Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30
दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.
ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तर मिळाल्या नंतर सुद्धा
उत्तर मिळाल्या नंतर सुद्धा पकोड़े अजूनही गरमगरम आहेत तर
छान मज़्ज़ा आली एकंदर ह्या प्रकारात !
याआर पण चिकू ने ओळखले ना
याआर पण चिकू ने ओळखले ना बरोबर... म्हणजे जमतंय..
येऊ दे पुढचं पकोडा
विनय यांचे कौतुक आहे... चांगलं प्रकार होता हा.. पार्टीचीपन्ट्स जास्त तेवढी मजा जास्त येणार आहे
कारण हा धागा Situational
कारण हा धागा Situational Puzzle च्या heading खाली काढलाय. म्हणून त्याचेच नियम पाळणे अपेक्षित आहे. >> Situational Puzzle ची एक ठोस नियमावली नाही. होस्ट च्या मनातले ओळखणे हा उद्देशाने बरेच प्रश्न सोडवले जातात पण बर्याच कोड्यांची एकापेक्षा अधिक अचूक उत्तरे नेटवर लोकांनी दिलेली आढळतील. situational puzzles हा lateral thinking चा भाग असल्यामूळे एकापेक्षा अधिक शक्यता असणे अध्याऋत असते. असो.
लेखकाच्या मनातली कथा हा ढोबळ प्रकार आहे. (कृपया हे वैयक्तिक घेऊ नका) ती बदलती असू शकते हि शक्यता आहे. समजा तुमच्या पहिल्याच कथेवर एखाद्याने 'आत्महत्या' नि ' अंधत्व' ह्याबद्दल प्रश्न विचारला असता तर तुम्ही नाही हे उत्तर देऊन उत्तर वेगळे सहज करू शकला असता. (परत एकदा तुम्ही हे केले असे नाही) किंवा गजोधर ह्यांनी त्यांचे दम्याचे उत्तर पहिल्या फटक्यात दिले असते तर तुमच्या मनात ते असले तरी तुम्ही 'नाही' म्हणून धागा अजून वेगळ्या शेवटाकडे सहज नेउ शकला असता. म्हणून लेखकाच्या मनातली गोष्ट हा ही लॉजिकल शक्यतेमधला फक्त एक धागा ह्यापलीकडे खर तर काहीच नाही. तुम्ही इतरत्र लॉजिकल थिंकिंग ची उदाहरणे दिल्यामूळे तुमची इथेही तीच अपेक्षा ( एकापेक्षा अधिक लॉजिकल उत्तरे) होती असा माझा (गैर)समज झाला होता.
प्रश्न विचारणाऱ्यावर
प्रश्न विचारणाऱ्यावर विश्वासच नसेल तर प्रश्न संपला. पहिल्या फटक्यात ओळखलं असतं तरी मी हो म्हटलं असतं.
Situational puzzle कसा खेळला जातो हे wikipedia वर दिलेलं आहे.
ज्यांनी या कोड्याचं उत्तर
ज्यांनी या कोड्याचं उत्तर दिलं त्यांनी illogical विचार केला असं म्हणायचं आहे का ?
विनय परत एकदा "मी वैयक्तिक
विनय परत एकदा "मी वैयक्तिक रोख नाहि हे वर स्पष्ट लिहिले आहे'. "म्हणून लेखकाच्या मनातली गोष्ट हा ही लॉजिकल शक्यतेमधला फक्त एक धागा ह्यापलीकडे खर तर काहीच नाही." ह्यासाठी ते उदाहरण दिले होते.
ज्यांनी या कोड्याचं उत्तर दिलं त्यांनी illogical विचार केला असं म्हणायचं आहे का ? >> कृपया गैर समज नसावा. मी असे कुठेही म्हटलेले नाही. ह्याउलट "ती फक्त एक(च) लॉजिकल शक्यता होती" असे म्हटलय.
असो.
असामी, मग हा खेळ कसा खेळला
असामी, मग हा खेळ कसा खेळला जावा असे आपणास वाटते?
