अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजेन्द्र कुमार चे नाव आले म्हणून त्याचा आणिक एक चित्रपट आठवला. बहुदा " वोह झुक गया आसमा" त्यात राजेन्द्रकुमार गाडी चालवत चालवत दिवास्वप्न बघत " कौन हे जो सपनो मे आया कोन है जो दिल मे समाया वोह झुक गया आसमा भी इश्क मेरा रन्ग लाया. ओ प्रिया"

मधे मधे सुकाणू वरचा एक हात काढून (ते गाण आपणच म्हणतोय हे दाखवण्यासाठी) हातवारे करत आणि तोण्ड वेडेवाकडे करत अभिनय करतो. मग पुढे अपघाताची तयारी म्हणून दोन्ही हात सोडतो. मग ठरवल्या प्रमाणे गाणे सम्पते अपघात होतो आणि राकु मरतो (आता पुढे चित्रपटात राकु दिसणार नाही म्हणून हुश्श) आणि स्वर्गात जातो तिथे त्याला डेव्हीड भेटतो (बहुदा मनात म्हणतो खाली भेटलास बाबा आता इथे पण आलास)

मग डेव्हीड च्या अभिनय करण्याची आणि राकु च्या अभिनय न करण्याची जुगल बन्दी र.न्गते. डेव्हीड कमीट करतो की बाबा तुला उचलून चुक झाली (जा बाबा परत खाली) पण तोपर्यन्त उशीर झालेला असतो. राकु च भौतिक शरीर जळून गेलेले असत मग त्याचा आत्मा दुसर्याच्या शरीरात प्रवेश करतो. दुसरा कोणी आपल्या शरीरात राकु ला प्रवेश करू देत नाही म्हणून तो परत राकुच्या शरीरात प्रवेश करतो (म्हणजे प्रेक्षकान्चे भोग सम्पत नाहीत तर)

नन्तर आत्मा राकुला कळत की की ज्या राकु शरीरात तो गेलाय त्या राकु शरीराशी त्याची प्रिया सायरा बानू नफरत करतेय. (हाय रे दैय्या)

मग पुढे आत्मा राकु आणि शरीर रुपी राकु जो काही धुमाकुळ घालतात तो तुम्हाला प्रत्यक्ष चित्रपट बघूनच कळेल (काय समजलाव )

केड्या काही गाणी चांगलीयेत पण त्या सिनेमातली.
उदा. मेरे तुम्हारे बीच मे अब तो... आणि उनसे मिली नजर के मेरे होश उड गये...

अगदी सुरवातीला मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हा पटकथा आणि सवांद लेखन रोहिणी निनावेच होत पण आजकाल संवाद लेखक म्ह्णून अभिजित गुरु च तर राकुच्या चेहेर्‍यावर नेहमीप्रमाणेच कसल्याही भावांचा पूर्ण अभाव. त्यामुळे तो आनंदाची बातमी द्यायला आलाय का दु:खाची हा पत्ता लागेना.>> Lol स्वप्ना नेहमीप्रमाणे अशक्य . अजून येऊ देत तुझ्या कडून अचाट सीन Happy

हल्ली दिसत असणारी Nerolac Paint ची जाहिरात पहिलीत का?
ज्यात काही क्रिकेटपटू क्रिकेट खेळत असतांना त्यांचा बॉल एका घराला लागतो आणि त्या घराचे बॉल लागलेल्या ठिकाणचे प्लास्टर निघते. असे वारंवार होते. याहून कहर म्हणजे त्या घरातील एक माणूस मग आपल्या घराला वाचवण्यासाठी घरातीलच एक वॉर्डरोब उघडतो आणि त्यातील स्टीअरिंग व्हील फिरवून घराला गाडीप्रमाणे चालवत चालवत दुसऱ्या एका घराच्या मागे नेवून लपवतो. अशी अनेक घरे या घराच्या मागे येवून लपतात! या दुसऱ्या घराला Nerolac चा रंग मारलेला असल्याने त्याला बॉलमुळे काहीही नुकसान होत नाही!!!
https://www.youtube.com/watch?v=SNxjhQQq3Xc

दक्षिणा चांगली माहिती डिलीट... उनसे मिली नजर के मेरे होश उड गये... हे मला पण आवडते गाणे आहे... माहीत नव्हते या रद्दी चित्रपटातले आहे ते..

