कुठे सापडलं तुम्हाला हे गाणं? इथे दिल्याबद्दल तुमचे फार फार आभार! बऱ्याच दिवसांनी एक सुंदर आणि शांत स्वरांचं गाणं ऐकायला मिळालं. मला गाणं ऐकून संगीतकार रवींद्र जैन आणि रामायण मालिकेची आठवण आली. गाण्यातील नायिकेचा अभिनयही आवडला. अगदी सराईत वाटली. गाण्याचा सेटही छान आहे. अगदी यूपी बिहारला गेल्यासारखे वाटले. गायिकेचा आवाज फारच गोड आहे. अगदी तालासुरात गाणं म्हटलंय. गाण्याचा विषय आणि बोल जरा हटके आहेत, एवढंच. बाकी मला गाणं फारच आवडलं.

फूल, गाणं इथे शेअर केल्याबद्दल आपले पुन्हा फार फार आभार.

आणि हो! राजकुमार यांचं ते 'दिवाणा आणि दिवाणी' गाणं सुद्धा मला
आवडलंय. किती सॉफ्टली नाच केलाय त्यांनी गाण्यावर. भगवानजी आठवले. गाण्याचे सूर आणि संगीतही आवडले. आणि नायिकेने गाण्यावर नाचही किती सुंदर केलाय. राजकुमार यांचा आवाजही सुंदर आहे. हो! राजकुमार यांचा अभिनय आणि गाण्याचं पिक्चरायझेशन मात्र बेसिक लेव्हलचं आहे.

मला ढिनचँक पुजाचं 'दारू दारू दारू' आणि 'स्वागवाली टोपी' हे गाणंही आवडलं होतं.

आता तुम्ही म्हणाल, सचिन काळे यांची टेस्ट काहीतरी जगावेगळीच दिसतेय. जरा हटेला है क्या? हा! हा! हा! पण काय करू!? हाय ते, हाय ते, हाय! Rofl

१९७१ मधले रँडी न्युमनचे एक गाणे आहे - इट इज लोनली अ‍ॅट द टॉप. १९९८ साली अचाटतेचा शिरोमणी असा गुंडा आल्यानंतर त्याला निश्चितच या ओळींमागची भावना समजली असणार. पुढची सहा वर्षे इनसाईडर नॉलेज मध्ये बंदिस्त असल्याने हे एकटेपण त्याला अधिकच जाणवले असावे. सहा वर्षांनंतर मात्र जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात टॉमी वायसोने द रूम बनवला आणि गुंडाच्या तोलामोलाचा सिनेमा तयार झाला.

तसे बघावे तर द रूमवर पानेच्या पाने खर्च करता येतील पण इथे फक्त एकच सीन सांगणार आहे. सिनेमाची थोडक्यात कथा अशी - जॉनी (टॉमी वायसो स्वतः) हा साखरेत घोळलेल्या कारल्यासारखा मनुष्य आपल्या होणार्‍या बायको लिसासोबत राहत आहे. त्याच्या नशीबाचे भोग म्हणून की काय पण लिसा आणि त्याचा सर्वात जवळचा मित्र मार्क एकमेकांकडे आकर्षित होतात. या सर्वांत प्रेक्षकांसकट सगळेच भरडले जातात अशी ही जॉनीची करूण कहाणी आहे. टॉमी वायसो चित्रपटाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक असा सबकुछ आहे. अगदी प्रेक्षकसुद्धा!! विश्वास बसत नसेल तर गूगल करणे, अजूनही टॉमी स्वतःच स्क्रीनिंग करतो आणि प्रेक्षकांत बसून सिनेमा बघतो. या सगळ्यांत काही उठून दिसत असेल तर ती म्हणजे टॉमीची डायलॉग डिलीव्हरी - https://www.youtube.com/watch?v=Jv3MhjSmR3c

लक्ष देऊन बघण्याची गोष्ट - आपल्या होणार्‍या बायकोने मारहाण केल्याचा खोटा आरोप केल्यानंतरची जॉनीने दिलेली प्रतिक्रिया आणि आपला परममित्र समोर दिसताच क्षणार्धात टोनमध्ये केलेला बदल! या संपूर्ण चित्रपटात असेच क्षणार्धात बदल होत राहतात. आणखी एक उदाहरण - लिसाची आई लिसाला सांगते की मला कॅन्सर झाला आहे. लिसा अत्यंत शांतपणे सगळं नीट होईल असं सांगते आणि मग क्षणार्धात दोघी विषय बदलून जॉनी कसा आहे यावर बोलायला लागतात.

