क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करुण नायर आणि जयंत यादव हे दोघे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे वजन वाढवणार यंदा Wink
आता उद्या मिश्राने कमाल दाखवावी.

करुण नायरचे खुप खुप अभिनंदन!

टेस्ट खेळत आहे भाऊ. टी -२० नाही Wink
जयंतचा चांस दिल्ली तर्फे खेळायचा कमी दिसतोय. पण अजिंक्य च्या डोक्याला शॉट मात्र लावला आहे. अर्थात एकाच इनिंग वरून करूणची अजिंक्य बरोबरची तुलना चुकिची आहे. कारण परदेशात जितका अजिंक्य सातत्याने खेळला आहे तितके आजच्या टीम मधले कोणीच खेळले नसेल.

नायर खूप फास्ट खेळलेला दिसतोय. दिवसभारात २०० धावा एकट्यानेच केल्या.
एकेकाळी भारत पूर्ण दिवस खेळून २०० धावा करायचा. Happy

बघायला मजा आली असणार.

>>टेस्ट खेळत आहे भाऊ. टी -२० नाही डोळा मारा

माहीत आहे मित्रा.... पण आपल्याकडे वजन वाढायला पुरते ते!
आणि साधेसुधे नाहीत तगडे परफॉर्मन्स आहेत राव!

भारीच तुडवला असणार .. ऑफिसमध्ये कोणीतरी मला बोल्ले की नायरचे त्रिशतक झाले तर मला ते द्विशतकच ऐकल्यासारखे वाटले. त्यावर वा वा छान छान बोल्लो आणि कामाला लागलो.. थोड्यावेळाने स्वत: स्कोअर चेक केला आणि शॉटच लागला डोक्याला Happy

मी मुरली विजय आउट झाला तोपर्यंत पाहात होतो. तेव्हा नायर चे शतकही झालेले होते. त्यानंतर तुफान धुतलेला दिसतोय. विशेषतः जडेजा आणि नायर ने १९ ओव्हर्स मधे १३०+ मारले शेवटी! जबरी.

तिकडे त्याआधी पाक-ऑसी मॅचही मस्त झाली. तीही पाहिली लाइव्ह ते शेवटचे सेशन.

टोटली! आणि ते ही बोलिंग रिस्ट्रिक्शन्स नसताना (लेग साइड बॉल्स "लीगल", ऑफ साइड वाइड चे नियमही वन डे इतके टाइट नसणे, नो बाउन्सर रूल्स, डिफेन्सिव्ह फिल्डिंग पाहिजे तशी लावू शकत असताना ई.)

नायर ने रोहितच्या डोक्यावर परत टांगती तलवार लावून टाकली. पण दोघेही available असतील तर रोहीतचीच वर्णी लागेल असे वाटते. पाअंडे नि नायर मधली स्पर्धा मात्र नक्की संपली टेस्ट्पुरती तरी.

साहा फीट झाल्यावर साहा कि पार्थीव हे ठरवणारे खूप शिव्या खाणार हे नक्की Happy

पान पसंद मोड ऑन, 'रोहित और टेस्ट क्रिकेट? कभी नही!'

विकेटकीपर म्हणून साहा आत येईल असं वाटतं.

पान पसंद मोड ऑन, 'रोहित और टेस्ट क्रिकेट? कभी नही!'>>> अगदी अगदी
त्याचा एकुण टेस्ट पर्फोर्मन्स बघता तो कायम चूर्ण चा ब्रँड अ‍ॅम्बसेडर होउ शकतो

पान पसंद मोड ऑन, 'रोहित और टेस्ट क्रिकेट? कभी नही!'>> Biggrin
रोहीत चे आवडते महिने येऊ घातले आहेत. जानेवारी ते मार्च च्या दरम्यान तो त्या वर्षभराचं एकदमच खेळून आपली जागा त्या संपूर्ण वर्षभरासाठी पक्की करुन ठेवतो Light 1

साहा आत येणे मुश्किल आहे.

