माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
हलापिनो नाहियेत, पण मळकट हात
हलापिनो नाहियेत, पण मळकट हात चालतील की... ते पण करुन बघते, ऑफिस मधुन लंचला घरी जाते आणि सगळे प्रयोग करते... पीठ फुगल्याशी कारण
मी पाणीपुरीच्या पुर्या फक्त
मी पाणीपुरीच्या पुर्या फक्त रव्याच्या करते. मागे एकदा एका गुजराथी काकुंनी शिकवलेल्या.
रवा कणिक भिजवतो तसा मीठ टाकुन भिजवायचा नंतर ओल्या रुमालात बांधुन २ तास ठेउन द्यायचा. २ तासांनंतर खुप घट्ट झाल असेल तर थोड पाणी लाउन परत मळुन घ्यायच आणि छोटे गोळे करुन अगदी पाटळ लाटुन पुर्या तळायच्या. मस्त फुगतात आणि कुरकुरीत होतात. मैदा, सोडा काही झंझट नाहि.
धन्यवाद अम्रुता.
धन्यवाद अम्रुता.
मी पहिल्यांदा केलेल्या फक्त
मी पहिल्यांदा केलेल्या फक्त रवा वापरुन्,मस्त झालेल्या.पण दुसरयांदा करायला गेले तर मऊ पडल्या.मग त्यात मैदा मिसळला तरीपण मऊच झाल्या
पुन्हा हयावेळि अम्रुताने सांगितल्याप्रमाणे करेन.
पाणिपुरीचं पीठ प्यायच्या
पाणिपुरीचं पीठ प्यायच्या सोड्यात भिजवायचं.
अमृता, तु रवा भिजवतांना तेल
अमृता, तु रवा भिजवतांना तेल घातलेस का? आपण जसे कणकेत घालतो तसे..? की तेल न घालताच भिजवतेस रवा?
आर्च सोडा वॉटर मधे रवा फक्त की रवा +कणीक / मैदा घालायचा?
खरे तर कमर्शियल पुरी बनवताना
खरे तर कमर्शियल पुरी बनवताना सोडा वॉटर घालून पिठ दाबून मारून ठेवायचे असते. आई सुद्धा अशीच करायची पुर्वी(पण तळणी बंद तेव्हा होत नाही आता).
नुसता रवाच घ्यायचा असतो. मिठ तरी टाकायची नाही. कणीकेने नरम पडतात.
रवा घे धूवून, त्यात एक चिमुट साखर टाक, हवे असेल तर टाक मिठ काहि वाईट नाही. मग सोडा बाटली फोडली रे फोडली की ओत त्यात सोडा व रवा दाब. मग झाकून ठेव.
मी इडली डोश्याच्या पिठासाठी
मी इडली डोश्याच्या पिठासाठी यीस्ट वापरतो. पिठ छान वर येते, आणि त्याला खास वास पण येतो.
मनू, 'मग सोडा बाटली फोडली रे
मनू,
'मग सोडा बाटली फोडली रे फोडली की ओत त्यात सोडा व रवा दाब.' म्हणजे काय?
दिनेश,
तुम्ही dry yeast वापरता की फ्रेश यीस्ट?
मनुस्विनी,पुन्हा éxplain कर
मनुस्विनी,पुन्हा éxplain कर ना प्लीज,
इतना झंझट काय कू? बाहर से
इतना झंझट काय कू?
बाहर से लाव ना पुर्या...
इतना झंझट काय कू? बाहर से
इतना झंझट काय कू? बाहर से लाव ना पुर्या...>>>>>>>>> ईथे मिळत असत्या तर नक्कीच आणल्या असत्या गं,ईथे ५ युरोच्या १० पुरया आणण्यापेक्शा घरी बनवणे बरं पडतं.
amayach, तेल नाही घालत
amayach, तेल नाही घालत अजिबात. मिठ घालते फक्त आणि पाणी. त्या काकु मिठ घालत नसत त्यांना वाटयच पुर्या मउ होतिल. मी पण पहिल्यांदा मिठ न घालता केल्या पण नुसत्या खायला मजा येत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी मिठ घातल. छान कुरकुरित होतात.
पुर्या पातळ लाटणे आवश्यक आहे. जाड लाटल्या गेल्या तर मउ पडतात.
इतना झंझट काय कू? बाहर से लाव
इतना झंझट काय कू? बाहर से लाव ना पुर्या...>>>>>>>>> ईथे मिळत असत्या तर नक्कीच आणल्या असत्या गं,ईथे ५ युरोच्या १० पुरया आणण्यापेक्शा घरी बनवणे बरं पडतं. >>> अगदी अगदी.. देशात असताना चुकुन पण मी पुर्या करायच्या भानगडित पडत नाही पण इथे खायची हौस असेल तर कराव्या लागतात.
हि संपुर्ण पणे घरी केलेली
हि संपुर्ण पणे घरी केलेली पाणीपुरी.
मागे माबोतच फोटो टाकला होता कुठच्या तरी बाफवर त्यामुळे इथे पटकन टाकता आला.
