पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाम रातांधळा आहे का ?
त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे का ?
त्याला अंधाराची भिती आहे का ?
>> तिन्हीचे उत्तर नाही

शाम रातांधळा आहे का ?
त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे का ?
त्याला अंधाराची भिती आहे का ?
>> तिन्हीचे उत्तर नाही

शामच्या कुठल्या शारिरीक आजारामुळे / अपंगत्वामुळे त्याचा मृत्यू ओढवलाय का?

शामच्या मानसिक अवस्थेमुळे / आजारामुळे त्याचा मृत्यु ओढवलाय का?

अर्रर्र दुर्लक्ष्य करा 'मानव आहे का' ह्याचे ऊत्तर येण्याआधी मी माझा खालचा प्रतिसाद लिहिला होता, पोस्टायला ऊशीर झाला.

घाटातला बोगदा >>> हे काय प्रकरण आहे एक तर घाट (एकीकडे डोंगर दुसरीकडे दरी) असेल नाही तर बोगदा असेल ?
शाम हे दिगूनानांच्या ज्युपिटर वरून आलेल्या पाळीव डासाचे (एलियन) नाव आहे. बोगद्यात थंडी असल्याने (त्याच्यासाठी हिवाळा) त्याला खूप भूक लागली आणि त्याला वेळच्यावेळी दिगूनानांच्या रक्ताचा डोस न मिळाल्याने तो मेला.

दिगुनाना का आले नाहीत म्हणुन श्याम चालू गाडीतून मागे वळून पाहताना बोगदा येतो आणी काही तरी डोक्यावर आदळते

शाम ला पाण्यातून काहीतरी दिले आणि स्वत खाण्यासाठी उतरतो अशी थाप मारून उतरला पण सोबत असल्याने संशय दिगूवर येणार म्हणून तो पुन्हा चढला पण वेगळ्या डब्ब्यात तिथे पोहचू पर्यत शाम मरणार व दिनूवर संशय जाणार नाही
>> हा खून नाही हे आधीच आलंय
शामच्या कुठल्या शारिरीक आजारामुळे / अपंगत्वामुळे त्याचा मृत्यू ओढवलाय का?
>> नाही
शामच्या मानसिक अवस्थेमुळे / आजारामुळे त्याचा मृत्यु ओढवलाय का?
>> नाही
मृत्यू हा अपघात होता का ?
>> नाही
दिगुनाना का आले नाहीत म्हणुन श्याम चालू गाडीतून मागे वळून पाहताना बोगदा येतो आणी काही तरी डोक्यावर आदळते
>> अपघात नसल्याने हेपण नाहीच

या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.
>>
त्यांनी सांगीतले ना की, आत्महत्या केली म्हणून.
झाले की कोडे सोडवुन.

रिकॅप

शाम हा मानवच आहे.
त्याला कुठला असा शारिरीक अथवा मानसीक आजार नाही ज्यामुळे त्याचा मृत्यु झालाय.
गाडी बोगद्यात नसती तर तो मेला नसता.

पण त्याने आत्महत्या केलीय.

शाम ला कोणता आजार होता का ?
शाम च्या आत्महत्येच कारण दिगुनाना आहेत का ?
ते सासरे आहेत का ?
>> तिन्हीचे उत्तर नाही

शामकडून चूक झाली का ?
>> चूक म्हणजे गुन्हा (खून चोरी वगैरे ) असा अर्थ अपेक्षित असेल तर नाही. दुसऱ्या एका अर्थाने हो

बोगदा नसता तर शामने आत्महत्या केली असती का?
>> अजिबात नाय

शाम त्या डब्यात एकटाच होता का?
>> असंबद्ध

हे पृथ्वीवर घडलेय का?
>> हो.

बोगदा नसता तर शामने आत्महत्या केली असती का?
>> अजिबात नाय

शाम त्या डब्यात एकटाच होता का?
>> असंबद्ध

हे पृथ्वीवर घडलेय का?
>> हो.

दिगुनानाचा ऑक्सिजन सिलेंडर शामजवळ होता. गाडी सुरू झाली तेव्हा दिगुनाना खालीच राहिले असं शामला वाटलं. ऑक्सिजन शिवाय दिगुनाना अगदी थोडाच काळ जिवंत राहू शकणार होते. गाडीला चेन ओढून थांबवण्याची सोय नव्हती आणि कुणाला सांगावं तर डब्यात कुणाजवळ फोनही नव्हता. त्यामुळे दिगुनाना आता मरणार अशी त्याची खात्री झाली. दु:खात चूर होउन त्याने आत्महत्या करायची ठरवलं. डब्यातल्या कोणी आपल्याला रोखू नये म्हणून तो बोगदा येईपर्यंत थाम्बला आणि त्या अंधारात त्याने आत्महत्या केली.

Pages