Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनि मस्त सजेशन्स. करून बघेन.
धनि मस्त सजेशन्स. करून बघेन.
प्रवासात नेता येतील असे
प्रवासात नेता येतील असे पदार्थ सुचवणारा धागा आहे का? मला सर्च मध्ये काही सापडले नाही पण पूर्वी चर्चा झाल्याचे आठवते आहे.
विविध धाग्यांवर विखुरलेल्या पोस्टसवरून जरा आयडियाज मिळाल्या
संपदा, तसा वेगळा धागा नाही
संपदा, तसा वेगळा धागा नाही निघालेला अद्याप. परंतु युसुयुसां, पाकृ धाग्यांवर विस्कळित माहिती, सुचवण्या आहेत बर्याच. रेडी टू ईट, रेडी मिक्स, टिकाऊ पदार्थ, प्रवासी पदार्थ वगैरे शब्दखुणा.
हा एक जुना धागा मिळाला :
http://www.maayboli.com/node/17023
थँक्स अकु
थँक्स अकु
पूर्वी चर्चा झाल्याचे आठवते
पूर्वी चर्चा झाल्याचे आठवते आहे.
<<
हो. आहे असा धागा.
आय थिंक सोबत ज्येष्ठ नागरिक की लहान मुले आहेत वगैरे धागा होता. मी झोमॅटोची वेबसाईट अन क्रेडीटकार्ड न्या असा रिस्पॉन्स दिल्याचं आठवतंय. प्रवासात जाऊन लोकल फूड चाखलं नाही तर काय मजा? असा प्रश्नही उपस्थित केल्याचं आठवतंय.
शोधून पाहतो. सापडला तर देतो लिंक.
kuni mala ambadi chya laal
kuni mala ambadi chya laal fulachi chatani chi recipe sangata ka please
मंजुडी, अमा आणी मेधा खुप
मंजुडी, अमा आणी मेधा खुप धन्यवाद.. घरी मैत्रीण आली होती तिला फ्रुट केक फार आवडतो त्यामुळे तिच्यासोबत बांधुन देउन मी सुटले
मी एकदा "पन्चमेल दाल" ची
मी एकदा "पन्चमेल दाल" ची रेसीपी बघीतली होति. कुथे सापडेल?
घरात भरपुर मोठी ताजी हिरवीगार
घरात भरपुर मोठी ताजी हिरवीगार पार्सलेची गड्डी आणि जवळ जवळ १ किलो ब्रोकोली आलं आहे? काय करु? कशात वापरु? ब्रोकोली लवकर नाही वापरली तर पिवळी पडुन खराब होवुन जाते, नाही तर रोजच्या सलाड मधे वापरण्यासाठी आठवडाभर ठेवली असती. मी एकटीच आहे त्यामुळे संपवायला अजुनच अवघड. जास्त कंझ्युम केल्याने या दोन भाज्यांचे काही गैरफायदे नाहीत ना?
रेसिपी सुचवणार असाल तर सांगुन ठेवते कि एक मोठी झुकिनी, २५०ग्रॅम मश्रुम्स, पर्पल कॅबेज, चेरी टोमॅटोज इ इ बरंच काही आहे. एका माणसासाठी विकत का आणलं हे मात्र विचारु नका. एका मित्राने हौशी ऑरगॅनिक शेती चालु केली आहे, ती अचानक इतकी पिकायला लागली आहे कि तो एक भला मोठा बॉक्स भरुन भाज्या आणुन आदळतोच. बरं यातली एकही भाजी पोळी बरोबर खाता येइल अशी नेहमीची नाही, त्यामुळे काय बनवावं हा महान वैताग असतो.
मनीमाऊ, ब्रोकोली स्टिम करुन
मनीमाऊ, ब्रोकोली स्टिम करुन नाहीतर चक्क फ्लॉवर सारखी करुन बघ. थोडी उग्र लागते पण मसाला असेल तर बरी लागते. झुकिनीच्या रेसेपीज आहेत नेटवर. बाकी मश्रुम चीज घालुन परत नाहीतर रवा मश्रुम कर माशांसारखे. चेरी टॉमेटोज येता जाता सॅलेड म्हणून खा.
मनीमाऊ, एवढ्या छान भाज्या
मनीमाऊ,
एवढ्या छान भाज्या मस्त सॅलड करा. पास्ता सॅलड केले तर पोटभरीचे जेवण होइल.
ब्रोकोलीचे तुरे फ्रीज करुन ठेवले(फ्रीजर मधे) तर स्टर फ्राय , फ्राईड राईस, तवा राईस मधे घालता येतील. मश्रुम , झुकीनी देखील असेच फ्रीज करुन गरज पडेल तेव्हा वापरता येतात. मी झुकीनी सांबारमधे घालते. झुकीनी किसून त्याची थालीपिठे, मुठीया देखील छान होतात. भजी तर मस्तच लागतात. मश्रुमची मालवणी मसाला घालून मस्त भाजी होते. किंवा स्ट्फ मश्रूम, सूप असेही करता येइल. पर्पल कॅबेजची कोशिंबीर छान होते. मी थालीपिठातही घालते. पर्पल कॅबेज अणि गाजर कोलस्ला पण मस्त होतो.