एक शक्यता: सिच्युएशन द्यायची. प्रश्नोत्तरे काही नाही. भाग घेण्याऱ्यांनी आपापली उत्तरे द्यायची?
मानव + १
मानव + १
सीन द्या .. तो कसा घडला असेल ह्याचे प्रत्येक जण डिडक्शन करेल. ६० प्रतिक्रिया किंवा दोन दिव्सानंतर कोडे घालणारा त्याला कुठली शक्यता सर्वात जास्तं प्लॉसिबल वाटली ते सांगेल आणि त्याच्या डोक्यातली शक्यता ही सांगेल.
मग लोक त्यावर हवी तर चर्चा (दळण / तळण ) करू शकतात. प्रश्नोत्तरं नकोतच. कुठल्याही कोडे घालणार कुठल्याही प्रश्नाचे ऊत्तर देणार नाही असे नमूदच करून ठेवायचे.
किती डिटेल्स देवून कोडे घालायचे हे स्कील आहे आणि त्यानेच मजा येईल.
मी नियमावली अशी केली असती
मी नियमावली अशी केली असती (परत एकदा विनय ह्यांनी तशी करावी असे मी सुचवत नाहीये) प्रश्नोत्तरे असावीत. फक्त एकच योग्य उत्तर असणे बांधिल नसावे. जोवर आधी आलेल्या सर्व सूचना, क्लूज ना धरून एकापेक्षा अधिक योग्य उत्तर असेल तोवर ती सर्व ग्राह्य असावीत. उदाहरणार्थ, गजोधरचे उत्तर विनय च्या मूळ पोस्ट मधील सूचनांशी अतिशय सुसंगत आहे पण विनय ह्यांच्या मनातील कथेशी जुळत नाही पण बाद होते. माझ्यासाठी गजोधर नि चिउ दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत.
असामी तुम्ही म्हणताय
असामी तुम्ही म्हणताय ते प्रॅक्टिकली शक्य आहे का याबद्दल मी साशंक आहे. मला त्यात बरेच प्रॉब्लेम्स उद्भवतील असे मला वाटते.
आता याच धाग्यात बघा.
त्याला दमा आहे का हा पहिलाच प्रश्न.
त्याला शुगरचा प्रॉब्लेम आहे का आणि त्याने आत्महत्या केली का हे पण पहिल्या दहा मिनिटात आलेले प्रश्न.
धाग्याकर्त्याने या प्रश्नांची एकाच वेळी उत्तरे दिली.
आता जर त्याने उत्तर दिले :
दमा: शक्य आहे.
शुगर प्रॉब्लेम: शक्य आहे
आत्महत्या: शक्य आहे
तर गाडी पुढे कशी जाईल?
किंवा
वरचे तीन प्रश्न जे सुरवातीला आलेत,
त्याची उत्तरे तुम्ही कशी दिली असती?
एक "त्रीसदस्यीय पकोडे समन्वयक
एक "त्रीसदस्यीय पकोडे समन्वयक समिती" नेमण्यात यावी.
पकोडा योग्य तितका कमी / अधीक कठीण आहे की नाही यासाठी तर्कशास्त्रात हुशार एक सदस्य,
पकोडा सोडवल्यानंतर मांडवात होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी एक कर्तव्यकुशल सामाजीक सलोखा जपण्यात सक्षम असणारे भारदस्त व्यक्तीमत्व हे दुसरे सदस्य
व
तीसरी सीट महिलांसाठी राखीव असे तीन सदस्य नेमावेत.
पकोडे सांगणा-या धागाकर्त्याने आधी या समितीकडे मुळ पुर्ण कथा द्यावी व समितीने ती इतर वाचकांनी सोडवेपर्यंत गुप्त ठेवावी.
मग नतर मुळ कथा कोणती यावरुन हाणामारी झाली की, या समितीने सांगावे की नक्की मुळ कथा हीच होती की नाही ते!
