Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
‘डंकर्क’साठी पराग +१
‘डंकर्क’साठी पराग +१
एकही जर्मन सैनिक दिसत नाही; मेलोड्रामा जराही नाही; सैनिकांचे फॅमिली-फ्लॅशबॅक्स नाहीत, युद्धात कोण बरोबर, कोण चूक हे दाखवण्याचा खटाटोप नाही; टाळ्यापाडू संवादांची, प्रसंगांची आवश्यकता भासलेली नाही... तरीही, डंकर्क घटनेचं इतिहासातलं महत्त्व, यशस्वी माघार घेणे या कृतीला असणारं युद्धशास्त्रातलं महत्त्व, युद्धात सर्वसामान्य सैनिकाच्या वाट्याला येणारी भयावह परिस्थिती हे सगळं जबरदस्त पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.
बॅकग्राऊंड म्युझिक तर अजूनही माझ्या कानात घुमतंय.
आय-मॅक्समध्ये मी प्रथमच सिनेमा पाहिला. त्याचा साऊंड-इफेक्ट अफाट वाटला! दारूगोळ्यांचे स्फोट, विमानांच्या घिरट्या अशा दृश्यांच्यावेळी त्या आवाजांची व्हायब्रेशन्स आपल्या अंगभर जाणवतात. प्रत्यक्ष ते हल्ले झेलणार्यांचं काय होत असेल याची कल्पना येते.
समुद्राची, विमानांची दृश्यं खरीखुरी असावीत... म्हणजे त्यात कम्प्युटर-करामती असतील असं वाटत नाही.
युद्धपटाची एक वेगळीच ट्रीटमेंट म्हणून मला फारच आवडला.
डंकर्क - महान चित्रपट. पराग
डंकर्क - महान चित्रपट. पराग +१
डिस्पेकेबल ३ मधे ३डी इफेक्ट
डिस्पेकेबल ३ मधे ३डी इफेक्ट अजिबात नाहित त्यामुळे ३डीचे पैसे वाया घालवु नका, बाकी मला पहिला,दुसरा जास्त आवडला होता त्यामानाने ३ रा तितका नाही मजा आणत.
"जब हॅरी मेट सेजल" कालच
"जब हॅरी मेट सेजल" कालच बघितला. एकदम बकवास. कोणीही बघू नये . त्याच त्याच विषयावर बॉलिवूड च्या चित्रपटांचं दळण कंटाळवाणं होत आजकाल. त्यामुळेच बघू नये

Lion बघितला... खूप मस्त..
Lion बघितला... खूप मस्त.. पिक्चरयजेशन आणि डायरेक्शन सैराट च्या तोडीचे आहे.. देव पटेल आणि सनी पवार ने मस्त काम केले आहे... नक्की बागण्यासारखा आहे
हॅरी मेट सेजलचे सगळेच
हॅरी मेट सेजलचे सगळेच रिव्ह्यू बेकार आलेत . त्यामुळे बघणार नाही.
शाहरुखपेक्षा इम्तियाज अलीच वाईट वाटतेय. सोचा न था, रॉकस्टार सारखे सिनेमे देण्याऱ्या इम्तियाजच काहीतरी बिनसलं आहे हे नक्की
सोचा न था. >... मला खुप आवडतो
सोचा न था. >... मला खुप आवडतो, ऐनी टाईम मुवी
इम्तियाझ एकच भेळ नव्या पुडित
इम्तियाझ एकच भेळ नव्या पुडित बान्धुन कितिवेळा देणार?
जास्त काही अपेक्षा न ठेवता..
जास्त काही अपेक्षा न ठेवता.. आधी रेटिंग कमी आहे हे माहित असुनही बघितला हॅरी सेजल..
चांगला वाटला हलका फुलका..
शाहरुख बरेच दिवसानी नॉर्मल वाटला..डिअर जिंदगी आणि हा मुव्ही दोन्हीत छान वाटला..
अनुष्का आणि त्याच्या कॅरॅक्टर्च बॅकग्राउंड नीट उअलगडल नाहिये हे खरच..
