साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साडेसाति मनुष्याला चक्रव्युहातल्या अभिमन्यू सारखे घेरते. ती व्यक्ती परिस्थितीच्या इतकी शरण जाते की फक्त सहन करणे ह्यापलिकेडे फार मार्ग उरत नाही.

जय शनी देव.. दया करो!!!!

शनि किंवा कुठलाच ग्रह त्रास देत नाही. ग्रह हे तुमच्या संचिताची फळ ग्रहण करतात आणि या काळात देतात. ही वाईट फळे प्रकर्षाने मिळण्याचा काळ म्हणजे साडेसाती.

मी कुठे असे लिहिले की शनी मला त्रास देत आहे. मला साडेसातीमुळे जो त्रास होत आहे त्यापासून माझी रक्षा कर म्हणून मी शनीदेवाचे स्मरण केले आहे.

जय शनी!

बी,

तुम्हाला सध्या खूप त्रासातून जावं लागत आहे आणि फक्त धीर धरा असे सांगण्याव्यतिरिक्त (जरी हे तुमच्या सद्यस्थितीमध्ये शक्य नसेल तरी) काहीच उपाय नाही. मान्य आहे हे सांगणे खूप सोपे आहे, प्रत्यक्ष परीस्थितीतून तुम्ही जात असल्याने तुम्हाला काय सहन करावे लागत असेल हे फक्त तुम्हीच जाणता. तरीही साडेसातीत शांत राहणे, परीस्थितीवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने मनावर नियंत्रण ठेवणे, शक्य तितकी तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक!!

साडेसाती हा फक्त एक काळ आहे. तुम्ही आधी तब्बेतीकडे दुर्लक्ष केलं असेल, चुकून कोणाचं मन दुखावलं असेल, नकळत कोणाला तुमच्यामुळे कसला त्रास झाला असेल तर त्या सार्‍याची भरपाई करण्याचा काळ! या काळात तुम्हाला स्वतःचे परीक्षण करता येते. तुमच्या मानसिक सामर्थ्याचे, सहनशक्तीचे! याच काळात तुम्हाला तुमच्या आप्त स्वकीय, मित्रांची खरी ओळख होते! तुमचा डाऊन टर्न असताना तुमच्यासाठी खंबीर उभे राहणारे कोण आहेत, कोण तुम्हाला टाळतात हे समजेल. असं समजा जगण्याने तुम्हाला यलो कार्ड दाखवलं आहे... आधीच्या नियमभंगांसाठी!! पुढे तुम्ही कसे खेळता आणि परीस्थितीवर कशी मात करता यावर पुढचा त्रास / विजय अवलंबून असतो...
आणि हा अनुभव पुढील आयुष्यभर उपयोगी पडतो त्यामुळे या काळाला सकारात्मक रितीने घ्या.
साडेसातीत सगळीच वर्षे त्रासाची नसतात. बर्‍याचदा अनपेक्षित रित्या चांगले अनुभव येतात, बरेच दिवस रखडलेली बढती, चांगली नोकरी, स्वतःचे घर, प्रगती, परदेश गमनाचे योग... हे ही येतातच!! सुख आणि दु:ख सारख्याच उर्मीने स्वीकारावेत. सुखात माज करू नये आणि दु:खात हरून जाऊ नये! इतकंच साडेसाती शिकवते. तेव्हा शांत राहा, नियमाने सत्याने वागा, धैर्याने पुढे चला. मनाशी सतत म्हणा... हे ही दिवस जातील!

माझी मेश राशि नवराचि वृश्चिक राशि .सादेसाती चा त्रास भयानक होतो आहे.म्हन्जे देवा वर चा विश्वास उठ्ला माझा. १०-१२ ज्योतिशि पन झाले.अता थोड रिलिफ वाट्तए.

माझा मुलगा व नवरा दोघांची रास वृश्चिक व नक्शत्र अनूराधा आहे साडेसातीची मधली अडीच वर्श चालू आहेत याचा मलाही त्रास होतो मनशांतीचा काही उपाय आहे का?

