क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण रशिद-डॉसन जोडी फुटतच नाही. चिकटून बसले आहेत.>>>

बहुतेक कोहली-जयंत सारखे रेकॉर्ड करायचा विचार दिसतोय त्यांचा देखिल!

५० च्या वर भागिदारी नेली आहे!

सकाळी विकेट पडल्या हे नशीब. एकूण पाहता 550+ वा डिक्लेअर करायच्या पोजिशनपर्यण्त खेळले असते तर सामन्यातील रंगत गेली असती. सामन्यात फक्त एकच संघ जिंकू शकतो आणि तो आपला नसणे ही जाम बोअर करणारी परिस्थिती असते. खास करून मालिकेचा निकाल अगोदरच लागल्यावर..
पण आता पुन्हा आपण 600-650 मारू आणि शेवटच्या दिवशी गुण्डाळू त्यांना म्हणत पुढचे दोन दिवस सामना एंजॉय करू शकतो. भले मग पाचव्या दिवशी सामना ड्रॉ का होईना. तो एक दिवस तेवढ बोअर होईल. आणि याचीच शक्यता जास्त आहे. खेळपट्टी खूप स्लो आहे, पाचव्या दिवशी तरी जान येईल की नाही शंका आहे.

अहो अजून दोनच दिवस झाले आहेत - एकदम ५ व्या दिवशी काय होईल याची काळजी कशाला?
एव्हढे सॅटेलाईट्स आहेत, कॉलेजमधे जाऊन डिग्री घेतली तर हवामानखात्याचे लोक म्हणतात जास्तीत जास्त दोन दिवसापर्यंतबद्दल नक्की बोलू शकतो.
तुमच्या जवळ क्रिकेटची पी एच डी होण्याइतके ज्ञान असेल पण सॅटेलाईट आहे का?
Happy

राहूलला बाद होताना पाहून रडू आले? कुणाची दृष्ट लागली? सोडून दिला असता तर कदाचित वाईड ठरला असता तो चेंडू!

Outside the off stump ball ला बॅट लावून पाहियाशिवाय चैन पडत नाही काही काही लोकांना. राहूलला कदाचित घाई झाली असेल २०० करण्याची! पण अगदी कोहली सुद्धा, काही घाई नसताना!

टाय >> ड्रॉ .. टाय म्हणजे बहुधा समसमान स्कोअरलाच बोलतात.
पण येस्स, तिथेच चालला आहे सामना. मी देखील वर हाच अंदाज वर्तवला होता. फार काहीसे घडेल या खेळपट्टीत असे वाटत नाही. ईंग्लंड अगदीच खांदे पाडून खेळले आणि आपल्याच कर्माने हरली तर, अन्यथा पाचवा दिवस खेळून काढणे त्यांनाही जड जाऊ नये. उद्या शेवटचा तासभर आपण त्यांना खेळायला दिले असेल आणि १७५ च्या आसपास लीड असेल असे वाटते..

कोहलीला परत फलंदाजी यायचा चान्सही नसल्याने त्याची विक्रमाची संधी हुकली ..

पाकिस्तानने मात्र धमाल उडवली. दिवस संपता संपता विकेट पडली नसती तर ऑस्ट्रेलियन्स आज झोपले नसते.

अफलातून खेळला राहूल. पार्थिव चं कौतुक आहे, १५०+ ओव्हर्स विकेटकीपिंग केल्यावर ५० ओव्हर्स बॅटींग केल्याबद्दल. करूण नायर ने सेंच्यूरी पूर्ण करावी उद्या. मला नाही वाटत विजय मोठा स्कोअर करेल, पण अर्धशतक जरी केलं, तरी तो आणी नायर मिळून डेफिसीट काढून टाकतील. सगळं मिळून ईंग्लंड ला शंभर-एक चा लीड बसेल असा माझा अंदाज आहे. तसं झालं तर ड्रॉ चे शक्यता जास्त आहे. बघू, हे सगळं 'अंदाज अपना अपना' चाललय.

>>बाकी राहूल, करूण नायर, पार्थिव पटेल ह्यांना बॅटींग चा भार वहावा लागेल.

फेफ, एकुणात मॅनेजमेन्ट आणि भारतीय प्लेयर्सनी तुझे ऐकायचे ठरवलेले दिसतेय आधी इशांत आणि मिश्राला आत घ्यायचा निर्णय आणि आता हा वरचा अंदाज !

बाकी राहूल, करूण नायर, पार्थिव पटेल ह्यांना बॅटींग चा भार वहावा लागेल. >>>> अरे हो की खरेच, तिघेही त्यांच्या एवरेज आणि अपेक्षेपेक्षा जास्त खेळले.

"फेफ, एकुणात मॅनेजमेन्ट आणि भारतीय प्लेयर्सनी तुझे ऐकायचे ठरवलेले दिसतेय आधी इशांत आणि मिश्राला आत घ्यायचा निर्णय आणि आता हा वरचा अंदाज !" - लॉटरी चं तिकीट काढायला हवं होतं मी Wink

आणि पाठोपाठ डाऊसनची पहिलावहिला कसोटी बळी देखिल मुरली विजय च्या रुपात!

मुरली विजय खेळणार नाही आणि नायरचे शतक हे देखील खरे ठरले.. लॉटरी आजही काढू शकता Happy

रिव्यू फालतूमध्ये फुकट घालवला. नायर बिचारा नवीन असल्याने त्याला नको घेऊ बोलू शकला नसेल. पण स्वत:लाही समजावे आपण स्टंपसमोर लॉक झालोय एवढे सोपे होते..

नायरचे द्विशतक! अभिनंदन!

इंग्रजी गोलंदाजांचा अंत पहातायेत दोन्ही फलंदाज!

मोईन अलीने फलांदाजीत शतक केले आता गोलंदाजी देखिल द्विशतक करायची संधी ! Wink

एकाच सामन्यात बोलिंग आणि बॅटिंग अशी दुहेरी शतकाची करामत प्रथमच असेल बहुदा! रेकॉर्ड तपासायला हवे!

पहिला भारतीय ज्यांने पहिल्यांदा शतक साकारल्यावर त्याला त्रिशतकात बदलले.

डिक्लेअर केला. आता ८ ओव्हर मधे १-२ विकेट सापडल्या तर ५व्या दिवशी मज्जा येईल

आणि इंग्रजांना ५ षटके फलंदाजीसाठी कोहलीने पाचारण केले!!!!
जरा दाहक ५ षटके ठरतील त्यांच्यासाठी!

पहिला भारतीय ज्यांने पहिल्यांदा शतक साकारल्यावर त्याला त्रिशतकात बदलले. >>>>

क्रिकेटच्या इतिहासात अजुन कुणी केलय का? पहिलेच शतक हे त्रिशतक???

पण कारकिर्दिच्या केवळ तिसर्‍याच कसोटीत त्रिशतक केलेला पहिलाच जगात! ह्यापुर्वी लेन हट्न ह्यांनी आपल्या ६ कसोटीत केले होते!

Pages