Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30
दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.
ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाम चे ऑपरेशन झाले होते.
शाम चे ऑपरेशन झाले होते. त्याच्या डोळ्यांवर पट्टी होती. पट्टी न काढता हॉस्पिटल मधून त्याला डिस्चार्ज कसा दिला ?
जगात असा कोणता डॉक्टर आहे जो डोळ्यांचे ऑपरेशन केल्यानंतर रुग्णाला दिसत आहे की नाही याची चाचपणी न करता त्याला घरी जाऊ देतात ?
शाम दिसत नाही म्हणून आत्महत्या करतो ? या आधीही त्याला दिसत नव्हते त्यामुळे आधी आत्महत्या का केली नाही?
आत्महत्या त्याने बोगदा आल्यावर केली. तेव्हा ट्रेन मधे अंधार असतो. कुणालाच कळत नाही. परंतू त्याने आत्महत्या कशी केली? सुरी खुपसून घेतली, गळफास लावून घेतला, गाडी मधून उडी मारली? यापैकी काय ?
सुरी खुपसून घेतली तर तो आंधळा होता सुरी कशी पकडली आहे हे त्याला इतक्या लवकर चाचपून कळणार नाही
गळफास लावून घेतला तर तो आंधळा असल्याने गळफास लावणार कुठे आणि कसा ?
गाडी मधून उडी मारली.. आंधळा / दिसत नसल्याने गाडीचा दरवाजा कुठे आहे कुठल्या बाजूला आहे हे कळणार कसे ?अधे मधे लोक सुध्दा असतात तर चालताना लोकांना धक्काबुक्की तर नक्कीच झाली असणार.
त्यामुळे वरील आत्महत्या केली हे अजिबात पटत नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यापेक्षा एक अजुन स्टोरीलाईन सांगतो.
शाम आंधळा होता. (आंधळा नसेल तरी चालेल.. मुका असेल तर बर होईल. ) तो आणि दिनूभाऊ हे गावी चाललेले असतात. शामला दम्याचा त्रास असतो. त्याला तो पंप वापरायची गरज असते. ट्रेन मधे शाम ने दिनूभाऊ कडे तो पंप दिलेला असतो. जेव्हा दिनू भाऊ खाण्याचे सामान घेण्याकरीता खाली उतरतात तेव्हा ते तो पंप शाम जवळच्या बॅगेत ठेवून जातात. आणि ठेवल्याचे शामला सांगतात उशीर झाल्याने दिनूभाऊ दुसर्या डब्ब्यात चढतात. ट्रेन बोगद्यात शिरल्यावर ड्रायव्हर कडून चुकून शिट्टी वाजवली जाते. त्यामुळे नेमका धूर ट्रेनच्या डब्ब्यात पसरतो. शामला दम्याचा त्रास असल्याने त्याला तो धुर बाधतो. आणि त्याला दम्याचा अटॅक येतो. धुर आणि अंधार यामुळे त्याला तो बॅग मधला पंप परत मिळत नाही.आणि इतर लोकांना सुध्दा लव्कर कळत नाही. त्यावेळेस शामला वाटते की दिनूभाऊ ठेवायला विसरला आहे. अटॅक वाढत गेल्यामुळे शामचा श्वास अडकतो. आणि तो त्यातच मरण पावतो.
तसं पाहिलं तर मूळ कोडे आणि
तसं पाहिलं तर मूळ कोडे आणि त्याचे उत्तर हे जास्त आक्षेपार्ह आहे.
या कोड्याच्या दोन व्हेरिएशन्स आहेत.
१. एक माणुस ट्रेन ने जात असतो. ट्रेन बोगद्यात शिरते. थोड्यावेळाने तो आत्महत्या करतो.
याचे उत्तर म्हणजे सनव यांनी दिलेले उत्तर. आपली सर्वमालमत्ता पणाला लावून पैसे उभे करुन त्याने डोळ्यांचे ऑपरेशन केले असते आणि परत गावी जात असतो. त्याला डुलकी लागते, गाडी बोगद्यात शिरल्यावर त्याला जाग येते (आवाजातील बदल?) आणि नुसता अंधार बघुन त्याला वाटते आपण परत आंधळे झालोत, निराशेने तो आत्महत्या करतो.