विकेंडला सकाळी डोक्याला जास्त त्रास न देता बघायला बरा वाटला..
शाहरुख कडे लोकांची तक्रार होती ना मला बघा फुले व्हा.. तसं यात वाटलं नाही म्हणुन बरं वाटलं..
बाकी सगळं बाजुला ठेवुन अभिनेता म्हणुन तो सहीच आहे हे यातल्या बर्याच सिन्स मधुन परत जाणवलं..
शाहरुख कभी हा कभी ना मधे खुप
शाहरुख कभी हा कभी ना मधे खुप आवडतो..
कालच 'ए काश के हम होश मे अब आने ना पाये' हे गाणं ऐकल ,,,
मस्त वाटल.. असा साधा शाहरुख परत बघायला मिळावा..
शाहरुख कडे लोकांची तक्रार
शाहरुख कडे लोकांची तक्रार होती ना मला बघा फुले व्हा.. तसं यात वाटलं नाही म्हणुन बरं वाटलं. >> आता त्याला त्याच्या वयाची आणि चॉकलेट हिरोची इमेज उतरणीला लागल्याची जाणिव झाली असेल. अभिनेता म्हणून तो चांगलाच आहे. डियर जिंदगीत छान काम केलं आहे. सेजल मध्ये काय हिरो आहे का?
या मधे तो एक फ्रस्ट्रेटेड
या मधे तो एक फ्रस्ट्रेटेड ट्रॅव्हल गाईड आहे..
घरी इंडिया मधे खुप वर्ष गेला नाहिये.. सिंगर बनायच असतं..
वयं पण त्याचं जास्त्च दाखवलं आहे..
एकुण अगदी कॉलेज गोईंग तरुण असं दाखवलं नाहिये
हॅरी मेट सेजल शनिवारी बघितला.
हॅरी मेट सेजल शनिवारी बघितला. शेवटचा अर्धा तास तर अगदी असह्य झाला . शारुख खान /सलमान खान /अमीर खान सगळे खान म्हातारे झाले आता . हिरो म्हणून त्यांचे पिक्चर बघणं थांबवावं. तरी अमीर खान ने दंगल मध्ये मुलीच्या वडिलांचा रोल केलाय म्हणून बरं
"अनारकली ऑफ आरा" - आवर्जून
"अनारकली ऑफ आरा" - आवर्जून बघा. जबरी आहे. स्वरा भास्कर चा 'नील बट्टे सन्नाटा" नंतर हा आणखी एक मस्त रोल आहे, पण एकदम वेगळा. संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी हे सध्या चांगले रोल्स मिळत असलेले आणि चांगले काम करत असलेले दोघे यात आहेत.
अमेरिकेत नेटफ्लिक्स वर आहे. इतर ठिकाणचे माहीत नाही. १००% रेकमेण्डेशन.
फारएण्ड +१
फारएण्ड +१
काही दिवसांपूर्वी स्टार गोल्ड सिलेक्ट एच.डी.वर `अनारकली...' चा प्रिमिअर बघितला होता.
वातावरणनिर्मिती, स्वरा भास्कर, कपडेपट, स्क्रिप्ट सगळं बेस्ट आहे.
ती सगळ्या पुरूषांना पुरून उरते, एखाद्याने डोकं सटकवलं तर सरळ पायातली चप्पल काढून त्याच्यावर उगारते ते भारी वाटतं.
मात्र मला शेवट अपेक्षित तरी गुंडाळल्यासारखा वाटला.
'बरेली का बर्फी' आवडला.
'बरेली का बर्फी' आवडला. आवर्जुन पहाण्यासारखा आहे. सगळ्यांचीच कामे छान झालीयेत पण राजकुमार राव ने धमाल ऊडवलिये.
वातावरणनिर्मिती, स्वरा भास्कर
वातावरणनिर्मिती, स्वरा भास्कर, कपडेपट, स्क्रिप्ट सगळं बेस्ट आहे.
