पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिकॅप:

शामला सध्या शारिरीक मानसीक आजार नाही.
त्याचे लग्न झाले की नाही याचा काही संबंध नाही.
दिगुनाना त्याचे कोण याचा संबंध नाही.
त्याच्या आत्महत्येला दिगुनाना कारणीभूत नाहीत.
त्याचे कुणावर प्रेम आहे की नाही याचा संबंध नाही.
तो आंधळा नाही.

पण पूर्वी आंधळा होता.

नेमकी त्याच वेळी गाडी बोगद्यात शिरते आणि अंधारच दिसतो. निराश होउन शाम गाडीच्या दारात जातो आणि उडी मारतो. >> दारात जायला दार दिसले पाहिजे ना आधी Lol

श्याम आधी आंधळा होता, त्याच्या डोळ्याचे ऑपरेशन करून दिगुनाना त्याला परत घेऊन चालले असतील. आधी तो पूर्ण आंधळा असल्याने त्याला बोगदा वगैरे कन्सेप्ट माहीत नसावी. बोगद्यात एकटा असताना त्याला वाटले की ऑपरेशन फेल होऊन त्याची दृष्टी पुन्हा गेली. निराशेच्या भरात त्याने जीव दिला असावा. दिगुनाना त्याच वेळेस तिथे नसल्याने त्याच्या गैरसमजाचे निराकरण करू शकले नाहीत.

चीकू चे उत्तर बदलून .... दिगू नाना खायला आणायला बाहेर पडतात पण वेळेत योग्य त्या डब्यात पोहोचू शकत नाहित. त्यामूळे शाम डब्यात एकटा आहे. (दिगू नानांना खायचे निमित्त देऊन कोडे घालणार्‍याने बाहेर काढलय) आपले ऑपरेशन यशस्वी झाले का नाही ते बघण्यासाठी तो पट्टी काढतो. नेमकी त्याच वेळी गाडी बोगद्यात शिरते आणि अंधारच दिसतो. म्हणून तो आत्महत्या करतो.

तात्पर्य:

डिस्चार्जची घाई करु नये.

शाम आधी आंधळा होता. त्याचे डोळ्याचे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. त्याने जवळची सगळी रक्कम दिगुनानांना यासाठी दिली आहे. त्याच्या डोळ्यावर प ट्टी आहे. दिगुनाना उतरून जातात आणि परत येत नाही तेव्ह्या त्याचा गैरसमज होतो की ते आपले पैसे घेऊन पळाले. आपले ऑपरेशन यशस्वी झाले का नाही ते बघण्यासाठी तो पट्टी काढतो. नेमकी त्याच वेळी गाडी बोगद्यात शिरते आणि अंधारच दिसतो. निराश होउन शाम गाडीच्या दारात जातो आणि उडी मारतो.
>>@ चिकू
अगदी बरोबर ओळखलत. तुम्ही पहिले. माझ्या डोक्यात अगदी हेच होतं.

मानवजींचंपण कौतुक करायला हवं. त्यांनी काही प्रश्न अचूक विचारले.
अगदी सुरुवातीलाच त्यांनी विचारलं होतं की शाम आंधळा आहे का. मी उत्तरं दिलं होतं की हो पण....
हा मुद्दा जर तेव्हाच पकडून ठेवला असता तर लवकर रहस्य सुटलं असतं. पण हरकत नाही.

एक पद्धत असते.

परिस्थितीजन्य कोडे सुटले की ज्या व्यक्तीने सोडवले तिला बिंगो मिळाला की तिने जिंकल्याची आरोळी द्यायची असते..

"याsssssssय!!!!!!!!!!!!!!!!!याssय !!!!! " अशी आणि पुढे किमान अर्धा डझन हसऱ्या स्मायल्या.

तेव्हा कुठे सांगता होते धाग्याची.

हा प्रोटोकॉल फॉलो करावा अशी विनंती.

परिस्थितीजन्य कोडे सुटले की ज्या व्यक्तीने सोडवले तिला बिंगो मिळाला की तिने जिंकल्याची आरोळी द्यायची असते..
>> अरे वा ! भारीये Biggrin Biggrin

संध्याकाळ बेटर म्हणजे उठायचं टेन्शन राहत नाही.
>> हम्म. शनिवारी कथुकल्यांचा उपक्रम असतो न. दुपारपर्यंत त्यात वेळ जातो. नंतर आम्ही गायब होतो ते रात्रीच उगवतो.
तरी बघू काहीतरी.

आजच्या कोड्यासंबंधीचं माझं इन शॉर्ट मनोगत

: हा प्रकार तर्काधारीत आहे पण त्यापेक्षा जास्त महत्व प्रश्ननिवडीला आहे.

शाम मेला म्हणजे पहिले प्रश्न असे अपेक्षित होते की त्याचा खून झाला का ? अपघात झाला का ? की आत्महत्या झाली ?

म्हणजे सुरुवातीलाच कळालं असतं की त्याने आत्महत्या केली.
(चुकून आत्महत्या करण्याचा प्रश्न येतच नाही. कारण तसं असल्यास त्याला अपघात म्हटलं असतं.)

आता या टप्प्यावर खालील प्रश्न जर विचारण्यात आला असता तर अर्ध कोडं तिथेच सुटत होतं. प्रश्न हा की शामची आत्महत्या Preplanned होती का ?
उत्तर नाही आलं असतं. मग पुढचा प्रश्न हा की तो विचार बोगद्यात गाडी गेल्यानंतर आला का ?
याचं उत्तर हो म्हटल्यावर पुढचं काम सोपं झालं असतं

असो. अर्थात हा माझा विचार झाला.

शाम आंधळा होता का ?
तो आधी आंधळा होता का ?
त्याने आत्महत्या केली का ?
त्याने एखादी चूक केली होती का ?
गाडीत आणि बोगद्यात अंधार होता का ?
हे प्रश्न मला त्या त्या टप्प्यावर उत्तराच्या जवळ नेणारे वाटले.

एका वाक्यात सांगायचं तर मला जाम मजा आली, तुम्हालाही आली असेलच.

विनय, तुम्ही दिलेल्या माहिती वरून "त्याने जवळची सगळी रक्कम दिगुनानांना यासाठी दिली आहे. त्याच्या डोळ्यावर प ट्टी आहे. दिगुनाना उतरून जातात आणि परत येत नाही तेव्ह्या त्याचा गैरसमज होतो की ते आपले पैसे घेऊन पळाले." हे अनुमान कसे काढता येईल हे लक्षात आले नाही. चिकूचे उत्तर बदलण्याची गरज मला म्हणून भासली.

असामी, तो तर्क आहे ना फक्त. आणि मिळालेल्या माहितीवरूनच करता आला.
शाम आधी आंधळा होता.
आत्महत्या गैरसमजातून झाली
बोगदा आला नसता तर नसती झाली
दिगूनानांचे दुसर्‍या डब्यात जाने प्लॅन्ड नव्हते
---- या वाक्यांवरून चीकू यांना तर्क करता आला

Pages