पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते वाचले हो. मग आता ह्याचा अर्थ सांगा ...>>>एका खोलीत दोन माणसं मरून पडलेले आहेत>>>> ते बुडाले तर मग खोली कुठून वाचली ती नाही का बुडाली?

अवांतर,
Inglorious Bastrds ह्या १०४० च्या सेट अप मधल्या मुव्ही मधे एक गेम खेळतांना दाखवल आहे. "who am I?" त्यातही असेच हो नाही चे प्रश्न विचारुन कॅरेक्टर ओळखाय्चे अस्ते.

बरोबर आहे. म्हणजे Second World War च्या आधीपासून हा खेळ आहे.
500 Days of Summer मध्येपण दाखवलंय

खोली कूट वाचली... ती पण बुडाली हो
बोट समुद्रतालाला असेल बहुतेक >> हो मग कोडं कुठे आहे ह्यात? एक तर दोघेही बुडून मेले तसं नाही तर एकाने दुसार्‍याला गोळी घातली.
मग बुडूनच का ? खून करणारा हार्ट अ‍ॅटेक किंवा ब्रेन हॅमरेज ने का नाही मरणार.

असामी तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे कधी पासून. त्या गेम मध्ये जे काय ओळखायचे असते ते फॅक्ट असते ... जसे माणूस, प्राणी, पक्षी, , कार्ड, स्थळ ई. त्या 'ऑब्जेक्ट' बद्दल दुमत नसते आणि 'बरोबर' ऊत्तर एकच असते.
ईथे कथेला पूर्ण पणे 'सबजेक्टिव' अँगल आहे. ज्यामुळे एका सीनचे 'हे असे घडले असावे' ह्याचे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव ने कैक सारे डिडक्शन असू शकतात. मग केवळ लेखकाच्या मनात तो नव्हता म्हणून चुकीचा ह्याला काही अर्थे ऊरत नाही आणि तो चूक बरोबरचा गेम रहात नाही
मुद्दा क्लिअर झाला असेल अशी आशा करतो.

बर्ग बहुतेक विनय ह्यांना त्यांच्या मनातलेच उत्तर शोधणे अपेक्षित आहे.खरं तर open ended तार्किक उत्तरे शोधण्यामधे अधिक मनोरंजन होते असे मला वाटते - जसे कि चिऊ नि गजोधर चे उत्तर. असो.

who am I नि situational puzzles हे दोन भिन्न खेळ आहेत.

मग केवळ लेखकाच्या मनात तो नव्हता म्हणून चुकीचा ह्याला काही अर्थे ऊरत नाही आणि तो चूक बरोबरचा गेम रहात नाही
मुद्दा क्लिअर झाला असेल अशी आशा करतो.
>>>>

हेच तर लेखक आणि मी माझ्या गेल्या काही पोस्टनध्ये सांगत आहोत.
फक्त ते तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या शब्दात ऐकायचे होते Happy

खोली कूट वाचली... ती पण बुडाली हो
बोट समुद्रतालाला असेल बहुतेक
>>><<<
एक्झॅक्टली!
हिच तर गंमत आहे या खेळाची .. औट ऑफ द बॉक्स थिंकिंग.. फक्त ती गोष्ट, घटना अशक्य वा अतार्किक नसावी.
आणि थेट काही कोणाच्या डोक्यात असा विचार येणार नाहीये. म्हणून प्रश्न विचारून क्ल्यू मिळवायचे आहेत. लेखकाच्या मनातलेच ओळखणे याला नशीब वा योगायोग नाही झाला. तर आपणच प्रश्नांची योग्य साखळी करत तिथे पोहोचायचे आहे. हे प्रश्न काय कसे विचारतो हे कौशल्य आहे या खेळातले Happy

खोली कूट वाचली... ती पण बुडाली हो
बोट समुद्रतालाला असेल बहुतेक
>>><<<
एक्झॅक्टली!
हिच तर गंमत आहे या खेळाची .. औट ऑफ द बॉक्स थिंकिंग.. फक्त ती गोष्ट, घटना अशक्य वा अतार्किक नसावी.
आणि थेट काही कोणाच्या डोक्यात असा विचार येणार नाहीये. म्हणून प्रश्न विचारून क्ल्यू मिळवायचे आहेत. लेखकाच्या मनातलेच ओळखणे याला नशीब वा योगायोग नाही झाला. तर आपणच प्रश्नांची योग्य साखळी करत तिथे पोहोचायचे आहे. हे प्रश्न काय कसे विचारतो हे कौशल्य आहे या खेळातले Happy

अपेक्षापेक्षा वेगळे उत्तर चूक असे अजिबातच नाही.