पटते का हे उत्तर? पण मूळ कोडे हे असे आहे.
त्याचे व्हेरिएशन :
२. एक माणुस ट्रेनने प्रवास करत असतो. तो स्मोकिंग कंपार्टमेंट मध्ये बसला असतो. तो जर नॉन स्मोकिंग कंपार्टमेंट मध्ये असता तर तो जिवंत राहिला नसता.
आणि याचे उत्तर, वरचीच केस. तो निराश होउन आत्महत्या करण्याचा विचार करतो एवढ्यात त्याला दम ओढत असलेल्या कुणाच्या सिगरेटचा निखारा दिसतो आणि त्याला लक्षात येतं की आपली दृष्टी परत गेली नाहीय. नॉनस्मोकिंग कंपार्टमेंट मध्ये असता तर असे दिसले नसते आणि त्याने आत्महत्या केली असती.
या दोन्ही व्हेरिएशन्स मध्ये तो आत्मह्त्या कशी करतो / करणार असतो याचा काहीही उल्लेख नाही.
एक माणुस ट्रेनने प्रवास करत
एक माणुस ट्रेनने प्रवास करत असतो. तो स्मोकिंग कंपार्टमेंट मध्ये बसला असतो. तो जर नॉन स्मोकिंग कंपार्टमेंट मध्ये असता तर तो जिवंत राहिला नसता. >>>
भारतीय एक्स्प्रेस मधे असा वेगळा कंपार्टमेंट असतो का ?
त्याने भारतात असण्याची
त्याने भारतात असण्याची आवश्यकता नाही.
A man is returning from Switzerland by train. If he had been in a non-smoking car he would have died.
असे ते कोडे आहे. भरपूर बोगदे, म्हणुन Switzerland निवडले असावे.
खुपच छान.
खुपच छान.
मानव यांचे खास आभार या कल्पनेबद्दल.
असे अजुन उपक्रम हवेत.
शुभेच्छा.
आयडिया मस्त पण हे अगदी
आयडिया मस्त पण हे अगदी सुतावरुन स्वर्ग गाठल्यासारखे आहे,.. ठोस क्लु फार काही नाहित त्यामुळे काउटर डिफिट करणारे मुद्दे उगाच आणल्यासारखे वाटले.
काहीही असो...जबरू माजा आलीय
काहीही असो...जबरू माजा आलीय पाकोडे सोडवायला...
नवीन येवु द्या विनय..
मजा आली वाचायला!
मजा आली वाचायला!
आयडिया चांगली आहे विनय....
आयडिया चांगली आहे विनय.... तुम्ही ऊकल करण्यासाठी लॉजिकली विचार करायला भाग पाडता आहात ते चांगले आहे पण जर पात्रं ईरॅशनल वागली, त्यांच्या एखाद्या कृती मागचे कारण तकलादू वा घटना ओढून ताणून बसवल्या की मग सीड आयडीया कितीही लॉजिकल असली तरी सपोर्टिंग फॅक्ट्स मजबूत नसल्याने ती ऊलगडल्यानंतरही 'अरेच्या मी असा विचारंच केला नव्हता हे पण शक्य होते की' असे वाटत नाही.
ह्या केस मध्ये मला असे वाटले नाही, हा कदाचित माझ्या बुद्धीचा दोष असेल.
आयडिया मस्त पण हे अगदी
आयडिया मस्त पण हे अगदी सुतावरुन स्वर्ग गाठल्यासारखे आहे,.. ठोस क्लु फार काही नाहित त्यामुळे काउटर डिफिट करणारे मुद्दे उगाच आणल्यासारखे वाटले. >>> करेक्ट.
बिंदू लक्षात आला.
बिंदू लक्षात आला.
याआधी एलीयन भेळचा गाडा चालवायचो. पकोड्यांचा स्टॉल पहिल्यांदा लावल्यामुळे जोडीला चटणी द्यायची राहली असेल.
पुढील वेळी हा मुद्दा लक्षात ठेवेन.