सर्वसाधारणपणे मॉन्स्टर मूव्हीजचे ठराविक नियम असतात. एक प्राणी - वानगीदाखल गोरिला, शार्क, ड्रॅगन - घ्या. शक्यतो त्याचा येनकेनप्रकारेण सायन्सशी संबंध जोडा. मग त्याला काही कारणाने त्रास द्या. ते जनावर मुंग्या माराव्या तशी माणसे मारत सुटेल. शेवटी हिरो प्राण्याला मारेल - म्हणजे असे दाखवले जाईल. पण तो जगेल किंवा त्याची पुढची पिढी जगेल. सीक्वेल येईपर्यंत तुमची सुटका झाली.

७ वर्षांपूर्वी काही लोकांना एक फॅन्टॅस्टिक कल्पना सुचली - एक प्राणी घ्या. त्याच्यात दुसर्‍या प्राण्याचे जीन्स मिसळा (सायन्स!). नवीन तयार झालेल्या प्राण्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी एक न्युरोकंट्रोलर बनवा (टेक नो लॉजि_). मग मुख्य शास्त्रज्ञाकरवीच तो कंट्रोलर मोडा. त्या प्राण्याला मोकाट सोडा - हॅशटॅग जीनियस! शार्क्टोपस आणि त्याच्या दोन सीक्वेल्सची कहाणी या वाटेने पुढे सरकते. अर्थातच शार्क आणि ऑक्टोपस - शार्क्टोपस

यात शार्क्टोपस सगळी मिळून सहज साठेक माणसे मारतो. इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा की या सगळ्यांच्या मृत्युला सेपरेट सीन मिळतात. गॉडझिला सारख्या बिनडोक मॉन्स्टरप्रमाणे शार्क्टोपस गठ्ठ्याने माणसे ठार करत नाही. दिग्दर्शक त्याला एक एक सीन एंजॉय करण्याची संधी देतो. तीनही सिनेमातले एकूण एक अ‍ॅक्शन सीन अ नि अ च्या प्रायमरमधून आलेले आहेत. उदाहरण म्हणून इथे दोन सीन देत आहे

१) सीक्वेल्समध्ये शार्क्टोपसला प्रतिस्पर्धी म्हणून असे इतर प्राणी येतात - टेराकुडा (उडता डायनोसॉर + बाराकुडा मासा) आणि व्हेलवुल्फ (किलर व्हेल + ग्रे वुल्फ). टेराकुडा अर्थातच पोहतो व उडतो. पोहताना टेराकुडा आपले पंख एखादा पक्षी उडतो तसे हलवतो - मध्ये मस्तपैकी अंडरवॉटर ग्लाईडिंग करतो आणि तरी शार्क्टोपसपेक्षा वेगाने पोहतो.

२) शार्क्टोपस ओरिजिनलचा क्लायमॅक्स. हिरो आणि हिरवीण (शास्त्रज्ञाचे कन्यारत्न) उरलेत. हिरोकडे लई लई भारीतले ग्रेनेड लाँचर आहे जे इंजेक्शनसारखे रुतून बसणारे ग्रेनेड सोडते आणि त्याला वायरलेसली अ‍ॅक्टिव्हेट करून स्फोट करता येतो. हिरो फूटभर अंतरावरून पहिल्या फटक्यात नेम साधतो. मग बंदूक फेकून देतो आणि हार्पून घेऊन शार्क्टोपसशी लढायला लागतो - तोवर हिरवीणीने बॉम्बचा पासवर्ड टाकणे अपेक्षित असते, जरी बापाने तिला पासवर्ड दिलेला नसला तरी. बॉबी देओलचा अजनबी पाहिलेला असल्याने पासवर्ड ओळखण्यात ती पटाईत असते. पासवर्ड निघतो पम्पकिन (पी यू एम पी के आय एन, नो किडिंग). शार्क्टोपसने तोवर हिरोला नांग्यांनी धरून पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न चालवला आहे - का तर त्याला असे करता येते म्हणून. बॉम्ब अ‍ॅक्टिव्हेट होतो, शार्क्टोपसच्या चिंधड्या उडतात पण हिरोला खरचटणे तर सोडाच त्याच्या अंगावर शार्क्टोपसचे रक्तही उडत नाही!!

