Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज सकाळी पाहिला महागुरूंचा
आज सकाळी पाहिला महागुरूंचा डँस
त्याची सिग्नेचर स्टेप होतीच, कुत्रा डान्स. खरतर हा शब्द शिरीष कणेकर जितेन्द्रच्या डान्सला म्हणतात पण महागुरूंसाठी चपखल बसतो.
टाळी वाजवत एकदातरी ते एक पाय नाचिव रे होतचं
अनामिका, आयाम वेटिंग फॉर
अनामिका, आयाम वेटिंग फॉर यू .. इन एयरपोट.... लाब्यू .. लाब्यू ... लाब्यू.... अश्या धडाकेबाज डायलॉगने सुरु होणारा आदरणीय राजकुमार यांचा नवीनतम व्हिडिओ ...
https://www.youtube.com/watch?v=Kx0TrkPqwlI
2० वर्षापूर्वी मी बाईच्या
2० वर्षापूर्वी मी बाईच्या वेशात नाजूक दिसलो म्हणून आज पण दिसतोय हे मान्य करा , अशा अअट्टाहासाने केलाय तो नाच.
नुसता स्त्रीवेशात तो इतका खटकला नाही, पण काही काही अदा फारच गन्डल्या आहेत आणि लवचिकपणा, नखरा नखा इतका पण दिसत नाहीये.
असो.. जितके कमी बोलू तितके उत्तम
@डॉक्टर
@डॉक्टर
2० वर्षापूर्वी मी बाईच्या
2० वर्षापूर्वी मी बाईच्या वेशात नाजूक दिसलो म्हणून आज पण दिसतोय हे मान्य करा << हे वाचुन बनवा बनवी चा गाणं बघितलं, त्यातही सचिन ठोकळाच वाटतोय की..काही नाजुन बिजुक दिसत नाहीये...
राजकुमार अजुन आहेच का हा?
राजकुमार
अजुन आहेच का हा?
<<सुरु होणारा आदरणीय राजकुमार
<<सुरु होणारा आदरणीय राजकुमार यांचा नवीनतम व्हिडिओ ...
https://www.youtube.com/watch?v=Kx0TrkPqwlI<<<
अगागा, कहर गाणे आहे हे! १:२३ मिनिटान्नी डॅन्स सुरु होतो तो तर अगदी अप्रतिम, रापचिक, तोड दिया असा!!
सचिन च गाणं पाहिलं.. फारच
सचिन च गाणं पाहिलं.. फारच काहीही..
ते ओठं चावुन वगैरे. यक्क..आणि मादक दिसण्यापेक्षा खुन्नस दिल्या सारखं जास्त वाटत आहे
आनंदी... अगदी अगदी........
आनंदी...
अगदी अगदी...................................................................
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=nxjbhLFA0D4
थोडं वजन कमी केले तर बरा
थोडं वजन कमी केले तर बरा दिसेल हा राजकुमार
बनवाबनवी 1988 म्हणजे 30
बनवाबनवी 1988 म्हणजे 30 वर्षापूर्वीचा हो.
Aho to episode 2011 cha aahe
Aho to episode 2011 cha aahe
लोक इतकं अचाट धाडस कसं काय
लोक इतकं अचाट धाडस कसं काय करू शकतात?