कारण एकी कडे लोकेश आहे तर दुसरीकडे पार्थिव दोघांनी चांगलीच गोची केली आहे. पार्थिव तर ओपनिंगला सुध्दा येऊ शकतो. तसे साहाचे नाही. पार्थिव किपिंगच्या मामल्यात साहा पेक्षा उजवा आहे तर लोकेश पेक्षा साहा उजवा आहे.

रोहीत ला टेस्ट मधे फुलवण्यापेक्षा त्याला टी२० आणि वनडे मधे जास्त फुलवले तर ते फायद्याचे ठरेल.

धोनी च्या आधी आणि नंतर आपल्याकडे "बरे" च किपर आहे. धोनीच्या जवळापास जाणारा किपर बनायला साहाला किमान ४-५ वर्ष तरी जातील.

४-० फज्जा इन्ग्रजांचा आणि हा सामना तर चांगल्या खेळपट्टीवर होता! काय इथेच नायरने दिवसभरात एकट्याने २३४ धावा जमवलेल्या!

अप्रतिम विजय! व्हॉट अ गेम!

"साहा आत येणे मुश्किल आहे. कारण एकी कडे लोकेश आहे तर दुसरीकडे पार्थिव दोघांनी चांगलीच गोची केली आहे. पार्थिव तर ओपनिंगला सुध्दा येऊ शकतो. तसे साहाचे नाही. पार्थिव किपिंगच्या मामल्यात साहा पेक्षा उजवा आहे तर लोकेश पेक्षा साहा उजवा आहे" - लोकेश राहूल टेस्ट च्या दर्जाचा विकेटकीपर नाहीये. आयपीएल किंवा गरज लागली तर बदली विकेटकीपर म्हणूनच ठीक आहे. पार्थिव ने गेल्या दोन मॅचेस मधे बॅटींग चांगली केली हे खरय. पण तो जेव्हा बाहेर गेला होता, तेव्हा सुद्धा बॅटींग चा परफॉर्मन्स घसरल्यामुळे नाही, तर किपींग चा दर्जा सब-स्टँडर्ड असल्यामुळे गेला होता. अजुनही त्याची विकेटकिपींग 'ठीक' च आहे, विशेषतः स्पिनर्स च्या बॉलिंग च्या वेळी.

"धोनीच्या जवळापास जाणारा किपर बनायला साहाला किमान ४-५ वर्ष तरी जातील." - धोनी कीपर म्हणून, बॅट्समन म्हणून आणी कॅप्टन म्हणून सुद्धा टेस्ट मधे ठीक ठीक च होता. (वन-डे मधे जरी त्याचं कीपर-बॅट्समन-कॅप्टन म्हणून त्याचं स्थान वादातीत असलं तरी).

धोनी कीपर म्हणून, बॅट्समन म्हणून आणी कॅप्टन म्हणून सुद्धा टेस्ट मधे ठीक ठीक च होता. (वन-डे मधे जरी त्याचं कीपर-बॅट्समन-कॅप्टन म्हणून त्याचं स्थान वादातीत असलं तरी).
>>>>
सहमत आहे.
पण तरीही उपलब्ध पर्यांयात तो चांगला होता हे देखील खरेय. एक पॅकेज म्हणून तरी नक्कीच.

सध्या कीपींग पाहता साहाच उत्तम पर्याय आहे. तो स्वतःही काही वाईट फलंदाज नाहीयेच, आणि एखादा त्यापेक्षा चांगला फलम्दाज निपजलाच तर थोड्याश्या अतिरीक्त फलंदाजीसाठी विकेटकीपरच्या जागेशी खिलवाड करण्यात अर्थ नाही.
अर्थात, साहाची कीपींग देखील फार अव्वल आहे अश्यातला भाग नाही.

ते काही असो, पण आजचा दिवस सर जडेजा यांचा Happy

सात विकेट तर सात विकेट, झेलही अफलातून !!!

