चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचे पिवळे दात आणि पिवळी नखं पाहुनही चित्कारणारी पोरं पोरी जोपर्यंत आहेत तोपर्यंत शाखाला कोणीही हात लावु शकत नाही. >>>>>>>> Rofl Rofl Rofl Rofl Rofl

रईस एकदम घिसीपीटी स्टोरीलाईन आहे.. तोच जुना फंडा (बहुतेक मनमोहन देसाईंनी बर्‍याच वेळा वापरलेला), लहान असताना काही तरी घडणार, मग पुढे तो मोठा होणार आणि ज्यानी तेव्हा साथ दिली त्यालाच पलटी घालणार.. आणि मग स्वतःच गोत्यात येणार.. तो गुंडे पण ह्याच प्लॉट वर आधारित होता.. पण निदान ते दोघं हिरो तरी तिशीतले होते. इथे पन्नाशीतल्या माणसाला किती वर्षं तिशीतला असल्या सारखं झेलायचं??

त्याचे पिवळे दात आणि पिवळी नखं पाहुनही चित्कारणारी पोरं पोरी जोपर्यंत आहेत तोपर्यंत शाखाला कोणीही हात लावु शकत नाही. <<< शी काय हे. आता शाखा ला बघतांना त्याच्य्या दाता नखांकडॅ लक्श जाणार Sad

काल ग्लैडीऐटर पाहिला आज ही हा चित्रपट फ्रेश वाटतो सतरा वर्षांनी सुद्धा जसा आपला शोले आहे. ....शेवट पर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो. ..पुन्हा पुन्हा पाहण्या सारखा चित्रपट

कावीळ झालेल्यांना सगळीकडे पिवळे दिसते म्हणे Wink
शाखा आवडत नाही तरी आवर्जून त्याचे चित्रपट मात्र बघतात..!! जगात अशी ही लोक आहे याचे ज्ञान प्राप्त झाले.

पायरेट्स पाचवा पार्ट बघितला।।।
फॅन्सला नक्की आवडेल पण आता कंटाळा आला। पहिल्यांदा वाटलं आता ही सिरीज थांबवावी।

काल चि व चिसौकां पाहिला. धमाल सिनेमा आहे. खूप हसलो.
सगळ्यांनी काम व्हायला हवी तेव्हडी छान केली आहेत. आज्जीचा प्लॉट मस्त आहे एकदम. डायलॉग, पंचेस भारी आहेत.
काही काही ठिकाणी (विशेषत: भांडणं) फार लाऊड आहेत.
बर्‍याच दिवसांनी शहरी भाषेतला विनोदी चित्रपट पाहून छान वाटलं.

चि व चि सौ का- मस्त धमाल मनोरंजक सिनेमा. मला सत्याच्या बाबांचा रोल फार आवडला. एकसेएक संवाद आहेत त्यांना.
"गाणं कशाला- अधूनमधून ऐकायला!"
"तरी मी म्हणत होतो घरात एक पंखा हवा"
"बाबा ती लहान आहे का आता?- म्हातारी आहे!" Rofl

दोन तास फुल्ल टीपी. चौथा आठवडा आहे इथे, तरी शोज जोरात आहेत.
भांडणं मात्र फार कर्कश्श आहेत आणि संपतच नाहीत लवकर! ती भांडणं कमी असती तर संवादात आणखी स्कोप होता.

दोन तास फुल्ल टीपी >>
+१११

आणि भांडणांबाबत पण .. हे असं भांडता भांडता एकदम मारा मारी कोण करायला लागतं बुवा Uhoh

मला तरी सुद्ध्हा आवडला Proud

रच्याकने मुरांबा बद्दल लिहा की लोकहो

मी पण चि व चि सौ का सोमवारी बघितला आणि मुरांबा रविवारी. दोन्ही मस्त . मुरांबा मधले संवाद पण बेस्ट चि सौ का च्या तोडीचे . निखळ आणि प्रसन्न हसू धमाल आली दोन्ही सिनेमे बघताना. चि सौ का मधलं सिनेमा सुरु झाल्या झाल्या दोन्ही घरातल भांडण मात्र कर्कश्य आणि अंगावर येणार. ते एक वगळलं तर अगदिच हहपुवा Happy

चि व चि.सौ,का, धम्माल चित्रपट. खूप हसले ! असा स्ट्रेसबस्टर मराठी चित्रपट तर पाहिलाच नव्हता बर्‍याच वर्षांत. मी मागेही लिहिलं होतं की मोकाशींच्या चित्रपटांत पॉझिटिव्हिटी ठासून भरलेली असते आणि त्यांच्याकडे गोष्ट मिश्कीलपणे सांगण्याची हातोटी आहे ती तर खासच. ह्या चित्रपटातील पात्रं थोडी कॅरिकेचरसारखी आहेत म्हणून प्रत्येकातला विक्षिप्तपणा जरा टोकदार करुनच दाखवलाय. एकदा तो टोन कळला की पिक्चर मनमुराद एंजॉय करता येतो. पण हा धमाल टोन कायम ठेवूनही एकदोन ठिकाणी विषयाचं गांभीर्य बरोबर पोचवलंय त्याबद्दल सॉलिड कौतुक वाटलं मोकाशींचं नाहीतर रडण्याच्या प्रसंगांत हमखास हशा खेचायला स्कोप असतो. मी पाहिला त्या थिएटरमध्ये व्हॉल्यूम फार जास्त नव्हता त्यामुळे भांडणं अंगावर नाही आली.
परत एकदा बघायला आवडेल हा पिक्चर Happy

आज लुटेरा पिच्चर बघीतला..
मस्त आहे.. आवडला.. दोघेपन छान दिसतात.. रणवीर सिंग आवडत नाही जास्त..त्याचं खिदळण खुप इरिट्टेटींग वाटत मला..पण यात काय संयत भूमिका केलीए त्याने..वाह.. खुप छान वाटल त्याच काम..

