चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवॉर्ड फ़ंक्शन ला बऱ्याचदा गाण्यात ड्रेस चेंज असतो, आणि त्यासाठी हे लोक कपड्याचे अनेक थर चढवतात, जस्ट साडी सोडली आणि दुपट्टा घेतला की घागरा तयार, घागरा काढला कि आत लेग्गीन्ग आणि मिनी स्कर्ट तयार टाइप्स
आणि कपडे शक्यतोवर सुटसुटीत असतात, नो पदर प्रकार,
कपडा सहज काढता यावा म्हणून वेलक्रो, नाड्या यांचा वापर असतो, त्यामुळे तसेही कपड्यांचे फिटिंग गंडलेले असते.
त्यामुळे बऱ्याच हिरॉईन्स ऑन स्टेज जाड दिसतात.

केली चूक दुरुस्त Happy
माझ्या की बोर्ड ला राजकीय नावांची जास्त सवय Wink

ते ठीक आहे पण आता झालेल्या मराठी अ‍ॅवार्डला आर्चीने नववारी टाइप साडी घातली होती आणि काही चेन्ज वैगरे नव्हता , एक्तर तिचा मेकप गन्डला होता , ड्रेस , अ‍ॅक्सेसरिज अगदी बोजड होते... ती जाडच दिसत होती.

https://www.youtube.com/watch?v=_iPlwgBeeLI
मेरी प्यारी बिंदू
आयुष्मान आणि परिनिती
७ मिनिटांचा भलामोठा ट्रेलर आहे. खर तर पुर्ण चित्रपट एक एक चॅप्टर आहे. त्यातील काही चॅप्टर या ट्रेलरमधे आहे.
ट्रेलरवरून तरी काही नविन प्रयोग वाटतोय.

७ मिनिटांचा भलामोठा ट्रेलर आहे. खर तर पुर्ण चित्रपट एक एक चॅप्टर आहे. त्यातील काही चॅप्टर या ट्रेलरमधे आहे.
ट्रेलरवरून तरी काही नविन प्रयोग वाटतोय. >>>> मला पहिला चॅप्टर बघून अस वाटल होत कि हा चित्रपट 'ती सध्या काय करते' चे हिन्दि वर्जन आहे कि काय? Happy

हाफ गर्लफ्रेन्ड ची स्टोरी प्रेडिक्टेबल वाटतेय.. घिसिपिटी.
मेरी प्यारी बिन्दु चा ट्रेलर हटके आणि मस्त वाटला.

हाफ गफ्रे फुकटातही बघणार नाही मी इतका बोर वाटला ट्रेलर वरुनच.. तसही चेतन चा च जरी दिसला तरी त्या वाटेला जायच नाही अस ठरवलय मी..

मेरी प्यारी बिंदु मधे आयुषमान छान वाटतोय..आणि मागे अधे मधे लता, आशा, किशोर, रफी ऐकु येतात तेव्हा काय सुखावतात कान...वाह...बघेल शायद..

Sachin A Billion Dreams | Official Trailer | Sachin Tendulkar
https://www.youtube.com/watch?v=8gTeE6pa4Kg

ट्रेलर वरून पिक्चर आहे की डॉक्युमेंटरी काही अर्थबोध होत नाही, पण तरीही.... सचिन आहे Happy

https://www.youtube.com/watch?v=GjkFr48jk68
Maatr Official Trailer | Ashtar Sayed | RAVEENA TANDON | Releasing 21st April 2017

दिल्ली - रेप कॅपिटल ऑफ ईंडिया..
थोडंस जळजळीत वास्तव.. थोडं फिल्मी.. रवीनाला सत्ता नंतर अश्या भुमिकेत बघतोय

पहिल्या बाहुबली मधल्या ६० चुका दाखवणारी क्लिप बघितली का ? खरेच फार ढोबळ चुका आहेत. माझ्या तर लक्षातही आल्या नव्हत्या.