नायरचे त्रिशतक कागदावरचा एक विक्रम बनून राहिला असता जर आज सर जडेजाने आपल्याला जिंकवून दिले नसते. मालिकेत दोनदा मॅचविनर कामगिरी आणि ईतरवेळी महत्वाचा सपोर्टींग रोल. अजूनही लोकं त्याच्या जागेबद्दल शंका घेतात कसे मला समजत नाही Happy

परदेशात खेळताना खेळपट्टीचा नूर जिथे त्याला साजेसा असेल तिथे तो आश्विनपेक्षा सरस ठरू शकतो. त्यामुळे पाच बॉलर पॉलिसीमध्ये परदेशातही तो आश्विनच्या जोडीला हवाच

फे फे ला साहाबद्दल अनुमोदन. लोकेश राहुल किंवा पार्थीव साहाच्या आजू बाजूलाही उभे राहू शकत नाही फक्त किपिंगचा प्रश्न असेल तेंव्हा. "अर्थात, साहाची कीपींग देखील फार अव्वल आहे अश्यातला भाग नाही" ह्याबद्दद्दल तू इतर किपर्सचे बोलणे ऐकच (गूगल इट). पार्थीवच्या बॅटींग्बद्दल (किंवा त्याच्या टीमसाठी काहीही करण्याबद्दल) कधीच शंका नव्हती नि नसावी, तो मागेही बाहेर गेला तो किपिंगमुळे. ती सुधारली असली तरी अजूनही हाफ चान्सेस घेण्यामधे तो कमी पडतो. भारतातली गोष्ट सोडून द्या पण बाहेर गेल्यावर जेंव्हा अश्विन नि जाडेजा हे सपोर्ट बॉलर बनतील नि शमी, यादव, शर्मा, भुवी हे मुख्य बॉल्रस बनतील अशा वेळी बॉलिंग तेव्हढीच प्रभावी राहणार नसल्यामूळे येणारा प्रत्येक हाफ चान्स घेणे मह्त्वाचे ठरणार असल्यामूळे सगळे बॅट्समन फीट असतील तर साहा फ्र्स्ट चॉईस म्हणून आत येईल असे माझे मत आहे.

अजूनही लोकं त्याच्या जागेबद्दल शंका घेतात कसे मला समजत नाही >> काढ तू चिमटे काढ., एका नवीन बाफाचा विषय होउ शकतो हे लक्षात आले का ? Wink

"काढ तू चिमटे काढ" - Wink

तुला कळलय, हे मला कळलय. टेस्ट क्रिकेट विषयी बोलत असताना, ऑफ स्टंप च्या बाहेरच्या बॉल ला बॅट लावायची नाही ईतकं जरी संभाळलं तरी पुरेसं आहे. Happy

Happy फे फे . कूकने जाडेजाला दिलेली दाद जबरदस्त आहे. सम्स ईट अप पर्फेक्ट्ली. What is strange is Jadeja has ended up close to Ashwin's wicket tally with no fuss for this series.

भाऊ ह्या सिरीजपुरता तरी टॉस, पिच ह्याबाबत तुम्हाला टीका करायला काहीच जागा ठेवली नाही भारताने.

जबरी विजय. साधारण ५०/० पर्यंत काल पाहात होतो. जिंकतील असे वाटले होते, कारण इंग्लंड दिवसभर टिकेल याची शक्यता कमी होती.

आश्विन ला glorious uncertainties of cricket जाणवल्या असतील. इतक्या भारी परफॉर्मन्स नंतर घरच्याच मैदानावर पूर्ण मॅच मधे २००/१. वॉर्न चा सिडनेचा परफॉर्मन्स आठवला (१९९२)

पूर्ण मालिकेत ग्रेट परफॉर्मन्स ! शाब्बास पोरानो, आगे बढो !! [ इंडीयासाठी ३ दिवसांच्याच टेस्ट ठेवाव्यात ही इंग्लीश माध्यमांची पूर्वीची कुचेष्ठा ज्याना झोंबली होती, त्या माझ्यासारख्याना तर या भारतीय संघाने आत्यंतिक आनंद दिला आहे !] चांगल्या विकेटस, प्रथम फलंदाजी मिळूनही इंग्लंड भारताविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात कांहींही प्रभाव टाकूं शकला नाही ! मनःपूर्वक अभिनंदन !!

Pages