Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युवराज खेळतो तेव्हा मजा येते
युवराज खेळतो तेव्हा मजा येते त्याचे स्ट्रोक्स बघायला. समोरच्या संघाला सळो की पळो करून सोडतो, बॉलर्सचे मनोधैर्य खच्ची करून टाकतो.
मागच्या सामन्यात ४ विकेट नंतर जाधवने केलेला काऊंटर अॅटेक आणि आज ३ विकेट गेल्यावर युवराजचा... अगदी फिलिंग ऑस्ट्रेलियन होऊ लागलेय
"इंग्लंड मधे खेळत असल्यामूळे
"इंग्लंड मधे खेळत असल्यामूळे राहाणे सलामीला असावा असे वाटतेय." - रहाणे सारखा प्लेयर टीम मधे नेहमीच असावा असं मला वाटतं. त्याच्याकडे सर्व प्रकारचा खेळ आहे. थोडं बहरायची संधी मिळाली तर तो संधीचं सोनं करेल असं मला वाटतं.
"युवी हाच फॉर्म पुढे चालू ठेवेल का हा खरा प्रश्न आहे." - युवराज ला खेळताना पाहून नॉस्टॅल्जिक वाटतं. त्याला चाहत्यांचं प्रेम आणी पाठिंबा नेहमीच लाभलाय (सुरूवातीला सुद्धा, त्याचे व्रात्यपणाचे किस्से वाचल्यावर, 'जाऊ दे, पण केनिया मधे ऑस्ट्रेलिया आणी द. अफ्रिकेला कसला धूतला होता' असा एक सॉफ्ट कॉर्नर असायचा). पण कळीचा मुद्दा हा आहे की जर फास्ट / बाऊन्सी विकेट असेल, चांगला बॉलिंग (पेस - स्पिन) असेल, किंवा बॉल ला स्विनंग मिळत असेल, तर त्याच्या खेळावर खूप मर्यादा येतात. त्याच्या जागी मनिष पांडे / करूण नायर सारखे युवा खेळाडू लवकरच पुढे येतील. मला वाटतं, ते नॅचरल ट्रान्झिशन असेल.
जाधव चे स्किल्स बघता तो
जाधव चे स्किल्स बघता तो धोनीच्या खाली येणे जास्त पटतेय >>
पण जर २०१९ साठी टीम घडवायची असेल तर केदार जाधवला बॅटिंगची जास्त संधी मिळायला हवी. युवी आल्यामुळे धोणी ४ नं ला येऊ शकत नाही, त्यामुळे केदार ६ ला गेला. मला धोणी २०१९ मध्ये खेळेल असे वाटत नाही.
२ वर्षे आहेत रे अजुन....
२ वर्षे आहेत रे अजुन.... तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल!
मला धोणी २०१९ मध्ये खेळेल असे
मला धोणी २०१९ मध्ये खेळेल असे वाटत नाही. >> well त्याने अजून काहीच स्पष्ट केलेले नाहिये. मिवड समिती/कोहली/कुंबळे ह्यांना तो निर्णय कधितरी घ्यावा लागेल. सध्या तरी फोकस फक्त चँपियन्स ट्रॉफीपुरताच मर्यादित आहे.
पण कळीचा मुद्दा हा आहे की जर
पण कळीचा मुद्दा हा आहे की जर फास्ट / बाऊन्सी विकेट असेल, चांगला बॉलिंग (पेस - स्पिन) असेल, किंवा बॉल ला स्विनंग मिळत असेल, तर त्याच्या खेळावर खूप मर्यादा येतात.
>>>>
अश्या खेळपट्ट्या हल्ली वनडे मध्ये असतात कितीश्या
अश्या खेळपट्ट्या हल्ली वनडे
अश्या खेळपट्ट्या हल्ली वनडे मध्ये असतात कितीश्या >> भारतात नाही पण बाहेर असतात ना.
"अश्या खेळपट्ट्या हल्ली वनडे
"अश्या खेळपट्ट्या हल्ली वनडे मध्ये असतात कितीश्या" - घे पोल, काढ धागा!
पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया वन-डेज पहातोयस का? स्विंग विकेट मधे नसतो, तो हवेत असतो आणी ईंग्लंड च्या हवेत तो नॅचरली मिळतो. बाऊन्स (स्किड होणं सुद्धा) बर्यापैकी मातीच्या गुणधर्मावर अवलंबून असतं (उदा. ऑस्ट्रेलिया / द. अफ्रिका)
नसतातच मी कुठे म्हणालो.
नसतातच मी कुठे म्हणालो.
कितीश्या असतात.
भारतात तर आता नसल्यातच जमा. भारतीय उपखंडातही प्रमाण कमी. कुठे स्विंग असल्यासही तो युवराज येईपर्यंत गायबला असतो.
