चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहायच राहुनच गेलं...

स्पॉयलर
बेगम जान मधे सर्वात मोठ्ठ सर्प्राईज म्हणजे आपला चंकी पांडे.. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणता येईल त्याचा...
बघुन क्लिक व्हायलाच दोन मिंट लागली मला कि हा चंकी पांडे आहे म्हणुन.. फार कमी रोल आलाय वाट्याला त्याच्या पण छाप सोडून जातो...
बाकी चित्रपटात विद्या बालन सोडली तर बाकी कोणी बघण्यासारख नाहीए..

बघुन क्लिक व्हायलाच दोन मिंट लागली मला कि हा चंकी पांडे आहे म्हणुन.. फार कमी रोल आलाय वाट्याला त्याच्या पण छाप सोडून जातो... >>>> त्याचा रेडिफ वर फोटो पाहिला होता . ओळखलचं नाही . लेख वाचला तेन्व्हा कळलं .

चि व चिसौकां पाहिला.... मस्त हलका फुलका सिनेमा आहे, जास्त लॉजिक बिजिक शोधत बसलं नाही तर फूल टू पैसा वसुल आहे.

हसून हसून तोंड दुखलं काल..... आज पुन्हा पाहिला जाणार..

बनवा बनवी, एक धाव धोबी पछाड यांसारख्या सिएन्मात जसं लॉजिक न शोधता सिनेमे फक्त एंजॉय क्रावेत, त्या रांगेतला हा एक सिनेमा
अर्थात वरचे दोन्ही सिनेमे अभिनयाच्या बाबतीत बाप आहेत.. पण तेवढं चालतंय..

ललित काय दिसतो! आहाहाहा!

आज पाठोपाठ दोन चित्रपट बघितले. क्रांती कानडेचा CRD आणि वरुण नार्वेकरचा मुरांबा.

'मुरांबा'ची भट्टी मस्त जमली आहे. वरुण उत्तम लिहितो आणि हा त्याचा पहिलाच चित्रपटही त्याच्याचसारखा निखळ प्रामाणिक, बुद्धिमान आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता गोष्ट सांगणारा आहे. ध्वनिलेखन (मिलिंद जोग), संगीत, (गीते - वैभव जोशी), पार्श्वसंगीत आणि अभिनय असं सगळंच अप्रतिम आहे. अजिबात चुकवू नका.

CRD चित्रपटगृहांत बघायला मिळेल की नाही, हे ठाऊक नाही. तरी संहिता, ध्वनिलेखन आणि संकलन यांसाठी हा चित्रपट जरूर बघा.

चि व चिसौकां पाहिला.... मस्त हलका फुलका सिनेमा आहे, जास्त लॉजिक बिजिक शोधत बसलं नाही तर फूल टू पैसा वसुल आहे.
हसून हसून तोंड दुखलं काल....... >>>■> +111111

चि आणि चि सौ कां आज परत एकदा पाहिला माझ्या बंगाली रुममेट बरोबर..
तिची सुद्धा हसुन हसुन पुरेवाट झाली.. सगळ्याम्ची कामे मस्त.. बाकी कन्सेप्ट चुम्मा आहे..

कानात कापूस घालून जा bagtana>> +१
फार किंचाळतात बुवा त्यात लोक भांडताना दाखवतात तेव्हा. पण बाकी सिनेमा टीपी आहे. पण परेश मोकाशीच्या आधीच्या एलिझाबेथ एकादशीची सर नाही मात्र.

द डेथ इन द गंज्/गुंज पाहिला..
कोंकना सेनने काढलेला.. मस्त पिच्चर आहे..
३ ४ दिवसाम्पूर्वीच पाहिला पण लिवायच राहुनच गेलं..
पिच्चर संपल्यावर सारे लोक त्या ट्रान्स मधे गेले...शेवटी कुणि का बाहेर येत नाहिए म्हणुन कर्मचारी आत येवून एकेकाचे चेहरे बघुन गेला...एकही जण खुर्चीवरुन उठलासुद्धा नव्हता..
खुप दिवसाम्नी एखादा पिच्चर बघीतल्यावर हा फिल सार्‍या बघणार्‍यांमधे आलेला पाहिलाय.. मज्जाच..