मायबोलीच्या शोध या सुविधेचा वापर केल्यास ब्रोकोली, मश्रूम वगैरेच्या भरपूर पाककृती मिळतील.
ब्रोकोलि लसुण आणि पेपर
ब्रोकोलि लसुण आणि पेपर फ्लेक्स वर परतुन खायची( जास्त शिज्वौन नका!) किवा चेडार ब्रोकोली सुप करता येइल
ब्रोकोली पराठे , स्तीर फ्राय नुडल्,राइस मधे घालता येइल.
१. ब्रोकोली स्टर फ्राय २.
१. ब्रोकोली स्टर फ्राय
२. ब्रोकोली सूप
३. वाफवलेली ब्रोकोली सीझनिंग भुरभुरून
४. पास्ता / नूडल्स / राईसमधे ब्रोकोली ढकलणे.
पार्सलेची लसूण, हिरवी मिरची, मीठ, साखर घालून चटणी, लिंबाचा रस आयत्या वेळी पिळून घेणे. फ्रीजमधे टिकू शकेल. कोथिंबीर ऐच्छिक.
रश्मी, स्वाती, प्राजक्ता &
रश्मी, स्वाती, प्राजक्ता & अरुंधती, थँक्यु ! तुमच्या चॉघिंच्या टिप्स कामाला येणार आहेत.
रश्मी, पराठे करुन पहाते. भाजी नाही आवड्णार त्याच्या उग्र वासामुळे.
प्राजक्ता, आज रात्री ब्रोकोली सुप नक्की.
आज ड्ब्यामधे सलाड विथ रोस्टेड चिकन आणलं आहे. थोडंसं सिझनिंग वापरुन यम्मी झालं आहे.
बाकी भाज्यांची क्वांटिटी फार नाही, फक्त ब्रोकोली आणि पार्सलेच जास्त आहे. स्वातीने लिहिल्याप्रमाणे ब्रोकोली डीप फ्रीझरला टाकते आणि अकुने लिहिल्याप्रमाणे पार्सलेची चटणी. ही सलाड बरोबर चांगली लागेल.
या दोन्ही भाज्यांचे काही गैरफायदे नाहीत ना? जसं कि अॅसिडिटी होणे, थंड्/उष्ण असणे इ इ. एकटीने एवढ्या मोठ्या क्वांटिटीमधे संपवायच्या आहेत म्हणुन जपुन खाव्यात का? नाहीतर सुप्स आणि सलाड्स हेच लंच आणि डिनर करणार रोज.
26 जानेवारीला हळदी कुंकु
26 जानेवारीला हळदी कुंकु ठरवले आहे. काहीतरी तिरंगी मेनू सुचवा ना.. गाजर-टोमॅटो/काजू-कोबी/पालक घालून 3 वेगवेगळे पुलाव करेन बहुतेक. आणि serve करताना एका खाली एक असे देईन. अजून काय करता येईल? आणि असेच काहीतरी वाण देखील सुचवा.. तिरंगी थीम ठेवायची आहे.
२१ जाने. ला लेकिबोर नहान थरवल
२१ जाने. ला लेकिबोर नहान थरवल आहे,,, तरि मेनु सुचवा..
व्हेज कबाब ,, बरोबर अजुन काय करता येइल ?
शकस्नक, स्नाक म्हनुन ,,, जेवन नको...
जिथे जाल तिथले खा या मताची
जिथे जाल तिथले खा या मताची मीही आहे तरी एक सांगावेसे वाटतेय. प्रवासात किंवा फिरायला गेल्यावर आपल्यासारखे नॉन वेज खाणारे लोक आपापली पोटे भरू शकतात पण फक्त वेजी असणाऱ्यांचे खूप हाल होतात. माझ्या नणंदेचे झालेले हाल मी पाहिलेत. Vej जवण देणारे हॉटेल नेमके कुठे याचा अंदाजे पत्ता घेऊन वणवण भटकंती आणि शेवटी हॉटेल सापडले कि त्यात जे मिळेल ते निमूट घशाखाली ढकलायचे. त्यामुळे ज्यांना बाहेरचे जमत नाही त्यांनी प्रवासात स्वतःबरोबर खादाडी नेलेली बरी.
@माणिकमोति, तिरंगी ढोकळा
@माणिकमोति, तिरंगी ढोकळा सँडविच आणि तिरंगी बर्फी मिळते तयार. तिरंगी हलवा ही मिळतो संक्रांती च्या दिवसात.