निम्म्यापेक्षा जास्त सामने आपण भारतात, भारतीय उपखंडात खेळतो.
बाहेरच्या देशात म्हटले तर झिम्बाब्वे सोडून द्या, विंडिजच्या तर आता संथ असतात. न्यूझीलंडच्या अश्याही कोणाला झेपतील याची शाश्वती नसते.
म्हणजे ईंग्लंड आफ्रिका ऑस्ट्रेलिया हेच तीन देश.
आणि हल्ली या देशांमध्येही वनडेत फलंदाजधार्जिण्या खेळपट्ट्या बनवायचे प्रमाण वाढलेय. सकाळी मिळणारा स्विंग दुपारी सुरु होणार्या डे नाईट सामन्यात कमी होऊ लागलाय. मर्यादीत षटकांचे क्रिकेट बदलत चाललेय.
रहाणे सारखा प्लेयर टीम मधे
रहाणे सारखा प्लेयर टीम मधे नेहमीच असावा असं मला वाटतं. त्याच्याकडे सर्व प्रकारचा खेळ आहे. थोडं बहरायची संधी मिळाली तर तो संधीचं सोनं करेल असं मला वाटतं. + १
कटक मॅच आधी खालच्या लिंकवरचा लेख वाचनात आला. दुर्दैवाने त्या लेखातल्या मतांशी सहमत व्हावं लागतंय. एका गुणी खेळाडूचं भवितव्यच जणू इतर कोणा ना कोणाच्या फिटनेस वर अवलंबून राहिल्यासारखं झालंय.
http://www.espncricinfo.com/india-v-england-2016-17/content/story/107829...
धोनीने नमूद केलेला राहाणॅच्या
धोनीने नमूद केलेला राहाणॅच्या बॅटींगचा प्रॉब्लेम खरा आहे ह्यात शंका नाही त्यामूळे त्याच्या आजूबाजूचे प्लेयर कसे खेळताहेत ह्यावर त्याचे असणे वा नसणे ठरत राहणार. त्याला इलाज नाही. जर १ वर रोहित नि ३ वर कोहली भन्नाट खेळत राहिले तर २ नंबर वर राहाणे परफेक्ट फिट होईल. रोहित सुरूवातीला स्लो खेळतो तेंव्हा राहाणे तो स्लॅक भरून काढू शकेल नि नंतर राहाणे स्लो होउ लागला कि तोवर रोहित पिकप करू शकेल.
वेल प्लेड केदार जाधव.
वेल प्लेड केदार जाधव. थोडक्यात हारले. ४ बॉल्स मधे ६ पासून काढायला हवी होती. अनुभव कमी पडला कदाचित. तिसर्या - चौथ्या बॉल्सवर २-२ रन्स घेऊन बॉलर वर प्रेशर टाकायचा प्रयत्न कदाचित जास्त यशस्वी ठरू शकला असता. डॉट बॉल्समुळे बॅट्समन वर प्रेशर आलं. अर्थात बोलणं / लिहीणं सोपं आहे.
शेवटच्या ओव्हर मधल्या त्या
शेवटच्या ओव्हर मधल्या त्या दोन ६ आणि ४ वाल्या शॉट्स नंतर केदार जाधव ने इंग्लंड ला शट आउट केले आहे असे वाटले होते. पण नंतर जमले नाही. अनुभव कमी असल्यामुळे असेल.
एकूण मस्त गेम.
कालची मॅच छान झाली पण!
कालची मॅच छान झाली पण!
केदार खरोखर छान खेळला! समोर विकेट शिल्लक नसल्याने त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला!
कालची मॅच आपण बुमरामुळे हरलो.
कालची मॅच आपण बुमरामुळे हरलो. ३५ ते ४२ ओव्हर्स मध्ये पंड्या अन कंपनीने चांगला रोक लावला होता. २९०-९५ होतील असे वाटत असताना, बुमराच्या लाईन अन लेंथ अन फुलटॉस बॉलिंगवर चांगल्याच धावा गेल्या अन मग परत ३२० चे टारगेट सहज शक्य झाले. जर पंड्याच्या त्या चार ओव्हर्स चांगल्या पडल्या नसत्या तर हेच ३२० अगदी ३४० पण झाले असते असे मानण्यास वाव आहे.
आपल्याला CT मध्ये बॉलिंगचा प्रॉब्लेम येणार आहे असे वाटते. बुमराच्या जागी शामी हवा.
बॅटिंग मध्ये आता आपल्याला ओपनिंगचा प्रॉब्लेम परत आला आहे असे दिसते. रोहित हवाच. रहाणेला अजून एक दोन संधी मिळायला हव्यात. पण रहाणे कुठे खेळणार हा प्रॉब्लेम आहे. केदार जाधवने त्याची गोची केली आहे. आता ६ नंला केदार परफेक्ट आहे.
