खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग

Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 00:20

खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

चवथा विषय :
निसर्ग

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज

Group content visibility: 
Use group defaults

भेंडी

स्वरूप, बरोबर! Happy

बिट्ट्या बरोबर!

आमच्या घरी झाड होते याचे.... पिवळी आणि पांढरी फार मोहक फुले यायची याला!

चला मीच देते कोडं.
घर माझे जंगलात,
पण असते तुमच्या घरात.
वरून मी काळी
पण आतून मी गोरी.
पक्षाची लाडकी आणि
घर, साहित्यात आवडती.

साहित्य म्हणजे लेखन ह्या अर्थाने घ्यायचे का? >> मला ही असेच वाटले. पक्षांना आवडती म्हणजे फळ, जंगलात घर आणि साहित्यात स्थान (संदर्भ - जाळीमधी पिकली...) करवंद Uhoh

Pages