चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाश, वैदेही छान दिसतायेत. वैदेही पुढे संस्कृती फार फिकी वाटतेय, मला आवडतही नाही बालगुडेबाई, माहीती नाही का. बाकी डब आवाज नको होता हे राहून राहून वाटतं.

मुलाखत बघितली आकाश आणि gang ची त्यात सत्या ला धड बोलताही येत नाही. आकाश करायला तयार नव्हता हा मूवी शहरी charactor आणि मुंबईत राहायचं म्हणून, अण्णांनी सांगितलं म्हणून केला. मयुरेश पेम आणि तो दुसरा शुभम पण छान देत होते मुलाखत. मयुरेश गोड आहे एकदम आणि आकाशही.

मुख्य म्हणजे पोट सुटलेले , विग लावुन फिरणारे फुगे >>> अभिनय दमदार असेल तर यावर मात करता येते हे या आधीही अशोक सराफ यांनी दाखवून दिले आहे Happy

मला तो एफ यू त्या कॅटेगरीतील पिक्चर वाटतोय ज्यांची थोडीफार किंवा बरीच चर्चा होते, पण थिएटरला जाऊन तो कोणी बघत नाही Happy

माणिकमोती जरुर सांगा Happy खरच खुप सुंदर दिसते वैदेही...

पर्सनॅलीटी पण खुपच खास आहे. हाईट, डोळे, केस (बहुतेक फ. यु. मध्ये कट केलेत तिने)... आणि स्माइल..
तिला आणखी योग्या सिनेमे मिळाल्यावर नक्कीच खुप मोठी अभिनेत्री होउ शकते...

हायला कतरीना कैफ.. मला पुन्हा बघायला हवा ट्रेलर.. माणिकमोती मलाही आपलa मित्रच समजा Happy

प्राजक्ता, त्यात पोट सुटलेल्याचाही उल्लेख होता

नक्की सांगते. इथली लिंकच देते. ती खरच खुप गोंडस आहे. 7-8 महिन्यापूर्वी म्हणाली होती की आकाश ठोसर बरोबर प्रोजेक्ट सुरु आहे. हाच होता,हे हल्ली हल्ली कळले. Btw, तिने वकिलीची डिग्री घेतली आहे. सुन्दर आणि हुशार, असं मस्त कॉम्बिनेशन आहे ती.

Btw, तिने वकिलीची डिग्री घेतली आहे. सुन्दर आणि हुशार, असं मस्त कॉम्बिनेशन आहे ती.>>> अरे वा.
ही तीच हिरोईन आहे का , पुजा सांवत आनि पाठक /पाटील सोबत एका चित्रपटात होती????
डँशिग गोविंदा... आला आला गोंविदा.. ह्या गाण्यात तिला पाहिल्यासारखे वाटत आहे.

ही तीच हिरोईन आहे का , पुजा सांवत आनि पाठक /पाटील सोबत एका चित्रपटात होती????
डँशिग गोविंदा... आला आला गोंविदा.. ह्या गाण्यात तिला पाहिल्यासारखे वाटत आहे. >> तीच ती..

वैदेही मस्त डान्सर पण आहे. पण महेश मांजरेकरने संस्कृती बद्दल मीडियामध्ये गवगवा केला आणि हि आहे आत्ता कळलंय. परवा दोघींचा interview बघितला कुठेतरी तर बालगुडे बैच जास्त बडबड करत होती, हिला फार बोलू देत नव्हती. मला तरी असं वाटलं. मी एफ यु च्या पेज वर लिहून आले. आकाश आणि वैदेही आवडले ते.

वैदेही मस्त डान्सर पण आहे. पण महेश मांजरेकरने संस्कृती बद्दल मीडियामध्ये गवगवा केला आणि हि आहे आत्ता कळलंय. परवा दोघींचा interview बघितला कुठेतरी तर बालगुडे बैच जास्त बडबड करत होती, हिला फार बोलू देत नव्हती. मला तरी असं वाटलं. मी एफ यु च्या पेज वर लिहून आले. आकाश आणि वैदेही आवडले ते.
नवीन Submitted by अन्जू

>>>>

अगदी अगदी... वैदेही चे दोन्ही सिनेमे पहिले "वेड लावी जिवा" आणि " वॄदांवन"... म्हंट्ल हिचे परत सिनेमे येतात कि नाही... एफ यु मध्ये तर टिझर पहिल्या नंतर कळल ति आहे यात...

ती कोकणस्थ मधे पण होती. >>> हो, मला मुवीचं नावंच आठवत नव्हतं, डोळ्यासमोर सचिन खेडेकर येत होते.

अगदी अगदी... वैदेही चे दोन्ही सिनेमे पहिले "वेड लावी जिवा" आणि " वॄदांवन"... म्हंट्ल हिचे परत सिनेमे येतात कि नाही... एफ यु मध्ये तर टिझर पहिल्या नंतर कळल ति आहे यात... >>>> ती झी मराठी गौरव मध्ये रसिका सुनील (मानबाची शनाया) बरोबर छान नाचली होती.

हा ट्रेलर पाहिलं का ? गजेंद्र अहिरे दिग्दर्शित नविन चित्रपट.. कलाकार सॉल्लीड्ड आहे.. रघुबीर यादव, अंजली पाटील, नागराज मंजुळे, कादंबरी कदम, मुग्धा चापेकर, वेदश्री महाजन
The Silence
https://www.youtube.com/watch?v=n29YyITLUtk

Pages