अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी फॉर इंटरप्शन हा कार्यक्रम तेव्हा खूप चालायचा. अधुन मधुन चित्रपट दाखवायचे.

व्यत्यय असंच लिहिलेलं असायचं Happy
रंगोली, चित्रहार, एवढेच काय तर साप्ताहिकीही रविवारच्या चित्रपटाची झलक दाखवतील म्हणून उत्साहाने बघायचो Happy
सुंदर माझं घर, प्रतिभा आणी प्रतिमा, आमची माती आमची माणसं आणी त्यातला शेवटचा उखाणा, शब्दांच्या पलिकडले, गजरा, विक्रम वेताळ्/सिग्मा/इन्द्रधनुष्/रामायण-महाभारत..आहाहा काय दिवस होते ते! असो.

अ आणि अ वर एवढ्या नविन पोस्ट्स पाहुन मला वाटलं कि जट्टुची चर्चा किंवा ढिनचॅक पुजाला शिव्या असा मोठा कार्यक्रम झालेला दिसतो, पण इथे खुप मस्त चर्चा झाली आहे.

आता या धाग्यावरुन आपण हे सगळं एका नविन धाग्यावर शिफ्ट करुयात का? मस्त इंटरेस्टिंग आठवणी आहेत. आणि या विसरलेल्या गाण्यांना एकत्र केलं आहे ती गाणी परत विसरली जातील. आशुचँपने माझी बरीच आवडती गाणी परत आठवुन दिली आहेत. काढा बरं कोणी उत्साही माणसाने नविन धागा.

"काढा बरं कोणी उत्साही माणसाने नविन धागा." - हे आवाहन आहे की आव्हान? कॉलिंग ऋन्मेष!! Wink

अरे वा... तरुणपणीची गाणी ऐकून बरं वाटलं....

ही मला आठवलेली...

पिया बसंती रे... - https://www.youtube.com/watch?v=XFT2niDEy28
सुरमयी आंखे - https://www.youtube.com/watch?v=VkkArIjWwD8
चैन एक पल नहीं... (जूनून) - https://www.youtube.com/watch?v=HdSm3aQ30C0
यार बिना दिल मेरा नहीं लग दा... (जूनून) - https://www.youtube.com/watch?v=k5qTQT4aJrU
माए री... (युफोरीया) - https://www.youtube.com/watch?v=ieUWx6VXYgw - पलाश सेन
कभी आना तू मेरी गली - https://www.youtube.com/watch?v=DH2sQ_je5v8 - विद्या बालन, पलाश सेन
व्हॅलेंटाईन्स डे के दिन - https://www.youtube.com/watch?v=CyO4-3guObM - रायमा सेन
यारों सब दुआ करो - https://www.youtube.com/watch?v=HKJ0KJsgZmw - जस अरोरा
कभी तो नजर मिलाओ - https://www.youtube.com/watch?v=MAOamM7wMIc - सलील अंकोला, आदिती (आडनाव विसरलो)
आफरीन आफरीन - https://www.youtube.com/watch?v=UnX5imZNBzU - लिसा रे
सोणी लग दी - https://www.youtube.com/watch?v=S2mSS3U6a_0 - गुलशन ग्रोवर (!)

फाल्गुनीचे 'चुडी जो खनकी' भारी होते. त्यातली ती गुडीयाची छ्त्री मला जाम आवडायची Happy

दिलेर मेहदींचे 'उंगली पकडली..... हैऽ' अजुन पण लग्नात गाजते.
परी हू मै, बूम बूम सगळी जाम आवडणारी !!

खली वली नाही आठवत का कोणाला???

जाम नाचायचो त्यावर!
ले गयी दिल मेरा मनचली..................खली वली, खली वली. खली वली

ले गयी दिल मेरा मनचली..................खली वली, खली वली. खली वली>>> +१
हे मी कायम खली बली खली बली अस एकत आले आहे.

