क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक आता पाहिली, तोच शॉट.
मी पाहिल्या पाहिल्याच व्हॉटसप ग्रूपवर पोस्ट केलेले.. अरे याने काय हे पोराला कडेवर उचलून घेतल्यासारखा सिक्स मारला..

मी हाईटबद्दल नाही तर लेंथ बद्दल बोलत आहे. अश्या लेंथच्या बॉलला असा फटका फक्त अंडरआर्ममध्येच शक्य आहे.. >> कसा काय रे बाबा ? तो जवळपास शॉर्ट ऑफ द लेंग्थ बॉल होता. अंडर आर्म मधे त्या टप्प्यावरून असा बाउन्स कसा शक्य आहे ? तोही बॉल स्लो असताना ? हे कळत नाही.

केदार ने सामन्याचा रंग पालटला.. त्यामुळे कोहली सहज खेळू शकला! >> हे मान्य. मॉर्गन म्हणाला कि कोहलीला strike न देण्याचा डाव होता पण केदार (ज्याडव - कर्टसी मांजरेकर नि शास्त्री) ज्या तर्‍हेने खेळला त्यामूळे हा डावपेच अंगाशी आला.

फेफे. धवन, युवी नि जाडेजा असे तिघे घेण्यामागे बहुधा लेफ्ट राईट काँबो ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. हे सगळे ठिक आहे जेंव्हा तिघांमधले दोघे तरी खेळतील. नाहितर सगळी बोंब. रोहित शर्मा परत येण्याची गरज आहे.

अश्विन टेस्ट मधे effective झाल्यापासून लिमिटेद ओव्हर्स मधे झगडतोय असे वाटतेय

अंडर आर्म मधे त्या टप्प्यावरून असा बाउन्स कसा शक्य आहे ?
>>>
तेच तर, तिथे असा बाऊन्स शक्यच नाही. बॉल पट्ट्यात येतो आणि समोर असा मारता येतो. अन्यथा या बाऊन्सला कठीणच.
थोडे स्पष्टीकरण देतो. आम्ही अंडरआर्म क्रिकेट एका सरळसोट गल्लीत खेळलो आहोत. तिथे आजूबाजूला मारले तर पत्र्यावर बॉल जाऊन वन डी मिळायची. किंवा अडकला पत्र्यावर तर बाद. त्यामुळे कंपलसरी समोरच मारा. त्यामुळे हट्टाने प्रत्येक लाईन लेंथचा बॉल समोरच मारला जायचा. म्हणून मला तो शॉट बघून आमचे गल्ली अंडरआर्म क्रिकेट आठवले. कोणीतरी त्याला समोरच मार रे बाबा असे दटावल्यासारखे. त्याने तो मारलाही ती वेगळी कमाल झाली.

रोहित शर्मा परत येण्याची गरज आहे.
>>>
अश्याच खेळपट्ट्या असतील तर नितांत गरज आहे. ३५० चे टारगेट आणि आपल्या ४ विकेट ६०-६५ धावात गेले तेव्हा मला तोच पहिला आठवला.
काही फलंदाज असतात जे अश्या मोठ्या टारगेटलाही निवांत खेळतात. एकदा सेट झालो की आपण हवे तितके सहज मारू हा विश्वास त्यांच्याकडे असतो. रोहीत अश्यापैकी आहे. मोठे टारगेट चेस करतानाचा एक की प्लेअर आहे तो.

अरे, तुम्ही हा शॉट विसरलात का? - https://youtu.be/MYtOqXo6etU?t=5m51s त्याबरोबर अजून एक - https://www.youtube.com/watch?v=MElL2pEr9lI

मला माहीत आहे लेंग्थ सेम नाहीये, पण प्रिन्सिपल सेम आहे, आर्म्सची पॉवर. स्पेशली दुसरी लिंक. नथिंग टू टेक अवे फ्रॉम कोहली, ऑफ कोर्स, पण मला तो शॉट बघून हेच आठवले लगेच. Happy

भा, मला आर्म्स पॉवर पेक्षा त्या लेंग्थला तो शॉट (जवळजवळ) सरळ खेळलाय ह्याचे अचाट कौतुक वाटतेय. फुल लेंग्थ किंवा गूड लेंग्थ बॉलवर सरळ मारणे तुलनेने सोपे वाटते. कंबरेच्या वर आलेल्या बॉलला समोर मारणे तेही बॅट जवळजवळ व्हर्टीकल ठेवून हे समजत नाहि. बरं पुल म्हणण्यासारखा पण प्रकार नाहिये तो. बॅट उभी ठेवून जॅब केल्यासारखा. स्लो बॉल असल्यामूळे पेस वापरला वगैरे arguments पण नाहित. शॉटची हाईट बघितली तर अशक्यच वाटते. अगदी वॉर्नर नि गिलक्रिस्ट्ला ला कॉम्प्ल्क्स येईल. मला वोक्स चे वाईट वाटले राव.