पण हा खेळ होय / नाही टाइप प्रश्न विचारुन खेळायचा आहे.
जर ते उत्तर सुरवाती पासुन कोडे देणाऱ्याच्या मनात नसेल तर तो त्या दृष्टिने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा ना ही कसे देईल?
गजोधर यांचे उत्तर विचारात घेतले तर "शामला दमा आहे का?" याचे उत्तर विनय "नाही" असेच देतील.

आता झालेली प्रश्नोत्तरे लक्षात न घेता फक्त दिलेल्या कोड्यावरुव अजून समर्पक शक्यता, चपखल बसणारी एकापेक्षा अनेक उत्तरे असु शकतात.
अशा शक्यता मांडाव्यात. किंवा कुणी याच पररिस्थितीवर माझे दुसरे उत्तर आहे, त्यावरुन वेगळा पकोडे धागासुद्धा काढु शकेल.
दिलेल्या परिस्थितीवरुन अन्य कुणी अधिक सरस कोडे बनवु शकेल.

... अशा शक्यता मांडाव्यात. किंवा कुणी याच पररिस्थितीवर माझे दुसरे उत्तर आहे, त्यावरुन वेगळा पकोडे धागासुद्धा काढु शकेल.
दिलेल्या परिस्थितीवरुन अन्य कुणी अधिक सरस कोडे बनवु शकेल. >> बरोबर.

{{{ नेक्स्ट पकोडा कधी आणि किती वाजता
Submitted by च्रप्स on 24 May, 2017 - 08:59 }}}

तेच तर ओळखायचंय आता.

बायदवे, पकोडे म्हणजे पकवणारे कोडे का?

वरील प्रत्येक प्रतिसादाच्या उलट माझे विचार आहे.
तुम्ही जेव्हा एक गोष्ट / कथा इ. रचतात अथवा एखादी लाईन देऊन रचू पाहतात तेव्हा ती गोष्ट लॉजिकली बरोबर असावी अशी किमान अपेक्षा वाचकांची असते. असे का? यामागे कारण काय? इ. प्रश्न जे वाचकांच्या मनात येतात त्याची लॉजिक उत्तरे लेखकाकडून अपेक्षित आहे. लेखक स्वतःचा दृष्टीकोन जेव्हा वाचकांच्या समोर ठेवतो तेव्हा तो फक्त त्याचा दृष्टीकोन समोर ठेवत नाही तर "माझा दृष्टीकोन कसा बरोबर आहे" हे वाचकाला पटवून सुध्दा देतो. विनय यांच्या मुळ कथेवर "आत्महत्या केली" यावर ठोस समाधानकारक उत्तर नाही. दिनूभाऊ उतरला. ट्रेन चालू झाल्यावर पण आला नाही अशावेळेस कोणीही शांत न बसता आरडाओरडा करतो "अरे माझा माणूस खाली राहिला बघा त्याला वगैरे" परंतू शाम ने तसे न करता शांत बसला. आणि थोड्यावेळेनंतर आत्महत्या केली. (हा नेमका मुद्दा स्पष्टपणे वाचकांच्या मनात उतरत नाही) असो.

वरती विनय यांनी एक दुसरे उदाहरण दिले आहे जे प्रसिध्द आहे. त्यात काय काय प्रश्न उभे राहतात आणि त्याची लॉजिकली (सर्वसामान्यांच्या मनाला पटणारी) उत्तरे कशी येतील ते बघू.

एका खोलीत दोन माणसं मरून पडलेले आहेत, बाजूला बंदूक आहे पण गोळी लागून एकच जण मेलाय.
त्याचे उत्तर लेखकाने दिलेले :- ती खोली एका बोटीवरची खोली आहे. नावेत पाणी घुसत, नाव डुंबायला लागते पण कुणालाच बुडुन मरायचं नसतं. त्यांच्याकडे बंदूक असते पण त्यात असते एकच गोळी. मग ते टॉस करतात. जो टॉस जिंकतो त्याला दुसरा गोळी मारतो.