तो राजकुमार असहनिय आहे अगदी.
रियल तेलंगना न्युजhttps://www
रियल तेलंगना न्युज
https://www.youtube.com/watch?v=AOpVbcFwQ2A
१:३० ते १: ४५ मध्ये एकदम अचाट आहे.
हे कुठे टाकावे काय कळले नाही.
हे कुठे टाकावे काय कळले नाही. नागाचा धागा वर आला होता पण तसाही या धाग्याचा विसर पडला होता म्हणून वर आणण्यासाठी इथे टाकते.
कारण बहुधा आता सगळ्या सिनेमात लॉजिक आलेले आहे आणि अचाट सीन्स नामशेष झालेले आहेत.
दिलीप प्रभावळकरांनी फॉरवर्डलेला (बहुधा originally मिलिंद शिंत्रेंचा) धमाल विनोदी मजकूर:
भयानक सिनेमा काढायला भाषा आणि काळाचे बंधन नसते. फार पूर्वी एक अमराठी फिल्म बघितली होती. ब्लॅक अँड व्हाईट आणि फुजिकलर यांच्यामधली कोणती तरी होती. त्यात एक लोकोत्तर सीन होता. त्यात ती जी काय, हिरोईन म्हणून भारदस्त नटी कामाला असते, तिच्यावर व्हिलनचा डोळा असतो. आणि मग एके दिवशी मनात रेपात्मक कारवाई करण्याचा अत्यंत दुष्ट विचार घेऊन तो त्याच्या टोळीसकट तिच्या पाठीमागे लागतो. आपली अब्रू जाऊ नये म्हणून ती हिरोईन यथाशक्ती धावत सुटते. हे पाच लोकही भरपूर रिळं शिल्लक असल्याने काही अंतर ठेवून हळू हळू धावत असतात. मग हिरोईन पळता पळता जंगलात शिरते. हे सुद्धा नाइलाजाने तिच्या पाठोपाठ जंगलात शिरतात. आणि एका दगडाला अडखळून हिरोईन धप्पकन पडते. रेप्या व्हिलनला भलताच आनंद होतो. तो मोठयाने हसतो. बाकीचेही हसतात. बाकीचे का हसतात ते कळले नाही. दुसर्याच्या सुखात सुख मानायची वृत्ती, असेच काहीसे असणार. मग रेप्याचा क्लोज दिसतो. त्याच्या डोळ्यातल्या वासना पार हनुवटीपर्यन्त आलेल्या असतात. तो गलिच्छ अभिनय बघून हिरोईन अजूनच घाबरते. मग स्वतःचे फोरआर्म जमिनीवर ठेवून ती हळूहळू विरुद्ध बाजूला सरकू लागते. [ देवदासमधील मार डाला गाण्यात माधुरीची अशी काहीशी स्टेप आहे. ] ती जमिनीवर पडल्यामुळे रेप्या वाकून वाकून पुढे येत असतो. आणि काय मौज सांगू महाराजा....हिरोईन एका वारुळाला धडकते. त्या वारुळातून एक नाग येतो. मग हिरोईन त्याला सगळी सिच्युएशन सांगते. नागालाही सिच्युएशनची ग्रॅविटी लक्षात येते. तो थोडा विचार करतो. [ असा शॉट आहे त्यात ] आणि मग तिला वाचवायचा निर्णय घेऊन तो त्या व्हिलनकडे एक दर्जेदार फूस्स टाकतो. म्हणजे आपला फणा त्याच्याकडे “बाबाजीका ठुल्लू” स्टाईल पुढे करतो. त्या फण्यामुळे रेप्या घाबरतो. मग त्याच्या साथीदारांनाही नाग एकेक फूस्स देतो. या नागड्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही, हे लक्षात येऊन, ते सगळे घाबरून पळून जातात. आपली अब्रू वाचल्यामुळे हिरोईन खूश होते. ती नागाला वंदन करते. तोही त्याच फण्याने तिला आशीर्वाद देतो. आता खरी कमाल पुढे आहे. मग ही बया स्वतःच्या ब्लाऊजमध्ये हात घालून एक राखी बाहेर काढते आणि त्या नागाच्या मानेला बांधते. हा सीन बघून आपल्या डोळ्यातून अश्रूच येतात. हे प्रकरण इथेच थांबत नाही. “थांब जरा, आलोच...” या अर्थाने फणा हलवून नाग वारुळात जातो. आणि...... दोन रुपयाची एक नोट घेऊन येतो आणि तिला ओवाळणी घालतो !!! यापेक्षा भयानक सीन माझ्या बघण्यात आजपर्यंत आलेला नाही. कोणी बघितला असेल, तर जरूर कबूल करावे.
(No subject)
अन्जली १२ मी हसून गडाबडा
अन्जली १२ मी हसून गडाबडा लोळले
(No subject)
(No subject)
(No subject)
हे प्रकरण इथेच थांबत नाही.
हे प्रकरण इथेच थांबत नाही. “थांब जरा, आलोच...” या अर्थाने फणा हलवून नाग वारुळात जातो. आणि...... दोन रुपयाची एक नोट घेऊन येतो आणि तिला ओवाळणी घालतो !!! >>>> बापरे फारच भयानक

आईशप्पथ!! अक्षरशः अचाट आणि
आईशप्पथ!! अक्षरशः अचाट आणि अतर्क्य .. मेले मी हसून हसून

भयंकर
भयंकर
मम्मीईईईईईईई! काय होतं हे?
मम्मीईईईईईईई! काय होतं हे? खरंच असा काही सीन असेल का ? रडले मी.... हसून हसून!
(No subject)
रेप्या व्हिलनला भलताच आनंद
रेप्या व्हिलनला भलताच आनंद होतो.
या नागड्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही.
कुठे लिंक मिळेल का या सिन ची,
कुठे लिंक मिळेल का या सिन ची, आताच गुगलून बघितले या सिन पेक्षा भयंकर काही बाही बघायला मिळाले.
रेप्या, दर्जेदार फुस्स्स
रेप्या, दर्जेदार फुस्स्स

दो रुपयोकी किंमत तुम क्या
दो रुपयोकी किंमत तुम क्या जानो विक्रांत बाबू

Pages