माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
नॉनस्टीक कढईत करते. आणि मि
नॉनस्टीक कढईत करते. आणि मि हिरव्या मिरचिच्याच भाजिबद्दल बोलत होते.
कोबिचिच काय वालिचि पण तशिच. >> हिंदालियमच्या कढईत किंवा भांड्यात छान होते कोबीची भाजी...
चिमुटभर हळद,हिंग आणि हिरव्या मिरच्यांची करावी...
कोबीच्या भाजीला हळद घालतेस का
कोबीच्या भाजीला हळद घालतेस का ?
<< असला बहारदार केलाय
<< असला बहारदार केलाय ना...>>> की बाहेरच दारच दाखवायला लागलं.
छान चालू आहे सगळी चर्चा!!!!
छान चालू आहे सगळी चर्चा!!!! एकदम आवडता विशय (हे चुकला आहे.. सुधारायचे कसे ते नतर बघु)
माझ्या नारळाच्या वड्या बिघडल्यात.. मी त्यात केळ टाकला होता.. आई करायची तश्या म्हणुन... पण त्या सैल झाल्यात...आईची रेसिपी फॉलो केली होती तशी...पण जमल नाही.. काय चुकला असेल?? मी नारळाचा किस साखरे सोबत शिजवला आणि अर्धा शिजला असताना त्यात केळ कुस्करुन टाकला..वडी झाली पण आई सारखी नाही...
आईसारखं कधी होतच नाही. त्याला
आईसारखं कधी होतच नाही. त्याला आईचा हात लागलेला असतो न.
स्वतःच्या आईसारखं म्हण कारण
स्वतःच्या आईसारखं म्हण कारण सायोने केलेला ढोकळा दिसायला तरी माझ्या आईच्या ढोकळ्यासारखा झालाय
आर्च "अगदी अगदी". सिंड्रेला
पण ह्या सगळ्यात माझा प्रश्न
पण ह्या सगळ्यात माझा प्रश्न राहिला ना!!! त्याला पण कोणी बघा ना...
सिन्ड्रेला, सयोने ढोकळंयाची
सिन्ड्रेला, सयोने ढोकळंयाची रेसेपी मायबोली वर लिहिलेली आहे का? तुला महित असेल तर सांग ग.
नविना मी केळ घालुन वड्या कधी
नविना मी केळ घालुन वड्या कधी केल्या नाहीत पण नारळाच्या वड्या सैल मऊ झाल्यात म्हणजे बहुदा वड्या अजुन थोडा वेळ वर आटवायला हव्या होत्या.
याआधी मायबोलीवर आलेल्या काही
याआधी मायबोलीवर आलेल्या काही ढोकळ्याच्या कृती:-
http://www.maayboli.com/node/7402
http://www.maayboli.com/node/10641 (सायोने केलेला)
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59862.html
हो सिन्डि कोबिच्या/वालिच्या
हो सिन्डि कोबिच्या/वालिच्या भाजिला हळद घालते.
हे बघा आधि तुप/तेल, नंतर हिंग, मोहरि, मिरची, हळद, थोडि साखर, मग कोबि/वालि नुसत वाफेवर शिजवते.
आधि छान पिवळा असतो पण नंतर रंग बदलतो.
मोठा गॅस ठेवतीस का?
मोठा गॅस ठेवतीस का?


पानकोबीला मी हिंग घालत नाही. मोहरी-जिर्याची मिरची (असल्यास हिरवागार कढीपत्ता) घालून फोडणी करते. मंदाग्निवर चांगली परतते. मीठ, साखरेची चिमूट टाकून परत एक वाफ काढते.. मस्त होते. रंगही पिवळा / हिरवीगार असल्यास पोपटी असतो.
तू नॉनस्टिक ऐवजी तांब्याबुडाच्या स्टीलच्या अथवा अॅल्यूमिनीयम कढईत करून बग.