देशात असताना चुकुन पण मी
देशात असताना चुकुन पण मी पुर्या करायच्या भानगडित पडत नाही पण इथे खायची हौस असेल तर कराव्या लागतात>>>>>>>> मला खरतर माहितही नव्हतं कि घरीपण पुरी बनवु शकतो.इथे आल्यावर पाणीपुरीची एवढी आठवण येत होत होती,मग नेटवर शोधाशोधी चालु झाली. मग त्या मऊ पुरया खाव्या लागल्या तरी बरं वाटतं,पाण्यामुळे मऊ झाल्यात असं समजुन घेते
अगदी.. माझ्याही मागे एकदा मउ
अगदी.. माझ्याही मागे एकदा मउ झालेल्या तरीही आम्ही त्या कुरकुरीत मानुन खाल्लेल्या
अगदी.. माझ्याही मागे एकदा मउ
अगदी.. माझ्याही मागे एकदा मउ झालेल्या तरीही आम्ही त्या कुरकुरीत मानुन खाल्लेल्या>>माझा विश्वास आहे ह्यावर पूर्णपणे
दिनेशदा, कोणते यीस्ट वापरता,
दिनेशदा, कोणते यीस्ट वापरता, ड्राय की फ्रेश्?आणि ते केव्हा ,किती घालायचे?
ड्राय यीस्ट, SAF नावाने
ड्राय यीस्ट, SAF नावाने मिळते ते. बरेच उपयोगी पडते. दोन कप पिठाला, एक चहाचा चमचा यीस्ट पूरते. कोमट पाण्यात साखर घालून त्यात यीस्ट घालायचे. १० मिनिटात मिश्रण फेसाळ झाले पाहिजे, तरच ती यीस्ट वापरायची ( नाहीतर ती वापरून उपयोग नसतो )
फ्रेश यीस्ट मिळणे जिकीरीचे असते.
गव्हाचे पिठ भिजवले कि त्याचा छोटासा गोळा कपभर कोमट पाण्यात बुडवून रात्रभर ठेवायचा. सकाळी त्याला बुरशी आली नाही ( म्हणजे वर काळे वा पांढरे ठिपके दिसले नाहीत ) तर त्यात यीस्ट तयार झाली असे समजायचे. आणि ते बाकिच्या पिठात मिसळायचे. याने पावाइतकी नाही पण बर्यापैकी जाळी पडते. (सरावाने यीस्टचा वास ओळखता येतो. बेकरीजवळ नेहमी हा वास येतो. सफरचंद व द्राक्षावर नैसर्गिक रित्या यीस्ट असते )
चण्याची डाळ घेऊन त्यावर गरम पाणी ओतायचे आणि ते जरा थंड झाले कि त्यात कच्चा बटाटा किसून घालायचा, आणि मग ते मिश्रण उबदार जागी ठेवायचे. त्यात आपोआप यीस्ट तयार होते.
यीस्टमधे जीवनसत्व असतात पण काहिजणाना त्याची अॅलर्जी असू शकते.
सहज मनात आलं म्हणून
सहज मनात आलं म्हणून विचारतो.
फक्त एक कपभर दूध गरम करायचं असेल तर ते कपमधे ठेऊन तसंच मायक्रोवेव्ह मधे गरम केलं तर काय होतं?
प्रश्न बाळबोध वाटून हसू आलं तरी हसत हसत उत्तर द्या!
योगि काहीही होत नाही... अगदी
योगि काहीही होत नाही... अगदी तसंच गरम करा..
माझी काकू तर थंड दुधात, कॉफी, साखर मिक्स करून तसाच कप ठेवायची मायक्रोवेव्ह मध्ये, बाहेर काढून चमच्याने ढवळलं की कॉफी तयार...
धन्यवाद दक्षिणा, अजून एक
धन्यवाद दक्षिणा,
अजून एक बाळबोध प्रश्न...
तो कप खूप गरम होतो का? म्हणजे लगेच हाताने काढता येतो का?
फक्त दूध लवकर वर येते व ऊतू
फक्त दूध लवकर वर येते व ऊतू जाते हे लक्षात ठेवायचे. कप बराच मोठा असावा, शक्य असेल तर कपबशीच ठेवावी आणि लक्ष ठेवावे.
हो कप खुप नाही तरी थोडा गरम होतोच. पण हाताने काढता येतो.
चकलीच्या भाजणीचे प्रमाण आणि
चकलीच्या भाजणीचे प्रमाण आणि कॄती सांगाल का कोणी?
मी करते त्या चकल्या फक्त गरम असतानाच छान लागतात.
नंतर त्या अतिशय मउ पडतात..
भाजणीच्या तसेच साध्या
भाजणीच्या तसेच साध्या चकल्याचे अनेक प्रकार आहेत इथे. चकल्या गरम
असतानाच डब्यात भरल्या का ? चकलीच्या पिठात पाणी कमीजास्त पडले,
तेल कमीजास्त पडले, तळण्याचे तंत्र बिघडले, तर चकल्या मऊ पडतात.
योगी नेट वर त्यातशा कपात
योगी नेट वर त्यातशा कपात करायची छोटूश्या चॉकोलेट केक ची रेसीपी पण आहे. कप अर्धा भरेल असे बघ नाहीतर ओवरफ्लो. ... व साफ सफाइ ची पीडा.
मी रोज एक कप दुध साखर घालुन
मी रोज एक कप दुध साखर घालुन गरम करते मायक्रोवेव्ह मधे.. १ मिनीट १० सेकंद ठेवते.. खाली बशी ठेवते
दिनेश, अश्विनीमामी,
दिनेश, अश्विनीमामी, वर्षा,
धन्यवाद!! धन्यवाद!! धन्यवाद!!
देसी दुकानातुन आणलेल्या
देसी दुकानातुन आणलेल्या बर्याच गोष्टीन्ना कीडे लागतात (ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, रवा, दलिया, मूग डाळ)
काय करता येइल?
Pages