फाल्गुनी च ओ पिया लेके डोली आ.. हे गाण पण खुप सुंदर होत्,,पिक्चरायजेशन पण सुंदर होत.

आशा आनि जगजीत च
जब सामने तुम आ जाते हो क्या जानिए क्या हो जाता है हे एक गाण अ‍ॅड कराव.

'Intteruption'
'रुकावट के लिए खेद है'
'व्यत्यय'

आणि रात्री दहा की साडे दहाला दूरदर्शनचे कार्यक्रम संपायचे तेव्हा निवेदिका खालील वाक्य म्हणायची.
ता.क. - फक्त 'सकाळी' ऐवजी 'संध्याकाळी' वाचावे.

आता बासच. एवढं चांगलं कलेक्शन, भलत्याच धाग्यावर चर्चा झाल्यामुळे दुर्लक्षित रहाणार आहे. यासाठी वेगळा धागा हवा. मी अपिल केलं होतं पण कोणीच पुढे आलं नाही, आता मला माझा पहिला वहिला धागा काढावा लागणार बहुतेक.

बाय द वे, जट्टु इंजिनिअर पाहिला. यामधे चक्क अ आणि अ काही नव्हतं. खुप यक्क आणि फडतुस मुव्ही होता. पिताजींना त्यांची एलिअन्सची थिम व्यवस्थित सांभाळता येते. कॉमेडी काही झेपली नाही. यापेक्षा त्यांचे अ‍ॅक्शन मुव्हीज जास्त कॉमेडी होते. यावेळेस नो झकपक, नो फॅन्सी बाइक, नो हिलेरिअस कॉस्ट्युम्स, फारच बोअर प्रकार होता. पहिले भाग तुफान एंजॉय केलेले आम्ही, यावेळेस पहिल्यांदाच आम्ही सिनेमा ३० मिनिटं आधी सोडुन निघुन गेलो. पिताजींनी चक्क चेक्सचा ऑर्डिनरी शर्ट घातला होता. बिलकुल कल्पनेच्या पलिकडे अशक्य गोष्ट होती ही. पिताजिंच्या सिनेमाला आणलेली ( हो आणलेलीच असते) गर्दी यावेळेस खरच हरियाणावरुन आयात केलेली असावी. त्या गर्दीमुळे सिनेमा हॉलला घाणेरडा कुबट वास येत होता.

करेक्ट मनिमाऊ. बहुतांशी विनोद(?) ९०च्या सिनेमांतून आयात केलेले वाटत होते. एक तो कोण सारखा थूक लगा के म्हणत होता तो सेम हर दिल जो प्यार करेगा मधल्या शक्ति कपूरच्या प्याज काट के च्या स्टाईलमध्ये म्हणत होता. पिताजींनी अगदीच निराशा केली यावेळी.

फाल्गुनीचे 'चुडी जो खनकी' भारी होते. त्यातली ती गुडीयाची छ्त्री मला जाम आवडायची >>> ही छत्री 'मैने पायल है छनकायी' मधे होती Happy माझंपण आवडतं गाणं.

कोणाला "दिलां तीर बीजां" हे बेनझीर भुट्टोचं गाणं आठवतंय का?
टीव्ही वर नाही लागायचं पण लहानपणी खूप ऐकलंय हे
https://m.youtube.com/watch?v=vk7TpSsx8Z8&feature=youtu.be

हो व्यत्यय. नेटफ्लिक्स वर बेनझीर भुट्टोंवर एक डॉक्युमेण्टरी आहे, त्यात ही हे गाणे आहे.

हे इथे लिहायचे कारण नेटफ्लिक्स च्या रेकमेण्डेशन इंजिन ने मला त्यानंतर हिम्मतवाला बघायचा सल्ला दिला. ("ओ ते जाउ द्या. तुम्हाला झेपायचे नाही. त्यापेक्षा तुम्ही हिम्मतवाला बघा" अशा कॉमेण्ट्स लिहील्या असतील त्या इंजिन ने. फक्त मला दाखवल्या नाहीत).