विशेष नोंद - या सर्व चित्रपटांतील स्पेशल इफेक्ट्सची क्वालिटी बिपाशाच्या क्रीचर थ्रीडी मधल्या स्पेशल इफेक्ट्सइतकीच आहे

असेच मला वाटत farend च्या
शार्कनेडो प्यार की अरी
ची आठवण झाली. शोधून वाचले पाहिजे

शार्कनेडो प्यार की अरी >> इ सब एकही गोडाऊन से आया हैं

शार्क्टोपस (२०१०) -> पिरान्हाकोंडा (२०१२) -> शार्कनेडो (२०१३) -> शार्क्टोपस अ‍ॅन्ड टेराकुडा (शार्क्टोपस २) आणि सेकंड वन (शार्कनेडो २) (२०१४) -> शार्क्टोपस अ‍ॅन्ड व्हेलवुल्फ (शार्क्टोपस ३) आणि ओह हेल नो (शार्कनेडो ३) २०१५ -> द फोर्थ अवेकन्स (शार्कनेडो ४) (२०१६) -> ग्लोबल स्वार्मिंग (शार्कनेडो ५) (ऑगस्ट २०१७)

कोणाला मनापासून अभ्यास करायचा असल्यास नवरत्नांची अशी दणदणीत लाईनअप आहे Proud

दक्षिणा चांगली माहिती डिलीट... उनसे मिली नजर के मेरे होश उड गये... हे मला पण आवडते गाणे आहे... माहीत नव्हते या रद्दी चित्रपटातले आहे ते..>>> मस्त गाणं आहे ते.
बाकी सगळीच गाणी चांगली आहेत 'झुक गया आसमान' मधली. माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे रफीचे 'सच्चा है प्यार मेरा गर सनम'. काय भन्नाट गायलं आहे त्याने!! केवळ गाण्यांमुळे हा चित्रपट (आणि राकु) गाजला Happy

राजेंद्रकुमार ज्युबिलीस्टार होण्यामागे त्याच्या चित्रपटातली गाणी हे प्रमुख कारण होते.

झुक गयाचे टायटल सॉंग रफीच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे. धूल का फुल मधली गाणीही एक सो एक आहेत.

राजेंडर ज्युबिली होण्यामागे कारण आहे त्याचा बंगला... नंतर त्याने बंगला काका ला विकला आणि काका झाला सुपर स्टार..

शार्क्टोपस ... Lol

मला शार्कनेडो सिनेमे आवडतात. त्यात असली भेसळ नाहीये. ते प्युअर शार्क्स आहेत. आणि ते तसे शांतताप्रेमी असतात. नेमके समुद्रात चक्रीवादळ होते म्हणून बिचाऱ्यांना उडत जाऊन दुष्कृत्ये करावी लागतात. त्यांच्या सद्वृत्तीचा एक पुरावा म्हणजे आरी चालवून शार्कला कापल्यावर आतमध्ये त्याने गिळलेली बाई जिवंत आणि अखंड सापडते.

अन्नाकोंडा, लेक प्लासीड हे देखील अफाट अ आणि आ चित्रपट आहेत.
जुरासिक वर्ल्ड ने तर आधीच्या तिन्ही जुरासिक पार्क ची पुण्याई मातीत घातली.

पायस, फारएण्ड, श्रद्धा, तुम्हा सगळ्यांच्या व्यासंगाला आणी प्रतिभेला (प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहेच Wink ) साष्टांग प्रणिपात!

"प्रदीपकुमार, भारतभूषण गाण्यांमुळे तरले." - प्रदीपकुमार, भारतभुषण, विश्वजीत, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी ई. तमाम मंडळींनी त्यांच्या घरात एक रफी चा मोठ्ठा पुतळा उभारून त्याची रोज पूजा करायला हवी होती असं वाटतं. त्याच्या गात्या गळ्यावर ह्या कित्येकांची खाती पोटं भरली आणी सुटली. Happy

फेरफटका अगदी अगदी...
रफिने ने कित्येक टुकार नटांना अक्षरशः तारून नेलं सिनेसृष्टीत... भाभू, प्रदीप कुमार, विश्वजीत (जरा बरा होता हा पण त्यातल्या त्यात बरा ठोकळा)
त्यामुळे रफिच्या गाण्याना खरा न्याय दिला शम्मी, देव यांनीच. आणि तो पण त्यान्च्यासाठी दिलखुलास गायला

फारेन्ड, भान हर्पून पहात असताना हातात वहीपेन ठेवायला विसरू नये. नाहीतर आम्ही कसे हर्पू?

Pages