अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं काय हे.......... मेले मी हसुन ऑफिसात. कसं कंट्रोल करु मी हसायचं.

माझ्या डोळ्यासामोर अख्खा सीन जिवंत झाला.
Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

हा फॉरवर्ड व्हॉट्सअ‍ॅप वर पण फिरतोय. मला त्याच्या 'दिलीप प्रभावळकर' आणी एकंदरीतच ऑथेंटीसिटी विषयी शंका आहे. कुणी हा सीन पाहिला असल्यास किंवा मूळ सेंडर दिलीप प्रभावळकर असण्याविषयी खात्री केली आहे का?

असा सीन गुगलायचा खूप प्रयत्न केला पण यापेक्षा भारी भारी रत्न विडिओ सापडले पण हा नाही. त्यामुळे किती ऑथेंटीक आहे माहित नाही.
पण खूपच भन्नाट वर्णन या धाग्याला साजेसे (खोटे असले तरी) वाटले म्हणून शेअर केले Proud

हा ओवाळणी वाला सीन भाडिपा च्या एका व्हिडिओमध्ये पण डिस्कस झालाय. गुजराती सिनेममधील आहे असा उल्लेख आहे, कमेंटमध्ये नाव देतो सांगितलं पण दिलेलं नाही.

https://youtu.be/oxC8Rk1SNgc

गोविंदा आणि दिलीपकुमार एकमेकांवर गोळ्या झाडत असातात...suddenly दिलीपकुमारच्या गोळ्या संपतात..

आणि गोविंदा सेफझोन सोडून बाहेर येतो..
इकडे गोविंदा बघतोय ..च्यायला थेरडं गेलं कुठं??

आणि मग undertaker style ने दिलीपकुमारची इंट्री होते ...फरक फक्त इतकाच Undertaker झीप नसलेला पेटीकोट व त्यावर आपल्याकडच्या रिक्क्षाच्या काळ्या हूडच जॅकेट घालतो तर दिलिपकुमारने इथे सुटबूट वरती हॅट घातलेली आहे...

आणि आश्चर्यम!!!..ओय माय गाॅड..

त्याच्या हातात काय आहे.. माहीतेय...??

एक जवार की रोटी...

मग गोंविंदा विचारतो...

ये कहासे लाये तुम??

अरे भुसानळ्या त्याला मारणार होता ना तु..लगेच काय कहासे लाये तुम...

हावरटच आहे मेला..

मग लगेच दिलीपकुमार सुरू होतो..
ये तुम्हारे माॅ के हाथ की बनायी हुई जवार की रोटी वैगेरे..

अरे काय चाललय...?? टीव्हीच फोडून टाकणार होतो...
पण आईने मग मला फोडला असता..आणि काय ते जवार की रोटीभी नसीब नही होती..

चित्रपटाचं नावं सांगणार्याला माझ्याकडून एक जवार की रोटी..
फ्री...

माझ्या घरी चोर आले व त्यांनी बंदूक रोखली व मी बचावासाठी बायकोने केलेली भाकरी घेतली तर ती संतापून म्हणेल की माझ्या भाकरी जाड असतात हे सरळ सांगायला काय झाले ? असा कुजकेपणा बरा नव्हे !

original गुजराती: खम्मा मारा वीरा>>>>

अरे देवा, किती वर्षांनी हे नाव ऐकले. हा बघितलाय टीव्हीवर.

https://www.maayboli.com/hitguj/messages/644/138604.html?1207236750

हा इथे उचापती नी लिहिलेला मिस्टर या मिस चा रिव्ह्यू
नव्या मायबोलीवर असेल, धागा सापडला नाही.
गरजूंना सूचना: हा पिक्चर इरॉस नाऊ ऍप वर उपलब्ध आहे, अवश्य पाहा.
(Why should I suffer alone ☺️☺️☺️☺️)

Lol
मला धर्मेंद्र, जितेंद्र दोघे मिळून साध्या चाकूने फुग्याच्या / प्लॅस्टिकच्या शार्कला मारताना दिसले. होळीच्या रंगासारखे बादलीभर रक्त आले. तशाच 'आ'वस्थेत शार्क बुडाला, तोंड बंद नाही झाले.

Happy Happy
कहर शार्क आहे
स्टीव्हन स्पिलबर्ग ने पहिला असता तर म्हणाला असता उगाच इतका खर्च केला
Happy

Submitted by भरत. on 18 March, 2023 - 12:43 >>>>>> अशक्य सीन आहे. यापेक्षा अचाट काही असेल असं वाटत नाही. Lol

Electricity नाही तर मॉनिटर कसा चालु आहे. आणि शेवटी नर्सने जो टॉर्च बाहेर काढला तो वापरून सर्जरी का केली नाही?

अतिभयंकर
खरंच की Happy
टॉर्च होता मग का इतके त्याग?

अतिभयंकर
खरंच की Happy
टॉर्च होता मग का इतके त्याग?

शिवाय हा प्रकार एका कापडी तंबूत , म्हणजे आगीची भिती !

ज्या नर्स ने टॉर्च दिला ती त्याचे पैसे घेत असावी बहुदा, तिचे एक्सप्रेशन बघता, अर्ध्या तासाच्या बोलीवर मिळेल, अनामत रक्कम भरा आधी असे म्हणाली असेल Happy

आणि ऑपरेशन अजून लांबल असतं तर Happy

https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1636681522391425026 >> Biggrin

थोडा कॉन्टेक्स्ट देऊया. चित्रपटाचे नाव जय हिंद (१९९९). या सीनच्या आधीच्या सीनमध्ये हिरो आतंकवाद्यांशी एकटाच लढून, गोळी खाऊन आलेला आहे. हिरो मृत्युशय्येवर असल्याने उपलब्ध एकमेव शिकाऊ डॉक्टर मनिषाने तुटपुंज्या सामग्रीनिशी ऑपरेशन करण्याव्यतिरिक्त इतर पर्याय नाही. ऑपरेशन सुरू होते. जखम स्वच्छ करायला सुरुवात करताच मनिषाला घाम फुटतो आणि ती रक्ताळलेल्या हाताने कपाळावरचा घाम पुसते. हिंदी चित्रपटांच्या - हिरोचे रक्त मांगमध्ये लागताच हिरोईन एक्साईट - या नियमाचे पालन होते. त्यामुळे मनिषाला अजूनच स्फुरण चढते - हा वाचलाच पाहिजे. पण तिच्याच डायलॉगनुसार नर्सच्या टॉर्चचा उजेड पुरेसा नाही (ये रोशनी काफी नही हैं). तेवढ्यात गावकी गोरी शि.शो. तिथे धावत येते. मनिषाच्या भांगेतले रक्त बघून तिला परिस्थिती फारच गंभीर असल्याची जाणीव होते. कट टू लिंकमधला सीन.

तो टॉर्च मांत्रिकाकडून आणलेला असतो. जर कुणी ( शक्यतो कुमारिका) आपले वस्त्र अग्नीस स्वाहा केले तरच टॉर्च पेटेल असे त्याचे शास्त्र असणार.

Lol
स्ट्रिपींग करणारी शिल्पा शिरोडकर आहे का ? त्यागाची शैली तशीच आहे. नर्स इतक्या वेळ कुठं होती, एकदम भुतासारखी आली. मनिषा कोईराला डेंटिस्ट सारखं वर ठोकून खालून गोळी काढतेय.

Pages