हायझेनबर्ग:
हायझेनबर्ग: प्रश्नोत्तरांशिवाय कोडे / कथा हा प्रकारसुद्धा चांगला आहे. एक सिच्युएशन देउन कथा पुढे पूर्ण करा.
Situation Puzzle मध्ये साधारणत: प्रश्नोत्तरांवरुन कोडे होस्ट करणाऱ्याच्या मनातील सिच्युएशन ओळखल्या जाते. हा प्रकार सुद्धा मस्तच आहे.
पण situation puzzles प्रश्नोत्तरांशिवाय हा प्रकार सुद्धा असायला काहीच हरकत नाही.
दोन्ही प्रकारांचे स्वागत असावे.
अभिनव
अभिनव
असामी राव... जाऊ द्या ना...
असामी राव... जाऊ द्या ना...
विनय राव.. इग्नोर करा.. आणि पुढचं पकोडा येऊ द्या.. सगल्यानं मजा येतेय..
Situation Puzzle मध्ये
Situation Puzzle मध्ये साधारणत: प्रश्नोत्तरांवरुन कोडे होस्ट करणाऱ्याच्या मनातील सिच्युएशन ओळखल्या जाते. >> फकस्तं हजर आणिक कामातून येळ काढू शकणारेच मेंब्रं मिळतील मग.. बाकी माह्यावाणी हुशार
जे सवडीनेच मायबोली वर येवू राह्यले अश्या मेंब्रांना चानस कसा मिळणार मग भाऊ. कोडे टाकणार्यालाही दोन चार तास कामून डांबून ठिऊ राह्यले, त्यायलेबी काय कर्मधर्म अस्त्ये की नाही. कमिटमेंट लई मोठ्ठा ईशू आहे.
समितीने ती इतर वाचकांनी सोडवेपर्यंत गुप्त ठेवावी. >> गुप्तं ठेवली ह्याचावर कसा विश्वास ठेवायचा, समिती मेंब्राचा डु आय असला तर.
तर गाडी पुढे कशी जाईल? >>
तर गाडी पुढे कशी जाईल? >> मानव त्याच तर वेगवेगळ्या शक्यता नि वेगवेगळी उत्तरे आहेत ना ? सुरूवातीला सगळी assumptions नसतील तर शक्याशक्यतेमधूनच वेगवेगळे फाटे नि उत्तरे फुटणार ना. वरच्या कथेमधे जर आत्महत्या हे स्पष्ट पणे आले असते ( शाम मरतो अशा वेगवेगळ्या probabilities च्या वाक्यापेक्षा ) तर हे प्रश्न विचारले नसते गेले. पण मूळात सगळे assumptions लिहिले तर ते तेव्हढेच challenging होइल कि नाही हि शक्यता येते. कदाचित प्रश्न्नोत्तरे नसणे हे तुमचे नि बर्गचे म्हणणे सयुक्तिक ठरेल.
सदरहू परिस्थितीवर एक उपाय
सदरहू परिस्थितीवर एक उपाय डोक्यात आहे. बघा कसा वाटतो :
मी पकोडे टाकण्याच्या आधी हायझेनबर्ग, असामी आणि गजोधर यांना माझ्या मनातील कथाकल्पना पाठवेन. ( हे आयडी निवडलेत कारण हे माझे डू आयडी नाहीत हे कुणीही खात्रीने सांगेन
)
नंतर मी कोडे टाकेन आणि यावेळेप्रमाणे हो/नाही प्रश्नोत्तरे होतील.
उत्तर मिळाल्यानंतर मी मांडलेल्या लॉजिकला बाजूला ठेवावं आणि हायझेनबर्ग यांनी सुचवल्याप्रमाणे प्रश्नातील situation वर वेगवेगळे तर्क लोकांनी मांडावेत, त्यावर चर्चा करावी. याला द्यायचे पुढचा एक किंवा दोन दिवस. त्यात ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येऊन सहभाग घ्यावा.
