पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंधारात त्याला दरवाजा कसा दिसतो...
गाडीत lights नसतात का..
पूर्ण काळोक कसा शक्य आहे...

मला तरी maitreyee च उतर बरोबर वाटत आहे...

मैत्रेयी पण पैशांबद्दल कसलाही उल्लेख नाहिये म्हणून खटकले. ऑपरेशन झाले होते नि शाम उतावीळ झाला होता त्याचा परीणाम/निर्णय बघण्यासाठी म्हणून दिगूनाना नसतानाही त्याने पट्टी घाईघाईने काढली हे ही जमतेच कि. (दिगूनानांना डब्यातून बाहेर काढून शामला एकटे ठेवणे जरुरी आहे म्हणून खाणे वगैरे - तिथे दिगूनाना तोंड धुवायला, रेस्ट रूम चा वापर करायला गेले नि गाडी चुकले हेहि चाललेच असते - अगदी दिगूनाना दरवाज्यातून बाहेर डोकावून बघताना खाली पडले हेही चालले असतेच Happy )

असामी - मला पैशासंबंधी का वाटले याचे विवेचन

समजा शामने केवळ उतावीळ होउन पट्टी काढली तर तो ती दिगुनाना असतानाही कधीही काढू शकत होताच की. पण तेव्हा दिगुनानांनी त्याला सांगितले असेल की आत्ताच ती काढू नकोस म्हणून. दिगुनाना आले नाहीत तेव्हा तो अस्वस्थ झाला, त्याने दिगुनानांना पैसे दिले होते, त्यांना जसाजसा विलंब होत गेला तसातसा श्यामचा संशय बळावत गेला. दिगुनाना आपल्याला पट्टी काढू देत नव्हते हे त्याच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाली असे त्याला वाटले. खातरजमा करून घेण्यासाटी त्याने पट्टी काढली आणी अंधार पाहून तो खचला. सगळे पैसे लंपास झाले, डोळे बरे झाले नाहीत यामुळे नैराश्याचा झटका येऊन त्याने आत्महत्या केली.
पैशाचा संबंध नसता तर त्याला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलायचे सबळ कारण नव्हते. फार तर तो हताश झाला असता पण जीव दिला नसता. यात जवळ दिगुनाना असताना त्याने पट्टी काढलेली नाहीये त्यामुळे हे सर्व तर्कसंगतच आहे.

चीकू, माझा प्रश्न तुमच्या लॉजिकच्या स्पष्टिकरणाबद्दल नसून कि विनय ने कुठेही पैशाबद्दल उल्लेख केलेला नसताना वाचकांनी पैसे हा घटक का धरावा ह्याबद्दल होता. त्यांच्या पोस्टमधले "ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत." हे बघा. त्यामूळे पैसे हि दुय्यम बाब आहे. अंध असलेली व्यक्ती द्रुष्टि परत न आल्यामूळे निराश होऊन आत्महत्या करणे सहज शक्य आहे (पैसे लंपास झाल्याची जोड असणे जरुरी नाही. )

तसे पाहता मूलच्या क्लूज मधे अंध असण्याचा उल्लेखही नाहीये हा भाग अलाहिदा Happy पण at least तेव्हढा भाग उत्तराचा लपवलेला भाग जो वाचकांनी शोधून काढायचा आहे म्हणून सोडून देउ शकतो.

असामी डोन्ट टेक इत टू सिरिसली,

दोन्ही व्यक्ती पृथ्वी वरचे मानवप्राणी दाखवल्या बद्दल विनय यांचे आभार माना,
नाहीतर,
मामा हे मोठे शास्त्रज्ञ असतात आणि त्यांनी लावलेला शोध, शाम हा हुमनोईड असतो. शत्रूराष्ट्राचे ऐजन्ट , हा शोध हाडपण्यासाठी त्यांच्या मागे पडलेले असतात, त्यांना झुकांडी देण्यासाठी ये ट्रेन ने प्रवास करायचा निर्णय घेतात,
घाई घाईत निघाल्याने शाम ची बॅटरी चार्जड नसते. सोलर पॉवर वर शाम चार्ज होत असतो,
पण नानु मामांच्या अनप्लान्ड डबा बदलल्यामुळे, लांब बोगद्यात ,गाडीत दिवे नसल्याने शाम चे चार्जिंग थांबते आणि तो मरतो.