आणि, कटाप्पाने क्यू मारा..... वरच्या थियर्‍या ( दुसर्‍या क्लिप्मधे ) भन्नाट आहेत.
बाहुबली मेलाच नाही.. इथपासून त्याने स्वतःचा आपल्याला मार असे सांगितले.. अश्या रेंज मधल्या आहेत त्या !

स्पायडर-मॅन: होमकमिंग https://www.youtube.com/watch?v=DiTECkLZ8HM
खास चाहत्यांसाठी मार्वल आणि सोनी स्टुडिओसने प्रथम 'सिविल वॉर' चित्रपटातून स्पायडर मॅनला MCU मध्ये आणले आणि आता त्याचा टोनी स्टार्क/आयर्न मॅन सोबत प्रशिक्षण घेऊन अव्हेंजर बनण्याचा प्रयत्न MCU दाखवणार आहे. एका प्रयत्नातच लोकांना आवडलेला टॉम हॉलंड, सर्वोत्तम अभिनेता रॉबर्ट डाउनी Jr. , स्पायडर-मॅनचा MCU मधील सहभाग यासाठी हा चित्रपट MCU फॅन्ससाठी most-awaited film आहे.

थॉर-रयाग्नारॉक https://www.youtube.com/watch?v=v7MGUNV8MxU
ट्रेलर एक आठवड्यापूर्वी आला आणि कदाचित तुम्हा लोकांपैकी बऱ्याच जणांनी पाहीलाही असेल पण तरीही लिंक देतो आहे, डिस्ने आणि मार्वल सिनेम्याटीक युनिव्हर्सचा थॉर चित्रपट मालिकेमधला तिसरा चित्रपट नोव्हेंबर मध्ये येतो आहे, ट्रेलर ने डिस्ने आणि मार्वलच्या सर्व ट्रेलर्सचे रेकॉर्ड तोडले आणि चित्रपटही या वर्षीचा सर्वात यशस्वी राहील यात संशय नाही. MCU खरंच वेगाने उत्तमोत्तम चित्रपट देत यशस्वी होत आहे, ५ मे ला Guardians of the Galaxy Vol 2 प्रदर्शित होणार आहे, तोही आवर्जून पाहा.

स्टार वॉर्स-दि लास्ट जेडाय https://www.youtube.com/watch?v=-qsg0fku78o
डिस्ने आणि लुकासफिल्मने १४ एप्रिलला झालेल्या स्टार वॉर्स चित्रपटाला ४० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त या वर्षी येणाऱ्या एपिसोड ८ चा टीजर दिला. मार्क हॅमिलचे पुनरागमन, महान अभिनेत्री कॅरी फिशरचा शेवटचा चित्रपट, दिव्य शक्तीच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूची पुन्हा एकदा होणारी लढाई आणि अदभूत VFX साठी हा चित्रपट खरोखरच बघण्यासारखा राहील आणि तोही ३D मध्ये!
तिन्ही ट्रेलर खूपच उत्साह वाढवणारे आहे! एक स्टार वॉर्स आणि MCU फॅन म्हणून तिन्हींच्या लिंक्स दिल्या आहेत जरूर पहा.

FU मराठी ट्रेलर पहिला... अतिशय भणंग बनवलाय..
परशा चा आवाज dub केलाय... काय फलटुगिरी

FU कळेना पहिले.. Its Friendship Unlimited..
मंजुळेंनी स्लो मोशन शुट करुन पिच्चर हिट झाल्यावर सारेच त्या मागे लागले कि काय अस वाटतय मला..
सारा ट्रेलरच स्लो मोशन मधला दिसला..
आकाश ठोसरचा आवाज किंवा भाषेचा हेल इतका वाईट आहे का कि आवाज डब करावा लागला? देवा रे..
सद्ध्या आलेल्या कॉलेजदुनीयेवरच्या असंख्य मराठी चित्रपटांसारखा हा पन रंगीबेरंगी आणि पब, बार, कॉलेज, कॉम्पिटिशन सारखा दिसतोय मला.. काहितरी नवं भेटेल अस ट्रेलरवरुन तरी वाटत नाहीए..
बोमन इराणी मराठी मात्र मस्त बोलला आहे.. ळ चा उच्चार भावला मला.. आजपावेतो त्याचा आणि अक्षय या दोघांचाच ळ चा उच्चार माराठीत करतो तसा वाटला बाकी आनंद आहे..
बाकी आपले जुणे गायक..रफी आणि किशोर वगैरे Happy