वाचकांचे प्रश्नः-
१) हा खुन आहे का ?
उ. नाही
२) आत्महत्या आहे का?
उ. नाही.
३) खोली आतून बंद आहे का?
उ. नाही/हो (दोन्ही बरोबर)
४) काही घटना घडली आहे का? ज्यामुळे खुन आत्महत्या झाली आहे?
उ. हो.
५) कोणती दुर्घटना घडली आहे का?
उ. हो (इथे उत्तर हो द्यावे लागेल कारण ही लेखकाच्या मते दुर्घटना आहे)
६) खोली कुठे आहे?
उ. पृथ्वीवर ( इथे जर लेखकाला फिरवायचे असेल तर फिरवू शकतो)
७) दुर्घटना नैसर्गिक आहे की मानवनिर्मित ?
उ. नैसर्गिक
८) भुकंप, ज्वालामुखी, वादळ, पुर या पैकी कोणती दुर्घटना?
उ. पुर ( पाण्याशी संबंधीत असल्याने लेखक हे बोलू शकतो.
९) दोन्ही माणसांना पोहता येते का?
उ. नाही. (गोष्टीच्या हिशोबाने दोघांनाही पोहता येत नाही). ( इथे खरा ट्विस्ट वाचकांच्या मनात येतो की जर खोली पुर आल्यामुळे बुडत आहे दोघांना पोहता येत नाही तर एकाला गोळी घालून मारण्याचे/ मरण्याचे कारण काय? दोघेही असे ही मरणार आहे. मग बंदूकीच्या गोळीचे काम काय? )
१०) बुडून मेले आहे का?
उ. हो
११) (या प्रश्नावर कथा पुर्ण होते) एक जण बुडून मेला आहे आणि दुसरा गोळी लागून?
उ. हो
----------------

आता वाचक सगळ्या लिंक लावून गोष्ट अशी लिहिल :- दोन मित्र भर पावसात पिकनिकला एका घनघोर जंगलात शिकारी करीता गेले होते. तिथे त्यांनी एका नदी काठी वसलेल्या छोट्याश्या हॉटेलवजा घरात तात्पुरती बैठी खोली घेतली. रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने नदीला भयंकर पुर आला. नदीचे पानी हॉटेल मधे घुसले. त्या दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांच्या मनात भिती दाटून आली. हॉटेलचा एकुलता एक मालक/स्टाफ हा जीव वाचवायला त्यांना खोलीत सोडून पळून गेला. कुठून ही मदत मिळणार नाही हे दोघांना लक्षात आले. आता आपण मरणारच आहे तर तडफडत मरण्यापेक्षा एका झटक्यात मेलेले केव्हाही चांगले यावर त्यांच्यात एकमत झाले. परंतू त्यांच्याकडे असलेल्या शिकारीच्या बंदूकीत अवघी एकच गोळी उरली होती. त्यामुळे दोघ आपापसात टॉस करतात " जो जिंकेल तो स्वतःवर गोळी झाडून घेईल आणि झटपट मरण स्वीकारेल" त्यातला एक जण टॉस जिंकतो. आणि बंदूक हातात घेतो. पण तो स्वतःवर गोळी झाडण्याऐवजी मित्रावर गोळी झाडतो. आणि स्वतःसाठी वेदनादायक मृत्युला कवटाळतो.
------- इथे खोली बोटीवरच असण्याची गरज नाही. मुख्य गोष्टीच्या सगळे मुख्य मुद्दे पुर्ण आले आहे----

लेखकाची आणि वाचकांनी तयार केलेली अशा दोन्ही गोष्टी लॉजिकतेच्या मुद्द्यावर परिपुर्ण आहे. दोन्ही गोष्टीत "जर-तर"चा मुद्दा कुठेही नाही. गोष्टीचा मुळ उद्देश, कथेचा गाभा, आणि मुद्दे सगळे गोष्टीमधे आले आहे.
हे कधी होते? जेव्हा लेखक आधी कथा/गोष्ट पुर्ण लिहून मग वाचकांच्या समोर "वन-लाईनर" ठेवेल तेव्हा येणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्याला फक्त "हो किंवा नाही" या मधे द्यायला जमते. (सविस्तर उत्तर द्यायची वरती गरज भासली नाही).

कथेचा किस काढणे ही मायबोलीवाल्यांची खासियत आहे Wink त्यातून कौतूक विशाल, कवठीचाफा, बेफिकिर सारखे दिग्गज सुध्दा सुटले नाही. अर्थात त्यांनी त्या-त्यावेळेस वाचकांच्या मनात आलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधन केले होते.
---

पुढच्या कथेला/ गोष्टीला शुभेच्छा..

गजोधर सदरहू कोड्यात आत्महत्येचे लॉजिक ठोस नाही हे कबूल.
Situation puzzle काय असते ते दाखवण्यास विनय यांनी एक कोडे निवडले त्यात थोडा बदल केला आणि टाकले. इथे त्यांचा उद्देश खास अेखादी कथा रचून ती सोडवण्यापेक्षा situation puzzle ची ओळख करुन देणे हा होता.

