पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही ही पकोडे तळू. आधी यजमानांची संधी पुर्ण होऊ द्या. सगळ्यांनी तळावे. एकट्यावर भार नको

ओके.... pudhachaa tappaa kadhi aataa?

पुढचा टप्पा पुढच्या गोश्टीत >>> Lol मला वाटलं तुम्ही पुढचा पकोडा तुम्ही तळताय कि काय Happy

ओके बाय...खूप झाल्या गप्पा आता Happy

इतरत्र गृप वर वाचलेला पकोडा

दोन मित्र बार मधे जातात. एकच प्रकारची व्हिस्की मागवतात. त्यातला एक जण मरण पावतो.

दारु पिणे वाईटच.
तशात बर्फ टाकुन काहीही पिणे वाईट.

... दोन मित्र बार मधे जातात. एकच प्रकारची व्हिस्की मागवतात. त्यातला एक जण मरण पावतो.>>>
दोघेही ती व्हिस्की पितात का ?

हो

पहिल्या मित्राने त्या दुसर्‍या मित्राला प्रपोज करायचे म्हणून त्याच्या ग्लास मध्ये वेटर शी संधान बांधून 'डायमंड रिंग' ठेवलेली असते. पण दुसर्‍या मित्राला त्याचा अंदाज नसल्याने तो डायमंड गिळतो आणि मरतो..... बहूतै 'याराना' था ऊन दो दोस्तों मे.

.. दोन मित्र बार मधे जातात. एकच प्रकारची व्हिस्की मागवतात. त्यातला एक जण मरण पावतो.>>
१. दोघांच्याही व्हिस्की मधे बर्फ घातलेला असतो ज्यात विष मिसळलेले असते. एक जण व्हिस्की गटागटा पितो तर दुसरा आरामत बर्फ वितळून देत देत पितो. अर्थात पहिल्याच्या क्युबमधून पुरेसे विष व्हिस्की मधे न गेल्यामूळे तो जिवंत राहतो तर दुसरा मरतो.
२. व्हिस्की रायबेस्ड असते नि मेलेल्याला रायची server allergy असल्यामूळे अ‍ॅनफिल्क्टिक reaction होते.
३. जो मरतो त्याला massive heart attack येतो. दुसरे काही कारण नाही.
४. दोघांमधे ठरलेले असते कि ते अतिशय महाग व्हिस्की मागवणार नि जो मेला तो त्याचे व्हिस्की चे पैसे भरणार, पण ऐन वेळी तो नकार देतो म्हणून पहिला त्याला गोळ्या घालतो.

वरती चार शक्यता दिल्यात त्यात थोड़ी अजुन भर Wink
आपण फक्त व्हिस्की पिलेल्याचा मृत्यु बघतोय पण माझ्या शक्यतेत न पिलेल्याचा मृत्यु घड़तोय.

बर्फ गोठवणाऱ्या ठंडी मध्ये शरीरास ऊर्जा (!) मिळावी म्हणून बार मध्ये जातात पण तेथे एकच ब्रैंड उपलब्ध असतो आणि ज्या क्याक्तिस तो आवडतो तो ती पितो आणि ठंडी पासून वाचतो

दुसरा पित नाही आणि मरतो

@ गजोधर

इथे घटना कशी घडली आणि का घडली एवढंच ओळखायचं task होतं, कथा पुर्ण करा असं मी म्हटलं नव्हतं.

पण, त्याऐवजी, वगैरे शब्द नको किंवा कसलीच hint नको हे तुमचं वैयक्तिक मत झालं. कोड्याची काठिण्यपातळी पाहून एखादवेळी hint देण्याची मुभा असते (जालावर शोधू शकता)

शाम आंधळा असतो का
>> नाही. पण...
हा पण शब्द टाकून मी hint दिली होती की आंधळेपणाशी संबंधित काहीतरी उकल आहे.
तो आंधळा नाही पण... त्याचा तसा गैरसमज झाला / आधी तो आंधळा होता.

