चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी पोस्टर बॉईज् चा रिमेक ना हा...
मला नाही आवडला ट्रेलर..
एक तर बॉबी देओल ला अ‍ॅक्टिंग कशाशी खातात हे कळत नाही अस माझं स्वच्छ मत आहे.. त्यात ट्रेलर मधेच त्यांनी मेन च्रक्स ओपन करुन टाकला..आणि ते अ आणि अ सिन्स फाईट वगैरे आहेच..असो..

बॉईज.. मराठी.. ट्रेलर पाहून मलाही चीप वाटला. शिस्तीत वाढणारी, अभ्यास करणारी मुलं आहेत आणि त्यांना बाहेरची मुलं येऊन बिघडवतात की सुधरवतात? असे काही तरी आहे..
पण एकंदरीत नाहीच आवडला ट्रेलर.. मुवी पण सो सो च असेल...

मला तो थ्री ईडीयटस सारखा वाटतोय.. अश्या चित्रपटात थोडाफार चीप प्रकार दाखवणे गरजेचे असावे.
शेवटचा डायलॉग चीप आहे हे मला कोणीतरी ते समजावून सांगितल्यावर समजले. मराठीमध्ये हा क्या कूल है हम प्रकार वेळीच टाळायला हवा..

about the movie ' boys' ... अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये मुलांचं "भावविश्व(?)'' दाखवण्याच्या नादात मुलींना जे dumb objects of male entertainment म्हणून सादर केलं जातं, त्याची मला चीड आहे.

शिवाय, शिस्त पाळणारी, अभ्यासू मुलं कशी बावळट आणि उनाड्क्या आणि अफेअर्स करणं कसं "कूल" असा ही संदेश दिसतो ह्या सिनेमात.

@अस्मानी..सहमत. मला ट्रेलर पाहूनच चीड आली. मोहब्बते मध्ये पण तो शाहरूख येऊन मुलांची शिस्त बिघडवतो. इथे तर त्या मानाने अजून लहान मुलं दाखवली आहेत. ह्या वयात शिस्त आणि अभ्यास करणं काय चुकीचं आहे? ट्रेलर वरून अंदाज आला आहे मुवी कसा असेल ते..

मोहब्बते मध्ये पण तो शाहरूख येऊन मुलांची शिस्त बिघडवतो...... इति बी.एस.

प्रत्यक्ष धागाकर्त्याच्या श्रद्धास्थानाला बोल लावता??? दाद दिली पाहिजे तुमच्या हिमतीला!!! Proud Proud Proud

Meri Pyaari Ammi - Secret Superstar | Zaira Wasim | Aamir Khan | Amit Trivedi | Kausar | Meghna
https://www.youtube.com/watch?v=z4I2H6Mulc0

हे गाणे पाहिल्यावर चित्रपट चांगला असावा असे वाटतेय. उत्सुकता लागून राहिली आहे.

"न्युटन" चा ट्रेलर पाहिला. राजकुमार राव आहे. मस्त वाटला ट्रेलर. >>>> +१ वेगळी ईंटरेस्टींग स्टोरी लाईन दिसतेय

"न्युटन" चा ट्रेलर पाहिला. राजकुमार राव आहे. मस्त वाटला ट्रेलर. >>>> +१ वेगळी ईंटरेस्टींग स्टोरी लाईन दिसतेय>>>>> + १० मतदान अधिकारी म्हणुन ड्युटी पार पाडण इतकही सोप नसत.राजकुमार राव तर प्रीसाय्डींग दाखवला आहे.

Secreat superstar चा ट्रेलर पाहण्यात आला..

सिनेमाची गोष्ट ट्रेलरमधून थोडीफार कळते..पण आमिर खान आहे म्हटल्यावर सिनेमा परफेक्ट असेल ह्यात नो डाऊट..
नेहमीचचं लव्हस्टोरी पाहण्यापेक्षा काहीतरी मोटीवेट आणि रिआलस्टीक पाहायला मिळेल अशी आशा आहे. ...बाकी सिनेमा आला की सविस्तर धागा काढू म्हणतोय...

https://www.youtube.com/watch?v=hCfAj91233k
फा फे .. लेटेस्ट ट्रेलर

मस्तंय...
मी पहिल्यांदाच बोल्लेलो की त्याचा ट्टॉक! मस्त वाटतोय.
आणि आता हा ट्रेलर पाहून अमेय सोबत पिक्चर देखील लय भारी असेल असे वाटते. रितेश देशमुखचा पिक्चर आहे, बजेट चांगले दिलेले दिसतेय पिक्चरला. मराठी माणसांनो जागे व्हा आणि करोडोंच्या घरात न्या या पिक्चरला
आपण तर जाणार ... Happy

Vidya Balan: TUMHARI SULU | Official Teaser | Releasing on 24th November 2017
https://www.youtube.com/watch?v=Rbs9UjQQxYw

हैलोssss .. मस्त ईंटरेस्टींग दिसतेय काहीतरी... काही नाही तर विद्या बालनची जोरदार अ‍ॅक्टींग कुठे जात नाही.

फा फे चे ट्रेलर बघितले. अमेय वाघ कोणासारखी अ‍ॅक्टींग करतोय हे जाणवत होते, अचानक व्हॉइसओवर चा आवाज ऐकून कन्फर्म झाले. हा अगदी रितेश देशमुखच्या बॉडिलॅन्ग्वेजची नक्कल करतोय....

अजुन कोणाला हे जाण्वलं का?

हे मी फाफेच्या धाग्यावर फोटोसह लिहिलेय. दोघांच्या चेहरेपट्टीतही साम्य आहे. तरी रितेशने एक चांगले केले की स्वत: यात काम करायचा मोह आवरला.

ओके
. त्याने रितेशची नाकपुडी फुगवून बघायची अ‍ॅक्शन सही सही उचलली आहे.

फाफे चा ट्रैलर आवडला.
फाफे बद्दल इथेच कळलं मला.
आधी काही माहित नसतानाही ट्रेलर मस्त वाटलाय.

तो तरी असा कुठे स्टार लागून गेलाय Happy
>>>>>

मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करता तरी नक्कीच तोच आपला सलमान आहे Happy

लय भारीने ते सिद्धही केलेय ...

करून करून कॉपी ती रितेश ची ? तो तरी असा कुठे स्टार लागून गेलाय

>>> नाहीतर काय? रितेश शाहरुखची कॉपी मारतो... शाहरुख दिलिपकुमार ची, दिलिपकुमार आणखी कोणाची मारत असेल....

Pages