ऋ आम्हीही अंडरआर्म सरळ गल्लीतच खेळलोय पण असा बाउन्स चा प्रश्न कधीच आला नाही. मूळात अंडरआर्म म्हटल्यावर सगळे फुल ते गूड लेंग्थ मधेच असायचे. कधी फास्ट अंडरआर्म खेळलो तरी कंबरेवर बॉल उडवल्याचे आठवत नाही. ओवराआर्म खेळताना बाउन्स येत असे तेव्हढाच पण तो सरळ बॅटने आजूबाजूला डॅब करण्याची सवय होती. नंतर उगाच समोरचे ग्राउंड बॅटने ठोकायचे Wink खर तर आता विचार केला तर टूर्नामेंट मधे कधिही कोणि बाउन्सर किंवा शॉर्ट बॉल वापरल्याचे आठवत नाही. सगळे ववार युनूस असल्यासारखेच पायात असायचे पण प्रॅक्टिस च्या वेळी सगळ्यांच्या अंगात काय यायचे देव जाणे.

दुसर्‍या लिंकमधील शॉट आधी पाहिला नव्हता. शेनवॉर्नला मारल्यासारखे मारलेय. फक्त ईथे बॉलरने फॉलो केल्यानंतर अ‍ॅडजस्ट केलाय शॉट..

कटक ला भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत का? भुवनेश, पांडे, रहाणे, मिश्रा ही लोकं तंबूत आहेत. एकाच मॅच नंतर लगेच बदल होईल असं वाटत नाही. कारण न-परफॉर्मर्स ची नावं वलयांकित आहेत. ते लौकिकाला जागण्याची अपेक्षा आहे.

केदार जाधव परवा अप्रतिम खेळला हे खरच. पण मिडीया तिथेच अडकून पडलीये. त्याच्या मुलाखती, त्याच्या आई-वडिलांच्या मुलाखती, मित्र-मंडळाच्या मुलाखती ह्या सगळ्याची रेलचेल आहे. मला हृषिकेष कानिटकर च्या त्या चौकारानंतर सकाळ ने वगैरे पहिल्या पानावर असा सोहळा केला होता, त्याची आठवण झाली. कौतुक होतय हे चांगलय. त्यातून त्याला सातत्याने खेळण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा.

तो कानिटकर त्या चौकारासाठी आणि जोगिंदर शर्मा त्या वर्ल्डकप विकेटसाठी ..

जाधवची इनिंग होती अख्खी, ती यात मोजता येणार नाही. पण येस्स ही तर सुरुवात आहे. आधीही त्याने अपाल्यातले टॅलेंट आणि पोटेंशिअल दाखवले आहे, फक्त काल मजबूत कॅश झाले. असेच होत राहावे.

यंदा जाधव पूर्ण सीझन खेळेल RCBकडून.... मागच्या सीझनला पहील्या मॅचमधल्या हाराकिरीनंतर काही मॅच त्याला बसवून सर्फराजला खेळवले होते कोहलीने
आता मात्र चांगली मर्जी बसली असेल त्याचावर कोहलीची!

Right Decision if MS Dhoni Doesn't See Himself in 2019 World Cup: Rahul Dravid

फेफ.... आज खुश तो बहोत होगे तुम!

"फेफ.... आज खुश तो बहोत होगे तुम!" "आज फे फे इथे नसेल. तो नवस फेडायला गेला असणार :D" - Happy

माझं काही वैय्यक्तिक वैर नाहीये धोनीशी. स्वरूप च्या च कॉमेंट चा धागा पकडून ईतकच म्हणता येईल की, 'मै धोनी से ईतनी नफरत नही करता जितनी क्रिकेट से मोहोब्बत करता हूँ"

"Right Decision if MS Dhoni Doesn't See Himself in 2019 World Cup: Rahul Dravid" - बाय द वे, ही कुठे आलय?

नफरत वगैरे नसते हो. मतभेद. केवळ मतभेद.
वैयक्तिक काही नसते, ज्याला जसे दिसते तसे तो वर्णन करतो, निष्कर्ष काढतो.

