नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे फ्रेशर्सला सुरु झालेला टीव्ही तंबू पर्यंत चालतो. त्यात मग जे काही बरे वाईट असेल ते सगळे बघावे लागते. त्यातल्या त्यात त्या महाभयाण नवऱ्यची बायको, आणि शिव गौरीच्या सिरीयल बघाव्या लागत नाहीत हीच काय ती समाधानाची बाब.

तंबु साडेसातला, मग तिळ्गुळकर संपणार असेल. असो म्हणजे माझ्या भाचीने सांगितलं की सिरीयल काही महिने आहे ते खरं आहे, खरं म्हणजे उगाच वाढवतायेत पण असो भाचीबाय साठी चांगलं आमच्या. साडेसातला मी गोठ बघते. त्यामुळे तंबु नाही बघता येणार.

त्या श्रावणबाळ ला डायलॉग नाही नीट म्हणता येत. दिसायला छान. नंतर सुधारला असेल तर माहीती नाही, त्यात मला केतकी आवडायची, त्याची बॉस.

इथली चर्चा वाचली वाटत झी वाल्यांनी...लगेच त्या बावळटाला काहीतरी कुठेतरी उपयुक्त आहे असे दाखवण्याची संधी दिली.

त्यातही दार उघडणार नाही, प्लिज घराबाहेर काढू नको असा असह्य इरिटेटपणा केलाच. अरे असे कुणी हाताला धरून बाहेर काढतं का कुणी...कुठल्या युगात राहतात हे

तो कुठल्याही कोनातून भाबडा न वाटता, एक सणसणून कानाखाली लगावून द्यावा असा वाटतो

तो कुठल्याही कोनातून भाबडा न वाटता, एक सणसणून कानाखाली लगावून द्यावा असा वाटतो>>>++++१११११ मला पण त्याच्यामुळे बिचारा राघव नेहमी ओरडा खातो. राघव ने कडी लावली तेव्हा बरा जज् झालेला आणि आकांक्षाशी वागला तेव्हा ... Angry
सुम्याच्या valentine चा पन बो-या वाजवतो cafe मधे जायचं ना तेव्हा ...
बुकलून काढावा त्याला चांगला... Angry

सोमवारपासुन तंबु ७.३० वाजता असणारये मग कोणती शिरेल बंद होतीये? >>> श्रावणबाळ.
इटातं साडेसातला शिफ्ट झालीय, त्याजागी "प्रेम हे" रात्री नवाला.
काल पहिला भाग पाहिला, आवडला. पण झीकृपेकरुन नंतर पाणी घालुन कथा फुळकवणी करतीलच म्हणा.

वैभवसाठी बघावासा वाटत होता पण जानुबाय जास्त दाखवत होते, नेमका तोच सीन बघितला. मग बघावीशी वाटेना. मला सुनील बर्वे आणि वीणा जामकर आहेत त्या स्टोरीत इंटरेस्ट आहे. दोघंही आवडतात तेव्हा बघेन.

वैभवसाठी ओझीवर बघितला, पण नि रा शा झाली.. सगळ्याच पात्रांचे संवाद आणि हावभाव सगळंच शहरी आहे त्यामुळे कोल्हापूरातली कथा दाखवण्याऐवजी मुंबईतल्या चाळीत दाखवली तरी सारखीच वाटली असती.

ल.ल.लो. -
कालचा विनय-रितेश सीन आवडला.

पण ते डान्स-प्रॅक्टिस-हिरॉईन वगैरे मला जरा बोअर होतंय. (काव्या सुरूवातीला आवडली होती; पण आता तिचा अभिनय जरा खोटा-खोटा, स्नॉबिश वाटतोय. ते कॅरॅक्टरच तसं आहे का माहिती नाही, कारण पहिल्या एपिसोडपासून मालिका पाहिलेली नाही. पण बाकीचे कसे, शहरी, आधुनिक वगैरे असले तरी मराठमोळेच वाटतात, तशी ती वाटत नाही.)

बाकीचे कसे, शहरी, आधुनिक वगैरे असले तरी मराठमोळेच वाटतात, तशी ती वाटत नाही.>> +1 .
तीचे बरेचसे मराठी उच्चार पण सदोष आहेत.

मिसेस मोरे आकांक्षा आणि श्रीकांतचं जुळवून देतायत का?? काल ती बेडरूममध्ये सोडायला सांगते तर या झोप आल्याचं कारण सांगून श्रीकांतला तिला बेडरूममध्ये सोडायला सांगतात.

हो बहुदा, कारण त्यांना लक्षात आलंय कि श्रीकांत ला ती आवडायला लागलीये, विनय चे एक्सप्रेशन पण चांगले होते आणि सौम्य फारच गोड दिसते,

फ्रेशर मध्ये धुमाकूळ चाललाय, धवल आणि रेणुकाचा सिन भन्नाट, असे नर्म विनोदी प्रसंग छान वाटतात

थँक्स आशूचँप.

