चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चि आणि चिसौका असा काहीतरी चित्रपट येतोय. ट्रेलरवरून बहुतेक लिविनरिलेशनशिपचा वाटतोय. मराठी मालिलेतील हिरोय कोणीतरी. बघायला पहिली ट्रेलर चांगली वाटली. पण सतत कानावर आदळून अतिरेक चालूय.

चि. व चि. सौ. कां.', रिव्ह्यु पण छान आलाय, आवडेल बघायला, तसेही परेश मोकाशींचे पिचर छान हलकेफुलके असतात

चि व चि सौ कां नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला. छान वाटतोय.>>> मलाही आवडला.हिरोईन क्युट आहे.

राजकुमार राव, श्रुति हसन यांचा बेहेन होगी तेरी हा चित्रपट >>> राजकुमार राव सहीच .>>> ह्या दोघांपेक्षा हनी सिंग परत आलाय ह्याचा त्याच्या फॅन ला आनंद झालाय. Proud

रामुच्या मुंबई माफिया वर बेतलेली वेब सिरीज Guns and Thighs चा ट्रेलर रिलीज झाला अनसेंसर खुपच बोल्ड आहे. मुंबईची जी काळी बाजू आहे ती रामू ने जसेच्या तसी दाखवली आहे एकदम काहीही आडपडदा न ठेवता .खुप मोठी डेरींग केली आहे रामुने
Watch at your own risk. ....

ची व ची सौ कां एक्दम टाइम पास मूवी,
माऊथ पब्लिसिटी ने खूप पिक अप झालाय,
कोथरूद मध्ये सोमवार दुपार 2 चे तिकीट मिळायला मारामार झाली

https://www.youtube.com/watch?v=A7n7WBTGe7k

मुक्ता बर्वे - सुबोध यांचा नविन मराठी चित्रपट "हृदयांतर"
बहुसंख्य बाहेरून गुडीगुडी वाटणार्‍या घरांमधली घुसमट गोष्ट.....

मुरांबा बघितला. झकास. बघायलाच हवा असा . परत बघणार आहे. दोन दिवसांनी
चि सौ. का चा पण रिव्हयु चांगला आहे . तो पण बघणार Happy

कोणी Toilet- ek premkatha चा ट्रेलर पाहिलाय का? भुमी पेडणेकर काही सीन्समध्ये महिमा चौधरीसारखी दिसत होती आणि ती बोलतेही तिच्यासारखीच.

मस्त आहे ट्रेलर. एकदाच वर वर पाहिला. पुन्हा सावकाश बघायला हवे. अजून एक सौ करोड सुपरहीट देणार अक्षय.
त्याचे एक चांगले आहे. त्याचा पिक्चर चांगला असेल तरच चालतो. सलमानसारखे काहीही टाकाऊ चालेल असे नसते. आणि तरीही बरेच चालतात. ही त्याच्या कामाची आणि चित्रपटनिवडीची पावती आहे.

मस्त आहे ट्रेलर त्याचा..
त्यात दिव्येंदू सुद्धा दिसला (प्यार का पंचनामा वाला)..त्याला आणखी चित्रपट मिळायला हवे..मस्त कलाकार आहे तो..

BLACK PANTHER , Marvel Cinematic Universe चा १८वा चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=dxWvtMOGAhw
कॅप्टन अमेरिका:सिविल वॉर नंतर किंग टी' चाला (T'Challa) च्या आयुष्यात एक नवीन संकट येणार जे त्याला परत वकांडा (Wakanda) चा रक्षक, 'ब्लॅक पॅन्थर' बनून रोखावे लागेल. नक्की पहा फेब्रुवारी २०१८ ला. कलाकार: चॅडविक बोसमन, मायकेल बी जॉर्डन, अँडी सरकीस, मार्टिन फ्रीमन, अँजेला ब्यासेट ....
Can't wait! MCU Rocks!

आता मला झेलायला तयार राहा ...
Radha – Jab Harry Met Sejal | Shah Rukh Khan | Anushka Sharma | Pritam | Imtiaz Ali| Latest Hit 2017 >>>> तु JHMS चे आधीचे ट्रेलर्स पाहिले नाहित का?

बादवे, वीआईपी २ चा ट्रेलर कोणि कोणी पाहिलाय?

तु JHMS चे आधीचे ट्रेलर्स पाहिले नाहित का?
>>>>
ते छोटे छोटे तुकडे ना ... ते पाहिलेले.. आणखी काही आहे का? मी विकांतालाच कधीतरी यूट्यूब वगैरे उघडून मौज करतो..
हे गाणे बाकी तडकते भडकते आहे.. मी बरेच वेळा कालच्या काल पाहिले.. आहाहा तसेही शाहरूख म्हणजे नेत्रासुख.. हलक्या हलक्या हरकती पण किती भारी असतात त्याच्या.. त्याच्यावर चित्रित झालेले असे एखादे गाणे मौज असते

Pages