सर्व खवय्यांना पकोड्यांची चव आवडल्यामुळे आनंद आहे.
पहिले तर "जी" नको रे.. अभिनव
पहिले तर "जी" नको रे.. अभिनव/अभि असं म्हण..
>> Ok buddy
उप्स ! मी मिस केला पहिला
उप्स ! मी मिस केला पहिला पकोडा. पण गारच सोडा, आता शिळा झाला तरी पकोडा जबरी टेस्टी आहे.
खुप मजा आली वेगवेगळी लॉजिक्स वाचायला. विनयच डोकं आणि ही पकोडा आयडिया एक नंबर आहेच, पण सगळे माबोकरच जिनिअस आहेत. चिकु Thumbs up and 3 cheers ! आता पुढचे पकोडे कधी? बाकी सगळ्यांबरोबर मी पण वाट बघते आहे.
मंडळी हे पकोडे नेहमीच
मंडळी हे पकोडे नेहमीच थ्रिलिंग, रहस्यमय असतात असे नाही. ते कधी हलके फुलके / विनोदीही असु शकतात.
त्यात अर्थात या पकोड्यासारखे थ्रिल नसते, पण चांगले मनोरंजक असु शकतात.
तुमच्या जिवनात घडलेल्या काही घटना / किंवा अशा काही घटना ज्या बातम्यांमध्ये गाजल्या ज्याचे तुम्ही साक्षीदार होता, किॅवा तुमच्या आसपास काही हटके घडलेले, जे विनोदी असु शकते किंवा त्यातून एक चांगला धडा मिळु शकतो असे काही खास घडले असे तर त्याचे आपण पकोडे बनवु शकतो.
काहीतरी खास असावं आणि ते सोडवण्याचा सहभागी होणाऱ्यांना पूर्ण स्कोप असावा. म्हणजे तुम्ही ते कोडे पोस्ट केले आणि काही कारणांमुळे तुम्ही अचानक काही तास / दिवस माबोवर येउ शकला नाहीत तरी ते लोकांना सोडावता येइल असे असावे.
तर आपण सुद्धा पकोडे शिजवायची तयारी करा.
मीठ मसाला चटणीचे प्रमाण सरावाने येइलच. रादर सूज्ञ माबोकर काय कमी झालंय काय जास्त झालंय ते आपल्याला सांगतील.
बघा प्रयत्न करुन.
विनय ह्यांनी धाग्याची
विनय ह्यांनी धाग्याची सुरूवातीला दिलेल्या क्लूनुसार (विशेषतः आत्महत्या हा भाग त्यात नसल्यामूळे) गजोधर ने दिलेले जास्त perfect वाटले
"शाम आंधळा होता. (आंधळा नसेल तरी चालेल.. मुका असेल तर बर होईल. ) तो आणि दिनूभाऊ हे गावी चाललेले असतात. शामला दम्याचा त्रास असतो. त्याला तो पंप वापरायची गरज असते. ट्रेन मधे शाम ने दिनूभाऊ कडे तो पंप दिलेला असतो. जेव्हा दिनू भाऊ खाण्याचे सामान घेण्याकरीता खाली उतरतात तेव्हा ते तो पंप शाम जवळच्या बॅगेत ठेवून जातात. आणि ठेवल्याचे शामला सांगतात उशीर झाल्याने दिनूभाऊ दुसर्या डब्ब्यात चढतात. ट्रेन बोगद्यात शिरल्यावर ड्रायव्हर कडून चुकून शिट्टी वाजवली जाते. त्यामुळे नेमका धूर ट्रेनच्या डब्ब्यात पसरतो. शामला दम्याचा त्रास असल्याने त्याला तो धुर बाधतो. आणि त्याला दम्याचा अटॅक येतो. धुर आणि अंधार यामुळे त्याला तो बॅग मधला पंप परत मिळत नाही. . त्यावेळेस शामला वाटते की दिनूभाऊ ठेवायला विसरला आहे. अटॅक वाढत गेल्यामुळे शामचा श्वास अडकतो. आणि तो त्यातच मरण पावतो. "
शिट्टी धुराने वाजते की वाफेने
शिट्टी धुराने वाजते की वाफेने?