फलंदाजीमधे आतां भरपूर अतिशय
फलंदाजीमधे आतां भरपूर अतिशय चांगले पर्याय उपलब्ध आहेत, ही बाब चांगली असली तरीही त्यामुळे प्रत्येक सामन्यातल्या कामगिरीवरून पुढच्या सान्मन्यात बदल करण्याचा म्मोह आंवरणं आवश्यक आहे; स्पर्धा आवश्यक असली तरीही प्रत्येक खेळाडू सतत अनिश्चिततेच्या दबावाखाली असणंही टाळलं जावं. सध्याचा आपला संघ अतिशय संतुलीत व गुणवत्तेने खच्चून भरलेला आहे याचा पुरेपूर व दीर्घकालीन लाभ करून घेणं हीच आतां खरी कसोटी असावी .
त्यामुळे प्रत्येक
त्यामुळे प्रत्येक सामन्यातल्या कामगिरीवरून पुढच्या सान्मन्यात बदल करण्याचा म्मोह आंवरणं आवश्यक आहे; स्पर्धा आवश्यक असली तरीही प्रत्येक खेळाडू सतत अनिश्चिततेच्या दबावाखाली असणंही टाळलं जावं. >> हे नक्की कशाबद्दल बोलता आहात भाउ ?एदोन जागा वगळता ९ जण तीन्ही सामने खेळले. त्या दोन जागांमधली एक जागा दोन सामन्यांमधे एकाच खेळाडूने घेतली. ओपनिंग चा तिढा सुटत नाही तोवर एखादा बदल तरी होणारच असे वाटतेय. टी २० मधे पंत किंव मनडिप ओपन करून चांगले चांगलेतर सगळाच गुंता होईल
दुसर्या मॅच मधल्या पहिल्या
दुसर्या मॅच मधल्या पहिल्या काही ओव्हर्स मधले स्विंग सोडले तर टोटल बॅटिंग फ्रेण्डली पिचेस होती. तरीही तिन्ही मॅचेस मधे पहिले ४/५ लौकर आउट झाले. कोहली-जाधव, युवी-धोनी आणि जाधव-पंड्या यांनी मोठ्या भागीदारी केल्या.
इडन गार्डन्सची पिच नक्की काय
इडन गार्डन्सची पिच नक्की काय होती ते क्युरेटरलाही माहिती नसावे. बरेचदा अन इन्व्हन बाउंस वाटला. आणि ग्रास असूनही हवा तसा फायदा बॉलर्सला मिळाला नाही.
शिवाय व्हाईट बॉलचा काही राडा होता की काय ते कळले नाही. बॉल फक्त पहिल्या चार ओव्हर स्वींग झाला. ( म्हणजे प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक बॉल केवळ दोनच ओव्हर) असे पूर्वी कधी बघितले नाही. ७-८ ओव्हर्स जनरली स्वींग होतो.
ईराणी ट्रॉफी ची मॅच मस्त झाली
ईराणी ट्रॉफी ची मॅच मस्त झाली. गुजराथ जिंकेल असं पहिले ३.५ दिवस वाटत असताना, साहा आणी पुजारा ने अफलातून भागीदारी करत मॅच जिंकून दिली शेष भारत संघाला. बॉलिंग - फिल्डींग चा दर्जा कसाही असला तरीही चौथ्या इनिंग मधे ४०० च्या आसपास टारगेट चेस करणं, शतक-द्विशतक झळकावणं नक्कीच स्पेशल असतं.
चौथ्या इनिंग मधे ४०० च्या
चौथ्या इनिंग मधे ४०० च्या आसपास टारगेट चेस करणं, शतक-द्विशतक झळकावणं नक्कीच स्पेशल असतं. >> +१. साहा ने परत पटेल च्या वर टेस्ट साठी उडी घेतली असे म्हणू शकतो.
T20 साठी जवळजवळ पूर्ण नव्या रक्ताची टीम खेळवायला हवी होती. There is too much bench strength to waste. कौन कितने पानी मे हे पण दिसले असते.
"T20 साठी जवळजवळ पूर्ण नव्या
"T20 साठी जवळजवळ पूर्ण नव्या रक्ताची टीम खेळवायला हवी होती. " - सहमत. ६-७ जण तरी वन-डे च्या टीम मधलेच असतील. जडेजा आणी अश्विन ला अगदी शेवटी बदललं नसतं तर ९ जण वन-डे मधल्या प्लेयिनंग ११ मधलेच खेळले असते.