पिच्चर संपल्यावर सारे लोक त्या ट्रान्स मधे गेले...शेवटी कुणि का बाहेर येत नाहिए म्हणुन कर्मचारी आत येवून एकेकाचे चेहरे बघुन गेला...एकही जण खुर्चीवरुन उठलासुद्धा नव्हता.. >>> भारीच की.. बघायलाच पाहिजे !
अजिबात ऐकलं नव्हतं या सिनेमाबद्दल. आता गुगल केल्यावर कळलं... कोंकणा चं दिग्दर्शन, कलाकारांमधे रणवीर शौरी, तनुजा, कल्की आणि ओम पुरी !

पिच्चर संपल्यावर सारे लोक त्या ट्रान्स मधे गेले...शेवटी कुणि का बाहेर येत नाहिए म्हणुन कर्मचारी आत येवून एकेकाचे चेहरे बघुन गेला...एकही जण खुर्चीवरुन उठलासुद्धा नव्हता.. >>> भारीच की.. बघायलाच पाहिजे !<< येस्स. ऑनलाईन यायची वाट बघावी लागेल...

&जरा हटके आजच पाहिला Hotstar वर. थोडा आवडला. पण काही ठिकाणी संथ वाटला. आणि शेवट पाहून तर अपूर्ण वाटला. म्हणजे पुढे ते काय ठरवतात, लग्न करतात की नाही... सगळेच प्रश्नचिन्ह..
कुणी पाहिला आहे का? माबोवर रिव्यू आहे का?

नेटफ्लिक्स वर होता म्हणुन रईस पाहिला, अजिबात म्हणजे अजिबात आवडला नाही, शाखा प्रचन्ड म्हातारा दिसतो, त्याला फाईटस अजिबात जमत नाही, अशक्त ,खप्पड शाहरुख जेव्हा बळच छाति फुगवुन गुन्डाशी मारामारी करतो तेव्हा फक्त केविलवाणा दिसतो, त्याचा तो फोर्टेच नाही... शिवाय अनेकानेक वर्ष स्वतःच्या पॉप्युलेरीटीच्या तो एवढा प्रेमात आहे की तो वेगळ काही अजुनही करु शकला नाहीये, नवाज त्याच्यापुढे भाव खाउन जातो, शाखा असल की बाकिच्या च्या रोल ला चविपुरत महत्व द्द्यायच असत हे काय गणित आहे तेच कळत नाही, तनु वेडस मनु मधले अगदी बारिकसा रोल असणारे कलाकार सुद्धा आपल्या लक्षात राहतात, दन्गल मधल्या मुलिचा निवदन करणारा भाउ सुधा भाव खाउन जातो, इथे त होणे नाही.
शाखा ला डिफेण्ड करणारे ती चुक डायरेक्टर वर ढकलतिल पण अस सगळ्याच मुव्हित होत असेल तर शाखा निडस टू थिन्क अबाउट, स्वतःच्या आरत्या ओवाळण एका लिमिट नतर प्रेक्षक नाकारतात हे राजेश खन्ना, देव आनद सारख्या सुपरस्टार्सलाही चुकल नाही.

शाखा ला डिफेण्ड करणारे ती चुक डायरेक्टर वर ढकलतिल पण अस सगळ्याच मुव्हित होत असेल तर शाखा निडस टू थिन्क अबाउट, स्वतःच्या आरत्या ओवाळण एका लिमिट नतर प्रेक्षक नाकारतात हे राजेश खन्ना, देव आनद सारख्या सुपरस्टार्सलाही चुकल नाही. >>> त्याचे पिवळे दात आणि पिवळी नखं पाहुनही चित्कारणारी पोरं पोरी जोपर्यंत आहेत तोपर्यंत शाखाला कोणीही हात लावु शकत नाही.