हि सगळी कथा ओळखा म्हणून सांगितले असते.

Biggrin

अंधारात त्याला दरवाजा कसा दिसतो...
>> अंध लोकांना एक सवय असते. ते कुठल्याही नवीन ठिकाणी गेले की entry, exit, महत्वाची ठिकाणं कुठल्या दिशेला आणि किती अंतरावर आहे याचा अंदाज घेत असतात, आणि ते लक्षात ठेवतात.

गाडीत lights नसतात का..
पूर्ण काळोक कसा शक्य आहे...
>> ती कोळशावर चालणारी ट्रेन आहे असं समजा. अजूनही असे दोनतीन route शिल्लक आहेत भारतात. उदा : i) दिल्ली ते रेवारी ( या ट्रेनने मी एकदा प्रवास केला होता. Full अंधेरा in the night.) या ट्रेनमध्ये भाग मिल्खा भाग च्या काही प्रसंगांची shooting झाली होती.

ii) जयपूर ते चिरावा

अशा ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी अंधार असतो. पण इतर वेळी पट्टी उघडली तर खिडकीतून बाहेरचा एखादा light दिसू शकला असता म्हणून बोगदा टाकलाय.

वा! मस्त होतं कोडं. अ‍ॅवि, छा गये तुम.

यावेळी नाही भाग घेतला पण आता घेऊ म्हणते.

मानवला स्पेशल धन्यवाद, ही कन्सेप्ट इथे आणल्याबद्दल.

"शाम आधी आंधळा होता, गाडी बोगद्यात असताना तो पट्टी काढतो आणि त्याचा गैरसमज होतो की आपण अजूनही आंधळे आहोत"
एवढंच फक्त अपेक्षित होतं ज्याचं उत्तर काहीजणांनी दिलं. आता त्याने फसवणूक झाली म्हणून आत्महत्या केली की निराश होऊन हा मुद्दा बाजूला ठेवू कारण स्पष्टपणे हे विधान करायला दिलेली माहिती अपुरी पडते. So,
असामी आणि चिकू, तुमच्या दोघांच्याही कथाशक्यता मान्य करता येतील.

मैत्रेयी आणि हायझेनबर्ग यांचे तर्कही चांगले होते ( यावर छान वेगळ्या कथा तयार होतील) पण हा task कोडे विचारण्याच्या मनात काय आहे हे ओळखा असल्याने या चौकटीत ती बसली नाहीत.

एक छान झालं की यानिमित्ताने एकाच धाग्याभोवती गुंफलेल्या बऱ्याच कथाकल्पना समोर आल्या. काही तर सायफाय. सुधारणा आहे म्हणायची Lol

अन्ध लोकान्चे ऐकण्याचे senses डोळस् लोकांपेक्षा जास्त तीक्ष्ण असतात.. शाम ला train बोगद्यात शिरली आहे हे train च्या बद्ललेल्या आवाजावरून कळू शकत होतं. sorry विनय, या कथेचे तर्क खूप ओढून-ताणून जुळवल्यासारखे वाटले..

शाम ने दिगुनाना येऊस्तोवर टाईमपास म्हणून मोबाईल वरून माबो एक्सेस करत आपल्या ऋन्मेषचे धागे वाचले होते काय =))

@अभिनवजी,

आपण इथे बघितला तो कथानकाचा एक भाग होता
म्हणून कदाचित तसं वाटलं असेल. अर्थात तेवढंच ओळखणं अपेक्षित होतं. बाकी मसाला प्रत्येकजण आपापल्या मनानुसार टाकू शकतो.

माझ्या डोक्यातलं संपुर्ण कथानक सांगतो ( सहज म्हणून सांगतोय. कोड्याचं उत्तर देणाऱ्यांनी संपुर्ण कथा शोधणं अजिबात अपेक्षित नव्हतं)

ही घटना आहे वीसेक वर्षांपूर्वीची. शाम हा एका खेड्यात राहणारा तरुण. तो जन्मतः अंध आहे. आपलं खेडं सोडून तो जास्तवेळा बाहेर गेला नाही. पण अंधपणाची खंत आहे त्याला, कारण यामुळे त्याला बाकीच्यांसारखं नॉर्मल आयुष्य जगता येत नाही, लग्न होतं नाही, आईवडीलही एक ओझं म्हणून बघतात. एकदा शहराजवळच्या एका गावात राहणारे त्याचे दुरचे मामा त्याला सांगतात की तुझी नजर परत येऊ शकते, माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत पण फक्त खर्च भरपूर लागेल. तो स्वतःच्या वाटेची शेती वडिलांना विकायला लावतो आणि इलाज करायला जातो.