अग केतकि ..कोबी शिजायला तु
अग केतकि ..कोबी शिजायला तु पाणी घालतेस थोडे का ...तसाच तेलावर शिजवतेस...कारण नुसत तेलावर परतले तर कोबी काळपट होतो...थोडेसे पाणी घालुन एक वाफ काढ मग नाहि रंग बदलणार...
नवीना, अगं त्या मऊ वड्या
नवीना, अगं त्या मऊ वड्या पुन्हा एका जाड बुडाच्या भांड्यात घे. आणि २ - ४ मिनीटं मंद आचेवर सारखं ढवळत रहा. कडेने सुटू लागले की पुन्हा थापून वड्या कर. थोडा रंग बदलेल पण छान खुटखुटीत होतील.
खुप खुप धन्स ग सिन्ड्रेंला
खुप खुप धन्स ग सिन्ड्रेंला आजच डाळ तांदुळ भिजत घातलेत.
केतकि अनि फोडणीत हळद घातली
केतकि अनि फोडणीत हळद घातली तरी कोबीची भाजी काळपट होते. फोडणी करून झाली की हळद मी
फोडणीच्या बाजुला म्हणजे कढअईच्या काठावर घालते, अशाने हळदीला थोडा चटकाही बसतो, आणि भाजीला रंग हल्का येतो. गुजराथी लोक एक तर हळद भरपूर घालतात शिवाय ती फोडणीत घालतात त्यामुळे भाजी किंवा कोणताही पदार्थ एकदम जर्द पिवळा दिसतो. मला तसं आवडत नाही.
आणि म्रिनिष म्हणतात तसं, भाजीत अर्धी वाटी पाणी घालून शिजव. भाजी शिजली आणि तरिही पाणी राहिलं तर हवं तर २ मिनिटं गॅस मोठा करायचा, पण झाकण काढायला मात्रं विसरू नकोस.
आणि अगदीच नाही जमलं तर माझ्याकडे ये कोबीची भाजी खायला...
केतकि अनि फोडणीत हळद घातली
केतकि अनि फोडणीत हळद घातली तरी कोबीची भाजी काळपट होते. <<<
गुजराथी लोक एक तर हळद भरपूर घालतात शिवाय ती फोडणीत घालतात त्यामुळे भाजी किंवा कोणताही पदार्थ एकदम जर्द पिवळा दिसतो. <<<
दक्षिणा, तुझी ही दोन वाक्ये परस्पर विरोधी आहेत असं वाटत नाही का ?
मिलिंदा थोडं विस्कटून सांगाल
मिलिंदा थोडं विस्कटून सांगाल का प्लिज?
कोबीची भाजी शिजताना त्यामधे
कोबीची भाजी शिजताना त्यामधे साखर घालायची (अगदी अर्धा चमचा) मग रंग छान येतो.
मला आठवडाभर लागणारा वाटणाचा मसाला रविवारी करायचा असतो. पण दर वेळेला प्रमाण चुकते. कधी जास्त मसालेदार होतो कधी जास्त काळा पडतो.
साधारण एक वाटी वाटण होण्यासाठी प्रमाण काय असावं?
दक्षिणा, तुझ्या पहिल्या
दक्षिणा, तुझ्या पहिल्या वाक्यातून हे कळते की फोडणीत हळद घातली तर भाजीचा रंग काळपट होतो
मी दाखवलेल्या दुसर्या वाक्यातून असा अर्थ निघतो की फोडणीत हळद घातली की भाजीचा रंग जर्द पिवळा होतो.
जर दुसर्या वाक्याप्रमाणे होत असेल तर उत्तमच की, मोगरा केतकी ला तशीच तर भाजी हवी आहे.
एकदम मान्य, पण मी पुढे हे ही
एकदम मान्य,
पण मी पुढे हे ही लिहिलंय की, की तसं मला आवडत नाही म्हणून.. 

बाकिच्यांना आवडत असेल तर करावं त्यांनी.. नाही का?
