नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोकडेचे लहानपणीच बबली बरोबर लग्न ठरलेले असते पण त्याला बबली आवडत नसते. जेव्हा तिचे लग्न ठरते तेव्हा तो खुष होतो आणि गावाला जातो. तेथे गेल्यावर त्याला कळते कि शेंबडी बबली आता शेंबडी नाही तर सुंदर झाली आहे. मग तो तिच्याशी लग्नाला तयार होतो.

आज श्रीकांत अतीच करणारे. तुला लाख राग आल असेल, पण वयाने मोठ्या व्यक्तीला असं कोण सांगतं, बुटांवरचे डाग पुसुन द्या म्हनुन? आता ही विन्या गप्प बसणारे का आणी त्याची आई?
मागे राघव ने चेष्टा केली होती त्याच्या वडिलांची तेंव्हा कीती चिड्ला होता त्याच्यावर.

काय वाटेल ते चाललंय तंबू मध्ये
लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला कोण कॉटेज देत का?
आणि एखाद्या व्यक्तीला किडनॅप केलं आहे तर सुटल्यावर तो पहिले काय करेल, फोन करेल कोणाला तरी का बस रिक्षा चे धक्के खात घरी येईल.

बन मस्का मध्ये सौमित्र चा फ्रस्ट्रेशन खरं वाटत अगदी

तो त्याचा पेशन्ट एक धमाल माणूस आहे, मला कोणतरी म्हणलं तो अमृता सुभाष चा नवरा

तो त्याचा पेशन्ट एक धमाल माणूस आहे, मला कोणतरी म्हणलं तो अमृता सुभाष चा नवरा>> +1.
हो तो अमृताचा नवरा आहे. संदेश कुलकर्णी. या सिरियलच्या लेखक की संवादलेखकापैकी तो एक आहे.
एलतिगो मध्येही होता तो. काही भागांचं दिग्दर्शन सुद्धा केलेलं त्याने. मस्त क्रिएटिव्ह आहे.

आज श्रीकांत अतीच करणारे. तुला लाख राग आल असेल, पण वयाने मोठ्या व्यक्तीला असं कोण सांगतं, बुटांवरचे डाग पुसुन द्या म्हनुन? आता ही विन्या गप्प बसणारे का आणी त्याची आई?>> बहुतेक राघव बुकलणार त्याला. आणि तेच करायला पाहिजे.

एल्टीगो मध्ये त्याला फार रोल नव्हता का? इथे त्याने अगदी धिंगाणा केलाय, सौमित्र लग्न ठरल्याचे सांगतो तेव्हा, आणि पडद्या मागे झोपलेला असतो तेव्हा, अजून आठवलं तरी हसायला येत

'बन मस्का'मधली ती माताजी केतकी थत्ते आहे.

बन मस्काची मुख्य स्टोरीलाईन बोर झाली पण आता. त्या सौमित्र मैत्रेयीचं शंभरदा ब्रेकअप, पुन्हा लग्न करायचंच म्हणून तयारी, पुन्हा तिसरंच काहीतरी ... या मुख्य जोडीपेक्षा इतरांचेच ट्रॅक्स जरा बरे वाटतात.

'लव्ह लग्न लोचा'मध्ये तो विनय अखंड घाबरत, चाचरत बोलण्यामुळे फारच डोक्यात गेला आहे.

एल्टीगो मध्ये त्याला फार रोल नव्हता का? >>> मोठा रोल होता कि, गावातून पळून लग्न केलेला गणिताचा शिक्षक, त्याला आणि त्याच्या बायकोला उमेश कामतच्या घरी मोठा भाऊ आणि वहिनी म्हणून ठेवतात.

'बन मस्का'मधली ती माताजी केतकी थत्ते आहे.>>> हा हा बरोबर. फार केमिकल लोच्या झालाय डोक्यात माझ्या.

काय वाटेल ते चाललंय तंबू मध्ये>>> वेळ बदलल्यापासून फिरकले नाहीये तिथे.

त्या विन्याच्या तर ना...वडीलांचा असा अपमान होताना बघून कुणाही पेटून उठला असता. कसलं पुळचट ध्यान आहे..त्याच्यापेक्षा राग राघवलाच आला होता. मला वाटलेल एक हाणेल कानाखाली

एक त्याच्या आणि एक विन्याच्या पण

पुपो मधे ऑलीव ऑईल पडलेलं आहे फ्युजन म्हणुन. आज बघू श्रीकांतच कसं हसं होतं ते Lol
ग्लोव्ज घालुन पुपो लाटायच्या?
ते काका कधी परत येणार? ते आले की बरोबर सरळ करतील श्रीकांत ला. त्यांच्या नसण्याची भरपाई विन्याच्या बाबांच्या येण्याने भरुन काढ्तायत का?