फा, Happy

पेहले तो कभी कभी गमं था
अब तो हर पल ही तेरी याद सताती है ..
अब तो हर पल ही तेरी याद सताती है ..

कलेया गुजारा
की मै राता कालिया
दंग दिया मैनु
रूत प्यार वालिया
तेरे बाजो जी नै लगदा
मै तो मर गयी यार
आजा माहिया घर आजा माहिया

ती मुकी असते. स्विमिंग चॅम्पियन. लग्न करतात. मग वेगळे होतात. अशी स्टोरी होती. अल्बमच्या एकाच गाण्यात संपुर्ण स्टोरी असायची.

इथे वाचुन त्या ढिनचैक पुजा चि गाणि पाहिलि २० सेकंदाच्या वर पाहु शकलो नाहि आता काहि केल्या तो आवाज कानातुन जात नाहियेय

कोणाला "दिलां तीर बीजां" हे बेनझीर भुट्टोचं गाणं आठवतंय का?
टीव्ही वर नाही लागायचं पण लहानपणी खूप ऐकलंय हे
https://m.youtube.com/watch?v=vk7TpSsx8Z8&feature=youtu.be
ह्यावरुन एक हिन्दि गाणं आहे ना " तु है तु है तु है मेरि जिन्दगि"
लिन्क द्या ना कुनितरि, किन्वा काहि तरि माहिति द्या

इथे वाचुन त्या ढिनचैक पुजा चि गाणि पाहिलि २० सेकंदाच्या वर पाहु शकलो नाहि आता काहि केल्या तो आवाज कानातुन जात नाहियेय>>> माझ्याही कानात तर गाण्याचा आवाज घुमतोच आहे, पण 'swag' ची टोपी घातलेला मी, 'दारू'च्या पुरात बुडत असतानाही, 'सेल्फी' काढण्याचा आटापिटा करतानाचे स्वप्न पडून रात्रीबेरात्री जागा होतो. Lol

FB वर एक व्हिडीओ बघितला, भल्लाल दुर्बिणीतून बघतो आणि शॉक लागून मागे हटतो मग बिजल देव त्या दुर्बिणीतून बघतो तर त्याला ती ढिनच्यॅक पूजा सेल्फीने मैने ले लिया असे बोलून दाखवते आणि तोही झटका खाऊन मागे हटतो. हा हा हा हा

म्हाताऱ्या लोकांची ला़ट आलीये का....
मला पण घ्या मग त्यात
बाबा सहगल, अपाचे इंडियन चे चक दे का चोक दे का चख दे
आलिशा चिनॉय मेड इन इंडिया, परी हू मै - सुचित्रा का सुनिता राव, त्यानंतर मिसो काहीतरी वाजवत असतो आणि आशा भोसले गाणे म्हणत असते ते रिमिक्स जानम समझा करो, त्यानंतर चांदनी राते
टिपिकल लग्नात वाजणारी गाणी - फाल्गुनी पाठक, आणि गुड नाल इशक मिठा
लकी अलीची जवळपास सगळीच, सिल्क रुटचे डूबा डूबा त्यावेळी कसले भारी वाटलेलं, आजही ऐकायला छान वाटेल असेच आहे.
फुल्ल पुर्वजन्मवाली स्टोरी होती ते बूम बूम
मग क्लासिकल बेस वाले शुभा मुद्गलचे अबके सावन ऐसे बरसे सगळ्यात फेवरिट...काय माहोल उभा केलाय. पण बाई मधली आलापी इतक्या जोरात घेतात की हंबरडा फोडल्यासारख्या वाटतात.>>>

मला बी जत्रेला येऊ द्या कि... अप्पुन भी तुम्हारे गट मे..
मला सगळ्यात भयान उषा उथ्थुप वाटते... बाकी यांच्यापेक्षा बाबा से कदीबी भारीच राहिल..

Pages