आम्हाला बुवा रईस आवडला, पिक्चर म्हणून पण आणि शाखाची अ‍ॅक्टिंग म्हणून पण. बाकी तुमचे बॅशिंग चालू द्या Lol

रईस भयंकर वाईट मूव्ही आहे. पैसे खाऊन लिहिणार्‍या नेहमीच्या मीडियावाल्यांनीसुद्धा त्याला शिव्या दिल्यात. राजमाचीच्या वार्‍यावर दगडात अडकलेलं, महिनोनमहिने फडफडणारं एखादं चिरकूट जसं फाटलेलं असतं, तसा शाहरुख खान त्यात फाटका दिसतो. 'पिवळे दात' बद्दल अगदी अगदी.

आम्हाला बुवा रईस आवडला, पिक्चर म्हणून पण आणि शाखाची अ‍ॅक्टिंग म्हणून पण. >> रईस सिनेमाचा फ्लोव मस्त मेंटेन करतोय हे त्याचे यश आहे. शाहरुख मला तरी शाहरुख म्हणून इंपोज करण्यापेक्षा रईस म्हणून स्वॅगर दाखवायचा प्रयत्न करतो असे वाटले. माझा आक्षेप नवाजुद्दीन ला आहे. त्याच्या कॅपॅसिटीच्या मानाने अतिश्य फुटकळ रोल वाटतो. रामन राघवन नि हरामखोर बघितल्यावर रईसमधला नवाज एकदम टिपीकल वाटओ (असे रोल आधी इर्फान करत असे आता नवाजुद्दीन करतोय)

मुरंबाचे मुंबइत इतके कमी शो का आहेत? आत्ताच मुसळधार पावसातुन एका थेटरातुन परतलो. गेल्या आठवड्यात तिथे चि व चिसौंका बघायला गेलेलो तेव्हा मुरंबाचा ट्रेलर बघितलेला. आता तिथे असेल झळकलेला म्हणून गेलो तर सचिन ने थेटर व्यापलेलं.बुक माय शो वर पाहिले तर फक्त 3 ठिकाणी शो आहे.पुढच्या आठवद्यत कोपरखैरणे च्या कुठल्याश्या थेटरात लागणार आहे म्हणे. बघू तेव्हा.

रईस भयंकर वाईट मूव्ही आहे. पैसे खाऊन लिहिणार्‍या नेहमीच्या मीडियावाल्यांनीसुद्धा त्याला शिव्या दिल्यात. राजमाचीच्या वार्‍यावर दगडात अडकलेलं, महिनोनमहिने फडफडणारं एखादं चिरकूट जसं फाटलेलं असतं, तसा शाहरुख खान त्यात फाटका दिसतो. 'पिवळे दात' बद्दल अगदी अगदी.>>>> +1111111

मुरांबाचा दुसरा आठवडा चालू आहे का ? तस असेल तर त्या अजूनही चित्रपट गृहात आहे हे कौतुकास्पद आहे.माझ्या जवळपासच्या थिएटरमध्ये एकच शो उरलाय .तिथे बुकिंग केलं आताच.नाहीतर मग टीव्हीवर आला मगच पाहायला मिळेल .

मुरांबा हा अनुक्रमे सचिन खेडेकर, चिन्मयी सुमीत, आणि वरुण नार्वेकर यांचा सिनेमा आहे! अमेय वाघने चांगलं काम केलंय पण मला इतका नाही आवडला. त्याचा मित्र जास्त धमाल करतो! मिथिला पालकर पाहुणी कलाकार असल्यासारखी आहे खरंतर. तिच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या म्हणून कदाचित तिचं काम अधिक चांगलं होऊ शकलं असतं असं वाटलं.
सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत अशक्य भारी काम करतात. Sachin literally owns the cinema! मी गोडच आहे हे वाक्य = सत्यवचन!
दिग्दर्शन आणि प्रकाशचित्रणाला पैकीच्यापैकी गुण!

बेबे थोडे दिवस थांब टिव्हीवर येईलच. तसा ही झी चा सिनेमा आहे म्हणजे किमान एका महिन्यात ३-४ वेळा लावतीलच. तेव्हा आज थोडा कल थोडा असं करत पाहिलास तर काही शो उरतीलच Proud
उगिच पावसात गेलीस फाफलत Happy

Pages