नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए का गं?
दोघी गोड आहेत.
--------------
'लव लग्न'..मधे सौम्या फार ऑड मॅन आऊट वाटते. ती तोडणार वाटतं सुमीतला सगळ्यांपासून.
मुद्दामुन नाही पण सुमीतला ती आणि बाकी सगळ्यांबरोबर एकदमच वेळ घालवायचा असतो.
तिल मात्र सुमीत बरोबर एकट्याने थोडा वेळ घालवायचा असतो, पण प्रत्येक वेळी काही ना काही करणाने त्याचा सौम्या बरोबर्र्चा प्लॅन फिसकटत असतो.

चैत्राली.... सौम्याबद्दल अगदी बरोबर मलाही असेच वाटते

मनवा आणी सायली... दिसायला दोघी चांगल्या आहेत पण मनवा मला कधीकधी खेळण्यातल्या बाहुली सारखी वाटते

हो ना, सौम्य पझेसिव्ह दाखवलीय, याच कारणावरून त्याचे फिस्कटेल का काय?
श्रीकांत अति चिडचिड करतोय आणि वाट्टेल ते बोलतोय, ते भाडेकरू आहेत नोकर नाहीत.

आता कुठलीच सिरीयल बघत नाही. सरगम रिपीट टेलिकास्टच्या वेळी बघितलं.

एक इ टा तं रात्री ९ ला क्वचित लावायचे. आता तिची वेळ बदलल्याने तीपण नाही बघत.

श्रीकांत फार irritate करतोय आता. राघवचं पटतयं. हा कोण सांगणारा कोणी कुठे रहायचं, शिक्षा करणारा हा कोण?
त्यांच्याच घरात झोपायला येऊन त्यांनाच म्हणतोय मला अजिबात आवाज नकोय..!!
ह विन्या का घाबरतो त्याला एव्ह्डा?

'बन मस्का' पण बोअर.

बन मस्का मध्ये नवीन एंट्री होणारे
उर्मिला निंबाळकर
दुहेरी म्हणून एक सिरीयल होती त्याची आधीची नायिका
ती आमच्या नात्यातली म्हणून कळलं, कोण म्हणून येणार ते कळलं नाही पण बहुदा सौमित्र साठी

ओह, तो मधे २ दिवस टाईमपास दाखवला आश्रमातला त्यामुळे का? म्हणजे ही नविन एंट्री तातपुर्ती असेल. मैत्रेयी normal होई तोवर.

उर्मिला निंबाळकर >>> बॅडलक हिचं. आजारपणामुळे डबल रोल भुमिका सोडायला लागली, लीड रोल होता तिथे. ती मालिका जोरात धावतेय. मी बघत नाही पण गोठ बघताना प्रोमोज लागतात दुहेरीचे.

काव्या-राघव चं जमणार ह्या डान्स शो च्या निमित्ताने. काव्या-संदीप ची केमीस्ट्री जुळत नाही मह्णुन तो स्वतःच पार्ट्नर होईल तिचा आणि त्यांची केमिस्ट्री जुळेल.
-------------------
आता राघव च्या वाढदिवसा मुळे सुमीतची गोची. एकतर सौम्या रागवणार नाहीतर राघव.

चैत्राली +1. काव्याला पण राघव आवडायला लागलाय असं दिसतंय.
कालच सौम्याला इतके डायलाॅग दिलेले का?? मी या सिरियलमध्ये पहिल्यांदाच तिला इतकं बोलताना पाहिलं. अंजूताई म्हणते तसं तिचं मराठी कैतरी विचित्रच वाटलं मला तरी.
"ऐन टायमाला"???? असं खरंच बोलतात का कोणी?? (मला माहित नाही म्हणून विचारतेय.)

झालय नाही. परवाच्या एपी मधे झालं. त्याला आधीच कोणी आवडतं होती. तिचं लग्न दुसर्या शी होणार असताना ह्याने तिथे जाऊन गोंधळ घातला.
तरी... मग तो त्या केतकीवरुन विघ्नेशशी का भांडत होता?? हा प्र्शन आहेच.

सुमीत सौम्याशी खोटं बोलुन पार्टीसाठी थांबलाय.
आता शाल्मली पार्टीचे फोटो फेसबुक वर टाकणारे आणि सौम्या ते पाहणार.

नाही रोकडेची बायको नाहीये उर्मिला
हि कुणीतरी वेगळीच आहे
पण जी कुणी आहे तीने छान केलाय, टिपिकल गाउन, पाणी आणून देणे, भावजी म्हणणे वगैरे बारकावे परफेक्त

पण जी कुणी आहे तीने छान केलाय, टिपिकल गाउन, पाणी आणून देणे, भावजी म्हणणे वगैरे बारकावे परफेक्त.._+११११
फार गोड वाटली ती.

आता माताजी कोण आल्यात यात??
10 चा रिपिट बंद केल्या पासून मला ही सिरियल पाहताच येत नाहीये.

तो श्रीकांत शेफ आहे??
काल राघवने श्रीकांतला मुद्दाम करपलेला होता म्हणून केक दिला असं वाटलं.

काल राघवने श्रीकांतला मुद्दाम करपलेला होता म्हणून केक दिला असं वाटलं. >>> बरोबर! तसंच होतं Lol

त्या मिसेस मोरे सारख्या `बाळा, बाळा' म्हणत असतात ते फार बोअर होतं मला... (काव्या पण म्हणत असते...)

Pages