शिट्टी वाजवल्यावर धूर जास्त
शिट्टी वाजवल्यावर धूर जास्त निघतो, गाडी अजून जोरात पळते, कुकरची शिट्टी वाजली तर वाफ कशी जोरात बाहेर निघते तसे
अरे लोकहो किती किस पाडत आहात.
अरे लोकहो किती किस पाडत आहात.
मूळात सारेच डिटेल मूळ पोस्ट मध्ये कश्याला हवेत? आणि ते दिलेच तर लोकं शोधणार काय?
तसेच जे काही थोडेथोडके दिले असेल त्यातून हजार शक्यता उभ्या राहतील, पण एकेक प्रश्न विचारत आपल्याला लेखकाच्या मनातील मूळ कल्पनेकडे प्रवास करायचा आहे. अर्थात ती अगदीच काहीच्या काही असेल तर वाद घाला, पण त्यापेक्षा अमुकतमुक जास्त शक्य आहे वा जास्त तार्किक आहे यावर वाद घालण्यात काय अर्थ आहे.
उदाहरणार्थ, हेच जर गाणे ओळखा असे खेळलो. लेखकाने एक गाणे मनात पकडले. ते गाणे देवदासचे डोला रे डोला असेल. त्याने पहिला क्ल्यू दिला माधुरी दिक्षित यात मस्त नाचलीय. तर ती एकटीच नाचलीय? की सोबत कोण नाचलेय? सोबत असणारी व्यक्ती स्त्री की पुरुष? वगैरे वगैरे प्रश्न विचारत आपण डोला रे डोला पर्यंत पोहोचू... पण मग त्यापेक्षा माधुरी ही करीष्मा सोबत दिल तो पागल है मध्ये मस्त नाचली आहे. ते उत्तर हवे होते. अशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे
@ऋ + १
@ऋ
+ १
ऋन्मेष काढ असा धागा.
संपादित
उदाहरणार्थ, हेच जर गाणे ओळखा
उदाहरणार्थ, हेच जर गाणे ओळखा असे खेळलो. लेखकाने एक गाणे मनात पकडले. >> ऋन्मेऽऽष हे उदाहर्ण चूकीचे आहे. लेखकाने गाणे मनात्पकडले नसून मनात एक गाणे रचले आहे. अर्थात ते त्याने रचले असल्यामूळे ते काय असू शकेल ह्याच्या शक्यता इतरांच्या द्रुष्टीने बर्याच असू शकतात. लेखकाने दिलेल्या क्लूजच्या आधारे लोक ते शोधणार आहेत त्यामूळे येणारे उत्तर हे लेखकाला हवे असेल तेच असण्यापेक्षा तार्किकद्रुष्ट्या योग्य असणारे उत्तर असणार आहे हा मूलभूत फरक आहे.
एक अजून बाफ उघडण्याच्या वेळे एव्हढा विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल कि गजोधर ने दिलेले उत्तर नुस्ते brilliant नाही तर अधिक वेगळे - out of the box (इंग्लिश शब्द प्रयोग तुला वापरता यावा म्हणून
) आहे.
आर कसला धूर अकख्या डब्यात
आर कसला धूर अकख्या डब्यात सोडलंय... जबरा सुचलय...
हा हा हा हा
असामी, चला उदाहरण उन्नीस बीस
असामी, चला उदाहरण उन्नीस बीस चुकले असेल, पण मुद्दा बरोबर नाही का? गजोधर यांनी जे उत्तर दिले ते ब्रिलियंट आहे की नाही हा मुद्दाच नाही आहे. तरी तुमची ईच्छा (परवानगी) असल्यास मी त्यांचे स्वतंत्र धागा काढून कौतुक करायला तयार आहे. नव्हे ते कौतुक वाटलेच. किंबहुना ईथे आणखीही काही लोकांनी एकेक मस्त शक्यता व्यक्त केल्या.. अगदी एलियन, टेरेस्टीट, शाम हा मोबाईल आहे वगैरे कल्पनांचेही फार कौतुक वाटले. पण ईथे आपण लेखकाच्या मनातील नेमकी शक्यता ओळखणे हा खेळ आहे, आणि ते ओळखले की कोडे सुटले समजायचे एवढेच.