आता पुढचे पकोडे बघु.

हो ते मान्य आहे. मी विनय यांच्या विरुध्द बोलत नाही आहे.

मी फक्त ते दुसरे situation puzzle कसे परफेक्ट आहे. आणि त्या अनुषंघाने वाचक कसे प्रश्न विचारत जातील आणि लेखक उत्तर देत जाईल याचा एक "फ्लो" नमुना दिला. एक फ्लो मिळत गेला की कोडे सोडवायला मज्जा येते. आणि लेखकाला सुध्दा "हो किंवा नाही" इतकेच उत्तर द्यायला सोप्पे जाते. (सविस्तर उत्तर दिले की मग त्याला फाटे फुटत जातात)

वरील कोड्यामध्ये शाम कसा मरतो, काय घडतं एवढंच शोधणं अपेक्षित होतं.

त्याच्या डोळ्यांना पट्टी होती, बोगद्यात पट्टी उघडल्यावर त्याचा गैरसमज झाला आणि त्याने आत्महत्या केली बस्स एवढं ओळखलं की झालं. इथे कोडं संपलं.
हे अतार्किक आणि अशक्य कोटीतील नाहीये ना, मग झालं.
हा element उचलून शंभर लोक शंभर वेगवेगळ्या प्रकारे कथा लिहू शकतील, तो मुद्दा नाहीये.

आता दुसरं उदाहरण घेऊ.
लेखकाला एवढंच अपेक्षित आहे की काय घडलं एवढं फक्त सांगा. ते मित्र आहेत का, शिकारीला गेले होते की दुसऱ्या कशाला या प्रश्नांची उत्तरं असंबद्ध अशी येतील... कारण त्यांची उत्तरं हो/नाही असली तरी काही फरक पडणार नाही.

तुम्ही जी प्रश्नावली मांडली आहे ती मान्य. पण ती प्रश्नावली तिथेच संपणार नाही, कारण कोड्याचा उद्देश्य पुर्ण झाला नाही.

वाचकाने जी गोष्ट लिहली आहे ती पोस्ट केल्यावर तो विचारणार की हे असंच आहे का ? लेखक म्हणणार नाही. मग वाचकाला अजून विचार करावा लागेल. तो विचारेल की ती हॉटेलमधली खोली आहे का ? उत्तर येईल नाही.
सिमेंट कॉन्क्रिटची खोली आहे का ?
नाही
बोट किंवा जहाजावरची खोली आहे का ?
हो

इथे खऱ्या अर्थाने ते कोडं सुटलं. वाचकाने मांडलेलं आधीचं लॉजिकही बरोबर होतं पण... प्रश्न लेखकाच्या मनात काय आहे ते ओळखण्याचा आहे, नाही का Happy

आता ते दोघे मित्र होते की शत्रु होते, स्मगलर होते की सज्जन होते, ते कुठे चालले होते कुठून आले होते हे ओळखण्याची आवश्यकता नाही. वरील ढाचा तोच ठेवला आणि इतर variables बदलले की शेकडो कथा तयार होतील. त्यातल्या काही लॉजिकल असतील, काही नसतील.

@ असामी

बहुतेक विनय ह्यांना त्यांच्या मनातलेच उत्तर शोधणे अपेक्षित आहे.
>> हो. कारण हा धागा Situational Puzzle च्या heading खाली काढलाय. म्हणून त्याचेच नियम पाळणे अपेक्षित आहे.

खरं तर open ended तार्किक उत्तरे शोधण्यामधे अधिक मनोरंजन होते असे मला वाटते
>> असू शकतं. त्यावर वेगळा धागा काढल्यास मी हिरिरीने भाग घेईन.

खरं तर open ended तार्किक उत्तरे शोधण्यामधे अधिक मनोरंजन होते असे मला वाटते
>>
+१
लेखकाला हवे आहे ते लॉजिक सापडले तरी पुरेसे असायला हवे... लेखकाच्या डोक्यातली कथा १००% इतर कोणाला सुचणं यात मज्जा नाही.

शामने दिनुकाकांना ऑपरेशनसाठी पैसे दिलेले आणि दिनूकाका नाहीत, अंधार आहे हे बघुन गैरसमजातून त्याने आत्महत्या केली एवढं उत्तर दिलं तरी पुरेसं असायला हवं... दिनुकाकाच्या गायब होण्याचं कारण महत्वाचं नसल्याने त्याला वाचकांवर सोडायला हवं

असं मला वाटतं

Pages