यातून कित्येक वेगवेगळ्या कथाकल्पना समोर येतील.
यातून काय होईल की पकोडे ची yes/no concept बऱ्याचजणांना आवडली आहे, तीपण सुरू राहील आणि दुसरा जो प्रकार समोर आला आहे तोपण राबवता येईल.
काय म्हणता ?
तुम्ही कय म्हण्ता विचारले
तुम्ही कय म्हण्ता विचारले म्हणून लिहितो..
( हे आयडी निवडलेत कारण हे माझे डू आयडी नाहीत हे कुणीही खात्रीने सांगेन Lol ) >> तुमचा डु आय नाही हो पण आमच्या डुआय ने ऊत्तर दिलें तर त्याचा हात कोण धरणार
उत्तर मिळाल्यानंतर मी मांडलेल्या लॉजिकला बाजूला ठेवावं आणि ... >> तिथंच गेम आणि लोकांची क्ल्पना शक्ती संपली ना...पुढे कोण अजून ऊत्तरं देत बसणार... ह्या धाग्यावर तुम्ही ऊत्तर देण्याअधीच काय ते तर्क आले नंतर नाही.
तुम्ही हुशार आणि तर्कमान
तुम्ही हुशार आणि तर्कमान लोकांनी सल्लामसलत करून हा खेळ कुठल्या कुठल्या पद्धतीने खेळला जाऊ शकतो वा खेळला जावा याचे दोनचार पर्याय मला द्या.
मी त्यावर उद्या एक पोल काढतो.
कारण जे जास्तीत जास्त लोकांना वाटेल तसेच खेळण्यात अर्थ आहे. अन्यथा जर मला एखाद्या पद्धतीने हा खेळ खेळावासा वाटला पण तसे आणखी कोणालाच वाटले नाही तर काय मी आणि विनय दोघेच खेळत बसणार का?
अरे मी पण हाय ना
अरे मी पण हाय ना
तुमचा डु आय नाही हो पण आमच्या
तुमचा डु आय नाही हो पण आमच्या डुआय ने ऊत्तर दिलें तर त्याचा हात कोण धरणार
>> तसं असेल तर लेखकावर विश्वास ठेवावा लागेल त्याला इलाज नाही.
माझ्या लॉजिकला बाजूला ठेवल्यास लोकांची कल्पना शक्ती कशीकाय संपणार ? ज्यांची इच्छा असेल ते तर्क मांडतील, ज्यांची कल्पनाशक्ती संपली असेल किंवा ज्यांची इच्छा नसेल ते मांडणार नाहीत.
किंवा ज्यांच्या डोक्यात ज्या
किंवा ज्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्यांनी त्यावर वेगळे धागे काढावेत. वाचकांच्या मेंदूला डबल खुराक मिळेल.
तसं असेल तर लेखकावर विश्वास
तसं असेल तर लेखकावर विश्वास ठेवावा लागेल त्याला इलाज नाही. >> आमचा आहे हो तुमच्यावर विश्वास ... काळजी नसावी
माझ्या लॉजिकला बाजूला ठेवल्यास लोकांची कल्पना शक्ती कशीकाय संपणार ? ज्यांची इच्छा असेल ते तर्क मांडतील, ज्यांची कल्पनाशक्ती संपली असेल किंवा ज्यांची इच्छा नसेल ते मांडणार नाहीत. >>मग तुम्ही सुरूवातीलाच तुमचे लॉजिक सांगून टाका बाकीचे यथाशक्ती दुसरे तर्क मांडतीलच.
असो.
ठीक आहे बघा प्रयत्न करून.. करा चालू तुमच्या आयडीयेप्रमाणे.. यथाशक्ती सहभाग घेवूच
माझी आयडीया नव्हे, तुमच्या
माझी आयडीया नव्हे, तुमच्या कल्पनांना सामावून घेता यावं म्हणून मी तो पर्याय मांडला होता. अन्यथा बिंगोची आरोळी मिळाली तिथेच माझ्या दृष्टीने या धाग्याचं अवतारकार्य संपलं होतं. असो.