Vruchikchi sadesati kadhi sampnar? Vishakha nakshtra aslyas? shevtche adich varshat kasla trass hoil? Plz koni sangave

Vruchikchi sadesati kadhi sampnar? >>>>> नोव्हे. २०१९
वर नि३ जीनी दिलेल्या प्रस्तावनेनुसार वृश्चिकेची शेवटची अडीचकी राहीली असेल....
बाकी जाणकार सांगतीलच !!!

Vrishik rashi chi sadesati sampnar aahe. YouTube var khup video aahe ki vrishik lokan che khup changle divas yenar aahe. Koni please prakash taka..

साडेसाती हि टेक्निकली पत्रिकेत चंद्राची जी पोसिशन आहे त्याच्या आधी ४५ डिग्री ला सुरु होते आणि नन्तर ४५ डिग्रीला संपते . तीन राशीत २.५ वर्षाचे जे गणित आहे ते फार ढोबळ आहे कारण पूर्वी ग्रहस्प्ष्ट आणि ग्रहसाधन एवढं सोपं नव्हतं . उदा- माझा चन्द्र हा मकर राशीत ६ अंशावर आहे म्हणून मला साडेसाती हि धनुत शनीप्रवेश केल्यावर न होता ती वृश्चिक २१ अंशावर शनी आल्यावरच चालू झाली आणि ती कुंभेत शनीने २१ अंश क्रॉस केल्यावरच संपणार.
बाकी साडेसाती म्हणजे शनी गोचर हे वाईटच असत असं काही नाही कारण भरपूर लोक या काळात मोठी होतात आणि चांगल्या गोष्टी घडून येतात. साडेसाती पेक्षा कैकपटीने भयानक ग्रह गोचर काही ठराविक ग्रह दशा-अंतर्दशेत पाहायला मिळतात जे नॉर्मली शुभ वगैरे मानले जातात. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे प्रत्येकाचे नशीब हे वेगळे असणार त्यामुळे साडेसाती संपली म्हणजे चांगला काळ सुरु झाला हे हास्यास्पद आहे कारण कुंडलीत बाकीचे ग्रह हे सिनेमा पाहायला बसलेले नसतात. युट्युब वर जे आर्मचेअर ऍस्ट्रॉलॉजर असतात त्यातल्या ९९.९९ % लोकांना घन्टा काय येत नस्तय त्यामुळे असे विडिओ पाहून काही अपेक्षा करू नये.
सगळ्यांचा नशिबाचा पॅटर्न हा ढोबळमानाने फिक्स असतो ज्यात कुटुंब, शिक्षण, आजूबाजूची परिस्थिती , देश/काळ/स्थळ आणि सर्वात महत्वाचे त्याची मेहनत याने कुंडलीपेक्षा थोडंफार वेगळं भविष्य तयार होत. शनी सौरमालेत मनुष्यापासून सर्वात लांबचा आणि मंद ग्रह आहे तर चन्द्र का सर्वात जवळचा आणि वेगवान ग्रह आहे त्यामुळे भ्रमणात ज्यावेळी तो मूळ चंद्रावरून जातो त्याने साहजिकच मानसिक उलथापालथ होणे हे स्वाभाविक आहे कारण चन्द्र हा मनाचा कारक आहे.
ज्योतिष हे अतिगूढ शास्त्र असून उपलब्ध साहित्यातून त्याची उकल होणे कठीण आहे. तेवढ्यापुरती करमणूक म्हणून पाहून सोडून द्यावं कारण फार डोकं लावलं यात तर फ्रस्ट्रेशन येऊ शकत. उपाय वगैरे तात्पुरती मलमपट्टी आहे जी बहुतेक लोकांना लागूपण होत नाही. उपायांनी नशीब बदललं असत तर कुंडली पाहायची गरजच काय उरणार . कुंडलीचा खरा उपयोग आधीच्या जन्मातील चुका/दोष ओळखून त्या टाळता कशा येतील हा असतो कारण तो पॅटर्न ह्या जन्मातसुद्धा चालूच असतो. योगायोगाने एखादा चान्गला अभ्यासक भेटला तर तो ह्या गोष्टी सांगू शकतो. बाकी ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही ते लोक सगळ्यात जास्त सुखी. सर्वसामान्य गृहस्थांची सुखिजीवनाची अपेक्षा असते ज्यात वाईट काही नाही आणि त्यामुळे साहजिकच लोकांची भावी आयुष्यात काही चांगलं घडेल(ज्योतिषाकडून ऐकायला मिळेल) या ओढीने ज्योतिष आणि तत्सम गोष्टींकडे पावले वळतात पण हा एक मेंटल ट्रॅप आहे ज्यात न सापडणच हिताचं असतंय. हा मी काही कोणाला सल्ला देत नसून दहा वर्षांत जेवढा वेळ दिला ह्या शास्त्रावर त्यातून आलेल्या अनुभवातून सांगतोय.