नेहरा ला घेतलय म्हणजे त्याला खेळवावंच लागेल. नेहरा ला प्रॅक्टीस मॅच मधे फिल्डींग करताना पाहीलं (भोग असतात एकेकाचे). पुण्यात पेशवे पार्क मधे पूर्वी एक फुलराणी नावाची छोटी ट्रेन होती मुलांना बागेतल्या बागेत फिरवणारी. डुगडुगत चालणारी, रमत गमत बागेला चक्कर मारणारी ती फुलराणी मला नेहराला पळताना पाहून आठवली. तितकाच डुगडुगत आणी रमत गमत बॉल च्या मागे दुडक्या चालीनं त्याचं ते 'वेगे वेगे धावू' चाललं होतं. मग बॉलच कंटाळून बाऊंड्री च्या अलिकडे थांबल्यावर नेहराने 'डाईव्ह मारून' तो थांबलेला बॉल अडवला आणी १० फूटावर असलेल्या दुसर्या फिल्डर कडे एक टप्पा रिले थ्रो केला. पारणं फिटलं डोळ्यांचं.
नेहरा ला प्रॅक्टीस मॅच मधे
नेहरा ला प्रॅक्टीस मॅच मधे फिल्डींग करताना पाहीलं (भोग असतात एकेकाचे). >>> लोल फेफ
१० फूटावर असलेल्या दुसर्या
फे फे
१० फूटावर असलेल्या दुसर्या फिल्डर कडे एक टप्पा रिले थ्रो केला >> रिले थ्रो ची आयडिया किवीज नि ऑस्ट्रेलियन्स ना नेहराकडूनच मिळाली असे ऐकलय
"रिले थ्रो ची आयडिया किवीज नि
"रिले थ्रो ची आयडिया किवीज नि ऑस्ट्रेलियन्स ना नेहराकडूनच मिळाली असे ऐकलय :D" - फरक ईतकाच आहे की ऑसीज माळरानासारख्या अफाट पसरलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड च्या बाऊंड्री लाईन वरून रिले थ्रो करतात. नेहराजी फिरोजशहा कोटलाच्या ३०-यार्ड सर्कल वरून सुद्धा ही अदाकारी दाखवतात.
>> ती फुलराणी मला नेहराला
>> ती फुलराणी मला नेहराला पळताना पाहून आठवली
अगदी अगदी!
दुसर्या एण्ड ने स्वत:चा
दुसर्या एण्ड ने स्वत:चा स्पेलही सुरू असताना इकडच्या बोलरच्या ओव्हर मधे फील्ड करताना डीप फाइन लेग वरून मैदानाचा अर्धा परीघ धावत येउन बाउन्ड्रीला बॉल अडवून एकाच स्मूथ अॅक्शन मधे थेट बोलरच्या हातात थ्रो केलेला कपिल आठवला.
थेट बोलरच्या हातात थ्रो
थेट बोलरच्या हातात थ्रो केलेला कपिल आठवला. >> कपिल आठवला पण यादव नाहि आठवला, आगरकर नाहि आठवला. मराठी माणूस मागे पडतो तो अशानेच
"डीप फाइन लेग वरून मैदानाचा
"डीप फाइन लेग वरून मैदानाचा अर्धा परीघ धावत येउन " - ह्या वर्णनावरून मला प्लेयिंग ११ मधे संधी मिळायच्या आधीचा आशिष कपूर आठवला (ह्या क्रिकेट च्या वेडापायी काहीही लक्षात रहातं.). राखीव खेळाडू म्हणून जेव्हा जेव्हा फिल्डींग ची संधी मिळायची, जी त्या काळात प्रभाकर, सिद्धू वगैरे संस्थानिक फिल्डर्स मुळे जरा जास्तच मिळायची, तेव्हा तेव्हा तो असाच, बॉल थर्ड मॅन बाऊंड्री पासून ते एक्स्ट्रा कव्हर बाऊंड्री पर्यंत कुठेही गेला, तरी धावत सुटायचा.
सहज म्हणून बघितलं तर आशिष कपूर ने त्याची शेवटची रणजी मॅच मुरली विजय, दिनेश कार्थिक आणी रविचंद्रन अश्विन बरोबर तमिळनाडू संघातून २००७ साली खेळलीये. बापरे!!
नेहरा फक्त त्याच्या
नेहरा फक्त त्याच्या बॉलिंगसाठी टीममधे आहे तेंव्हा आता पुढे सरका बर. जाडेजा त्याच्या फिल्डींग्साठी टींम मधे आहे असे तात्या म्हणाले होते ह्यावर चर्चा करायला घ्या
seriously एकही left arm fast बॉलर उरला नाहिये म्हणून परत नेहराकडे जावे लागते. पाकिस्तान किंवा किविज मधून एखादा आयात करता आला तर ......
Pages