नंतर आपल्याला माहीत असलेल्या वरील घटना घडतात. वीस पंचवीस वर्षांपूर्वी कोळशावर चालणाऱ्या अजून काही ट्रेन होत्या. एखादी मुंबईच्या आसपासही असेल.

योगायोगाने गाडी बोगद्यात येते आणि हा पट्टी उघडतो (कुतुहल किंवा मामा का आला नाही, तो पैसे घेऊन गायब झाला की काय ही भिती. तो पहिल्यांदाच इतक्या लांब पडल्यामुळे insecurity ची भावना असणं सहाजिक आहे.) त्याला अंधार दिसतो. बोगदा असल्यामुळे आवाजातला फरक जाणवला असेल पण बोगदा ही concept च त्याला माहीत नसेल तर ! सहज शक्य आहे कारण तो जास्त बाहेर फिरलेलाच नाहीये. त्याचे आईवडीलही अडाणी, तेपण फिरले नसतील म्हणून चर्चेत हा मुद्दा आलाही नसेल.

So शाम निराश झाला, की आपली शेतीपण गेलीये, लग्नही होणार नाही, आई वडीलांनंतर भाऊ कशाला पोसणार ? मामाचाही पत्ता नाही, त्यानेच फसवलं तर नसेल. यातले एक किंवा अधिक विचार त्याच्या डोक्यात येतात, तो दरवाजापर्यंत चाचपडत जातो (यात अशक्य काय बरे ?) आणि आत्महत्या करतो.

वरील कथेत योगायोग आहेत पण सहज घडू शकणाऱ्या घटना आहेत.

एखादी गोष्ट किंचितशी offbit वाटली असेलही पण मग प्रत्येक लेखकाला थोडाफार writer's freedom द्यायला हवा नाही का Happy

शाम ने दिगुनाना येऊस्तोवर टाईमपास म्हणून मोबाईल वरून माबो एक्सेस करत आपल्या ऋन्मेषचे धागे वाचले होते काय =))
>> LOL Lol

अरे माझे धागे आणि ईथे कश्याला.. कोडे सुटले उकल झाली तर आता धागा भरकटवायला मीच एक गिर्हाईक भेटतो का Happy

बाकी काल सुरुवातीचे पानभर होतो..
आज आता पाहिले तर मजा आली सारे वाचायला..
चिकू अभिनंदन..
मानव यांचे नेमके प्रश्न ..
मूळ कल्पनाही रोचक..

आता पुढचा कधी तळणार ?

मानव यांचे नेमके प्रश्न ...>>>>>
मला हे कोडं माहित होतं, मी गाईड करत होतो फक्त.

डब्यात लाईट नसणे: कोळशाचं इंजिनच असायला हवं असंही नाही. काही फॉल्टमुळे डब्यात लाईट नाही असे अनुभवलंय काही वेळा.
बोगद्यात गाडी गेल्यावर आवाज बदलण्याचा मुद्दा बरोबर आहे. पण हा बदललेला आवाज म्हणजे गाडी बोगद्यात आहे हेच त्याला माहित नव्हते. यासाठीच मी मुद्दाम 'गाडी बोगद्यात आहे हे शामला माहित होतं का?' असा प्रश्न विचारला. उलट आवाज बदलल्या मुळे आणि एकटा असल्यामुळे तो जरा बिथरला आणि त्याने डोळ्यावरची पट्टी काढण्याचा निर्णय घेतला असावा.

अवो, ते सोलायला लागतंय ना म्हणुन संत्र.
>> अच्छा असंय का...

पहिले तर "जी" नको रे.. अभिनव/अभि असं म्हण.. Happy
तुझं लेखन चांगलं आहे म्हणूनच तर तुझ्याकडून जास्तं अपेक्षा आहेत.. बाकी आता तू दिलेल्या explanation वर अजून कीस पाडत नाही..
ही "पकोडे" idea छानच आहे..

Pages