असामी असे जर प्रश्न विचारुन
असामी असे जर प्रश्न विचारुन शक्य अाहे शक्य आहे उत्तर द्यायचे तर प्रश्नोत्तरांची गरजच काय?
ते हायझेनबर्ग्ज प्रिन्सिपल प्रमाणे विना प्रशनोत्तरांनी खेळल्या सारखे होइल.
तरीसुद्धा तुमच्या कल्पनेप्रमाणे प्रयोग करुन बघण्यास काहीच हरकत नाही. तुम्ही एक कोडे टाका आपण त्याप्रमाणे आपण खेळुन बघु.
हायझेनबर्ग्ज यांच्या सूचने प्रमाणे विनाप्रश्नोत्तरे कोडे / कथा पूर्ण करा प्रकार पण व्हायला हवा.
याच बरोबर हो / नाही उत्तरांचा क्लासिकल सिच्युएशन पझल प्रकारही सुरु राहीलच.
मी दोन दिवस प्रवासात आहे, पण हायझेनबर्ग पकोडे देउ शकतो कारण त्यात देणाऱ्याला सारखे ऑनलाईन असणे आवश्यक नाही. अथवा हायझेनबर्ग रादर तुम्ही द्या.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र................. बराच गैरसमज झालेला दिसतोय.
विनय मी उदा. देऊन फक्त काही सुचना / मुद्दे / मत दिले होते. आपल्या धाग्यावर अथवा कथेवर टीका केली नाही कृपया हे लक्षात घ्या. माझी उदा. वाली पोस्ट बहुदा पुर्ण वाचली नाही असे दिसत आहे. जिथे कथा, लघू कथा इ. प्रकार येतात तिथे बरेच प्रश्न उपस्थित होतात हे सहाजिक आहे. तिथे उत्तर मिळून दृष्टीकोन पुर्ण होईल अशी अपेक्षा असते.
पण वरील काही पोस्टींवरून असे लक्षात आले की दिलेला मजकूर हा कथा नव्हे तर "घटना" या प्रकारात येत आहे. एखादी घटना घडली आणि ती कशी घडली बस इतकाच आवका परिघ आहे. ती का घडली? त्यामागे कारण काय ? इ. प्रश्नांच्या उत्तराची आवश्यकता नाही. कारण "वाचकांना" 'एक घटना कशी घडली' एवढेच पुर्ण करायचे आहे. तिथे मग वाचक आणि लेखक मनाप्रमाणे ओपन एंड संकल्पने खाली बरेच फाटे फोडू शकतात. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून ती घटना बघू शकतात. घटना पुर्ण करणे हा एकमेव उद्देश लेखकाचा आणि वाचकांचा असतो.
पण जिथे कथा/गोष्ट पुर्ण करायचा उद्देश येतो तेव्हा तिथे प्रश्नांचा आवका/परिघ वाढतो. तिथे निव्वळ घटना घडवून लेखक थांबू शकत नाही. घटनेच्या अनुषंघाने येणारे प्रश्न कारणे यांना देखील पुर्ण करावे लागते. अगदी लघू अथवा शतशब्द कथा असेल तरीही ते पुर्ण असते.
इथे पकोड्यासंबधी जर बोलायचे झाले तर "लेखकाने फक्त "हो की नाही" इतकेच उत्तर द्यावे जास्तित जास्त २ शब्द" बाकी कल्पनाशक्ती वाचकांना लढवू द्यावी. तुमच्या ओरिजनल घटनेसंबंधी जुळत असेल तर हो अन्यथा नाही. "पण, त्याऐवजी वगैरे शब्द नको. त्याने वाचक भलतीकडे जातो. त्यामुळे त्याला पुन्हा ट्रॅकवर आणायला प्रश्नोत्तरे वाढत जातात आणि मुळ घटनेमधे अनावश्यक बदल होतात"
उदा. <<<<<शाम आंधळा असतो का?
