माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुक्या मच्छीचा खारटपणा कमी कसा करता येईल? गॅसवर भाजण्याव्यतिरिक्त अजुन काय करता येईल सुक्या सुरमईचे?

नमस्कार...
मी काल नाचणीचे लाडू केलेले , ईथलीच रेसिपी वाचून .
पण मला ते थोडे कड्क झाल्यासारखे वाटले. कडकच होतात का ? किंचित कडू झाले. तसे चांगले लागतात . पण असेच होतात का ?
मी पीठ दळायला देताना त्याच्यात मेथी दिलेली. माझ्या सासु म्हणतात मेथीची वेगळी पुड टाकायला हवी होती. पीठ खमंग भाजलेले पण त्याबरोबर मेथीदेखील भाजल्यामुळे झाल असेल.

की काहीतरी चुकले ?

तुपात केले का? थंडी मुळे तूप थिजते व वस्तू कड्क होते. तुझी रेसीपी बरोबरच असेल. एकदा ३० से. मावेत ठेवून बघ.

जुई, अगं मी पण करते नाचणीचे लाडू नाचणीचं पीठ आणून. माझे तर थेट बेसन लाडवासारखे होतात. मेथी टाकत नाही तरी काळसरच होतात ते जसे काही कोको घालून केलेत. बेसनलाडूसारखं साजूक तूप, वेलचीच घालते.

<<<एकदा ३० से. मावेत ठेवून बघ.>>> मला नक्की कळल नाही ..
त्यात दिलेले तुप घालून करायचे पण प्रमाण नव्हते.. म्हणून मी भाजताना तूप घेतलेले अंदजानेच..

नाचणी खूप जुनी व ज्यास्त भाजली तर कडू लागते. मी करते नाचणीचे लाडू उडदाचे पिठ टाकून तेव्हा ज्यास्त भाजत नाही.

नाचणीच्या लाडूत गुळ बारीक करून पीठ गरम असताना भरभर मिसळायचा आणि तुप घालून लाडू करायचे अस लिहल होत. मी गुळ वेगळा वितळवून धेतला आणि मग त्यात पीठ टाकले, म्हणून तर नाही ना झाले असतील कडक..

गूळ वितळवून केलात म्हणून लाडू कडक झाला असणार. कारण ही पद्धत चिक्की करायला वापरतात. इतर पदार्थात (उदा लाडू, साखरभात) गूळ बारीक करुन शिजवताना घालतात..

मुग्धा केक कश्यात बेक केल होता, म्हणजे ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅसवरचे ओव्हन, ओ टी जी? बर्‍याचदा त्यावर ते अवलंबून आहे, केक साठी मिळते ते भांडे वापरले तर उष्णता सगळीकडे सारखी मिळते आणि केक व्यवस्थित शिजतो. तसच जितका वेळ सांगीतला होता आणि ज्या सेटींगला बेक करायला सांगीतला होता तितका वेळ, ते सेटींग असा बेक केला होता का?

काचेचं भांडं आहे गं...त्यात करते..
मावे कन्वेक्शन मोड वर २५० अंश सेल्सिअस वर प्रिहीट केला आणि मग केक बेक करायला ठेवला..
तसच जितका वेळ सांगीतला होता आणि ज्या सेटींगला बेक करायला सांगीतला होता तितका वेळ, ते सेटींग असा बेक केला होता का?>> हो हो..अगदी तेवढाच वेळ बेक केला....

२५० से. जास्त टेंपरेचर आहे त्यामुळे वरुन पटकन ब्राऊन झाला आणि आतून कच्चाच राहिला. १८० डि. से. ( किंवा ३५० फॅरनहाईट ) हे केकसाठी युनिव्हर्सल टेंपरेचर आहे.

१८० डी. हे बरोबर. ३५ मिनिट टाइम. तसेच मावे बरोबर एक तिवइ मिळते त्यावर काचेचे भांडे ठेवले की तो वरून ब्राउन वा आतुन चान्गला बेक होतो. मिश्रण जास्त लिक्विड राहिल्यास होउ शकते.

आज कोलंबी बिर्याणी केलीय जुन्या माबोवरच्या कृतीनुसार, बाकी सगळ जमलय Happy फक्त गरम मसाला जरा जास्त झालाय त्यामुळे थोडी तिखट नी जास्तच झणझणीत झालीय, तिखट्पणा कमी करता येईल का? तोंडात टाकल्यावर छान चव लागते पण गिळताना जरा झणझणीत लागत बहुतेक हिरव्या मिरचीचे वाटणातले प्रमाणही जास्त झाले काय करु आता, रात्री सगळे असतील जेवायला काय उपाय आहे का यावर? कृपया लवकरात लवकर मदत करावी हि विनंती........

आजकाल बाजारात इतक्या प्रकारच्या मिरच्या आणि लाल तिखटाच्या पावडरी दिसताहेत कि तिखटाचा अंदाज घेणे कठीण जाते. अश्या वेळी, त्याचा आधी वापर करुन बघून त्या कितपत तिखट आहेत ते बघून ठेवाव्यात.

अवंतिका, अमित म्हणतो तसं पालक शिजवतांनाच रंगाचा प्रॉब्लेम होत असावा. पालक न उकडता गरम पाण्यातून काढायची आणि थंड बर्फाच्या पाण्यात घालायची. म्हणजे रंग टिकेल.
इथे दिनेशदांनी दिलेली कृती आहे पालक पनीरची. त्यात थोडी सिमला मिरची घालायला सुचविलयं. त्याने चव छान येते नी रंग पण.

अवन्तिका
पालक चिरून (आधी धुवून) थोडे दूध (१/२ वाटी) घालून झाकण घालून शिजव. फार वेळ नको.......३/४ मिनिटात शिजतो.......मस्त हिरवा रंग येतो. सोडा नको वापरू.

Pages