इथे वाचकांना भ्रमित करणे हा उद्देश्य नसून त्यांना योग्य दिशेने विचार करायला मदत करावी हा हेतू होता.

>> शामला अंधाराची भिती आहे का ?

याचं सरळसरळ उत्तर म्हणजे नाही. ज्याचं सगळं आयुष्य अंधाराच्या सोबतीने गेलं त्याला अंधाराची कसली भिती. अंधाराची भिती वाटली म्हणून त्याने आत्महत्या केली असं तुमचं म्हणणं आहे का ?

त्याला कुठला शारीरिक किंवा मानसिक आजार आहे का ज्यामुळे त्याचा मृत्यू झालाय ?

>> या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मते हो असे आहे. शामचा मृत्यू कशाने झाला याचं एका शब्दात उत्तर म्हणजे गैरसमजामुळे... आजारामुळे नव्हे. At the moment of suicide तो आजारी नव्हताच.
तुम्ही म्हणता की तो आधी आजारी होता. हेपण चूक आहे. आंधळं असणं म्हणजे आजार आहे का ? तुमच्या आजुबाजुला जे अंध लोक असतील त्यांना तुम्ही आजारी म्हणता का ? आजार आणि व्यंग या दोन शब्दांमध्ये फरक आहे.

So, मी जे उत्तरं दिले त्यामागे माझं स्वतःचं एक thinking होतं, logic होतं.

माझ्या मनात वेगळीच कथा होती हेच जर तुम्ही डोक्यात पक्कं भिनवलंय तर त्याला मी काही करू शकत नाही. या धाग्याचा उद्देश्य मला हवे ते उत्तर मिळाल्यामुळे केव्हाच पुर्ण झालेला आहे. बऱ्याच वाचकांना ही कल्पना आवडली, उत्तम प्रतिसाद मिळाला याबद्दल आनंद आहे. (हे मी फक्त प्रतिसादांच्या संख्येवर मोजत नसतो. )

साधी गोष्ट आहे, तुम्हाला नाही पटल्या न काही गोष्टी, पुढचे पकोडे धागा तुम्ही काढा. मलाही काहीतरी शिकायला मिळेल.

वेगळी कल्पना डोक्यात आहे का ? मग त्यावर वेगळा धागा काढा. तेव्हाच त्यावर अधिकारवाणीने बोलणं योग्य राहील.

पकोड्यांचा हा concept सर्वांच्या लक्षात आलेलाच आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी यावर पुढील धागे काढावेत. सहभाग घ्यायला मी आहेच.
धन्यवाद Happy

मरण हे दोन मित्रांपैकी एकाचं नाव आहे.
दुसरा मरणला व्हिस्की प्यायला घेउन जातो आणि बिल पे करतो. आपल्या मित्राने आपल्याला व्हिस्की पाजली म्हणुन खुश होउन मरण (त्याला) पावतो.

अंधाराची भिती वाटली म्हणून त्याने आत्महत्या केली असं तुमचं म्हणणं आहे का ? ------ऑपरेशन यशस्वी झाले नाही डोऴ्यापुढे अंधार आहे याला भितीच म्हणणार ना ? की अजून काही

गजोधर समजा त्याचा बाजुला काही व्यक्ती आहेत. गाडी बोगद्यात गेली आणि अंधार झाला. त्याच वेळेस याने पट्टी काढली. बाजुला असलेल्या व्यक्तींपैकी एक छोटा मुलगा म्हणाला "बाबा, किती अंधार झाला ना बोगद्यात. लाईट पण नाही गाडीत."

तर शामने आत्महत्या केली नसती. त्याला कळले असते की अंधार आहे पण याचा अर्थ मी अजुन आंधळा आहे असा नाही. त्याला अंधाराची भिती नाही. ऑपरेशन अयशस्वी होण्याची भिती आहे,

बरोबर मानव
मी आयुष्यातला 'अंधार' कायम राहण्याची भिती गृहीत धरली
दोन्ही बरोबरच

Pages