ती सगळ्या पुरूषांना पुरून उरते, एखाद्याने डोकं सटकवलं तर सरळ पायातली चप्पल काढून त्याच्यावर उगारते ते भारी वाटतं.>> लले +१
मला फक्त जरा कपडेपटात गडबड वाटली. त्यांची कमाई व स्वरा भास्करचे कपडे यात तफावत वाटली जरा.
मी अनारकली ऑफ आराह थेटरात
मी अनारकली ऑफ आराह थेटरात जाऊन बघीतला.. मला जरा कंटाळवाणा वाटला होता
Toilet-एक प्रेमकथा धो धो
Toilet-एक प्रेमकथा धो धो चालतोय. पण माबोवर ह्या पिक्चरविषयी एक शब्द सुद्दा लिहिला गेला नाही ह्याचे आश्चर्य वाटले मला!
'अनारकली...' फारएन्डाच्या
'अनारकली...' फारएन्डाच्या सुचवणीवरून पाहिला - मस्त आहे!
बाराह आना पाहिला. नक्की
बाराह आना पाहिला. नक्की पहावा असा आहे. विजय वाझ आणि नासीरुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. छानच कामे झाली आहेत. Should promote this kind of movies
काय आहे बाराह आना मध्ये ????
काय आहे बाराह आना मध्ये ????
सुबोध भावे, सोनाली चा 'तुला
सुबोध भावे, सोनाली चा 'तुला कळणार नाही' कोणी पाहिला का? कसा आहे ?
१५ ला पुष्कर श्रोत्रीचा 'ऊबन्टू' येतो आहे. चांगला वाटतोय .
Toilet-एक प्रेमकथा धो धो
Toilet-एक प्रेमकथा धो धो चालतोय. पण माबोवर ह्या पिक्चरविषयी एक शब्द सुद्दा लिहिला गेला नाही ह्याचे आश्चर्य वाटले मला >> मी बघितला होता पण बोलले नाही किव्वा परीक्षण पण लिहिलं नाही कारण परीक्षण लिहिण्याचा अधिकार एकट्या रसप यांच्याकडे आहे असं वाटत . त्यांचीच परीक्षण वाचली जातात . बाकीच्यांनी लिहिलेली जास्त कोणी वाचत नाही. त्यांनी परीक्षण लिहिलं नाही ना. म्हणून तुम्हाला असं वाटतंय
मी आज मराठी 'बॉईज' पाहिला..
मी आज मराठी 'बॉईज' पाहिला.. ठिक होता.. एवढा काही आवडला नाही... ते दोन गावातले लेकरं छान होते.. जुव्याला का घेतात पिच्चर मधे कळेना मला..असो.. सर्वरी जमेनीस खरचं आता म्हातारी झालेली दिसते
मला अजुनही ती बिनधास्त वाली डोक्यात आहे म्हणुन हे दिसणं पचत नसावं... भयाण मेकअप केलय..
त्यानंतर 'इट' बघीतला..छाने.. काही काही जम्प पॉईंट्स घाबरगुंडी उडवतात पण इफेक्ट्स आहे हे अगदी दिसुन येत.. त्या क्लाऊनच नजर एकटक बघीतल्यास अंगावर शहारा आणते.. मला 'सायलेंस ऑफ द लांब्स' मधला अँथोनी हॉपकिन्स आठवला.. बघा एकदा..
वॊह नावाची सिरीयल आठवली
वॊह नावाची सिरीयल आठवली लिलीपुत वली इत चा ट्रेलर बघून
'इट' मला पण आवडला. क्लाऊन
'इट' मला पण आवडला. क्लाऊन जबरदस्त साकारला आहे. त्याचे डोळे वगैरे बघून भीती वाटते.
काही वेळापूर्वी न्युटन बघुन
काही वेळापूर्वी न्युटन बघुन आली...
मस्त चित्रपट.. नक्की पाहावा असा...
इतेफाक
इतेफाक
अतिशय फालत्य कथा, मट्थ अभिनय सिधार्थ मल्हित्रा, आणि सोनाक्क्षी.
फाफे बघितला छान आहे
फाफे बघितला छान आहे
Pages