बद्रिनाथ की दुल्हनिया पाहिला! सरप्राइझ पॅकेज निघाला , एक्दम वेगळ विषय आणी टेकिन्ग , आवडला मुव्ही मला, आलिया-वरुण जोडी मस्त आहे.

हिंदी मिडीयम एकदा पाहायला हरकत नाही. खरतर विषय चांगला निवडला होता. योग्य ट्रीटमेंट मिळाली असती तर सोने पे सुहागा होता पण अति जनरलाइज करण्याच्या नादात घडी विस्कटली.पहिला भाग चांगला आहे पण दुसरा भाग टू मच नाइव्ह वाटतो.पण इरफान खान आणि सबा कमर वेळ निभावून नेतात. एकदा बघायला हरकत नाही.

बद्रिनाथ की दुल्हनिया पाहिला! सरप्राइझ पॅकेज निघाला , एक्दम वेगळ विषय आणी टेकिन्ग , आवडला मुव्ही मला, आलिया-वरुण जोडी मस्त आहे >>>>> +11111

एवढ्यात विमानप्रवासात पाहिलेले सिनेमे अन रिअ‍ॅक्शन्स -

फोर्स २ - ठीक
फार अपेक्षा नव्हत्या, पण बरा निघाला

अकीरा - ठीकच
फोर्स २ मुळे सोनाक्षी ची अ‍ॅक्शन सहन होईल असं वाटलं. अनुराग कश्यप अन खूप सार्‍या मराठी अ‍ॅक्टर्सनी चांगलं काम केलंय (लोकेश गुप्तेला बर्‍यापैकी रोल मिळालाय). कोंकणाचं कामही छान.

रॉक ऑन २ - बकवास
का काढला असावा हा सिनेमा काही समजण्यास मार्ग नाही. फरहान अख्तर डोक्यात जातो रामदेवबाबा लुक मधे अन एरवी ती जवाबदारी श्रद्धा कपूर निभवते.

कहानी २ - बरा
नाव कहानी न ठेवता काही वेगळं ठेऊन लिंक अ‍ॅव्हॉईड केली असती तर अपेक्षा फार जास्ती न ठेवता पाहिला गेला असता अन चांगला वाटू शकला असता.

फ्रीकी अली - बर्‍यापैकी एंटरटेनिंग
रिफ्रेशिंग. चक्क अरबाज खानही सहन झाला.

एम. एस. धोनी - बर्‍यापैकी एंटरटेनिंग
सुशांत सिंग राजपूतनी बरीच मेहेनत घेतल्याचं दिसतं. सिनेमा सारखा सिनेमा होता. डॉक्युमेंट्री नाही.

फीवर - चांगली सुरुवात पण नंतर गंडलेला
राजीव खंडेलवालच्या भरवशावर पहायला लागलो. सुरुवातीला बर्‍यापैकी ग्रिप घेतली होती, पण जसाजसा सस्पेन्स उलगडत गेला तसा रटाळ होत गेला.

अय दिल है मुश्किल - वेळ घालवायला माणूस काय काय करतो नाही
रणबीरचं कॅरेक्टर केजोनी स्वतःवरून बेतलं असावं. कुठेही रडतो. तीच ती लै पैशेवाली लोकं (फर्स्ट क्लास वाले नाही, प्रायवेट जेट वाले) अन त्यांचे टिपिकल फॅमिली इश्युज.

ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झेंडर केज - हॉलिवुडी बॉलिवुडपट
दीपिकासोबत बहुतेक बर्‍याच बॉलिवुडी गोष्टी पॅकेज्ड डील मधे आल्या असाव्यात. टोटल ट्रीटमेंट बॉलिवुड मसाला आहे.

आणि
वाय झेड - छान
बर्‍याच दिवसांनी बरा मराठी सिनेमा पाहिला. नायकाच्या एक्झॅक्ट सिचुएशनमधे असलेल्या काही मित्रांच्याशी रिलेट झाल्यामुळे असेल कदाचित, पण आवडला.

Kadhi kadhi achnak ek anjan movie pahayala milte jyache nav apan kadhi eiklehi naste.Aplyala ek sukhad dhakka basto.Asech kahise Manorama,six feet under ha cinema pahun watale.you tube war ahe.Tari jaroor paha.

कहानी २ मी पण पाहिला (हौसेहौसेने) पण भ्रमनिरास झाला.
कहानी कितीतरी सरस होता त्यापेक्षा.

अभय देऊल चे सगळेच मोवी भारी आहेत>>> +१०००

त्याचा मनोरमा सिक्स फीट अंडर जबरदस्त आहे. आयेशा केवळ त्याच्यामुळे पाहिला.

Pages