>> नाही. पण...>>>> इथे नाही हे उत्तर पुरेसे होते. परंतू तिथे "पण" लिहिल्याने वाचक "राताअंधळा वगैरे वेगळ्याच ट्रॅक वर गेले" जो की मुळ कथेचा अनावश्यक भाग झाला. लेखकाने स्वतःच्या कथेवर चिटकून रहावे. पाणी ऐवजी पुर ठिक आहे कंसिडर होऊ शकते.
<<<<<<<<<<शाम रातांधळा आहे का ?
त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे का ?
त्याला अंधाराची भिती आहे का ?
>> तिन्हीचे उत्तर नाही>>>>>>>>>>>>>> इथे उत्तर चुकले .. आंधळा आहे का विचारलेले तेव्हा "नाही..पण" असे उत्तर आले मग आंधळा नाही तर रातआंधळा पण नाही आले. दुसरीकडे त्याला अंधाराची भिती आहे का विचारले त्याला नाही म्हणालात जे चुक आहे. त्याला वाटले की ऑपरेशन होऊन सुध्दा दृष्टी आली नाही म्हणून त्याला काळजी वाटली. म्हणजे डोळ्यापुढे अंधार आहे म्हंणून भिती मनात भरली.
या मुळे वाचक पुन्हा भरकटले. आंधळ्याला ऑपरेशन झाल्यानंतर सर्वात जास्त कशाची भीती वाटणार? तर अंधाराचीच वाटणार..
बहुदा तेव्हा लेखकाच्या मनात स्टोरीलाईन वेगळी होती अथवा वाचकांना पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न चालु होता. त्यामुळे अवधानाने घडले असावे.
<<<<<<<<त्याला कुठला असा शारिरीक अथवा मानसीक आजार नाही ज्यामुळे त्याचा मृत्यु झालाय.>>>>>> इथे अजुन एक अवधानाने चूक झाली.
शामला शारीरिक आजार होता. आणि तो आजार बरा झाला नाही या गैरसमजुतीने त्याचा मृत्यु झाला. हे विनय यांच्या कथेतून स्पष्ट झाले तेव्हा मानव पृथ्वीकर यांच्या प्रश्नाला उत्तर "हो" असे यायला हवे होते. म्हणजे मानव योग्य ट्रॅक वर असुन सुध्दा यावेळेस त्यांना विनय यांनी फिरवले
चीकू यांनी अचूक उत्तर दिले होते. फक्त त्यांनी आत्महत्येला असलेले कारण दुसरे दिले. माझ्या मते त्यांनी "घटना योग्य प्रकारे पुर्ण केली होती"
पकोड्याची अपार चिरफाड झाली...
पकोड्याची अपार चिरफाड झाली... म्हणजे आतमधले जिन्नस खरंच शिजलेत का? ते तसेच कि अजून शिजायला हवे कि कच्चेच राहिले... वगैरे वगैरे ...एवढ्या २०० च्या वरच्या कमेंट्स पाहून नव्याने आलेले वाचक फिरकतील का धाग्यावर...?
अहो... जी उत्तर योग्य असतील किंवा साजेशी असतील तीच गृहीत धरा ना.. आता समोरासमोर बसून थोडीच खेळ रंगलाय... थोडंफार मागेपुढे होणारच...
आलेल्या उत्तरातून माझ्याही डोक्यात हिच कल्पना होती असं... विनय सांगू शकतात... मग थांबवा तो धागा तिथेच...
पकोडे तळता तळता दिगूनानांचे
पकोडे तळता तळता दिगूनानांचे 'दिनूकाका' झाले ब्बा
पकोडे तळता तळता दिगूनानांचे
पकोडे तळता तळता दिगूनानांचे 'दिनूकाका' झाले ब्बा

>>
वविचा खेळ आठवला... वाचुन येते ववि वृ आता
री, मला शेवट सुचवा वाली
री, मला शेवट सुचवा वाली आक्षेप कथा आठवली.
Pages