नाही, माझा तो आवडीचा मुद्दा
नाही, माझा तो आवडीचा मुद्दा नव्हता..

मला इतकंच म्हणायचं होतं की फोडणीत हळद घातल्याने नक्की रंग काय होतो ते कळत नाहीये. एका वाक्यातून तो 'काळपट' होतोय, दुसर्यातून 'जर्द पिवळा' होतोय.
असो. हेमाशेपो
आहो मिलिंद फोडणीत हळद (थेट
आहो मिलिंद फोडणीत हळद (थेट तेलात) घालून केली की कोबीची भाजी काळपट होते, गुजराथ्यांचा रेफ हा त्यांच्या एकूण समस्त भाजी प्रकाराचा होता..

एडिट करू का पोस्ट?
आरे बाप रे एवढि चर्चा?
आरे बाप रे एवढि चर्चा? सगळ्यांचे धन्यवाद. मि आत्ताच भाजि केलि ति पण जुन्या कढइत. आधि फोडणि केलि आणि कोबि घातल्यावर हळद घातलि. वाफेवर शिजवलि आणि शिजवताना कढइवर पाण्याने भरलेली प्लेट ठेवलि होति. छान रंग आला. आणि आधि जो थोडा कडवटपणा यायचा तो पण नाहि आला. आरे हो थोडि साखर पण टाकलि भाजि करताना.
धन्यवाद सगळ्यांचे.
नमस्कार मला अगदी लवकरात लवकर
नमस्कार मला अगदी लवकरात लवकर मदत हवी आहे. मी आत्ताच साधा मटर पुलाव (तिखटा शिवाय, सफेद) केलाय , सगळी सामग्री व्यवस्थित टाकली पण अगदी शेवटी घोड्चुक केली. पाणी टाकुन फक्त कुकर मध्ये ठेवुन शिजवायचा बाकी होता. पण पाण्याची बाटली समजुन तेलाची बाट्ली ओतली गेली लगेच लक्षात आल तरी अर्धा पेला तरी तेल पड्ल. मग १ बटाटा बारिक कापुन टाकला आणि कुकर लावला. चव चांगली आलीय पण तेलात तरंगतोय भांड्याच्या तळ्भर तेलच तेल दिसतय काय करु आता मी? संध्याकाळिसाठी पण तेच जेवण आहे. नवरा यायच्या आत काही तरि सुधारणा करायची आहे. please काही तरी सुचवाना...... please help me as soon as possible............
भात एका मोठ्या भांड्यात काढून
भात एका मोठ्या भांड्यात काढून घे आणि ते भांडे तिरके उभे कर. भरपूरसे तेल खाली येइल ते वेगळ्या वाटीत वगैरे काढून घे.
ब्रेडच्या स्लाईस आहेत का घरात?? असतील तर त्या भातावर टाक. ब्रेड बर्यापैकी तेल शोषून घेइल.
शिल्पा तुझ्याकडे चाळणी असेल
शिल्पा तुझ्याकडे चाळणी असेल त्यात काढून ठेव भात. चाळणीखाली एखादं मोठं ताट किंवा भांडं ठेउन त्यावर चाळणी तिरकी ठेव. सगळं तेल निथळून येइल. निथळलेले तेल पराठ्याच्या पिठात मळताना वापरता येईल.
thanks to both.for quick
thanks to both.for quick reply
ब्रेड् नाही आहे घरात त्यामुळे चाळ्णी try करुन बघ्ते.
धन्यवाद पुन्हा सर्वाना
माझ्या नारळाच्या वड्या २ दा
माझ्या नारळाच्या वड्या २ दा बिघडल्या काल केल्या होत्या दुधी चा कीस + नारळाचा चव + साखर. एकदम मउ झाल्या आहेत. मागच्या आठवड्यात नुसत्या नारळ + साखर केलया त्या पण मउ. जराही खुटखुटीत नाही. काय चुकते आहे?
Pages