चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणविर जबराच ट्रेलर मधे, दिपिका रामलिला मधे मस्त वाटली होती , इथे मस्तानीपेक्षा कमि पेल दिसतेय एवढच पण पोस्टर पेक्षा चान्गली दिसतेय, शाहिद ऑड मॅन आउट वाटतोय, रणविर पिक्चर खावुन टाकणार अस अत्ताच वाटतय.

एखादा क्रूर लांडगा आपल्या शरीराचा लचका तोडून जाईल ही झाली भिती...
आणि एखादी घाणेरडी पाल आपल्या अंगावर फिरून जाईल याला म्हणतात किळस...
... पैकी रणवीरचे कॅरेक्टर अगदी किळसवाणे केलेय. लोकं समोर पॉपकॉर्न समोसे खात असतात याचे तरी भान ठेवायला हवे होते. अगदी सायकोची पण बायको दाखवला आहे..

येथील चर्चा वाचून मोठ्या अपेक्षेने ट्रेलर बघितला.... पण अगदीच भ्रमनिरास झाला.
भव्यदिव्य सेट, भरजरी पोशाख, तूफान हाणामारी, आकाशातून टिपलेली दृष्ये, अंगावर येणारी कॅरेक्टर्स, एकूणच लार्जर दॅन लाईफ गोष्टींचे लोकांना जोपर्यंत कौतुक वाटत राहणार तोपर्यंत भन्सालीचे दुकान चालू राहणार. मला ट्रेलर पुर्ण बघवला नाही. पुन्हा बघणारही नाही. तसेच आशा करतो जसे बाजीराव मस्तानी आजवर बघितला नाही तसा हा देखील बघायचा योग येणार नाही.
पण चर्चा करायला मात्र मजा येते अश्या चित्रपटांवर Happy

दीपांजली, सिंगबद्दल एकदम सहमत. मला आवडला ट्रेलर. थेटरमधे पहायचा विचार आहे. एकदा डोक्यात पक्के केले की बंसालीसाहेब मनाचे पण घालत असतात अशा सिनेमात, की मग सिनेमाची मजा घेता येते.

पण fast pace पाहिजे. बाम मध्ये सुरुवात जेवढी धडाकेबाज झाली व मजा आली तेव्हढंच नन्तर संथ, रडारड यात जरा बोअर झालं. होप यात भन्साळी शेवटी ढेपाळणार नाही.

आणि एखादी घाणेरडी पाल आपल्या अंगावर फिरून जाईल याला म्हणतात किळस... >>>>>+1111111111111
आणि तुझ्या ह्या पोस्ट साठी तुझे सगळे बीबी माफ Lol

शादी में जरुर आना मुव्ही (राजकुमार राव, किर्ती खरबंदा) चा ट्रेलर पाहिलाय का? इंटरेस्टींग वाटतोय. राजकुमार राव साठी तर बघणे मस्टच...

शादी में जरुर आना मुव्ही (राजकुमार राव, किर्ती खरबंदा) चा ट्रेलर पाहिलाय का? इंटरेस्टींग वाटतोय. राजकुमार राव साठी तर बघणे मस्टच...>> मी पाहिला.. फारच मस्त वाटतोय..

छान आहे ट्रेलर. पण बद्री की दुल्हनिया सारखी वाटली स्टोरी लाइन जरा.
आमीर च्या सीक्रेट सुपरस्टार चा प्रोमो बघा. मस्त वाटला मला.

आमीर च्या सीक्रेट सुपरस्टार चा प्रोमो बघा. मस्त वाटला मला.
>>>>>>
मी सुद्धा याची वर खूप तारीफ केलेली. पण यात एक लहान पोरांच लव एंगल सुद्धा दाखवलाय. तो पाहून जरा मनात शंकेची पाल चुटपुटलीय. होपफुली त्या ट्रॅकवर वाहावत न जाता व्यवस्थित हॅन्डल केले असेल.

पण बद्री की दुल्हनिया सारखी वाटली स्टोरी लाइन जरा. << एन्ड ला ट्विस्ट आहे जरा. लव टु वॉर चा
राजकुमार राव असल्यामुळे मस्ट सी...

करीब करीब सिन्गल ... काय धमाल ट्रेलर आहे... !!!>> +१

इत्तेफाकचा पन ट्रेलर मस्त वाटतोय... सिद्धार्थ कपूराणि सोनाक्षी अधिक अक्षय खन्ना..

पिंक मे ना तो आप एकदम.. जुही चावला लगते हो
आप तो हर रंग मे शाहरूख खान लगते हो..
अच्छा... शाहरूख मिश्रा

https://www.youtube.com/watch?v=An4vqppEWXU
शादी मे झरूर आना
नक्की बघणार Happy

करीब करीब सिंगल सुद्धा ट्रेलरवरून टाईमपास वाटतोय... ईरफानला चांगले पंच असतील तर मजा आहे, एकसुरी असेल तर बघवत नाही तो..

