खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग

Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 00:20

खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

चवथा विषय :
निसर्ग

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज

Group content visibility: 
Use group defaults

नाही.
मानव आणि स्निग्धा तुमचे काही अंदाज बरोबर आहेत. Happy

मनुका कधी पासुन आतून गोर्‍या व्हायला लागल्या>>>>>>>>. जेव्हा पासनं जांभळं व्हायला लागली तेव्हा पासनंच Proud

नाही.
आता सांगून टाका!>>>>>>>>..सांगू का? हात वर करा.

अजून क्लू द्या.
जसे वर कुणी विचारले आहे: पक्षी हे खातात का?
साहित्य कुठले? (घरकामाचे, बांधकामाचे?)

शिंगाडे

हे वरुन काळे आणि आतुन पांढरे असते लख्ख!

ना.....ही.
तरीही नाही. Happy

पावटा

पावटा व वाल यांच्या अनेकविध प्रकारांचे वाण बाजारात मिळते. शेंगा सपाट, चपटय़ा, फुगीर, लुसलुशीत किंवा मांसल आणि विविधरंगी म्हणजे फिकट पांढरा, पोपटी, हिरवा, मातकट हिरवा, जांभळा, काळा अशा रंगांच्या असतात.
पावटाच्या काळ्या शेंगा?

सस्मित, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मीच दिली तर मग उत्तर हातातच. Happy
पण वरच्या clue मध्ये म्हटलंय "याचा वापर नेहमी नसतो">>>>>>>>>.बरोबर. असा सगळ्या "क्लू" चा विचार करा. Happy सोप्प आहे. हा अजून एक "क्लू" Happy

खोबरं

राई, मोहोरी, राळे?

हे सर्वात लहान आकाराची काळी धान्ये

राजमा

Pages