पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रक्तातली साखर कमी झाल्यामूळे ? खाण्याचा संदर्भ आहे म्हणून.

दिनू हा खाली उतरताना शामचा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उतरला.. थोडावेळ चालत होते पण डब्बा बदलल्याने दिनुला पोहचायला वेळ लागला त्यात बोगदा आल्याने शाम जवळचा ऑक्सिजन संपला.

अशा कोड्यांमध्ये प्रश्नांचा भडिमार आणि उत्तर देणारी व्यक्ती एक असे सहसा घडते.

तेव्हा आता पर्यंत काय प्रश्नोत्तरे झाली आणि त्यातुन काय निष्पन्न झालेय याचा रिकॅप अधून मधून टाकावा लागतो. रिकॅप कोडे टाकणाऱ्यानेच द्यावा असे नाही, सहभाग घेणाऱ्यांपैकी कुणीही रिकॅप टाकु शकतो/ते

शाम ला दम्याचा त्रास आहे का ??
>> नाही

काही कारणास्तव ट्रेन बोगद्यामधे जाऊन थांबली होती का?
>> नाही

बोगदा नसला तरी शाम मेला असता का?
>>नाही

श्यामचा मृत्यु हा खून आहे का?

उत्तर हो असल्यास,
श्यामच्या खूनात दिगूभाऊंचा हात आहे का?

ऊतर नाही असल्यास,
श्यामच्या मरण्यात दिगूभाऊंची चूक आहे का?

श्यामला गर्लफ्रेंड आहे का?
किंवा त्याचे कुठल्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे का?
श्यामचे लग्न झाले आहे का?

नाही प्रत्येक संशयास्पदरीत्या मृत्युमुखी पडलेल्या पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो.

दिनू हा खाली उतरताना शामचा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उतरला.. थोडावेळ चालत होते पण डब्बा बदलल्याने दिनुला पोहचायला वेळ लागला त्यात बोगदा आल्याने शाम जवळचा ऑक्सिजन संपला.
>> असं नाही झालं

शाम आणि दिगुनाना (किंवा त्याचा सोबत रहाणारी व्यक्ती) वेगळे झाले म्हणुन शामचा मृत्यू झाला का?

शाम आणि दिगूनाना एकाच मृत्युपत्राचे दोन लाभार्थी होते का?
>> नाही

शाम मानव आहे का ?
>> हो

शाम ला पाण्यातून काहीतरी दिले आणि स्वत खाण्यासाठी उतरतो अशी थाप मारून उतरला पण सोबत असल्याने संशय दिगूवर येणार म्हणून तो पुन्हा चढला पण वेगळ्या डब्ब्यात तिथे पोहचू पर्यत शाम मरणार व दिनूवर संशय जाणार नाही

श्यामला गर्लफ्रेंड आहे का?
किंवा त्याचे कुठल्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे का?
श्यामचे लग्न झाले आहे का?
>> असंबद्ध

Pages