काही बीसीनेस करत नाही..
>>>
चित्रपट हा व्यवसाय आहे. काहीच बिजनेस करत नसतील वा तोटा होत असेल तर त्याला जबाबदार संबंधित लोकं असेही बाहेर जातीलच.
तसेच कुठल्या चित्रपटाने किती कमावले आणि गमावले याच्या अधिकृत आकड्यांवर जाऊ नका. त्या हिशोबाने नव्वद टक्के चित्रपट फ्लॉप दिसतील पण प्रत्यक्षात तसे नसावे. अन्यथा या क्षेत्रात कोणी पैसा लावला नसता. असो, हा वेगळा विषय होईल ईथे....

राजमुकर राव सारखे लोकांना का घेतात .. पडीक फ्लॉप मोविस असतात.. काही बीसीनेस करत नाही..>>>>>

चित्रपट हा फक्त व्यवसाय नसून कलाही आहे हे लोकांच्या लक्षात रहावं म्हणून घेत असावेत.

चित्रपट हा फक्त व्यवसाय नसून कलाही आहे हे लोकांच्या लक्षात रहावं म्हणून घेत असावेत.>>>> +१
काहींना पाट्या टाकणार्या सुप्पर्र्स्टार्स पेक्षा असे कमी प्रसिध्द अभिनेते आवडतात.
राजकुमार राव, आयुशमान खुराना, नवाजुद्दीन, इर्फान वैगेरे.

राजमुकर राव सारखे लोकांना का घेतात .. पडीक फ्लॉप मोविस असतात.. काही बीसीनेस करत नाही..>> फारच भयंकर बोलला हो तुम्ही..
माझ्यासारखे असतात काही अश्या लोकांना बघुन पिच्चर बघायला जाणारे..

चित्रपट हा फक्त व्यवसाय नसून कलाही आहे हे लोकांच्या लक्षात रहावं म्हणून घेत असावेत.>> सौ टके कि बात..

राजमुकर राव सारखे लोकांना का घेतात .. पडीक फ्लॉप मोविस असतात.. काही बीसीनेस करत नाही..>>>
बिलकुल पटल़ नाही. त्याचा प्रत्येक चित्रपट वेगळ्या धाटणीचा असतो.

चित्रपट हा फक्त व्यवसाय नसून कलाही आहे हे लोकांच्या लक्षात रहावं म्हणून घेत असावेत.>>>
+++१११
भारी प्रतिसाद

बाकी शादी में जरुर आना चा ट्रेलर आवडला.

राजमुकर राव सारखे लोकांना का घेतात .. पडीक फ्लॉप मोविस असतात.. काही बीसीनेस करत नाही..>>>
तुमच्यासारख्या विचाराच्या लोकांमुळे चांगले कलाकार मागे पडतात, तुम्ही सलमान, शाहरुख चे पांचट सिनेमे १० वेळा बघाल पण चांगल्या कंटेंट चा सिनेमा १ वेळा ही नाही.

वातघाले ताई - मला शाहरुख आवडत नाही ओ - तयाचे पण आजकाल सिनेमे फ्लॉप जातायत... सलमान भाई चे नक्की पाहतो सिनेमे- 2 वेळा तरी नक्कीच. भाई चा पिच्चर 200 करोड जायलाच पाहिजे. तुम्ही पण बघत जा - थेटरात बरं का ☺️

चित्रपट हा फक्त व्यवसाय नसून कलाही आहे हे लोकांच्या लक्षात रहावं म्हणून घेत असावेत.>>>
चित्रपट व्यवसाय आहे आणि फक्त व्यवसाय. पैसे इन्व्हेस्टड असतात, रिटर्न्स नको? कोण खिशातून पैसे टाकून फक्त कला आहे म्हणून सिनेमे बनवतो ( म फ हुससेन- गाजगामीनी सोडला तर )

कोण खिशातून पैसे टाकून फक्त कला आहे म्हणून सिनेमे बनवतो << तरीही बनवतात म्हणजे घाट्याचा सोउदा नसणार आहे.

आंबा आणि आवळा यांची अशी एका तागडीत तुलना करण्यात अर्थ नाही.
ज्याला पित्त वा अपचनाचा त्रास आहे त्याच्यासाठी आवळा गुणकारी, आणि ज्याला चवीने खायचे आहे त्याची पहिली पसंती चवदार आंब्याला.
यात उगाच आंब्यालाच का फळांचा राजा बोलतात, किंवा आंब्यालाच लोकं जास्त पैसे का मोजायला तयार असतात, त्यापेक्षा आवळा जास्त पौष्टीक वा औषधी असतो असे बोलून भांडण्यात अर्थ नाही. ज्याची त्याची आवड आणि ज्याची त्याची गरज. त्या त्या वेळेला आपापल्या जागी दोघेही सरस असतात हेच खरे !

म्हणजे राजकुमार आवळा आणि सलमान आंबा ??
>>>
तुम्ही आपल्या आवडीनुसार जोड्या लावा. म्हणजे तुम्हाला राजकुमार आणि आवळा आवडत असेल तर त्याला आवळा आणि सलमानला आंबा बोला.
जर तुम्हाला राजकुमार आणि आंबा आवडत असेल तर त्याला आंबा आणि सलमानला आवळा बोला.

असो, मला वाटते हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. हा वाद प्रत्येक क्षेत्रात असतो

Pages