मनिमाऊ, कल्पना नाही गं मोठ्या
मनिमाऊ, कल्पना नाही गं मोठ्या प्रमाणात ब्रोकोली / पार्सले खाण्याचे काही दुष्परिणाम असतील तर. चटणी फ्रीझ केलीस तर नंतरही वापरता येईल.
माणिकमोती, तिरंगी स्प्राऊट चाट करू शकता. तिरंगी सलाद ठेवू शकता. (कोबी, गाजर, मटार). तिरंगी वड्या ठेवू शकता. तिरंगी ढोकळा, तिरंगी सँडविच, तिरंगी इडली चटणी, तिरंगी उत्ताप्पे, तिरंगी करंज्या यांपैकी काहीही तिरंगी थीममध्ये ठेवू शकता. कटलेट्स, टिक्की प्रकारातही वेगवेगळी सारणे / भाज्या / चटण्या / फूड कलर वापरून तिरंगी काँबो करू शकता.
cha, व्हेज कबाब सोबत तुम्ही
cha, व्हेज कबाब सोबत तुम्ही छोले पुरी ठेवू शकता. गाजर हलवा.
किंवा मटार उसळ पुरी.
हाताने उचलून खाण्यासारखा पदार्थ हवा असेल तर मग मटार करंजी किंवा सँडविच ढोकळा. कचोरीही ठेवू शकता.
पाणी-पुरी / चाट.
माणिकमोती, मी मुलीच्या
माणिकमोती, मी मुलीच्या संक्रांतीला (२६ जानेच) ताटलीत वड्यांचा तिरंगा केला होता. खोबर्याच्या पांढर्या शुभ्र वड्या , आमरस घालून केशरी अन पिस्तारव्याच्या हिरव्यावड्या व लवंगांचे चक्क, गाजराचा मधला दांडा खांब म्हणून! एकावर एक थर देऊन वड्या आधी करुन ठेवता येईल.गुळाच्या ढेपेला टुथपिकने बोर वै लावून फ्लॉवरपॉट हलवा(रंगबिरंगी) भेलीला चिकटवून डेकोरेट केलं..
रावी, अकु, मंजूताई, खुप खुप
रावी, अकु, मंजूताई, खुप खुप धन्यवाद!! फाइनली काय केलं ते इथे लिहेन..
सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा
सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा पंच क्रोशीतल्या सर्व इंडिय ग्रोसरी मधे चिकीचा गूळ शोधला परत. ऑर्गॅनिक गूळ, कोल्हापुरी गूळ, गुळाची पावडर हे प्रकार मिळाले पण चिक्कीचा गूळ मिळाला नाही.
चिक्कीचा गूळ बनवण्याची प्रोसेस काय आहे कोणाला माहिती आहे का? उसाच्या रसापासूनच बनत असेल तर साधा गूळ वापरुन तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या का जमत नाहीत ?
साधा गूळ वापरून जमतात वड्या.
साधा गूळ वापरून जमतात वड्या. मी त्याच करते. दाण्याचं कूट घालते थोडं म्हणजे मिळून येतात. या मऊ वड्या.
खुटखुटीत वड्यांसाठी (ब्रिटल्स) सिंडरेलाची रेसिपी मस्त आहे.
साधा गूळ वापरुन तिळाचे लाडू
साधा गूळ वापरुन तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या का जमत नाहीत ?>>>>>>>साधा गूळ घालून तिळाच्या वड्या होतात.फक्त मऊ होतात.
पावडरीच्या वड्या नीट होत
पावडरीच्या वड्या नीट होत नाहीत. ढेप असेल गुळाची तर होतात चांगल्या. चिक्कीचाच गूळ असला पाहिजे असं नाही.
साखरेच्या अगदी सोप्या वड्याची
साखरेच्या अगदी सोप्या वड्याची रेसिपी आहे देवु?
>> साधा गूळ वापरून जमतात
>> साधा गूळ वापरून जमतात वड्या. मी त्याच करते. दाण्याचं कूट घालते थोडं म्हणजे मिळून येतात. या मऊ वड्या.
अशी एक रेसिपी साखर वापरून रुचिरा मध्ये दिली आहे पण रुचिरा च्या काही रेसिपीज् कधी कधी अॅक्युरेट वाटत नाहीत किंवा मला जमत नाहीत.
>> साखरेच्या अगदी सोप्या वड्याची रेसिपी आहे देवु?
ह्यांच्या प्लीज रेसिपीज् द्या.
प्राजक्ता, साखरेऐवजी गुळाची पावडर कशी वापरता येईल ते माहित असेल तर तेही दे.
थँक्यू!
गुळाच्या पोळ्यान्ची क्रुती
गुळाच्या पोळ्यान्ची क्रुती कुणी टाकलीय का?आसेल तर लीन्क प्लीज....
@दीपाकुल, मन:स्विनी ची आहे.
@दीपाकुल, मन:स्विनी ची आहे. http://www.maayboli.com/node/13162 .
Pages