अहो झक्की, ते 'लोहे को सिर्फ लोहा काटता है' टाईप्स स्वरूप च्या दीवार मधल्या ड्वायलॉक वर डॉन चा एक ड्वॉयलॉक होता. बघा, ह्यात सुद्धा शोले चा एक येऊन गेला. Wink

छ्या, ह्या नवीन मायबोलीवर स्मायलीज कधी सुरू होणार आहेत? Wink

फे फे मला वाटते कि धोनी as a finisher batsman म्हणून अजूनही उपयुक्त आहे. त्या कामासाठी जे कोणि आहेत त्यामधे तो सरस आहे. मी हे भारताबाहेरच्या मॅच्स डोक्यात ठेवून बोलतोय. तिथे लागणारा power game तोच करू शकतो. पंत कदाचित उपयुक्त ठरेल पण सध्या तरी अजून कोणी वाटत नाही.

कालच्या इनिंग मध्ये तरी, धोणी काहीतरी प्रुव्ह करायचे आहे, अश्या अर्विभावात प्रत्येक बॉलला खेळत होता. माझ्यामते नं ४ किंवा ५ वर आल्यावर धोणीने पहिले काही बॉल त्याच्या सध्याच्या शैलीत खेळावे अन हळूहळू आक्रमक व्हायला सुरूवात करावी, ट्रान्झिशनला वेळ द्यावा.

धवण सध्यातरी नॉन परफॉर्मिंग असेट कॅटेगरीमध्ये मोडतोय. आजची मॅच नीट खेळायला हवी.

युवराज - धोनी जबरदस्त खेळले.

असामी, गेल्या वर्षभरात धोनी बर्याच वेळा मॅच संपवू शकला नाहीये. आत्ता पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे फ्लोरिडात झालेली टी-२०. त्यामुळे, भविष्यकाळात फिनीशर म्हणून त्याचा रोल मला तरी डळमळीत वाटतो. ४ किंवा ५ क्रमांकावर कदाचित अजुन काही दिवस तो खेळू शकेल.

प्रत्येक ओव्हर ला बाऊंड्री देणं थांबवलं पाहीजे. नाहीतर शेवटच्या ५ ओव्हर्स मधे १० च्या रनरेट ने धावांचा पाठलाग करणं ह्या टी-२० च्या जमान्यात अशक्य नाही.

"धोनी as a finisher batsman म्हणून अजूनही उपयुक्त आहे." - अजुन एक महत्वाचा बदल गेल्या दोनेक वर्षात झालाय म्हणजे वेगवेगळ्या टी-२० लीग्स खेळून शेवटच्या ओव्हर ला १०-१५ रन्स डिफेंड करणं ही बॉलर्स साठी सुद्धा नित्याची बाब झालीये. त्यामुळे धोनी चं शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच खेचून बॉलर ला प्रेशर खाली आणायची क्लृप्ती कमी परिणामकारक ठरायची शक्यता आहे.

दोन लेफ्ट हँडर्स बॅटींग करत असल्यामुळे बहुदा जाधव बॉलिंग करतोय. पण तो रेग्युलर बॉलर (अगदी रणजी मधे सुद्धा) नाहीये आणी प्रत्येक ओव्हर मधे एक बाऊंड्री देतोय. युवराज कदाचित जास्त चांगला बॉलिंग ऑप्शन आहे.

मस्त जिंकले!! भुवनेश ने अप्रतिम बॉलिंग केली. युवराज, धोनी ची बॅटींग आणी अश्विन, जडेजा आणी भुवनेश ची बॉलिंग कमाल होती. पुढच्या मॅच मधे धवन च्या जागी रहाणे खेळेल का?

जबरी गेम. शेवटच्या काही ओव्हर्स काम सोडून टीव्ही समोर जाउन बसलो Happy

युवी टोटल रिस्पेक्ट!

त्यामुळे, भविष्यकाळात फिनीशर म्हणून त्याचा रोल मला तरी डळमळीत वाटतो. ४ किंवा ५ क्रमांकावर कदाचित अजुन काही दिवस तो खेळू शकेल. >> फे फे मी फिनिशर म्हणजे ह्याच क्रमांकावर ग्रुहित धरत होतो. थेट बेव्हन सारखे नाही. विशेषतः जाधव चे स्किल्स बघता तो धोनीच्या खाली येणे जास्त पटतेय. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच खेचणे कमी होईल आता असे वाटतेय.

इंग्लंड मधे खेळत असल्यामूळे राहाणे सलामीला असावा असे वाटतेय. बहुधा पुढच्या मॅचमधे त्याला ट्राय करतील.

युवी हाच फॉर्म पुढे चालू ठेवेल का हा खरा प्रश्न आहे.

Pages