त्यामुळे साहजिकच लोकांची भावी आयुष्यात काही चांगलं घडेल(ज्योतिषाकडून ऐकायला मिळेल) या ओढीने ज्योतिष आणि तत्सम गोष्टींकडे पावले वळतात पण हा एक मेंटल ट्रॅप आहे ज्यात न सापडणच हिताचं असतंय. हा मी काही कोणाला सल्ला देत नसून दहा वर्षांत जेवढा वेळ दिला ह्या शास्त्रावर त्यातून आलेल्या अनुभवातून सांगतोय.>>>>>>> अगदी सहमत आहे. या ज्योतिषाच्या अभ्यासाच्या नादात मी कॉलेजचे वर्ष वाया घालवले आहे.

साडेसाती फक्त मानवालाच असते की प्राण्यांना देखील..?
फक्त मानवालाच असेल तर फक्त हिंदु मानवाला की ख्रिश्चन, इस्लामिक, बौद्ध, जैन मानवाला पण असते..?
साडेसाती ज्योतिष मानणार्‍यालाच छळते/फळते की न-मानणार्‍यालाही..??

साडेसाती फक्त मानवालाच असते की प्राण्यांना देखील..? >>> मनुष्यप्राण्याला
फक्त मानवालाच असेल तर फक्त हिंदु मानवाला की ख्रिश्चन, इस्लामिक, बौद्ध, जैन मानवाला पण असते..? >> हो सगळ्यांनाच
साडेसाती ज्योतिष मानणार्‍यालाच छळते/फळते की न-मानणार्‍यालाही..?? न मानणार्‍यालाही

साडेसातीत ज्यांना सुरू आहे त्यातले साडेसाती मानणारे लोक साडेसातीत त्रास होतो म्हणतात.

जे मानत नाहीत ते सध्या badpatch सुरू आहे म्हणतात.

Badpatch देशी परदेशी, गोरा काळा पिवळा, स्त्री पुरुष सगळ्यांना सतावू शकतो. तुम्ही त्याला काय नाव द्यायचे हे तुमच्यावर आहे.

माझ्या लेकीची वृश्चिक रास, अनुराधा नक्षत्र. तिचे पूर्ण शिक्षण साडेसातीत होऊन आता व्यवसायातही तिची घडी नीट बसतेय. तिला या काळात प्रचंड मानसिक त्रास झाला तितकेच यशही अनुभवास आले. पूर्वसंचित कर्मेही मदत करत असावीत.