आकाश ठोसरचा आवाज किंवा भाषेचा हेल इतका वाईट आहे का कि आवाज डब करावा लागला?>>> मला आवडतो त्याचा आवाज. इथे आवाज त्याचा नाही जाणवतं लगेच. नको होता डब करायला त्याचा आवाज, तो तसा मेहेनती आहे. घेतली असती त्याने भुमिकेसाठी उच्चारांवर मेहेनत. एरवी मला त्याचं ग्रामीण ढंगातलं बोलणं आवडतं.

आता जर त्याचं कॅरॅक्टर प्रमाण मराठी भाषा बोलणारं असेल आणि आवाज दुस-याचा असेल तर ते खटकेल मला. त्याच्याच आवाजात हवेत संवाद. त्याचा आवाज नाही हे लगेच कळतं, पेपरमधे पण आलंय तसं. सर्वांनी लगेच ओळखलं.

एफ यु मधे ब-याच टीव्ही कलाकारांचा भरणा आहे. मेन आकाश, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, माधुरी देसाई दिसतायेत.

बाकी स्वरदा थिगळे, मधुरा देशपांडे, इशा कोप्पीकर, तो सरस्वतीमधला कान्हा आणि अजून बरेच आहेत.

इशा कोप्पीकर >> चला..मला वाटल मलाच भास झाला कि काय ती दिसल्याचा.. सगळे ओळखीचे चेहरे असले कि मजा नाही येत आजकाल मला पिच्चर पाहायला..

तो तसा मेहेनती आहे. घेतली असती त्याने भुमिकेसाठी उच्चारांवर मेहेनत. एरवी मला त्याचं ग्रामीण ढंगातलं बोलणं आवडतं.>> +१
हितं तो शहरी दाखवलाय ना त्यात ग्रामिण ढंगाच मराठी कस जमेल? पण म्हणुन काय आवाज डब करायचा..श्या..
मला प्रसाद ओक सारखा आवाज वाटला Proud

हितं तो शहरी दाखवलाय ना त्यात ग्रामिण ढंगाच मराठी कस जमेल? पण म्हणुन काय आवाज डब करायचा..श्या.. >>> एक्झॅक्टली. थोडा वेळ लागला असता पण जमू शकलं असतं त्याला कॅरॅक्टरप्रमाणे संवाद म्हणायला. अर्थात मला तरी असं वाटतं. कदाचित नसेल जमलं त्याला. समजेल काय ते.

मांजरेकरांकडून फार अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. काहीतरी वेगळंच असतं त्याचे. मांजरेकरांच असंच असतं, मग संजय असो की महेश. मला तो दिग्दर्शनात मराठीतील रामगोपाल वर्मा वाटतो.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही नावीण्य नाही. टिपिक्क़्ल कॉलेजछाप द्रुश्ये. त्यात ना आपला स्वप्निल जोशी ना सई ताम्हाणकर. सैराटची प्रसिद्धी कॅश करायच्या प्रयत्नात घेतलेला परश्या. आता तो एखाद्या शाहरूख हृतिकची स्टाईल मारतोय की आपली आणतोय हे अजून गुलदस्त्यात. कोणीतरी बघून चित्रपटाबद्दल चांगले म्हटल्याशिवाय जायचा विचार करणे म्हणजे पैश्याची नासाडी!

मला आवडला ट्रेलर , आकाश मस्त दिसलाय, वैदेही पण मस्त , मुख्य म्हणजे पोट सुटलेले , विग लावुन फिरणारे फुगे smiley2.gifकॉलेजवयिन म्हणून खपवत नाहियेत हे आवडल, खरीखुरी तरुणाई बघायला फ्रेश वाटल.
आकाशचा आवाज डब करायची गरज नव्हती.

Pages