अचाट आणि अतर्क्यची गोष्ट चाल्लीच आहे तर महागुरुंना लावणी करतानापन पाहुनच घ्या एकवारी..
खालच्या भक्तगणांच्या कमेंट्सचापन आस्वाद घ्या..
भयान आहे हे भयान.. ओव्हरकॉन्फिडन्स माती खातो..
२.४० पासुन पुढे..
https://www.youtube.com/watch?v=K1pLL7DrK74

त्यात मी म्युट करुन बघितला विडीयो. अजुनच भयाण वाटलं. Lol>>मला ऑस्ट्रक कि काय तसल फिलिंग आलं.. लोक चढवतात ते चढवू दे पण आपणही त्याच उंचीवर आहे ह्याबद्दल स्वतःचही दुमत नसणे आणि तितक्याच (ओव्हर)कॉन्फिडेंटली नाचुन ती वाहवा स्विकारण म्हणजे गट्स लागतात ब्वा..
रच्याकने हा आरशात पाहुन प्रॅक्टिस नसेल करत का?
याला याचे एक्स्प्रेशन अन हालचाली दिसत नसाव्या का?
अन कहर म्हणजे ते सर्वांसमोर स्टेजवर सादर करायचे.. का म्हणते मी?
तुम्हा बघुन डावा डोळा झाकला या ओळीला केलेल्या डान्स स्टेप्स.. हर हर गंगे काय पाहिल मी आज..

तुम्हा बघुन डावा डोळा झाकला या ओळीला केलेल्या डान्स स्टेप्स>>>>>>>> आणि चेहर्‍याचे एक्सप्रेशन्स- ते ओठ हलवणं- तर खत्तरनाक Lol
सुरेखाताईंना पण नै जमायचं. Happy
आपणही त्याच उंचीवर आहे ह्याबद्दल स्वतःचही दुमत नसणे>>>>> टीना, स पि नेहमीच मला पहा फुले वहा मोड मधे असतो. दुमत नाहीच.

महागरू ने जो एक डोळा बंद करायची कला आहे ती कुठून विकसित केलीय देव जाणे.. आणि खरंच कॉमेडी आहेत आणि त्यावर त्यांना अगदि भरभरून छान छान कमेंट्स ही मिळाल्या आहेत...भगवान उठाले रे बाबा, मेरेको नही महागरू को ( बाबूभाई आपटे मोड ऑफ )

अनिश्का,
अगं त्याचा सो कॉल्ड पर्फॉरमन्स झाल्यावरचा जल्लोष पाहिला का?
सुरुवातीला त्याच ते पाय टाकत येण्याला ती जज म्हणतेय कि काय भारी होत, अन मी पाहतच राहिले..
ते डोळा मारणे आणि आम्हाला वाटत होत म्हणे कि एखादी स्त्रीच हे सगळं करतेय कि काय...
वर तो त्याच्या समोर असलेल्या स्पर्धकांना म्हणतोय कि मी तुम्हाला चांगल म्हणायचो तसच क्रिटीसाइझ पन करायचो आणि चुकी दाखवायचो तर मला इतकच प्रुव्ह करायचय कि थोडी बहोत नजाकत माझ्यातही आहे बर का.. अरे आवरा याला..
'पडदा लाजचा फेकला' ओळीच्यावेळी सारी नजाकत दिसुन येते..
मधे मधे त्याच्या टिपीकल जुन्या पिच्चरमधल्या डान्स स्टेप्स पन घेतल्याय..
'अशी रोखा नजर' ओळीच्या वेळी भिती वाटते त्याची Lol
काय चाल्लय कठिणे..

Pages