तरी नशीब विजेत्याला काही रोख रक्कम बखीस नाही.... अन्यथा ईथे आतापर्यंत खूनखराबा झाला असता
पण ईथे आपण लेखकाच्या मनातील
पण ईथे आपण लेखकाच्या मनातील नेमकी शक्यता ओळखणे हा खेळ आहे, आणि ते ओळखले की कोडे सुटले समजायचे एवढेच. >> हो कोडे सुटले पण इतरांनी आणखी वेगळ्या शक्यता व्यक्त केल्या तर हरकत काय आहे अजून ? जसा तु मनातल्या प्रत्येक शंकेवर नवा बाफ उघडतोस तसेच वाचणारा आपल्या मनातली प्रत्येक शक्यता लिहितो. अगदी तुला पटेल अशा शब्दांमधे सांगायचे म्हणजे विनयच्या बाफाचा TRP वाढतोय ना
पण इतरांनी आणखी वेगळ्या
पण इतरांनी आणखी वेगळ्या शक्यता व्यक्त केल्या तर हरकत काय आहे अजून ? >>>> काहीच हरकत नाही. वर नमूद केले आहेच. त्यांचे स्वागत आणि कौतुकच आहे.
त्यांचे स्वागत आहे म्हणतोस तर
त्यांचे स्वागत आहे म्हणतोस तर मग "अरे लोकहो किती किस पाडत आहात." हे पोस्ट कशाला होते नक्की ?
मला वाटतं concept समजण्यात
मला वाटतं concept समजण्यात थोडी गफलत होत आहे.
आपल्याला फक्त लेखकाने दिलेल्या क्ल्यूजच्या आधारे उत्तर शोधायचं नाहीये तर त्याला प्रश्न विचारून त्याच्या मनात काय आहे ते ओळखायचं आहे.
गजोधर यांनी दिलेले उत्तर उत्तम आहे, त्यात शंका नाही पण जर माझ्या मनात काय आहे ते ओळखा असा प्रश्न असेल तर त्यांचं उत्तर बरोबर आहे असं कसं म्हणता येईल.
मी तरी भरपूर मोठा प्रश्न विचारलाय.
बऱ्याच situational puzzles मध्ये तर फक्त एकच ओळ दिलेली असते -
उदा एक प्रसिद्ध situational puzzle सांगतो :
एका खोलीत दोन माणसं मरून पडलेले आहेत, बाजूला बंदूक आहे पण गोळी लागून एकच जण मेलाय.
आता मला सांगा , यात ठोस clues दिलेले आहेत का ? तर नाही.
आता त्या लेखकाने काय उत्तर दिलंय ते सांगतो :
ती खोली एका बोटीवरची खोली आहे. नावेत पाणी घुसत, नाव डुंबायला लागते पण कुणालाच बुडुन मरायचं नसतं. त्यांच्याकडे बंदूक असते पण त्यात असते एकच गोळी.
मग ते टॉस करतात. जो टॉस जिंकतो त्याला दुसरा गोळी मारतो.
आता तुम्ही म्हणाल की हे कैच्या कै आहे आणि काहीच तर दिलेलं नाहीये मग आम्ही कसं शोधायचं. हेच तर खरं challenge आहे. आपण आपल्या डोक्यात काय तर्क आहे तो थोडावेळ बाजूला ठेवून असे प्रश्न विचारायचे आहेत की लेखकाच्या मनातील उत्तर ओळखता येईल. त्याच्याकडून सगळी माहिती खूबीने काढून घेणे अपेक्षित आहे. अशाच पद्धतीने हे कोडे खेळले जातात. तुम्ही जालावर शोधू शकता.
मग ते टॉस करतात. जो टॉस
मग ते टॉस करतात. जो टॉस जिंकतो त्याला दुसरा गोळी मारतो. > मग दुसरा कसा मेला?
बुडुन हो. नीट वाचा की
बुडुन हो. नीट वाचा की
@ असामी,
I keep mum
Pages