L3 मध्ये सौम्या मिसमॅच वाटते मला अजूनही. यामध्ये चांगले काम केलेय तिने. पण सगळ्यांच्या केमेस्ट्रीत ती वेगळी आहे हे जाणवत राहतं.

फ्रेशर मध्ये धुमाकूळ चाललाय, धवल आणि रेणुकाचा सिन भन्नाट, असे नर्म विनोदी प्रसंग छान वाटतात>> +1.

फ्रेशर मध्ये धुमाकूळ चाललाय, धवल आणि रेणुकाचा सिन भन्नाट.. +१

पण तो निरवच्या बाबतीत गैरसमज होण्याचा प्रसंग उगाच घेतालाय. परी ज्या कोणाला सांगतिये ते कोणी ऐकतच नाहीये. Lol
आता परी एक एक करत मनवालाच सांगणार निरव-सायली बद्दल. मग मनवाच्या हार्ट ब्रेक मधे २-३ एपी जाणार.

हो बळच खेचतयात, आता निरव एक लेक्चर झोडेल कि कसे त्याचे करियर हेच प्रेम आहे आणि एखादी व्यक्ती आवडणे म्हणजे लगेच प्रेम नाही वगैरे वगैरे.
तो प्राध्यापकच व्हायचा, चुकून स्टुडंट झाला

L3 मध्ये सौम्या मिसमॅच वाटते मला अजूनही. यामध्ये चांगले काम केलेय तिने. पण सगळ्यांच्या केमेस्ट्रीत ती वेगळी आहे हे जाणवत राहतं. >>>>>>> असू द्या हो, मला आवडली ती, काव्य पेक्षा

Lol आशुचाम्प.

डायलॉग म्हणते का नीट ती सौम्या आता. ती आली आणि मी सिरीयल सोडली आधीच्या अनुभवावरून Wink

सौम्या म्हणजे अक्षया गुजर तिच्या पहिल्या सिरीयलमध्ये ण च्या ऐवजी न बऱ्याचदा म्हणायची जाणवण्याइतपत. मी प्रमाण भाषाच बोलावी ह्या मताची नाही पण तिच्या घरातले सगळे प्रमाण मराठी बोलायचे त्यात तिचं बोलणं फार खटकायचं, मग तिला बदलली आणि दुसरीला घेतली त्या सिरीयलमध्ये. ती सिरीयल पण तशी अतिच होती पण आमचे जावईबापू तिचे बाबा झालेले त्या सिरीयलमध्ये म्हणून मी थोडे दिवस बघितली, त्यांच्यासाठी.

आशुचँप Lol

तो प्राध्यापकच व्हायचा, चुकून स्टुडंट झाला>> हो ना बघावं तेव्हा लेक्चर देत असतो. रेणूका त्याला फोन करते. वेगळ्या नावाने तेव्हाही लेक्चरच देतो तिला. Lol

निरव-सायली बद्दल. . >>>> हे कधि झाले ...>> सायलीच्या डायरीत नीरव बद्दल स्पेशल फिलिंग्ज वगैरे लिहिलेलं असतं नि ते परी वाचते.

मला काव्याच आवडते, तिच्या snobbish attitude मुळेच कदाचित.
सौम्या फार बोअर करते.

काल-परवा ९ च्या कार्यक्रमात ऊर्मिला कानिटकरने ते काय प्रकारचे कपडे घातले होते. बंडल होते.
'पयलं नमनची' बद्द्लेली चालपण नाही आवडली.खुप गडबड गोंधळ वाटला.

ऊर्मिला कानिटकरने ते काय प्रकारचे कपडे घातले होते. बंडल होते.>> अरे मी इतक्या बारकाईने बघत होते तिने काय घातलंय ते पण मला शेवटपर्यंत कळलं नाही. आधी नऊवारी वाटली मला पण कैतरी वेगळाच प्रकार होता. नि फिटींग पण नव्हतं धड. ढगलं होत होतं तिला.

काल-परवा ९ च्या कार्यक्रमात ऊर्मिला कानिटकरने ते काय प्रकारचे कपडे घातले होते.>>
हो ना..
'सरगम' नाव आहे कार्यक्रमाचं. आज टायटल्स पाहिली कार्यक्रमाची.. कोठारे निर्माते आहेत

Thanks Nidhi.

म्हणजे अजुन निरव कडुन कळायचे बाकी आहे का की तो कुणावर प्रेम करतो, मनवा की सायली

नीरवने स्पष्ट नाही सांगितले अजून पण रेणूकाला त्याच्या बॅगमध्ये फोटो मिळतात सायली, परी आणि मनवाचे त्यात मनवाच्या फोटोमागे लाल दिल काढलेलं असतं. पण ते रेणूकाला दिसत नाही. Happy
मनवाला तो मुलगा प्रपोज करतो तेव्हा ही नीरवच्या चेहर्यावरचा रंग उडतो.

Pages