साडेसाती मध्ये मिळणारी फळे ही पूर्वसंचिताप्रमाणे मिळतात. काही कर्मे अत्यंत प्रबळ असतात आणि त्यांचे रिसल्ट्स बदलण्यासाठी खूप जास्त कष्ट तेही योग्य मार्गाने काटेकोरपणे करावे लागतात. अध्यात्मिक शक्ती पाठीमागे असतील तरच हे शक्य होऊ शकते. काही कर्मे त्यामानाने सौम्य असतील तर थोड्याश्या उपायाने त्याची तीव्रता कमी करता येते. परंतु बऱ्याचदा माणसाला कर्मे भोगुनच संपवावी लागतात. आता कोणती कर्मे कश्या प्रकारे रिसल्ट्स देतील ह्याचा ग्रहांच्या पोसिशन वरून थोडाफार अंदाज लावता येतो परंतु नक्की अंदाज बंधू शकणारी माणसे अत्यंत कमी आहेत कारण त्यासाठी प्रचंड अभ्यास, अनुभव, आणि अध्यात्मिक साधना देखील लागते. मी तर म्हणेन असा माणूस मिळणे ह्यासाठी सुद्धा पत्रिकेत योग असावा लागतो.
ह्या धाग्याच्या निमित्ताने परमहंस योगानंदांच्या 'Autobiography of a Yogi' मधील 'ग्रहांवरती मात' हे प्रकरण आठवले. मूळ पुस्तक इंग्रजी मधून आहे परंतु मराठीतले भाषांतर एकदम उत्तम. मूळ पुस्तकातील काही वाक्ये खाली देत आहे. जमल्यास संपुर्ण प्रकरण वाचावे शेवटी लिंक दिली आहे.

"Mukunda, why don’t you get an astrological armlet?”

“Should I, Master? I don’t believe in astrology.”

“It is never a question of belief; the only scientific attitude one can take on any subject is whether it is true. The law of gravitation worked as efficiently before Newton as after him. The cosmos would be fairly chaotic if its laws could not operate without the sanction of human belief. Astrology is too vast, both mathematically and philosophically, to be rightly grasped except by men of profound understanding. Man, in his human aspect, has to combat two sets of forces—first, the tumults within his being, caused by the admixture of earth, water, fire, air, and ethereal elements; second, the outer disintegrating powers of nature. So long as man struggles with his mortality, he is affected by the myriad mutations of heaven and earth. Astrology is the study of man’s response to planetary stimuli. The stars have no conscious benevolence or animosity; they merely send forth positive and negative radiations. Of themselves, these do not help or harm humanity, but offer a lawful channel for the outward operation of cause-effect equilibriums which each man has set into motion in the past.The message boldly blazoned across the heavens at the moment of birth is not meant to emphasize fate the result of past good and evil but to arouse man’s will to escape from his universal thralldom. What he has done, he can undo. None other than himself was the instigator of the causes of whatever effects are now prevalent in his life. He can overcome any limitation, because he created it by his own actions in the first place, and because he has spiritual resources which are not subject to planetary pressure.
“Superstitious awe of astrology makes one an automaton, slavishly dependent on mechanical guidance. The wise man defeats his planets which is to say, his past by transferring his allegiance from the creation to the Creator. The more he realizes his unity with Spirit, the less he can be dominated by matter. The soul is ever-free; it is deathless because birthless. It cannot be regimented by stars.
The ancient rishis discovered many ways to curtail the period of man’s exile in delusion. There are certain mechanical features in the law of karma which can be skillfully adjusted by the fingers of wisdom. By a number of means- by prayer, by will power, by yoga meditation, by consultation with saints, by use of astrological bangles the adverse effects of past wrongs can be minimized or nullified.

पूर्ण प्रकरण येथे वाचू शकता: http://www.newthoughtlibrary.com/yogananda/autobioYogi/auto_016.htm#TopO...

असं काही नाही कि फक्त साडेसातीतच त्रास होतो. मला आणि माझ्या नवऱ्याला सध्या खूप सारे health issues येत आहेत. आणि आमच्या दोघांचीही साडेसाती सुरु नाहीय (कारण माझी मीन आहे आणि त्याची मिथुन ). माझी काहीतरी केतू महादशा कि काहीतरी सुरु होती. कदाचित सुरु असेलही. आणि त्याची राहू ची सुरु आहे. पण इथे जसे साडेसाती त आलेले अनुभव लिहिलेले आहेत तशेचकिंवा त्यापेक्षा ही जास्ती कटू अनुभव मलाही मागच्या 4-5वर्षात आले आहेत. आणि मीनेची साडेसाती 2022 की 23 मध्ये येणारे सो तेव्हाही वाईट अनुभव येतीलच. थोडक्यात काय तर साडेसाती नसणाऱ्यांनाही त्रास होतं असतो /होऊ शकतो.

