पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्नोत्तरात गंमत आहे. नुसतेच ज्याला हवे ते लिहिण्यात नाही. संवादाशिवाय पकोडे खाण्यात मजा नाही.

शाम हा सूर्य-प्रकाशावर चार्ज होणारा रोबो आहे. (रेफ. कोइ मिल गया..धूप...)
दिनूगूनाना उतरायच्या वेळेस सकाळ झालेली असते. त्यामूळे, शाम रात्रभर चार्ज होउ शकलेला नसतो.
त्यात लाम्बच लाम्ब बोगदा येतो. अन्धार असतो. तोपर्यन्त त्याचे चार्जिन्ग पुर्न सम्पते, आणि तो मरतो
Lol

प्रश्नोत्तरात गंमत आहे. नुसतेच ज्याला हवे ते लिहिण्यात नाही.
>>>
+७८६
माझेही हेच मत आहे.
फक्त प्रश्नोत्तरात तेव्हाच ऑनलाईन असलेल्याची मजा ईतकेच

अरे हे आज वाचतोय! Sad
मस्त संकल्पना विनय. आता पुढच्या पकोड्याकडे लक्ष ठेवतो.

पकोडे ला थोडं अजून interesting करण्यासाठी १ idea देतो.. बघा पटते का..
पकोडे प्रश्नोत्तरात पहिले काही basic प्रश्न येतात.. आणि त्यान्ची उत्तर मिळाल्यावर एक वेळ अशी येते की काही अचूक आणि नेमके प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तर मिळाल्यावर पकोडे ची उकल करणं खूप सोपं होउन जातं.. अशा key प्रश्नांची उत्तरं देणं लेखकाला optional असावं/ठेवावं असं मी suggest करतो... प्रश्न विचारले जातीलच् ; फक्तं लेखकाने ठरवावं की काही प्रश्नांची उत्तरं तो गुप्तं ठेवेल...यामुळे पकोडे सोडविण्यास जास्तं मजा येइल... सगळ्याच् hints दिल्या तर कसं चालेल?

अहो रामायण झालं तरी अजून रामाची सीता कोण
Lol

पण गाडी बोगद्यात जाते तेव्हा तिच्या धावण्याचा आवाज वेगळा येतो. आणि ते शाम ला समजायला पाहिजे होते. आंधळा असला तरि.

शामने ट्रेनबाहेर उडी मारली हे एक बरे केले नाहीतर तो लंगड़ा होता अशी शक्यताही मांडण्यात आली असती Lol

पण गाडी बोगद्यात जाते तेव्हा तिच्या धावण्याचा आवाज वेगळा येतो. आणि ते शाम ला समजायला पाहिजे होते. आंधळा असला तरि.
>> या मुद्द्यावर चर्चा झाली आहे आधी

किती ते पकवताय... पुरे की आता...
>>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स!
मला तो एक रुका हुआ फैसला की काही नावाचा हिंदी पिक्चर आठवला.
एका खूनाच्या घटनेचा किस काढत बसतात. खून केलाय नाही केलाय कोणी केलाय कसा केलाय.. शेवटी मी हे बोल्लोच त्यांना...

काय मस्त.. सगळं उघड उघड घडलेलं समजत होते आणि हे एखद्या एमेनेसी मीटींग सारखे आम्ही पगार घेतो ते कामही करतो हे दाखवायला उगाच तावातावाने चर्चा. चित्रपट जिथून सुरू होतो तिथेच संपतो आणि ते देखील तिथल्या तिथे घुटमळत. जे थिएटरात बघायला गेले असतील त्यांना कोंडून बुक्यांचा मार झाले असेल. एकदोन सीन मजेशीर होते. पण दोनेक तासांचा सिनेमात हे फार कमी झाले.

गाडी बोगद्यात असतानाच शामला हार्ट अॅटॅक येतो. कदाचित दिगुनाना त्या स्टेशनवरच राहिले ह्या टेन्शनमुळे ....
शाम एकटा... बोगदा बऱ्यापैकी लांब... त्यामुळे त्याची अवस्था कोणालाही कळत नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे शाम मरतो.

Pages