काय वाट्टेल ते चाललंय, प्रिन्सिपल च्या केबिन ला ते नसताना लॉक नसतं, आजूबाजूला शिपाई नसतो, किती ते ओव्हर करायचं.
सम्राट आणि ती हिंदी वालीचा सिन मस्त जमलाय पण,
आधे घंटेसे रंग लागा राहे हे

अरे हो, यीस्ट सुध्दा..

फ्रेशर्स मी नाही पाहिलं, नीरव- मनवा- सायली ट्रँगल घुसवल्यापासुन.

सम्राट आणि ती हिंदी वालीचा सिन मस्त जमलाय पण,
आधे घंटेसे रंग लागा राहे हे>> हो. सम्राटने अॅक्टींग मस्तच केली भांग प्यायल्या वरची. डोळे तर खरंच मस्त केले होते झिंगल्यासारखे.
काजल पण छानय. मला खूप आवडते. तिचे डोळे खूप छान आहेत हरिणीसारखे.

ब-याच दिवसांनी ओझीवर बघितला इ टा तं चा एपिसोड. केतकी चितळे दिसली त्यात. ती बरी वाटतेय त्या आधीचीपेक्षा कपिलला. एनिवे कंटाळा आला बघायला मात्र. हल्ली नाही बघत ते बरं असं वाटलं. ते टायमिंग बदलल्याने घोळ झाला, नऊला होती तेव्हा मधे मधे बघितली जायची.

ल.ल.लो.मध्ये होळी-पुरळपोळीचा टाईमपास चालू आहे. श्रीकांत रंग न खेळण्याची वगैरे अट घालतो, तर हे तिघं अभि-शाल्मलीच्या किंवा काव्याच्या घरी जाऊन, रंग खेळून, तिथेच आंघोळ करून येऊ शकत नाहीत का? Uhoh

सर्वांसाठी पुरणपोळ्या करून शिवाय शाल्मलीला निवांत बीन-बॅगवर बसून गप्पा टाकायला वेळ मिळाला याबद्दल तिचे पाय धरावेसे वाटले मला... Proud

ललिता-प्रिती, सगळ्याला +१.. Proud
आज नाहीतरी रंग खेळणारच आहेत, स्वतःच्याच घरी. पण उगाच पाणी वाचवायच्या गप्पा कशाला?

सुक्या रंगाने खेळणार आहेत ते.
पण मला एकच प्रश्न पडलाय. हे लोक असे घरात कसे काय रंग खेळू शकतात?? Uhoh घरातल्या वस्तू रंगाने खराब नाही का होणार??? अगदी भिंती, फरशी, इतर वस्तू वाट लागेल सगळ्याचीच. आणि हे एवढं सगळं साफसूफ करायला किती कष्ट पडतील?? मला तर घरात कोणी पायाला माती लागून आलं तरी चिडचिड होते. Angry

अरे हि कुणीतरी भलतीच बाई आलीये बन मस्का ला, मला वाटलेलं उर्मिला ची एंट्री होईल.
त्या आधी तंबू मध्ये ती मुलगी कसली फाडफाड बोलते त्या कपिल ला, एकच नंबर

तंबू मध्ये >>> केतकी चितळे आलीय ना. एकापेक्षा एक पहील्या सिझनला होती, डान्सर आहे. मग आंबट गोड सिरीयलमधे होती स्टार प्रवाहच्या, त्या सक्षम कुलकर्णीची बायको म्हणून.

अरे हि कुणीतरी भलतीच बाई आलीये बन मस्का ला... ही नाही का उर्मिला?
तरी जे चाललय ते बोअरच आहे..

काल 'लव लग्न..' मधे हे सगळे घर साफसुफ करुन + आंघोळी करुन एव्ह्ड्या कमी वेळात पत्ते खेळायला कसे बसले?

अन्जू ची ph.dच असते सगळ्या सिरीयल्स वर.

काल 'लव लग्न..' मधे हे सगळे घर साफसुफ करुन + आंघोळी करुन एव्ह्ड्या कमी वेळात पत्ते खेळायला कसे बसले? >>> हो ना! Lol

कालचा 'असंस्कारभारती' संवाद त्यातल्या उत्स्फूर्ततेमुळे आवडला.

श्रीकांतचं अ‍ॅक्टिंग एकसुरी होत चाललंय. फार तोंडातल्या तोंडात बोलतो तो. (का.दि.प.मध्ये आवडला होता; इथे नाही आवडला फारसा.)

अन्जू ची ph.dच असते सगळ्या सिरीयल्स वर.>>> Lol तरी फार कमी सिरियल्स बघते. अगं चैत्राली सोर्सेस आहेत माझे. आंबट गोड नंतरचे काही भाग माझ्या धाकट्या बहिणीच्या मित्राने डायरेक्ट केले होते. त्याने बहिणीला कळवले, बहिणीने मला मग त्याच्यासाठी काही बघितले. नाहीतर नव्हते बघत ती सिरीयल.

Pages