नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Finally Shashank Ketkar moved on.... त्याच्या साखरपुड्याचा फोटो आलाय मटावर

तेजश्री जास्त सुट व्हायची त्याला

फ्रेशर्स मध्ये नेमका काय लोच्या चालू आहे. मी मध्येच एकदा फार दिवसांनी बघितली. पण मला काहीच कळलं नाही. ते सगळे असे लपून का बसलेले असतात??

L3 आवडतेय सध्या. परवाच्या भागात आकांक्षा आवडते ते सांगताना विन्या भारी लाजला. जाम हसू आलं तो भाग बघताना.

अरे ते तंबू मध्ये काय वेड्याचा बाजार चाललाय? तो त्या मुलीच्या मागे लागलाय ते इतकं खोटं वाटतंय की त्यात काहीतरी प्लॅन असेल पण किमान होणाऱ्या बायकोला विश्वासात घ्यावं इतकीही साधी गोष्ट सुचू नये.
आणि त्या गौरी च्या आईला वेड लागले आहे
साखरपुडा साखरपुडा करत रस्त्यावरून दगड मारत फिरेल एकदा

पण सापुत हार का घातलेत दोघांनी?>>> दोन प्रकारे करतात. साधा आणि वांगनिश्चय मध्ये हार घालतात असं कोणीतरी सांगितलं. तो शब्द वाड.निश्चय असा लिहितात, मला येत नाहीये लिहिता.

मला आवडली श्रीची नवीन बायको फार गोड दिसते पण खूप लहान वाटते त्याच्यापुढे. हल्ली सगळ्या award functions मध्ये त्याच्याबरोबर असायची. हीपण डोंबिवलीची आहे असं वाचलं होतं.

निधी फ्रेशर्स मध्ये तो गुंड सिनियर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असतो हे सगळे त्याच्याकडे समझोता करायला जातात पण तो सिनियर मनवाशी चाळे करतो हिला सोडून तुम्ही बाकीचे जा असे बोलतो यामुळे मारामारी होते आणि निरवच्या हातून त्या गुंड सिनियर चा खुन होतो म्हणून धवल त्यांना लपवून ठेवतो...
हुश्श्य ...

आज एक कार्यक्रमाल जाताना तंबू मधले अण्णा दिसले, वेगळ्या कपड्यात असल्यामुळे मी आधी ओळखले नाही, लिफ्ट मध्ये एकत्र होतो पण विचारावे का नको यात नाहीच विचारले.
पण इतक्यात बंद होणार नाहीये सिरीयल असं कुणाशी तरी बोलताना ऐकलं

पण संपतेय, माझ्या भाचीचा रोल तरी संपतोय बहुतेक. मधे नणंद माझ्या नवऱ्याला सांगत होती. आता थोडे दिवस शुटींग आहे असं. नवीन सिरीयल प्रोमो पण दाखवतायेत.

आशूचँप भरपूर चिडलेले दिसतायत तंबूवर. Happy

वैजंती, धन्स गो. Happy
मला हल्ली फ्रेशर्स पण बोअर व्हायला लागलीय. कधीमधी बघते.
लललो मस्त चाललीय. आवडतेय सद्ध्या.

"इथेच टाका" मध्ये त्या मल्लिकाच्या वडिलांनी कपिलवर दबाव टाकलाय का ? मल्लिकाशी लग्न कर तर मी राधाश्रय ला मदत करिन असं काही. मालिका अगदी आता आता ( खरं तर संपत आली असताना ) बघायला सुरवात केलेय . नक्की कळत नाही तो गौरीशी लग्न करायला का नकार देतोय . काही तर्क?

बनमस्का संपणार आहे. संदेश कुलकर्णीचा लोकसत्तेत एक लेख होता, डिप्रेशनवर त्यात "बनमस्का ही आमच्या प्रॉडक्शन हाऊसची मालिका, आता संपत आलिये, तेव्हा सेंड ऑफ पार्टी ऐवजी आम्ही एक वर्कशॉप घेतलं...." असा उल्लेख होता. छान होती मालिका. मी कधीतरी बघत असे.

मला हिरो आवडतो बनमस्काचा, त्याचे डोळेपण सॉलीड बोलके आहेत आणि अभिनयपण ग्रेट पण हिरॉईन अजिबात नाही आवडली म्हणून मी बघू शकले नाही.

उलट बाकी सगळ्यात हीच बारी वाटत होती. फ्रेशर्स ही दुनियदारीच्या वळणावर जाणार का असे वाटत आहे. (चित्रपट नव्हे, कादंबरी)
तंबू ला कपिल साठे कसे हुशार हे दाखवून आणि सगळं गोड गोड मिट्ट करून पडदा टाकतील.
लव्ह लग्न ला सगळ्या जोड्या जमत आल्यात, विनय आकांक्षाला पुन्हा धुमारे फुटलेत.

Pages