.

साडेसाती कधी सुरू होईल याची माहिती मिळू शकेल का? मी गेले कित्येक वर्षे वाट बघत आहे, पण अजून भेट झालीच नाही. माझे पुण्य कमी पडत आहे का?

मी गेले कित्येक वर्षे वाट बघत आहे, पण अजून भेट झालीच नाही. माझे पुण्य कमी पडत आहे का?>>>>> भेटेल नक्की.पुण्य कमी पडत नाही. ती पापी माणसालाही भेटते आणि पुण्यवान माणसालाही भेटते. सश्रद्धांनाही भेटते व अश्रद्धांनाही

ती पापी माणसालाही भेटते आणि पुण्यवान माणसालाही भेटते. सश्रद्धांनाही भेटते व अश्रद्धांनाही>>>> खरंय. योग्य वेळ आल्यावर येतेच. मग कोणाचा विश्वास असो वा नसो. विश्वाचे सूक्ष्म नियम हे कोणाच्या मानण्या - न मानण्यावर अवलंबून नाहीत. गुरुत्वाकर्षणाचा नियम हा न्यूटन च्या आधी ही अस्तित्वात होता आणि नंतरही राहिलच. पृथ्वी गोल आहे हे मानणाऱ्या व्यक्तींना काही शतकापूर्वी फाशी झालेली परंतु सत्य बदलले नाही. तसेच हे. ग्रहगोल सूक्ष्म पद्धतीने मानवी जीवनावर प्रभाव टाकतच असतात मग कोणाचा विश्वास असो वा नसो. सर्व कर्माचा खेळ आहे आणि कर्मणे गहन: गति:|
यावरून एक प्रथितयश ज्योतिषाच्या ब्लॉगवर लिहिलेली एक घटना आठवली. त्या ज्योतिषाकडे एकदा एक माणूस आला. खरे तर त्याच्या मित्राने त्याला त्या ज्योतिषाकडे आणले होते. तो माणूस आर्थिक तंगी ने खूप बेजार होता. जो व्यवसाय करायचा त्यात नुकसान. ज्योतिषाकडे आलेला तेंव्हा खाण्यापिण्याचे वांदे होते. ज्योतिषाची फी पण त्याच्या मित्राने भरली. पत्रिका पाहिल्यावर ज्योतिष म्हणाले की नशिबात पैसा आहे परंतु चुकीचा धंदा इतकी वर्षे करत आलात म्हणून ही अवस्था आहे. त्या ज्योतिषाने पत्रिका अभ्यासून धंदा सांगितला. कोणता तर मेलेल्या माणसावर क्रियाकर्म करण्याचा. हल्ली त्याचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट असतात ना. त्या माणसाला त्यातले काहीच ठाऊक नव्हते परंतु शिकला. थोड्याच महिन्यात बरीच कामे मिळाली...नाव झाले...पैसा आला. खाण्यापिण्याचे वांदे असलेला मनुष्य आता चारचाकी गाडीमधून फिरतो.
मार्ग तयार असतो. फक्त मार्ग दाखवणारा मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्यावर चाला किंवा चालू नका त्या मार्गाला काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो शेवटी माणसाला.
दैवकृपेने योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ज्योतिषाची मदत होऊ शकते. सारासार विचार करून शक्य तेवढ्या साधनांचा उपयोग करावा आणखी काय?

किती ती फेकंफाकी? वरतीच कुणीतरी म्हटले आहे की साडेसाती दर ३० वर्षांनी येत असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त ३ वेळा येते. वाट बघत इथे आता आयुष्य संपायची वेळ आली की हो, म्हणून म्हटले विचारून बघू की माझे पुण्य कमी पडतेय किंवा याच्यावर काही उपाय आहे काय?

Pages